अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
5 Dec 2008 - 9:20 am

अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे.

गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही. गालावरचा डास मारलात मग तुम्ही अहिंसावादी कसे काय? असा युक्तिवाद करणार्‍यांना मी एव्हढेच विचारु शकतो तुम्ही जर स्वतःला हिंसावादी म्हणवता तर जगातील सर्व हिंसा तुम्हाला मान्य आहे का? उदा. एखाद्याने रागाच्या भरात आपल्या मित्राचा जीवानीशी खून पाडला ही गोष्ट तुम्हाला योग्य वाटते का? फक्त होय किंवा नाही असे उत्तर द्या असा हट्ट धरला आणि तुम्ही 'नाही बुवा हे योग्य नाही वाटले कसल्याही पाठपुरावा न करता निव्वळ रागाच्या भरात त्याने मित्राचा जीव घ्यायला नको होता' असे (माझ्या मते) सुज्ञ उत्तर दिलेत तर तुम्ही अहिंसावादी ठरलात असे अनुमान काढून मोकळे व्हायचे का? होय तुम्ही इथे हिंसेला विरोध केलात तुम्ही कसले हिंसावादी तुम्ही तर अहिंसावादी तुमची तत्वे भोंगळ आहेत असा युक्तिवाद केलेला योग्य ठरेल का?

जर एखाद्या व्यक्तिच्या हिंसक प्रवृत्तीला विरोध केल्याने तुम्ही लगेच अहिंसक बनत नसाल, तर एखाद्या गुंडाची पिटाई केल्याचे समर्थन केल्याने एखादा हिंसक कसा काय बनतो? थोडक्यात एखाद्या गुंडाची पिटाई केली गेली आणि मला ती कृती योग्य वाटली म्हणून निव्वळ ह्या एकाच निकषावर तुम्ही माझ्यावर 'हा कसला अहिंसावादी ?'असा आरोप करु शकत का?

माझ्यामते अहिंसावादी म्हणजे शक्य तितक्या ठिकाणी हिंसे ऐवजी इतर पर्याय शोधणारा. त्यासाठीच मी तात्या अभ्यकरांना पान खाउन थुंकण्याचे उदाहरण दिले होते. एखादा पान खाउन रस्त्यात थुंकला म्हणुन त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे मला तरी ते योग्य वाटले नाही. (ह्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे हे एकमेव कारण, त्यामध्ये मी ताकाला जावुन भांडे लपवण्याचा प्रश्नच नाही, प्रश्न सरळ सरळ तात्यांना उद्देशुन विचारले होते इनडायरेक्ट काहीही नव्हते) थुंकणार्‍या व्यक्तिला आधी समजावुन सांगणे प्रसंगी आवाज चढवणे असा पर्याय मी निवडला असता. ह्या कुठल्याही पर्यांयांचा वापर न करता लगेचच मी हातापायीवर उतरलो असतो तर माझ्या अहिंसावादावर प्रश्नचिन्ह ठेवायचा हक्क आहे. म्हणूनच अतिरेकी ताजमध्ये घुसलेले असताना कमांडोजनी त्यांना ठार मारुन बाहेर काढणे मला अहिंसेच्या तत्त्वांचे उल्लघन करणे वाटत नाही. माझ्यामते गांधीजींना देखिल तसे वाटत नसावे. अन्यथा स्वतंत्र भारतात सशस्त्र पोलीस, सशस्त्र सैनिक कधी होउच दिले नसते. अतिरेक्यांना कंठस्नान घालुन संपवणे हा तात्काळ उपाय आणि पहिली पायरी होती ज्यात काहीही चूक नाही. पण म्हणून इथुन पुढे आणखी हिंसा करुन हा प्रश्न समुळ निकालात काढता येईल का? असे एक अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून मला वाटत नाही. (इथेही शक्य तिथे शस्त्र उचलावेच लागेल पण ते कमीत कमी ठिकाणी आणि विचारपुर्वकच उचलावे हे माझे मत. त्याचवेळेस सरळ सरळ पाकिस्तानावर अणुबाँब टाकावा आणि हा प्रश्न कायमचा सोडवावा असेही कुणाचे मत ठरु शकते जे मला मान्य नाही) कदाचीत इथेच हिंसावादी आणि अहिंसावादी ह्यांचे मार्ग वेगवगळे होत असावेत. पण म्हणून अतिरेक्यांना मारण्याचे समर्थन केल्याने कुणीही लगेच 'हिंसावादी' बनत नाही की अतिरेक्यांनी मारलेल्यांचा जीवांचा निषेध नोंदवला म्हणून 'अहिंसावादी' बनत नाही इतकेच. हीच गोष्ट छेड काढणार्‍या गुंडाच्या उदाहरणात लागू पडते.

