तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Feb 2009 - 11:26 pm

आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..!

काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...!

तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!

ती..!

जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती
इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसारा वाटतो..!

आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण..

....कारण आम्ही तिला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे!

आज या लावण्याच्या खाणीला तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार याद करत आहे...

सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.

कलासद्भावनाशुभेच्छाआस्वाद

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

14 Feb 2009 - 11:53 pm | योगी९००

हि नवीनच माहिती मिळाली मला..

मधुबालेला जन्मदिनानिमित्त अभिवादन..

तात्या..आपल्या दोघांचा ही व्हॅलेन्टाईन डे वरील लेख एकाच वेळी मि.पा.वर आला.

खादाडमाऊ

अविनाशकुलकर्णी's picture

15 Feb 2009 - 12:04 am | अविनाशकुलकर्णी

वा .....यादे ताजा कर दि आपने.....Beauty Divine......
avinash

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 11:24 am | विसोबा खेचर

Beauty Divine......!

दशानन's picture

15 Feb 2009 - 8:01 am | दशानन

तात्या,

त्या महान कलाकाराला व तीच्या अनुपम सुंदरतेला सलाम !

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 9:00 am | पिवळा डांबिस

परकीय व्हॅलेंटाईन डे म्हणून ना सही......
पण तुमच्या आवडत्या मधुबाला नामक अप्सरेचा जन्मदिवस म्हणून तरी हा दिवस लोकांनी त्यांच्यामधील प्रेमभावनेला समर्पित केला तरी चालेल.....
उगाच "भारतीय संस्कृती" वगैरे मध्ये न आणता....
कुणाच्याही कोंबड्याने का होईना, उजाडल्याशी कारण......
:)

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 11:04 am | विसोबा खेचर

पण तुमच्या आवडत्या मधुबाला नामक अप्सरेचा जन्मदिवस म्हणून तरी हा दिवस लोकांनी त्यांच्यामधील प्रेमभावनेला समर्पित केला तरी चालेल.....

अगदी!

इन फॅक्ट आम्ही तर असंही म्हणू की तिच्या जन्मामुळेच १४ फेबच्या प्रेमदिनाला खर्‍या अर्थाने शोभा प्राप्त झाली आहे! :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 11:16 am | पिवळा डांबिस

इन फॅक्ट आम्ही तर असंही म्हणू की तिच्या जन्मामुळेच १४ फेबच्या प्रेमदिनाला खर्‍या अर्थाने शोभा प्राप्त झाली आहे!
पुन्हा म्हणतो, कुणाच्याही कोंबड्याने का होईना, उजाडल्याशी कारण......
:)
ते भारतीय संस्कृती वगैरे रुद्राक्ष रूदन पाहून कंटाळा आला हो.....
आयला, वर्षातून एक दिवस तरी रसिकतेने प्रेमात घालवा की!!!!!
लग्नाची,बिनलग्नाची , समलिंगी, विषमलिंगी, आम्ही ते कायपण विचारत नाही....
फक्त प्रेमभावनेत एक दिवस घालवा इतकंच.....
काय जास्त आहे का हे विचारणं?

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 11:20 am | विसोबा खेचर

आयला, वर्षातून एक दिवस तरी रसिकतेने प्रेमात घालवा की!!!!!
लग्नाची,बिनलग्नाची , समलिंगी, विषमलिंगी, आम्ही ते कायपण विचारत नाही....
फक्त प्रेमभावनेत एक दिवस घालवा इतकंच.....

सहमत आहे! :)

आपला,
(बिनलग्नाचा) मधुवर मरणारा तात्या.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 11:28 am | पिवळा डांबिस

अनुष्का तुला एकट्याला दिली....
पण मधूवर मरण्याचा हक्क तुलाच दिलाय असं समजू नकोस....
वो लाईन तो बहोत लंबी है.....
नंबर लेके शांतीसे बैठ जावो......
:)

(खुद के साथ बांता: "वो लाईन तो बहोत लंबी है!!!!" हे वाक्य मला डांबिसकाकूने सुचवले आहे त्याबद्दल तिचे धन्यवाद!!!!)
:)

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 11:34 am | विसोबा खेचर

अनुष्का तुला एकट्याला दिली....

थॅक्यू थँक्यू..! :)

पण मधूवर मरण्याचा हक्क तुलाच दिलाय असं समजू नकोस....

