Skip to main content

झोका...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका.. अंगणी बांधला, झाडाले टांगला मैत्रीने सांधला, एक झोका.. आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी मारावीशी दडी, घेत झोका.. झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी वल्ह असे मारी, देत झोका.. गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो भवर हसतो, घेत झोका.. पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे पाऊस बहाणे, देई झोका.. इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते भुईला सांधते, देते झोका.. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. पिकावर जाई, बांधावर गाई मन माझे घेई, पुन्हा झोका.. आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. - प्राजु
लेखनविषय:

वाचने 7475
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मस्त.. आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका..

झोक्यात लिहिलेला झोका आवडला. :) पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. :)

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. ......... अतिशय सुंदर ३-४ महिन्यांपूर्वी एका बागेत असाच एक एकटा झोका दिसलेला. वय-बीय सगळ विसरुन छान १५-२० मिनिटे झोके घेत सुटलेले मी. खूप मजा आली. झोके घेत असताना वरती आभाळात-ढगांकडे बघण्यात, काय मजा असते ते नव्याने अनुभवल.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. ......... त्या झोक्याने जीवनाचा गेलेला थोडासा काळ नक्कीच परत दिला.

जिवनातला `रोलर कोस्टर` छान दाखवला आहे. फूल आणि भवर ,आभाळातली पाखर , आखाशाला भुईशी सांधणारे इंद्रधनुष्य ---- छान आहेत. शिवाय झुलणारी होडी ,झोक्यासारख हलणारे पाण्यातले प्रतिबिंब, मनाचा झोक्यासारखा चंचलपणा ,झोक्यासारखे सुखदु:खाचे हेलकावे आणि ह्या सा-यांचा जिवनातल्या `अप डाऊन्स ` शी साम्य ---मस्त जमलं आहे. झोका एंजॉय केला!! मीनल.

कविता फक्त चालिवर म्हणता आली म्हणून आवडली आहे !! पाचव्या कडव्यात वृत्तात मार खाल्लाय म्हणायचा करंटेपणा आम्ही करणar Naahee अवांतर : "चौकट राजा" हा आपला जाम आवडता चित्रपट... हॅट्स ऑफ टू दिलीप प्रभावळकर , त्यातलं "एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका " हे के व ळ अ प्र ति म गाणं आठवलं आहे !! ढण्यवाड्स पाजू !! (इस्पिक राजा ) टारझन

In reply to by टारझन

मस्त कविता... टार्‍याशी १००% सहमत,,कवितेच नाव वाचताच मलाही तेच गाण आठवल... नंदु आणि मुन्नी त्याची लहानपणाची मैत्रिण..दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला दाद ध्यावी तेव्हढी कमीच आहे.. त्यांचा रात्र आरंभ हा पण असाच एक वेगळा चित्रपट आहे.. टार्‍या हे घे रे ते गाणे :-- एक झोका चुके काळजाचा ठोका एक झोका उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे जरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका जमिनीला ओढायचे आकाशाला जोडायाचे खूप मजा, थोडा धोका मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका... वा वा! सुंदर कविता प्राजू. (पचंब्याच्या मारुतीच्या जत्रेत झाडाला बांधलेला झोका खेळलेला आठवला. किती वर्ष झाली त्याला. मन त्यावर बसून मागे गेलं.) चतुरंग

अरे वा... मस्त कविता आहे! आवडली...!!

खूपच सुंदर! एकदम "झोकदार" कविता!! :) गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका.. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. पिकावर जाई, बांधावर गाई मन माझे घेई, पुन्हा झोका.. हे विशेष आवडलेत! मुमुक्षु

बर का प्राऽऽजू आमच्या सारक्यान बी आख्खी वाचली . आख्खी आवाडली .गत स्मृतीत घेउन गेली. धन्यु. (टंकताना बी झोकाळलेला) प्रकाश घाटपांडे

कविता क्लास अपार्ट! प्राजू, जियो..! तात्या.

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. .... खूप छान !

झोका आवडला. विशेषतः आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. ही दोन कडवी फारच. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

वा !! छान कविता.. आवडली. -- लिखाळ.

बऱ्याच काळानंतर अशी एखादी लयबद्ध कविता वाचली. रचना अत्यंत दाणेदार. बरंच काही सांगू पाहणारी कविता. हे असं साध्य होत नसतं. ते तुम्ही या कवितेत बऱ्यापैकी केलेत. त्यामुळेच अनेकांना जुन्या आठवणीत ही कविता घेऊन गेली.

मस्त कविता.

मस्त कविता , आवडली. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. छानच आणि प्रतिसाद नेहमीप्रमांणे उशीरा:)))