(ठेव दरवाजा खुला...)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
28 Apr 2009 - 9:30 pm

आमची प्रेरणा 'ठेव दरवाजा खुला...' ही भूषण कटककर यांची सुंदर गजल! ;)

जाहले आहे कठिण, मी भेटणे म्हणजे तुला
बेरकी बापुस कधीचा शोधतो आहे मुला!

मी सदा वाईट ठरतो, चांगला ठरतो कधी?
बंधुराजे गाठ पडता, ठणकतो माझा कुला

दूरदर्शन व्हायचे मज तेवढी होती मुभा
हलवताना हात दिसली दूरच्या कोणा मुला

रोजचा हा सीन, देते पोरगी हुलकावणी
मारते फाट्यावरी पण मारते तोवर डुला!

छापकाटा चालला आहे नशीबाचा असा
वाट का मी बघत राही रातचा लकडी पुला!

रोज काटे टोचती जे आज देखिल टोचले
का पुन्हा मी हासलो पण आज दिसलेल्या फुला

हाय! ह्या गजलेवरी, वदलाच 'रंग्या' शेवटी
पाडण्या वीडंबना मज ठेव दरवाजा खुला!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

28 Apr 2009 - 11:54 pm | संदीप चित्रे

या वेगाने तर तुझा फक्त विडंबनांचा संग्रह प्रसिद्ध करता येईल

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 1:40 am | श्रावण मोडक

एखादे इतके सुंदर जमून जाते की, वेगळ्या स्वतंत्र रचनेतही बसावे:
रोज काटे टोचती जे आज देखिल टोचले
का पुन्हा मी हासलो पण आज दिसलेल्या फुला

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 1:55 am | बेसनलाडू

दोन्ही शेर ह ह पु वा झालेत. फुलाचा शेर विडंबन/हझलेतला म्हणून न शोभता गझलेतला म्हणूनही चालून जाईल.
(आस्वादक)बेसनलाडू
'वी'डंबन खटकले/ते. पोएटिक लायसन्सचा स्वैराचार वाटू नये, इतपत काळजी रचनाकर्त्यांनी स्वतःच घ्यायला हवी, असे मनापासून वाटते.
(मनस्वी)बेसनलाडू

केशवसुमार's picture

29 Apr 2009 - 4:29 am | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम झकास विडंबन.. चालू दे..
केशवसुमार
(स्वगतः केश्या रंग्याने तुझा 'बापा' 'आय पी' ढापला)

अवलिया's picture

29 Apr 2009 - 6:57 am | अवलिया

रंगाशेठ,
एकदम झकास विडंबन..

--अवलिया

आंबोळी's picture

29 Apr 2009 - 10:43 am | आंबोळी

रंगूनाना,
झकास झालय.
आंबोळी

काळा डॉन's picture

29 Apr 2009 - 10:47 am | काळा डॉन

च्यामारी केसु आणि रंगा मध्ये एकाच विडंबनाची स्पर्धा सुरू आहे... सध्या तरी प्रतिसाद संख्येत रंगा आघाडीवर आहे..:P

स्पर्धेचा निकाल उद्या :>

चतुरंग's picture

29 Apr 2009 - 10:16 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : रंग्या, 'बापा' हा ओपन सोर्स कोड असताना गुर्जी ढापला का बरं म्हणतात? :W )

चतुरंग

लिखाळ's picture

29 Apr 2009 - 10:34 pm | लिखाळ

वा .. मजा आली :)
-- लिखाळ.