(कहर)
लेखनविषय:
अर्पिलास जरी तुझा अकल्पित कहर मला तू,
रिती तरीही निबंद प्रतिभा माझी राहिली कशी?
टंकताना प्रतिसादाचे नव्हते भान मजला,
आता हे अवैचारीक प्रतिसाद राहू दे तुझ्याचपाशी!
कुपितले, खिशातले लेख आगळे
कसे , कधी अन कुणी टंकले, कुणास ठावे?
खरडीखरडींवरी आवाहनाच्या कळ्या ठेवुनी,
उडून गेले ते वैचारीक समुपदेशनवाले
उधळलीस तू विडंबने माझ्या भग्न मनावर
तुरट कडवट नासक्या शेंगदाण्याची
काय करू मी? तरी पुन्हा टंकतो नव लेखाला
चिरंजीव प्रेरणा कुपितल्या मनाची
आवाहनांच्या पायघड्यांच्या सजवल्या वाटा,
नशिबात तो कडु गंध, तो नासका शेंगदाणा
लेख निसटावे तसे विडंबन ते निसटून गेले,
'खव'त एक दाटला समुपदेशन कोपरा
या लेखाचे प्राण कोमेजून गेले
समुपदेशनाने तुझ्या दिलासा कसा मिळावा?
मनीमानसी ग्रीष्मदाह आजन्म सोसता,
तूच सांग, प्रतिसाद हा कसा मिळवावा?
प्रेरणा :- क्रांतीबै चा बहर
(वरिल विडंबनाचा कुठल्याही जिवंत अथवा मृत मिपावासीयाशी संबंध नाही, जर आढळल्यास तो एक योगायोग समजावा.)
वाचने
1838
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
परा भौ ..
परा.रा..रा, लैच घाण विडंबन
छान, मस्तच, आवडले..
जमलंय रे
कहर!
In reply to कहर! by क्रान्ति
क्रांती