कलंत्रीसाहेबांना जाहीर प्रश्न..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
4 Dec 2008 - 1:12 am
गाभा: 

कलंत्रीसाहेब,

कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या, ही विनंती..

घटना - मी अन् माझी बहिण रस्त्याने चाललो आहोत. कुणा गुंड-मवाल्याने माझ्या बहिणीकडे पाहात अत्यंत अश्लील उद्गार काढून तिचा अपमान केला, तिच्या स्त्रीत्वाला शिवी दिली. त्यावर मी त्या गुंडाला भररस्त्याततच लाथा-बुक्क्याने बडवला, आणि बेदम झोडून काढला.

प्रश्न -

१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?

२) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?

३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल?

बोला कलंत्रीशेठ!

आपल्या उत्तरांची वाट पाहतो आहे. कृपया काही अवांतर लेखन न करता मी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात परंतु नेमकी उत्तरे द्या ही कळकळीची विनंती..
काहीतरी अवांतर किंवा दिशाभूल करणारे लेखन कराल तर ते माझ्या डोक्यावरून जाईल एवढेच नम्रपणे सांगू इच्छितो. मी होता-होईल तोवर अत्यंत साध्या व सरळ शब्दात प्रश्न विचारले आहेत, तेव्हा त्याची उत्तरेही तेवढीच साधी व सरळ असावीत अशी अपेक्षा करतो..

वास्तविक हे प्रश्न मी आपल्याला खाजगीतही विचारू शकलो असतो परंतु ज्या गांधीवादाचे आपण हट्टाने आणि सातत्याने समर्थन करत आहात तो गांधीवाद किती फोल आहे अथवा सशक्त आहे, किंवा मूळ मुद्द्याला बगल देत शब्दांवर शब्द रचलेला शब्दांचा नुसतच एक गडबडगुंडा आहे, हे आपल्या उत्तरावरून चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात यायला मदत होईल..!

आपला नम्र,
तात्या.

प्रतिक्रिया

टग्या's picture

4 Dec 2008 - 1:38 am | टग्या (not verified)

(कलंत्रीकाका काय उत्तर देतील ते पाहण्यास उत्सुक आहेच, पण त्यापूर्वी माझ्या समजुतीप्रमाणे उत्तराचा एक प्रयत्न.)

त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथाबुक्क्यांनी बडवण्याची क्षमता जर तुमच्यात असेल, तर त्याला प्रत्यक्षात लाथाबुक्क्यांनी बडवण्याची काहीच गरज नाही. जरी तुम्ही त्याला सामोरे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून जरबेने त्याच्या डोळ्यात पाहून त्याला जे काही समजावायचे ते "समजावलेत", तरी पुरे आहे. तुमचे त्याला निर्भयपणे सामोरे जाणे, त्याच्या खांद्यावर हात ठेवणे, त्याच्या डोळ्यात जरबेने पाहणे, एवढेच पुरे आहे. हा मनुष्य वेळ पडली तर जागच्या जागी आपल्याला लाथाबुक्क्यांनी बडवू शकतो एवढे त्या गुंडाच्या "लक्षात" जरी आले तरी त्याला प्रत्यक्षात बडवण्याची गरज नाही.

यातून तुमच्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावणे आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाणे हे आपोआपच साधेल, आणि तेही एकही वार न करता.

मात्र हे साध्य होण्यासाठी मुळात वेळ पडली तर (इफ़ एवरीथिंग एल्स फे़ल्स) त्याला तिथल्या तिथे बडवण्याची क्षमता मात्र तुमच्यात पाहिजे. मारण्याची ताकद असून न मारणे म्हणजे अहिंसा; मारण्याची ताकद नाही म्हणून न मारणे म्हणजे अहिंसा नव्हे, निव्वळ दुबळेपणा.

विकास's picture

4 Dec 2008 - 1:43 am | विकास

मारण्याची ताकद असून न मारणे म्हणजे अहिंसा; मारण्याची ताकद नाही म्हणून न मारणे म्हणजे अहिंसा नव्हे, निव्वळ दुबळेपणा.

सावरकरांचे या अर्थी वाक्य आहे की, "एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करणे हा अहिंसेचा एक भाग झाला, पण स्वतः इतके सशक्त असायला हवे की, अशी प्रथमतः एका गालावर कुणाची मारायची हिंमतच होता कामा नये. त्यातून खरी अहींसा/अहींसक वातावरण तयार होते." :-)

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 1:44 am | विसोबा खेचर

तर त्याला प्रत्यक्षात लाथाबुक्क्यांनी बडवण्याची काहीच गरज नाही.

मी काय करायला हवे होते हा मुद्दा नसून मी काय केले आहे ते लिहिले आहे!

आणि त्यावर आधारीत प्रश्न विचारले आहेत हे लक्षात घ्या..!

तात्या.

टग्या's picture

4 Dec 2008 - 1:50 am | टग्या (not verified)

आपल्या मुद्दा क्र. ३ चे हे उत्तर होऊ शकेल. (लाथाबुक्क्यांनी बडवणे हा पर्याय हाताशी असावाच; त्याशिवाय सारे फोल आहे. पर्याय हाताशी असल्यावर तो पूर्णपणे वापरण्याची नेहमीच गरज आहे असे नाही. गरजेप्रमाणे योग्य तितका वापरावा. गरज नसल्यास वापरू नये.)