-कोलबेर

टीप: हेच उत्तर मी वरील प्रश्न (पान खाण्याबाबतीत) जिथे उपस्थित केले तिथेही देऊ शकलो असतो पण ह्या प्रश्नांमागील माझी भूमिका लक्षात घ्यायचा प्रयत्न न करता हा पोरकटपणा आहे आणि मला विशीष्ठ लोकांना टारगेट करायच्या छंद आहे असले वैयक्तिक आरोप उपस्थित केल्याने इथे स्वतंत्र रुपात देत आहे. असो हा विषय माझ्याकडून संपला हे तिकडे लिहुनही तात्यांचा प्रतिसाद आल्याने हे स्पष्टीकरण देणे गरजेचे वाटले.अनावश्यक वाटल्यास ही तळटीप उडवुन टाकायला हरकत नाही. पण माझ्याकडून हा विषय संपलेला आहे.

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 9:49 am | विसोबा खेचर

प्रकटन संपूर्णत: बाळबोध व तेवढेच असंबद्धही वाटले..!

असो..

तात्या.

वेताळ's picture

5 Dec 2008 - 10:48 am | वेताळ

कशाचेही शेपुट कशालातरी लावण्याचा अट्टाहास चालवला आहे.पान खाऊन थुंकणे व बहिणीचा अपमान ह्या गोष्टीची तुलना तुम्ही कशी काय करता.दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. त्याची बरोबरी किंवा तुलना करणे हे एकदम चुक आहे.थुंकणार्‍याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील. परंतु बहिणीची छेड काढणार्‍यास तुम्ही धक्काबुक्की कराल त्यावेळी इतर लोक ही तुमच्या समर्थनार्थ उतरतील हा फरक लक्षात ठेवा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे चुकच आहे त्याला मी समर्थन देत नाही.
वेताळ

कोलबेर's picture

5 Dec 2008 - 11:01 am | कोलबेर

दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. थुंकणार्‍याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील.

माझाही हाच मुद्दा आहे. एकदा का हिंसेची चटक लागली की असा सुक्ष्म फरक कळणे अवघड होउन बसते.

इथे ह्याच प्रश्नावर मला मिळालेले उत्तर पाहा.

१) त्या थुंकणार्‍या असभ्य व्यक्तिला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती आपल्याला योग्य वाटते का?

हो, योग्य वाटते!

ऋषिकेश's picture

5 Dec 2008 - 11:07 am | ऋषिकेश

अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो

+१

एक विचार मनात आला (खरे तर गेलो २-३ दिवस सतत येतो आहे) सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.

अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता?

-(स्वयंवादी) ऋषिकेश

सहज's picture

5 Dec 2008 - 11:08 am | सहज

कोलबेर +१

ऋषिकेश ++१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजरावांप्रमाणेच

कोलबेर +१
ऋषिकेश ++१

अवांतरः अहिंसावाद, गांधीवाद, सावरकरवाद, फक्त व्यक्तिगत वादावादीवर येऊन थांबल्याचं अधून मधून दिसतंय, त्याबद्दल खेद वाटतो.

धनंजय's picture

6 Dec 2008 - 4:15 am | धनंजय

+१

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 11:32 am | यशोधरा

सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता?

+१

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 11:38 am | विसोबा खेचर

या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.

अगदी खरं! मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर काही तासातच आम्ही ५-६ मित्र रक्तदान करायला गेलो, इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले..आम्हाला जे करता येणं शक्य होतं ते आम्ही केलं, अजूनही करत राहू...

परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही.. त्यामुळे काही लोकांचे थोर विचार समजायला आम्हाला मदत होते! ;)

आपला,
(नुसते लंबे लंबे लेख न लिहिता कृती करणारा!) तात्या.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 11:41 am | विसोबा खेचर

इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले.