बिलकुल नाही, सर!

वो लाईन तो बहोत लंबी है.....
नंबर लेके शांतीसे बैठ जावो......

हरकत नाही! आम्हाला सर्वात शेवटचा नंबरही चालेल!

और कुछ?! :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 11:58 am | पिवळा डांबिस

"इस नंबर की सभी लाईनें व्यस्त है, कृपया कुछ देर के बाद संपर्क किजिये"
:))))
तिच्यायला, काय समजायचं रे जेंव्हा या ***** टेलिफोन ऑपरेटर असं सांगतात तेंव्हा?
तिच्या कानफडात माराविशी वाटते ना? मलातरी असंच वाटतं!!!!
बघू कधी योग येतोय ते!!!!!
:)

प्रदीप's picture

15 Feb 2009 - 11:53 am | प्रदीप

उभ्या उभ्या ती लाईन # १ ला काय म्हणत होती, ते पाहूया:

http://www.youtube.com/watch?v=zxHl-Da1dKU

...लाईन # ३.६E37 ...प्रदीप

यशोधरा's picture

15 Feb 2009 - 11:37 am | यशोधरा

किती सुंदर दिसतेय मधुबाला! आरस्पानी सौंदर्य!

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 12:01 pm | पिवळा डांबिस

ह्ये कुटलं वो पानी?
आमाला नलाचं पानी आनि (हल्ली!!!) बिसलेरीचं पानी माह्यती हाय!!!
आरसपानी ह्ये कोनचं?
आमी पन पिवूया म्हनतो....
:)

यशोधरा's picture

15 Feb 2009 - 12:09 pm | यशोधरा

काका, ते नुसत बगायाचं पानी हाय! पियाच न्हाय!

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 12:16 pm | पिवळा डांबिस

निस्तं बगायचं पानी? त्येचा काय उपयोग?
ते आमी रोज हितं प्रशांत महासागर बघतुयाच नव्हं?

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 1:12 pm | विसोबा खेचर

आमचा प्रिय मित्र पि डांबिस याने आमच्या खरडवहीत तिच्याबद्दल फार सुरेख अश्या चार ओ़ळी खरडल्या, त्या इथे देत आहोत..

कोई घरमें बैठा नमन करे...
कोई हरिमंदिरमें भजन करे...
कोई गंगा-जमना स्नान करे...
कोई काशी जाके ध्यान धरे...

जिन मधुबालाका ध्यान धरो...
उन और कोई ध्यान धरो ना धरो.....

पि डांबिसा, जियो रे...! :)

आपला,
(घर बैठा नमन करनेवाला) तात्या.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 1:18 pm | पिवळा डांबिस

मूळ कवन हरि ओम शरण यांच्या तोंडचं आहे....
मी जरा थोडाफार फेरफार केलाय....
(उगाच 'वाचकांच्या पत्रांची' मारामारी नको!!!!!!!!!!:))

रामदास's picture

15 Feb 2009 - 1:34 pm | रामदास

पिडांसाहेब या ओळी पण वाचा.
मधुच्या कन्यादानाचे पुण्य मिळवा.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 1:37 pm | पिवळा डांबिस

ते तुम्हाला लखलाभ असो.....

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 1:24 pm | विनायक प्रभू

मधुबालेच्या आसपास पण कुणीही पोचत नाही ह्या मताशी चिरंजिव पण सहमत.

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 1:24 pm | विनायक प्रभू

मधुबालेच्या आसपास पण कुणीही पोचत नाही ह्या मताशी चिरंजिव पण सहमत.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 1:32 pm | पिवळा डांबिस

दोनदा सांगितलं म्हणुन काहि आम्ही तुम्हाला लाईन तोडून पुढला नंबर देणार नाही!!!!!!!!
बाकी तुमच्या चिरंजिवांचं सोडा....
तुमचं सवताचं काय मत आहे?
:)

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 1:35 pm | विनायक प्रभू

पण तेच. टोकन तुमच्या आधी घेतले आहे.

सर्किट's picture

15 Feb 2009 - 1:39 pm | सर्किट

मदुबाला चान दिस्ते

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 1:41 pm | विसोबा खेचर

प्रभू, पिडा, रामदास,

अरे भांडू नका रे म्हातार्‍यांनो! ती आता आपल्या सर्वांची आहे, ती वैश्विक आहे! :)

आपला,
(ब्रॉडमाईंडेड) तात्या.

