(कहर)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 8:07 pm

अर्पिलास जरी तुझा अकल्पित कहर मला तू,
रिती तरीही निबंद प्रतिभा माझी राहिली कशी?
टंकताना प्रतिसादाचे नव्हते भान मजला,
आता हे अवैचारीक प्रतिसाद राहू दे तुझ्याचपाशी!

कुपितले, खिशातले लेख आगळे
कसे , कधी अन कुणी टंकले, कुणास ठावे?
खरडीखरडींवरी आवाहनाच्या कळ्या ठेवुनी,
उडून गेले ते वैचारीक समुपदेशनवाले

उधळलीस तू विडंबने माझ्या भग्न मनावर
तुरट कडवट नासक्या शेंगदाण्याची
काय करू मी? तरी पुन्हा टंकतो नव लेखाला
चिरंजीव प्रेरणा कुपितल्या मनाची

आवाहनांच्या पायघड्यांच्या सजवल्या वाटा,
नशिबात तो कडु गंध, तो नासका शेंगदाणा
लेख निसटावे तसे विडंबन ते निसटून गेले,
'खव'त एक दाटला समुपदेशन कोपरा

या लेखाचे प्राण कोमेजून गेले
समुपदेशनाने तुझ्या दिलासा कसा मिळावा?
मनीमानसी ग्रीष्मदाह आजन्म सोसता,
तूच सांग, प्रतिसाद हा कसा मिळवावा?

प्रेरणा :- क्रांतीबै चा बहर

(वरिल विडंबनाचा कुठल्याही जिवंत अथवा मृत मिपावासीयाशी संबंध नाही, जर आढळल्यास तो एक योगायोग समजावा.)

विडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Mar 2009 - 10:40 pm | टारझन

परा भौ .. शरम वाटली णाही ... उत्तम ...

(शरमनाक) टारझन

नाना बेरके's picture

15 Mar 2009 - 10:53 am | नाना बेरके

रंगपंचमीला धुळवड खेळ्ळी
आन् चिकुलामंदी माकडे लोळ्ळी

वरील प्रतिसाद कुठल्याही जिवंत अथवा मृत माकडाशी संबंध नाही, जर आढळल्यास तो एक योगायोग समजावा

अनंता's picture

15 Mar 2009 - 11:22 am | अनंता

छान, मस्तच, आवडले म्हणणारांचा निशेध !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Mar 2009 - 11:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जमलंय रे परा! :-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

क्रान्ति's picture

15 Mar 2009 - 1:12 pm | क्रान्ति

कहर केलास परा! इतक्या झटपट प्रतिसाद! चालू द्या! जमल खासच हं!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

क्रांती बै, खरे तर करणार न्हवतो विडंबन पण काही जुन्या 'हितचिंतकानी' येउन भरीला घातले हो ;)

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सगळ्यांचे धन्यवाद !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य