इतकेच नव्हे, तर आमची कृती पाहून मिपावरीलही एका व्यक्तिला रक्तदान करावेसे वाटले आणि तिने ते केले याचेही आम्हाला समाधान आहे!

एरवी, काहितरी असंबद्ध लिहित रहाणे, नेळभटवादाचा पुरस्कार करत राहणे अगदी सोपे आहे! :)

तात्या.

कोलबेर's picture

5 Dec 2008 - 11:57 am | कोलबेर

परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही..

वाद घालण्यात आम्हालाही बर्‍याचदा काही गैर आहे असं वाटत नाही पण आम्ही वाद मुद्द्यांवर सोडून वैयक्तित टिप्पण्यांवर घसरणे टाळातो. :)

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 1:43 pm | यशोधरा

तात्या, रक्तदानाबद्दल तुमचे आणि तुमच्या मित्रमंडळींचे खूप कौतुक आहे.

ऋषिकेश's picture

5 Dec 2008 - 12:58 pm | ऋषिकेश

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर काही तासातच आम्ही ५-६ मित्र रक्तदान करायला गेलो

अभिनंदन :)

परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही.. त्यामुळे काही लोकांचे थोर विचार समजायला आम्हाला मदत होते!

कबूल.. वादही घालण्यात गैर काहि नहि. फक्त हे थोर विचारमंथन जरा जास्त होतंय असं वाटलं ;)
असो. चालु द्या! :)

-(गोंधळलेला) ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Dec 2008 - 9:54 pm | llपुण्याचे पेशवेll

>>या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.
हा उपदेश हिटलर ने मात्र अगदी चांगला अमलात आणलेला दिसतो. त्याने तेच केले.
पुण्याचे पेशवे

सुनील's picture

5 Dec 2008 - 2:31 pm | सुनील

विपर्यासाची अतिशयोक्ती हा विनोदनिर्मितीचा एक प्रकार आहे.

सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम कशी फोल आहे हे दाखवण्यासाठी, "अग्निरथपथ....." ह्या शब्दाचा दाखला देण्याविषयीचा विनोद सर्वांच्या परिचयाचा आहेच.

आता हा विवक्षित शब्द सावरकरांनी रचला असल्याची शक्यता फारच धूसर, किंबहुना नाहीच. तरीही, तो शब्द सावरकरांनी रचला असे भासवण्याचे एकमेव प्रयोजन म्हणजे, त्या मोहिमेतील फोलपणा दाखवणे. आणि त्यासाठीच ही विपर्यासाची अतिशयोक्ती!

अशा वेळेस सावरकरांनी योजलेले कित्येक शब्द आज रूढ झाले आहेत, याकडे हेतुपुरःसर दुर्लक्ष करायचे असते!

तीच गोष्ट गांधीवादाची.

ज्या गोष्टी गांधींजींनी सांगितल्या नव्हत्या अथवा सांगितल्या असल्या तरी त्यांचा संदर्भविरहीत उपयोग करून, विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न येथे (मिपावर) काही मंडळींनी केला असल्याचे जाणवते.

अर्थातच अशा वेळी, दुसर्‍या महायुद्धात गांधींनी ब्रिटीशांना पाठिंबा दिला होता (हिटलरला गुलाबाचे फूल देण्याचा सल्ला नव्हे), तसेच कायदा जर अन्याय्य असेल तर प्रसंगी कायदेभंग करायलाही सांगितले होते, हे हेतुपुरःसर विसराचे असते!!

शेवटी विनोदनिर्मिती ही महत्वाची!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

5 Dec 2008 - 2:39 pm | टारझन

अबब !! अवघड आहे !!!

(आता या पठडीतले लेख येणे बंद झाले तर ?)

- टारझन

कपिल काळे's picture

6 Dec 2008 - 5:23 am | कपिल काळे

आता लेख टाकताना, त्यात कुठे गांधीवाद, अहिंसावाद, हिंसेचे समर्थन, हल्ला, असे काही शब्द असल्यास तो लेख आधी संपादकांकडे जाइल असे काहितरी करा बुवा.
सध्या मिपा सदस्य भलतेच एक्टीव्ह होवून लेखन करतायत ( मी ही आहे त्यात!), कौल टाकतायत.

पण त्यामुळे धड काही वाचलेच जात नाही.
तेव्हा जरा काहीतरी विवेक व्हावा. असे वाटते.