पण काहीही न करता गप्प बसण्यापेक्षा जागच्याजागी बडवणे कधीही चांगलेच.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 1:54 am | विसोबा खेचर

आपल्या मुद्दा क्र. ३ चे हे उत्तर होऊ शकेल.

करेक्ट!

पण काहीही न करता गप्प बसण्यापेक्षा जागच्याजागी बडवणे कधीही चांगलेच.

पण मग ज्या अहिंसावादावर गांधीचाद उभा आहे तो अहिंसावाद गेला की चुलीत! असो, कलंत्रीसाहेब काय ते उत्तर देतीलच! :)

तात्या.

टग्या's picture

4 Dec 2008 - 2:11 am | टग्या (not verified)

पण मग ज्या अहिंसावादावर गांधीचाद उभा आहे तो अहिंसावाद गेला की चुलीत!

अहिंसावाद म्हणजे दुबळेपणाने मार खाणे होत नाही. बडवण्याचे ऑप्शन हाताशी असावे. गरज नसताना ते वापरू नये एवढेच. तो अहिंसावाद. दुबळेपणाने मार खाणे आणि बडवणे दोन्ही अहिंसेत बसत नाहीत. पण अहिंसेत न बसणार्‍या या दोन ऑप्शन्सपैकी बडवणे हे त्यातल्यात्यात बरे ऑप्शन - द लेसर ऑफ द टू ईव्हिल्स. अहिंसा - अर्थात बडवणे शक्य असताना न बडवता काम निभावणे - हा या दोहोंहून वेगळा तिसरा मार्ग. (उगीच गरज नसताना हात खराब कशाला करा?)

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:19 am | विसोबा खेचर

बडवण्याचे ऑप्शन हाताशी असावे.

त्याच ऑप्शनचा वापर केला आहे! नेमके काय घडले आहे आणि काय कृती केली आहे हे सांगितले आहे आणि त्यावर आधारीत पहिले दोन प्रश्न विचारले आहेत..!

तात्या.

टग्या's picture

4 Dec 2008 - 2:35 am | टग्या (not verified)

पहिल्या प्रश्नाबाबत विचाराल तर कोणाच्या दृष्टिकोनातून विचारताय त्यावर अवलंबून आहे.

चर्चाप्रस्तावाच्या एकंदर रोखावरून अहिंसावादाच्या दृष्टिकोनातून पाहताय असे वाटते. तसे असल्यास तुमच्याजवळ बडवण्याचा ऑप्शन होता खरा, पण तो न वापरता काम होण्यासारखी परिस्थिती होती की नव्हती यावर अवलंबून आहे. न बडवता काम होण्यासारखी परिस्थिती असल्यास बडवणे (ओव्हरकिल म्हणून) अयोग्य, नाहीतर (अन्य उपायांअभावी) अनिवार्य म्हणून योग्य मानावे लागेल असे वाटते. (अधिक माहिती अहिंसावादीच देऊ शकतील.)

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनाला या चर्चेच्या दृष्टीने महत्त्व नाही आणि या बाबतीत योग्य-अयोग्याचा निवाडा मी करूही इच्छीत नाही.

दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे आपल्या बहिणीच्या दृष्टिकोनावर, ती या सगळ्या प्रकाराला कितपत महत्त्व देते यावर अवलंबून आहे.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:42 am | विसोबा खेचर

पहिल्या प्रश्नाबाबत विचाराल तर कोणाच्या दृष्टिकोनातून विचारताय त्यावर अवलंबून आहे.

ज्याच्या बहिणीवर भररस्त्यात अश्लील वाक्ये फेकली गेली आहेत अश्या एका भावाच्या दृष्टीकोनातून विचारला आहे..!

तसे असल्यास तुमच्याजवळ बडवण्याचा ऑप्शन होता खरा, पण तो न वापरता काम होण्यासारखी परिस्थिती होती की नव्हती यावर अवलंबून आहे.

बहिणीचा अपमान सहन न होऊन इतर कोणताच विचार न करता, अन्य उपाय कोणते, हा विचार न करता ऑप्शन वापरला आहे!

नाहीतर (अन्य उपायांअभावी) अनिवार्य म्हणून योग्य मानावे लागेल असे वाटते.

धन्यवाद! ;)

(अधिक माहिती अहिंसावादीच देऊ शकतील.)

नक्कीच! :)

तात्या.

टग्या's picture

4 Dec 2008 - 2:56 am | टग्या (not verified)

बहिणीचा अपमान सहन न होऊन इतर कोणताच विचार न करता, अन्य उपाय कोणते, हा विचार न करता ऑप्शन वापरला आहे!

पुन्हा, "हे अहिंसेत बसते का" या दृष्टिकोनातून (किंवा "अहिंसावाद योग्य / प्रॅक्टिकल आहे का" या अध्याहृत प्रश्नातून) ही चर्चा उद्भवली आहे असे वाटते, म्हणून त्या दृष्टिकोनातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनाला येथे महत्त्व नाही आणि माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून मी याचा निवाडा करू शकत नाही.

अहिंसावादाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर डोके शांत ठेवून प्रथम अन्य उपाय आहेत का हे पाहणे योग्य, आणि म्हणूनच तसा कोणताही विचार न करता एकदम हाणामारीचे ऑप्शन एक्सरसाइज़ करणे अयोग्य. अर्थात यावर नेमके भाष्य अहिंसावादीच करू शकतील, पण मला हे प्रॅक्टिकल म्हणून (नैतिक म्हणून नव्हे) योग्य वाटते. (उगीच गरज नसताना हात खराब कशाला करा?) अर्थात प्रत्यक्ष परिस्थितीत कोण कसा वागेल हे सांगता येत नाही, आणि त्याचा न्यायनिवाडा करणे माझ्या कक्षेत येत नाही.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:45 am | विसोबा खेचर

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनाला या चर्चेच्या दृष्टीने महत्त्व नाही आणि या बाबतीत योग्य-अयोग्याचा निवाडा मी करूही इच्छीत नाही.

आपल्या व्यक्तिगत दृष्टिकोनाचा अन् इच्छेचा मी आदर करतो! :)

राघव's picture

4 Dec 2008 - 9:48 am | राघव

"क्षमा बलं अशक्तानाम् शक्तानां भूषणं क्षमा" असे काहीसे सुभाषीत आठवते. टग्याच्या प्रतिसादाला बघून आठवले.
मुमुक्षु

धम्मकलाडू's picture

4 Dec 2008 - 11:22 am | धम्मकलाडू

मारण्याची ताकद असून न मारणे म्हणजे अहिंसा; मारण्याची ताकद नाही म्हणून न मारणे म्हणजे अहिंसा नव्हे, निव्वळ दुबळेपणा.

टग्या, बरोब्बर! सशाची अहिंसा म्हणजे दुबळेपणा!

आणि तात्या, तुमच्यात तेवढी ताकद असती तर तुमच्या बहिणीवर लाइन मारण्याची कुणाची हिंमत झाली असती? गांधीवाद कसा फोल आहे हे सिद्ध करण्यासाठी चर्चेत आपल्या आयाबहिणींना कशाला आणायला हवे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गांधी's picture

4 Dec 2008 - 12:31 pm | गांधी

मित्रांनो माझ्या अहिंसेचे विचार आपल्याला फारच कमी माहिती दिसतायत असे आपल्या चर्चेतून जाणवले. माझे अहिंसेचे खरे विचार असे आहेत.

कोणी तुमच्या थोबाडात मारत असेल तर त्यापूर्वीच त्याचा हात अडवा, मात्र तो मोडून टाकण्यापेक्षा तो असा काही पिरगळा की तुम्ही भ्याड आणि निर्बल नाही आहात याचा त्याला प्रत्यय येईल. कोणी तुमच्या उजव्या गालात मारत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यापेक्षा डावा गाल पुढे करा असे मी कधीही सांगितले नाही. त्याचा प्रतिकार जरूर करा. पण त्यावर उलट वार मात्र करू नका.

समोर संकट आल्यावर आपल्या प्रियजनांना मागे टाकून पळून जावे असे माझी अहिंसा सांगत नाही. अशावेळी भ्याड पळपुटेपणा करण्यापेक्षा मी हिंसेलाच प्राधान्य देईन. म्हणूनच ज्या प्रकारे एखाद्या आंधळ्या माणसाला सुंदर दृश्‍य बघण्याची मी सक्ती करू शकत नाही, त्याचप्रमाणे संकट आले असताना पळून जाणाऱ्या ( कायराला) माणसाला मी अहिंसचा उपदेश करू शकणार नाही.

अहिंसा हे मोठ्या वीरतेचे प्रतिक आहे. माझ्या आजवरच्या अनुभवानुसार हिंसेवर विश्‍वास असणाऱ्या लोकांना अहिंसेचे महत्त्व पटविणे मुळीच कठिण गेले नाही.

मी अनेक वर्ष भित्रा राहिलो होतो आणि अशा काळात मला हिंसा करण्याची तीव्र इच्छा व्हायची. पण मग जेव्हा मी भित्रेपणा सोडायला सुरूवात केली तेव्हा अहिंसेबद्दल मला आत्मियता वाटायला लागली.

याचा अर्थ समोर संकट आल्यावर जे लोक पळतात ते अहिंसेचे पुजारी होते आणि वार करायला घाबरतात असे मानन्याचे काहीच कारण नाही उलट त्यांचे पलायन हे सिद्ध करते की त्यांची मरण्याची किंवा इजा सहन करण्याची तयारी नाही.

याचे उदाहरण द्यायचे झाले तर खतरनाक लांडग्याला पाहून घाबरून बिळात पळणारा ससा तो अहिंसक आहे म्हणून पळून जात नाही तर तो त्या लांडग्याला बघताच चळाचळा कापू लागतो आणि जीवाच्या भीतीने पळून जातो.

म्हणून अहिंसक होणे हे खऱ्या धैर्याचे आणि वीरतेचे काम आहे.

अहिंसा भित्रेपणाच्या आड दडलेली नसून तो एका वीराचा सर्वोच्च गुण आहे. आणि म्हणूनच अहिंसा अंगी बाळगण्यासाठी तलवार चालविण्यापेक्षाही जास्त वीरतेची गरज असते. अर्थात तलवारबाजी सोडून देऊन अहिंसेचा स्विकार करणे शक्‍य आहे आणि कधी कधी सोपेही आहे.

