झोका...

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
19 Dec 2008 - 12:23 am

गेला उंच वर, नाही थार्‍यावर
खाली झरझर, आला झोका..

अंगणी बांधला, झाडाले टांगला
मैत्रीने सांधला, एक झोका..

आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी
मारावीशी दडी, घेत झोका..

झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी
वल्ह असे मारी, देत झोका..

गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो
भवर हसतो, घेत झोका..

पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे
पाऊस बहाणे, देई झोका..

इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते
भुईला सांधते, देते झोका..

पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..

पिकावर जाई, बांधावर गाई
मन माझे घेई, पुन्हा झोका..

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका..

- प्राजु

कविताआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 12:57 am | स्वाती फडणीस

मस्त..

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

शितल's picture

19 Dec 2008 - 12:35 am | शितल

झोक्यात लिहिलेला झोका आवडला. :)

पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..

:)

लवंगी's picture

19 Dec 2008 - 12:54 am | लवंगी

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

......... अतिशय सुंदर

३-४ महिन्यांपूर्वी एका बागेत असाच एक एकटा झोका दिसलेला. वय-बीय सगळ विसरुन छान १५-२० मिनिटे झोके घेत सुटलेले मी. खूप मजा आली. झोके घेत असताना वरती आभाळात-ढगांकडे बघण्यात, काय मजा असते ते नव्याने अनुभवल..

जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका..
......... त्या झोक्याने जीवनाचा गेलेला थोडासा काळ नक्कीच परत दिला.

मीनल's picture

19 Dec 2008 - 12:56 am | मीनल

जिवनातला `रोलर कोस्टर` छान दाखवला आहे.
फूल आणि भवर ,आभाळातली पाखर , आखाशाला भुईशी सांधणारे इंद्रधनुष्य ---- छान आहेत.
शिवाय झुलणारी होडी ,झोक्यासारख हलणारे पाण्यातले प्रतिबिंब, मनाचा झोक्यासारखा चंचलपणा ,झोक्यासारखे सुखदु:खाचे हेलकावे आणि ह्या सा-यांचा जिवनातल्या `अप डाऊन्स ` शी साम्य ---मस्त जमलं आहे.

झोका एंजॉय केला!!

मीनल.

टारझन's picture

19 Dec 2008 - 1:03 am | टारझन

कविता फक्त चालिवर म्हणता आली म्हणून आवडली आहे !!
पाचव्या कडव्यात वृत्तात मार खाल्लाय म्हणायचा करंटेपणा आम्ही करणar Naahee

अवांतर : "चौकट राजा" हा आपला जाम आवडता चित्रपट... हॅट्स ऑफ टू दिलीप प्रभावळकर , त्यातलं "एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका " हे के व ळ अ प्र ति म गाणं आठवलं आहे !!

ढण्यवाड्स पाजू !!

(इस्पिक राजा ) टारझन

मीनल's picture

19 Dec 2008 - 2:49 am | मीनल

कुठल्या चाली वर म्हटल?
मला ही म्हणून पाहायचा आहे `झोका` .
मीनल.

मदनबाण's picture

19 Dec 2008 - 5:47 am | मदनबाण

मस्त कविता...
टार्‍याशी १००% सहमत,,कवितेच नाव वाचताच मलाही तेच गाण आठवल...
नंदु आणि मुन्नी त्याची लहानपणाची मैत्रिण..दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला दाद ध्यावी तेव्हढी कमीच आहे..
त्यांचा रात्र आरंभ हा पण असाच एक वेगळा चित्रपट आहे..
टार्‍या हे घे रे ते गाणे :--
एक झोका चुके काळजाचा ठोका
एक झोका

उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका

नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायाचे
खूप मजा, थोडा धोका

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

चतुरंग's picture

19 Dec 2008 - 1:12 am | चतुरंग

गेला उंच वर, नाही थार्‍यावर
खाली झरझर, आला झोका...

वा वा! सुंदर कविता प्राजू.
(पचंब्याच्या मारुतीच्या जत्रेत झाडाला बांधलेला झोका खेळलेला आठवला. किती वर्ष झाली त्याला. मन त्यावर बसून मागे गेलं.)

चतुरंग

अनामिक's picture

19 Dec 2008 - 2:32 am | अनामिक

अरे वा... मस्त कविता आहे! आवडली...!!

राघव's picture

19 Dec 2008 - 9:25 am | राघव

खूपच सुंदर! एकदम "झोकदार" कविता!! :)

गेला उंच वर, नाही थार्‍यावर
खाली झरझर, आला झोका..

पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..

पिकावर जाई, बांधावर गाई
मन माझे घेई, पुन्हा झोका..

हे विशेष आवडलेत!
मुमुक्षु

यशोधरा's picture

19 Dec 2008 - 9:32 am | यशोधरा

छान कविता, आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2008 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

बर का प्राऽऽजू
आमच्या सारक्यान बी आख्खी वाचली . आख्खी आवाडली .गत स्मृतीत घेउन गेली. धन्यु.
(टंकताना बी झोकाळलेला)
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 10:36 am | विसोबा खेचर

कविता क्लास अपार्ट!

प्राजू, जियो..!

तात्या.

मनीषा's picture

19 Dec 2008 - 12:46 pm | मनीषा

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका.. .... खूप छान !

पॅपिलॉन's picture

19 Dec 2008 - 2:22 pm | पॅपिलॉन

झोका आवडला. विशेषतः
आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका..

ही दोन कडवी फारच.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

स्मिता श्रीपाद's picture

19 Dec 2008 - 2:36 pm | स्मिता श्रीपाद

प्राजु,

फारच गोड कविता...

स्मिता श्रीपाद's picture

19 Dec 2008 - 2:37 pm | स्मिता श्रीपाद

प्राजु,

फारच गोड कविता...

अवलिया's picture

19 Dec 2008 - 3:02 pm | अवलिया

मस्त

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 4:18 pm | लिखाळ

वा !!
छान कविता.. आवडली.
-- लिखाळ.

श्रावण मोडक's picture

19 Dec 2008 - 4:31 pm | श्रावण मोडक

बऱ्याच काळानंतर अशी एखादी लयबद्ध कविता वाचली. रचना अत्यंत दाणेदार. बरंच काही सांगू पाहणारी कविता. हे असं साध्य होत नसतं. ते तुम्ही या कवितेत बऱ्यापैकी केलेत. त्यामुळेच अनेकांना जुन्या आठवणीत ही कविता घेऊन गेली.

विसुनाना's picture

19 Dec 2008 - 4:36 pm | विसुनाना

मस्त कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2008 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली !!!

प्राजु's picture

19 Dec 2008 - 7:47 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

19 Dec 2008 - 7:40 pm | प्राजु

आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुवर्णमयी's picture

19 Dec 2008 - 11:37 pm | सुवर्णमयी

मस्त कविता , आवडली.
पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..

छानच आणि प्रतिसाद नेहमीप्रमांणे उशीरा:)))

धनंजय's picture

20 Dec 2008 - 12:47 am | धनंजय

लयीतच झोका आहे.