बालगीत

दवबिन्दु's picture
दवबिन्दु in जे न देखे रवी...
6 Apr 2009 - 3:19 pm

कविता स्वताच्या जबाबदारीवर वाचवी.

१ होती उ आणि १ होती टु,
दोघी गेल्या फिरायला,
उ ला सापडला रुपया,
उ म्हणाली आईला -
आई, आई, याचं काय करु ?
आई म्हणाली आण जा भाजी.

उ : आई मी भाजी आणली.
धुवु कशी ?
सपासपा.

चिरु कशी ?
कराकरा.

शिजवु कशी ?
रटा रटा.

खाऊ कशी ?
मटा मटा.

झोपु कशी ?
डाव्या कुशी.

पादु कशी ?
ढुम्मदिशी.

(लोकगित)

कविताबालगीतमुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

6 Apr 2009 - 4:08 pm | आनंदयात्री

हा हा हा .. एक नंबर लोकगित/बालगीत !!

-
(पाद्रा) आंद्या

दवबिन्दुजी..
शेवटच्या कडव्यातील , पहिल्या चरणातील प्रश्नचिन्ह नसते तरी चालून जाते.
अशा गोष्टी विचारायच्या थोड्याच असतात ;)

अवांतर : बालगीत / लोकगीत वाचून मजा आली.
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

यन्ना _रास्कला's picture

7 Apr 2009 - 5:31 am | यन्ना _रास्कला

बालगोपाळांना आवडेल असे बालगीत आहे. पादणे या संकल्पनेवर नाहि हसले तर ते लहान मुल समजुच शकत नाही आपण.

सुनील's picture

7 Apr 2009 - 11:52 am | सुनील

छान बडबडगीत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उमेश कोठीकर's picture

7 Apr 2009 - 12:29 pm | उमेश कोठीकर

छान बालगीत.