परंतु अहिंसेची पूर्व अट ही आहे की अहिंसेचे पालन करणाऱ्या व्यक्तिमध्ये वार करण्याचे पूर्ण सामर्थ्य असावे.

अहिंसेमुळे माणसाची बदला घेण्याची वृत्ती सचेतन आणि मुद्दाम दाबून टाकण्यात येते. निष्क्रिीय, हतबल होऊन कुणाच्याही अधीन जाण्यापेक्षा बदला घेणे केव्हाही श्रेयस्कर असले तरी त्यापेक्षाही क्षमा करणे जास्त श्रेष्ठ आहे. क्षमा ही अत्युच्च भावना आहे तर प्रतिशोध घेणे दुर्बळतेचे लक्षण आहे.

मुळात प्रतिशोध किंवा बदल्याची भावना ही आपले काल्पनिक किंवा वास्तविक नुकसान होईल या संशयामुळेच निर्माण होते. म्हणूनच जो माणूस जगात कुणालाच घाबरत नाही तो त्याचे नुकसान करण्याचा निरर्थक प्रयत्न करणाऱ्यावर क्रोधीत होण्याचा प्रयत्न करणार नाही.

खेळताना लहान मुलांनी आकाशात तळपणाऱ्या सूर्याकडे धूळ फेकली असता सूर्य त्याचा बदला घेऊन त्यांचे नुकसान करत नाही. त्याउलट धूळ उडविण्याच्या प्रयत्नात ती लहान मुले मात्र त्याच धुळीने खराब होतात.

आपला बापू ( अर्थातच गांधीवादी नसलेला 'मो. क.गांधी")

प्रियाली's picture

4 Dec 2008 - 1:57 am | प्रियाली

माझी उत्तरे -

१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?

गुंडाचे हात केळी खाण्यात मग्न असतील तर तुमची कृती योग्य वाटते. ;) नाहीतर, तो तुम्हाला उचलून बुकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य अयोग्य हे सबळ-दुर्बळ कोण यावर अवलंबून असावे, प्रश्नावरून ठरवता येत नाही.

२) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?

अश्लील उद्गार काढायचे गुंडाने, मारामारी करायची तुम्ही आणि मान बहिणीची खाली का जावी? गुंडाला मारण्याआधी बहिणीला समजावा की कोणा फालतू माणसाने तुला काही शब्द म्हटले तर त्यामुळे तुला मान खाली घालायचे कारण नाही.

३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल?

जर शब्दाने लाज वाटत असेल तर ती मारामारीने जाते असे वाटत नाही. हे म्हणजे बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली म्हणून त्या बाईच्या मनावरील व्रण पुसले गेले म्हणण्यासारखे आहे. तेव्हा, आधी आपल्या बहिणीला सबळ करा.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:05 am | विसोबा खेचर

नाहीतर, तो तुम्हाला उचलून बुकलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इथे शक्याशक्यतेचा किंवा तर्कावितर्काचा प्रश्न येतोच कुठे? आणि तसेही बाकी अनेक मुद्दे आहेत परंतु जे घडले आहे ते मी लिहिले आहे आणि त्यावर आधारीत प्रश्न विचारले आहेत हे कृपया ध्यानात घ्या!

मी त्या गुंडाला बडवायची कृती स्पॉन्टॅनियसली केली आहे आणि ती चूक की बरोबर हा प्रश्न विचारला आहे!

तात्या.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:13 am | विसोबा खेचर

गुंडाला मारण्याआधी बहिणीला समजावा की कोणा फालतू माणसाने तुला काही शब्द म्हटले तर त्यामुळे तुला मान खाली घालायचे कारण नाही.

तो पुढचा भाग झाला. माझ्या चर्चाप्रस्तावात मी स्पॉन्टॅनियसली हिंसेची कृती केली आहे आणि ती चूक की बरोबर हे विचारले आहे!

हे म्हणजे बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली म्हणून त्या बाईच्या मनावरील व्रण पुसले गेले म्हणण्यासारखे आहे.

एखाद्या स्त्रीवरचे बलात्काराचे व्रण कधीच पुसले जात नाहीत, तरीही तो करणार्‍याला फाशीची शिक्षा ही आवश्यकच असते!

तेव्हा, आधी आपल्या बहिणीला सबळ करा.

नक्कीच करीन..

तूर्तास, माझ्याकडून त्या गुंडाला बडवण्याची कृती घडलेली आहे आणि ती योग्य की अयोग्य? हाच या चर्चाप्रस्तावाचा मूळ भाग आहे हे कृपया लक्षात घ्या..

तात्या.

प्रियाली's picture

4 Dec 2008 - 6:38 am | प्रियाली

माझ्या चर्चाप्रस्तावात मी स्पॉन्टॅनियसली हिंसेची कृती केली आहे आणि ती चूक की बरोबर हे विचारले आहे!

एखाद्याच्या शाब्दिक बोलचालीवर तुम्ही हात उगारत असाल तर अयोग्य. माणूस आपल्यापेक्षा दुर्बलांवर हात उगारतो. कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला चिथावणार्‍या माणसामुळे तुम्ही गुन्ह्यास प्रवृत्त होत असाल तर तो गुन्हा आहे आणि तुम्ही गुन्हेगार आहात.