सर्किट's picture

15 Feb 2009 - 1:43 pm | सर्किट

तात्या
तुमी पन म्हातारेच है की

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 1:50 pm | पिवळा डांबिस

पन मग ह्ये रामदासस्वामी असं कसं सांगतात 'कन्यादान करा' म्हनून? तेंना म्हनावं तुमीच करा कन्यादान!!!! :)
आपुन तर बोहल्यावरनं पळून गेले आनि आता आमाला कन्यादानाच्या लफड्यात अडकवितात!!!!!

पण ह्या विश्वात तुमच्यापेक्षा मी प्रथम आलो. म्हणुन माझा लंबर पैला.
ह्ये बाकी खरं!!! आनि त्यात ते विप्र म्हंजे "कॅश" देतात म्हनं!! मग तेंचाच लंबर पयला!!!!
:)

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 1:43 pm | विनायक प्रभू

पण ह्या विश्वात तुमच्यापेक्षा मी प्रथम आलो. म्हणुन माझा लंबर पैला.

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 1:52 pm | विसोबा खेचर

आमचे प्रिय मित्र रामदासराव यांनी चार अप्रतीम ओळी आम्हाला खरडीत लिहिल्या त्या इथे देत आहोत..

आज मधुबाला असती तर ....
ए, फुला जाग ना .पेंग आली कशी
वादळाचे रंग विटले
काजळाचे पंख मिटले
राजवर्खी चांदण्याला
पटल झाले मोकळे.

सुरेख..!

रामदासभाऊंना भोत भोत शुक्रिया..!

तात्या.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 1:56 pm | पिवळा डांबिस

पेंग आली कशी?
म्हंजे? आता रातीचे साडेबारा वाजले ना आमच्याकडे!!!!!!!
आता आमी पटल मोकळे करन्यास जातो....
:)
शुभरात्री!!!!

विसोबा खेचर's picture

14 Feb 2010 - 1:13 pm | विसोबा खेचर

आज या लावण्याच्या खाणीला तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार याद करत आहे...

सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.

शुचि's picture

14 Feb 2010 - 2:26 pm | शुचि

मधुबाला माझी पण लाडकी.
"चलती का नाम गाडी" मधला तो सीन आठ्वा - रात्री मधुबाला किशोर कुमार ला जागं करते गाडी बंद पडलेली असते. काय तो तिचा फणकारा, काय ते किशोर कुमारचं मिश्कील वागणं. ....... प्रत्येक वेळी मधुबालाचं किशोर कुमार्ल सहकार्य करण्यचं नाकारणं आणि प्रत्येक वेळी त्यानी तिच्यावर केलेली कुरघोडी. आणि मग तिला आलेला तो राग .... वाह!!! आज परत तो सिनेमा बघणार. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वर्षा म्हसकर-नायर's picture

14 Feb 2010 - 4:56 pm | वर्षा म्हसकर-नायर

अरे वा! आज मधुबालाचा देखिल जन्मदिवस!!!.
खरंच लावण्याची खाण होती आणि मुख्य म्हणजे खुप अवखळ.

तीचे प्रत्येक गाणे अप्रतिम.
खरंतर भारत भुषण समोर असतांना इतका romantic अभिनय करायचा म्हणजे तीला मानलच पाहीजे. ;)

'तीचे ते दो घडी हो जो पास आ बैठे' काय गोड दिसली आहे ती ह्या गाण्यात.

शुचि's picture

14 Feb 2010 - 10:42 pm | शुचि

वर्षा मी आत्ताच ते गाणं तु-नळी वर पाहीलं .... खल्लास!!! काय जीवघेणं गाणं आहे, काय अदा आहे ..... मस्त गाणं सांगीतलत आपण. धन्यवाद!!! :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चला तात्यासाहेब,
आजपासून मी १४ फेब्रू.ला "मधुबाला डे" म्हणणार. व्हॅलेंटाईनला राम-राम!
(खरं तर आपण सर्व 'मिपा'करांनी तेच करावं!)
पण शुचिताईंनी सांगितलेल्या प्रसंगाइतकाच मला तिचा "हाल कैसा है जनाबका" या गाण्यातला अभिनय आवडतो. काय ते विभ्रम! हुश्श!
खरंच दैवी सौंदर्य व स्त्रीसुलभ अभिनय यांचं 'मस्त' मिश्रण होती ती!!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)