झोका...
लेखनविषय:
गेला उंच वर, नाही थार्यावर
खाली झरझर, आला झोका..
अंगणी बांधला, झाडाले टांगला
मैत्रीने सांधला, एक झोका..
आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी
मारावीशी दडी, घेत झोका..
झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी
वल्ह असे मारी, देत झोका..
गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो
भवर हसतो, घेत झोका..
पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे
पाऊस बहाणे, देई झोका..
इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते
भुईला सांधते, देते झोका..
पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..
पिकावर जाई, बांधावर गाई
मन माझे घेई, पुन्हा झोका..
आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..
जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका..
- प्राजु
वाचने
7471
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
वा!
झोका आवडला.
छान आहे कविता
जिवन
लै भारी ... लै भारी
In reply to लै भारी ... लै भारी by टारझन
चाल
In reply to लै भारी ... लै भारी by टारझन
मस्त
'झोक'दार कविता!
अरे वा...
वा... वा..!!
छान कविता,
आख्खी आवाडली
कविता
झोका
झोका
कित्ती सुंदर ...
कित्ती सुंदर ...
मस्त --
वा !! छान
छान
झकास
In reply to झकास by विसुनाना
आभाराच्या अगोदर प्रतिसाद
In reply to आभाराच्या अगोदर प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्हहाहा..
धन्यवाद..
वावा
मस्त कविता