जगात अनेक खून, मारामार्‍या, गोळीबार हे "स्पॉन्टेनियसली" होत असतात म्हणून चूक-बरोबर करून कायदा त्यांना सोडतो असे नाही.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 12:32 am | विसोबा खेचर

एखाद्याच्या शाब्दिक बोलचालीवर तुम्ही हात उगारत असाल तर अयोग्य.

सदरच्या घटनेत मी केलेल्या कृतीबाबत आपले व्यक्तिगत मत समजले! धन्यवाद...

जगात अनेक खून, मारामार्‍या, गोळीबार हे "स्पॉन्टेनियसली" होत असतात म्हणून चूक-बरोबर करून कायदा त्यांना सोडतो असे नाही.

सुदैवाने थोडाफर कायदा मलाही माहीत आहे. परंतु मी उपस्थित केलेल्या चर्चेत मला माझ्या हातून घडलेल्या कृतीबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत हे मी विचारलेले नाही. तरीही सांगितल्याबद्दल आभार..!

तात्या.

आजानुकर्ण's picture

4 Dec 2008 - 2:07 am | आजानुकर्ण

अशी घटना घडल्यास पोलीसात तक्रार करावी. आणि गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा गुन्ह्यांना शिक्षा देणारी समांतर व्यवस्था उभी होऊ नये असे वाटते.

चूक तुमच्या बहिणीची नसल्याने तिला लाज वाटण्याची काहीच गरज नाही. किंबहुना तिनेच मुस्काटीत मारले तर चालेल. कारण कायद्यानुसार स्वतःवर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:31 am | विसोबा खेचर

अशा गुन्ह्यांना शिक्षा देणारी समांतर व्यवस्था उभी होऊ नये असे वाटते.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, धन्यवाद..!

चूक तुमच्या बहिणीची नसल्याने तिला लाज वाटण्याची काहीच गरज नाही.

खरे तर काहीच गरज नाही, नक्कीच नाही! परंतु अश्लील बोलणे ऐकून काही स्त्रियांची अपमानाने म्हणा किंवा लाजेने म्हणा, मान खाली जाते/जाऊ शकते! विनयभंगाचाच हा प्रकार!

किंबहुना तिनेच मुस्काटीत मारले तर चालेल.

पण मग गांधींच्या तत्वाचे अन् अहिंसावादाचे काय? मी काय किंवा माझ्या बहिणीने काय, त्या गुंडाच्या मुस्कटात मारली ह्याचे गांधीवाद समर्थन करतो किंवा नाही हाच या चर्चेचा हेतू आहे!

"किंबहुना तिनेच मुस्काटीत मारले तर चालेल" ह्या उत्तराने पुन्हा एकदा मला माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे!

धन्यवाद! ;)

तात्या.

वाटाड्या...'s picture

4 Dec 2008 - 2:12 am | वाटाड्या...

सज्जनपणा गेला उडत...पेहेले हाथ(लाथ) फिर बात....आपण तर तेच करणार...गांधीगीरी वगैरे गेली उडत...आणि तेवढी शक्ती राखुनच आहोत...समजा आपल्यापेक्षा जास्त शक्तीवाला आला गुंड तर जीव गेलातरी बेहत्तर पण त्याला उत्तर देणारच...सोडणार नाही...तात्यांच्या पहिल्या पर्यायाला संबोधन...पोलीसवगैरे नंतर कारण त्या गुंडाने पोलीसाला विचारले होते का की "मी हे करु का?"....शत्रुवर धावुन जाताना आपण पोलीस आहोत का सामान्य नागरीक असा विचार करत बसलात तर आलच रामराज्य....आठवा जागतीक युद्ध..लेनीनग्राडमध्ये सामान्य नागरीक होते ज्यामुळे जर्मन सैन्याला पहिली माघार घ्यावी लागली तेन्व्हा त्यांनी असा विचार केला होता का...

एकलव्य's picture

4 Dec 2008 - 2:09 am | एकलव्य

(१) केले ते ठीकच आहे.
(२) बहिणीची मान उंचावेल का खाली जाईल हे तिच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. माझी बहीण माझ्याच कानाखाली आवाज काढेल की कोणी काही उसकावले तर लगेच भडकायला तुला काय झाले म्हणून?
(३) ... तुम्ही काय करावे हे मी नाही सांगू शकत. प्रत्येक वेळी हात उगारून भागतेच असे नाही तसेच प्रत्येक वेळी सोडून देऊन चालते असेही नाही. भीतीपोटी करतो आहोत की सामर्थ्यापोटी ह्याचे उत्तर ज्यानेत्याने स्वतःला द्यायचे.

(४) माझ्याबाबतीत विचाराल तर काहीही करणार नाही. पण जर 'हलकटपणा' 'लिमिट'च्या बाहेर गेला तर त्या गुंडाला सांगेन "बाबारे - आता गप्प बस. नाहीतर गरज पडल्यास भाड्याचे मारेकरी आणून तूच नाही तर तुझे खानदानही जिथे कोठे असेल तेथे जाऊन संपवून टाकीन." निव्वळ बहिणीला शांत बस असे सांगणार नाही.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:14 am | विसोबा खेचर

बर्‍याच मंडळींनी माझ्या तिसर्‍या प्रश्नाला उत्तरे दिली आहेत याची गंमत वाटते आहे! :)

तात्या.

