मराठी
इंग्रजी
बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.
सामर्थ्यदाता : गमभन
Powered by gamabhana
घेतली मिठीत आम्ही
प्रेषक पुष्कराज ( रवी, 02/08/2009 - 06:09) .
घेतली मिठीत आम्ही
मेघातली त्या वीज ती
ठाउक हे होते जरी की
आंम्हास हो जाळेल ती
जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती मिठीत
कौतुक त्याचे आंम्हास हो
चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