तुम्हाला त्याक्षणी जे योग्य वाटलं ते केलतं ना? मग त्या साठी तिर्‍हाईताच्या (जो तुमच्या बहिणीचा भाऊ नाही किंवा गुंडाचा नातलगही नाही) त्याच्या सर्टीफिकेटची गरज काय?

तुमच्याजागी मी असतो तर हेच केलं असतं.

"..गुंडाला मारण्याआधी बहिणीला समजावा की कोणा फालतू माणसाने तुला काही शब्द म्हटले तर त्यामुळे तुला मान खाली घालायचे कारण न"...."
हे सगळं ठीक आहे. पण कुठल्याही फालतू माणसाने काही कारण नसताना माझ्या बहिणीबद्दल असे शब्द का काढावे? ही त्याची पहिली चूक. आणि तीच चूक त्याची शेवटची चूक ठरवण्याची जबाबदारी माझी.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 2:35 am | विसोबा खेचर

मग त्या साठी तिर्‍हाईताच्या (जो तुमच्या बहिणीचा भाऊ नाही किंवा गुंडाचा नातलगही नाही) त्याच्या सर्टीफिकेटची गरज काय?

मला गरज वाटते आहे. त्यामुळे मिपावर अलिकडेच लिहिल्या गेलेल्या एका लेखमालेबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत त्या दूर होण्यास मदत होईल असे वाटते! ;)

हे सगळं ठीक आहे. पण कुठल्याही फालतू माणसाने काही कारण नसताना माझ्या बहिणीबद्दल असे शब्द का काढावे? ही त्याची पहिली चूक. आणि तीच चूक त्याची शेवटची चूक ठरवण्याची जबाबदारी माझी.

सहमत आहे!

आपला,
(हिंसावादी!) तात्या.

इनोबा म्हणे's picture

4 Dec 2008 - 2:48 am | इनोबा म्हणे

त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?
मला तरी ही कृती योग्य वाटते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लोकांनी कायदा हातात घेतल्याने अतिरेकी सापडला... हातात हात धरून बसले असते तर कदाचित ... जय मुंबईकर!

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 7:14 am | भास्कर केन्डे

चांगली माहिती दिल्याबद्दल आभार!

जय हिंद!

माझ्यामते तात्यासाहेब तुम्ही पुढील कृती करावी..

१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवण्यापेक्षा त्याचे आभार मानावेत.शक्य झाल्यास त्याला साष्टांग प्रणिपात करावा...बहिणीलाही तसे सांगण्यास करावे आणि तिने तसे करायला नकार दिल्यास तिलाच रस्तात झोडावे.
२) त्या गुंड भाऊच्या समोर रोज रोज दोन किंवा तीन बहिणींबरोबर जावून त्याला अश्लिल उद्गार काढण्यास चेतवावे. हवे तर कधी कधी त्याला अश्लिल साहित्य ही पुरवावे. रोज रोज नवीन नवीन घाणेरडे शब्द ऐकून तुमच्या सर्व बहिणींना त्याची चांगलीच सवय होइल. मग त्यांची मान खाली जाणारच नाही. आहो स्वतः चे अस्तित्वच त्या विसरतील त्यामुळे आत्मसन्मानाचा प्रश्नच नाही राहणार..
३) अशाने तो गुंड बेजार होईल आणि मग तुमच्या बहिणीलाच काय पण स्वतःच्या बायकोला ही मातेसमान वागवेल. मात्र अशाने तुमच्या बहिणीची नाही पण गांधीगिरी करणार्या लोकांची मात्र मान उंचावेल.

माफ करा अशा सडेतोड उत्तराबद्दल ..पण पाकड्यांवर प्रेम करणार्या लोकांकडून यापेक्षा काही वेगळे उत्तर अपेक्षित नाही.

खादाडमाऊ

कलंत्री's picture

4 Dec 2008 - 7:47 am | कलंत्री

आता उत्तर : अनेक गोष्टी ठरवुन करता येत नाही. तेथे तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय निवडा. मारणे, दुर्लक्ष करणे, लोकाना सांगणे, बहिणीला घरी पाठविल्यानंतर त्या गुंडाची कणिक तिंबणे.

अवांतर : आपली बहिण आहे म्हणून आपण योग्य ते करालच. परंतु अशी कोणी मुलगी जी अश्या गुंडाच्या शेरेबाजीने त्रस्त आहे, तिच्या आजूबाजूला तिचे असे कोणी नाही अशा वेळेस कोणताही विचार न करता तिला तिचा आत्मसन्मान मिळवुन देणे आणि परत त्या गुंडाला असे न करता येणे हाच खरा भाग असायला हवा.

अहिंसावाद ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे. हे विसरु नका. दुसरे असे इतके मोठे तत्त्व त्याचा किस आणि कस माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या प्रतिपादानातुन कृपया काढु नका.

बाकी इतर लोकांनी खुपच चांगले निवेदन दिले आहे. इतक्या सुत्रबद्धपणे मलाही विचार करता आला नसता.

एकलव्य's picture

4 Dec 2008 - 7:54 am | एकलव्य

- अंगठाबहाद्दर

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 10:56 am | विसोबा खेचर

तेथे तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय निवडा.

मला जे योग्य वाटले ते मी केले आहेच. त्यावर मी आपले मत विचारले आहे, ज्याचे उत्तर द्यायचे आपण पुन्हा टाळलेले आहे!

दुसरे असे इतके मोठे तत्त्व त्याचा किस आणि कस माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या प्रतिपादानातुन कृपया काढु नका.

मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते किंवा अयोग्य वाटते इतकेच मी विचारले आहे! आपण त्याचे उत्तर का देत नाही हे कळत नाही! अर्थात, उत्तर देण्याचे आपल्यावर बंधन नक्कीच नाही. मी एक घटना आपल्यापुढे मांडली आणि ती आपल्याला योग्य वाटली किंवा नाही यावर आपले व्यक्तिगत मत विचारले. आपण त्याचे जे काही असेल ते, परंतु उत्तर दिले असतेत तर आपल्या प्रांजळपणाचे कौतुक वाटले असते!

असो.

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2008 - 11:22 am | प्रभाकर पेठकर

तात्यासाहेब,
सद्यपरिस्थितीत, आपल्या तरूण वयाकडे पाहता, आपली कृती १००% योग्यच आहे. पुढे, म्हातारपणी, यदाकदाचित तरूणपणातील ह्या कृत्यात आपल्याला काही चुक आढळली तर त्या गुंडाला शोधून त्याची माफी मागा. तोही तेंव्हा म्हाताराच असेल, त्यामुळे, 'नाही याऽऽऽर, माझंच तेंव्हा चुकलं होतं. तुम्हीच मला माफ करा' असे म्हणेल. तेंव्हा 'सिंगल माल्ट' च्या मध्यस्थीने दोघांनीही एकमेकाना माफ करून टाका. हा 'आपला वाद' आहे बुवा! 'गांधीवाद' आपल्याला झेपत नाही.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2008 - 10:19 am | घाशीराम कोतवाल १.२

हे सगळं ठीक आहे. पण कुठल्याही फालतू माणसाने काही कारण नसताना माझ्या बहिणीबद्दल असे शब्द का काढावे? ही त्याची पहिली चूक. आणि तीच चूक त्याची शेवटची चूक ठरवण्याची जबाबदारी माझी आहे
आणी त्याचा **कापुन मी त्याचा हातात दिला असता हे आपले तत्व आहे फालतु अहिंसा आपल्या बुध्दीच्या बाहेर आहे
ज्याला ठोशाची भाषा कळते त्याला ठोसा द्या

अवांतर : ही माझी प्रतिक्रिया आहे कोणी सहमत असेल तर ठिक नसेल तर ठिक ...

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

विनायक प्रभू's picture

4 Dec 2008 - 10:47 am | विनायक प्रभू

१ केले नाहीतर २ आणि ३ ला अर्थ नाही.
आणि १ केल्यानंतर २ आणि ३ चा विचार करायची गरज नाही.

अवलिया's picture

4 Dec 2008 - 10:51 am | अवलिया

१) योग्य कृती
२) अर्थातच
३) सध्याच्या व्यवस्थेत दुसरा पर्याय मला तरी सापडत नाही. दिल्यास मी स्विकारेन

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

वेताळ's picture

4 Dec 2008 - 10:52 am | वेताळ

मला वाटते मागे एका अप्रकाशित धाग्यात "स्त्रियाना गाडी चालवता येते का" मध्ये मी आपल्या वाहन चालवण्याच्य कौशल्यावर शंका उपस्थित करताच , आपन मला सांगितले होते की जर समोर तुम्ही आलात तर गाडी तुमच्या अंगावरच घालीन.व आता तुम्ही सांगत आहात की एखाद्याच्या शाब्दिक बोलचालीवर तुम्ही हात उगारत असाल तर अयोग्य. माणूस आपल्यापेक्षा दुर्बलांवर हात उगारतो. कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला चिथावणार्‍या माणसामुळे तुम्ही गुन्ह्यास प्रवृत्त होत असाल तर तो गुन्हा आहे आणि तुम्ही गुन्हेगार आहात.. मग खरे काय?
बाकी काठावर बसुन बुडणार्‍याला सल्ला देणे खुपच सोपे असते. पण त्याला वाचावण्यास त्या पाण्यात उडी मारणे एकाद्यासच जमते.तात्या व गुंड ह्या दोन व्यक्ती मध्ये बोलाचाली झाली नसुन तो त्याच्या बहिणीस वेडेवाकडे बोलला आहे. आज जर त्याला नुसते डोळ्याच्या जरबेतुन बघणे किंवा समज देणे ह्या गोष्टी केल्या तर उद्या दुसरे लोक त्या तात्याच्या कृतीचा गैरफायदा घेवुन त्याच्या बहिणीची टिंगल करण्यास मागे पुढे बघणार नाहीत.तो गुंड तुमच्या बहिणीची टिंगल तुम्हाला दुबळा समजुनच करत असतो, त्यावेळी तुम्ही त्याला तुमच्या कृतीतुनच उत्तर दिले पाहिजे . म्हणजे बघणार्‍या बघ्याना व गुंडाला त्याची जरब बसेल.मग उद्या तुमची बहिण जर रस्त्यातुन एकटी निघाली तर तिच्या कडे वाकडी नजर करुन बघायची कोणाचेही धाडस होणार नाही.

अजुन एक तुमचे वाक्य जगात अनेक खून, मारामार्‍या, गोळीबार हे "स्पॉन्टेनियसली" होत असतात म्हणून चूक-बरोबर करून कायदा त्यांना सोडतो असे नाही.
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ताज.ओबेरॉय व नरिमन हाऊस मध्ये कंमाडोनी कारवाई करुन दहशतवाद्याना मारले त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे खटले चालवावेत?
तुमच्या सारख्या विचारवंतानी ह्यापुर्वीच पंजाब पोलिसदलाचे खच्चीकरण केले आहे.
वेताळ

मला वाटते मागे एका अप्रकाशित धाग्यात "स्त्रियाना गाडी चालवता येते का" मध्ये मी आपल्या वाहन चालवण्याच्य कौशल्यावर शंका उपस्थित करताच , आपन मला सांगितले होते की जर समोर तुम्ही आलात तर गाडी तुमच्या अंगावरच घालीन.

तुमचा प्रतिसाद वाचून अजूनही त्यांनी तुमच्या अंगावर गाडी घालायला हरकत नाही असेच वाटते. :):):)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2008 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेताळबुवा, तेव्हाच (त्या अप्रकाशित धाग्यावर) प्रियालीने "ह.घ्या" असंही लिहिलेलं होतं. आणि एकूण ही तुलना मला वड्याचं तेल वांग्यावर ओतल्यासारखी वाटत आहे.

तुम्हाला असं वाटत असेल की या देशात मुलींना कधीच अशा कमेंट्सना सामोरं जायला लागत नाही तर ती चूक आहे. प्रत्येक वेळेला जरा असं गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मारायचंच ठरवलं तर आयुष्यातला अर्धा वेळतरी असाच जाईल. करणार आहात का असं खरोखर?
शिवाय प्रॅक्टीकली या गोष्टीचा विचार करावा: तुम्ही (किंवा तात्या किंवा कोणीही भाऊ) आपल्या बहिणीबरोबर २४ तास फिरणार आहे का, बळकट स्नायू, काठ्या, (रिल्हॉल्व्हर, एके ४७, ग्रेनेड लाँचर, अणुबाँब इ.इ.) घेऊन??

म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ताज.ओबेरॉय व नरिमन हाऊस मध्ये कंमाडोनी कारवाई करुन दहशतवाद्याना मारले त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे खटले चालवावेत?
जगात होणारे अनेक खून, मारामार्‍या, गोळीबार हे स्पॉटेनियसलीच होतात. त्यासाठी काहीही प्लॅनिंग नसतं. आणि अशा घटनांवर मिपा, वर्तमानपत्रं अनेक दिवस चर्चा करत नाहीत, तीन मंत्र्यांचे राजीनामे सादर होत नाहीत, इ.इ.
एका माणसाने केलेला हिंसाचार आणि संघटीत गुन्हेगारी यांच्यात फरक आहे, आणि संघटीत गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्यातही प्रचंड फरक आहे.

अवांतरः कोणीही माझ्यावर (फक्त!) अश्लील शेरेबाजी केली म्हणून मला काहीही फरक पडत नाही. कोणा एकाला 'गेट वेल सून'ची गरज आहे तर त्यामुळे माझी मान का खाली जावी, माझा आत्मसन्मान का कमी होईल?

प्रियाली's picture

5 Dec 2008 - 12:22 am | प्रियाली

तुमच्या सारख्या विचारवंतानी ह्यापुर्वीच पंजाब पोलिसदलाचे खच्चीकरण केले आहे.

हाहाहाहा!!!! =)) आणि माझ्यासारख्या विचारवंतांनी! पोलीसदलाचे खच्चीकरण!!!!

विनोद आवडला.

वेताळ's picture

4 Dec 2008 - 12:52 pm | वेताळ

मला त्यावेळी पण राग आला नाही व आता देखिल. पण तुम्हाला येवढे चिढायला काय झाले?
प्रियाली ताईच्या त्या प्रतिक्रियेचा आता वापर कशा करिता केला ह्याचा जरा ईचार करा की .माझ्या त्यावेळच्या लिखाणाचा त्याना जर इतका राग आला होता ,मग एकाद्या मुलीची रस्त्यात कोणी अत्यंत अश्लील उद्गार काढुन टिंगल करत असेल तर त्या मुलीची व तिच्या सोबत असणार्‍याची मानसिकता त्यावेळी काय असेल हे मला दाखवुन द्यायचे होते.अन तुमच्या लिखाणाकडे बघुन मला वाटते माझा हेतु साध्य झाला.
तसेच तुमच्या दुसर्‍या मुद्द्याचे उत्तर पण मी माझ्या वरच्या लिखाणात दिले आहे.
तुम्हाला असं वाटत असेल की या देशात मुलींना कधीच अशा कमेंट्सना सामोरं जायला लागत नाही तर ती चूक आहे. प्रत्येक वेळेला जरा असं गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मारायचंच ठरवलं तर आयुष्यातला अर्धा वेळतरी असाच जाईल. करणार आहात का असं खरोखर?
शिवाय प्रॅक्टीकली या गोष्टीचा विचार करावा: तुम्ही (किंवा तात्या किंवा कोणीही भाऊ) आपल्या बहिणीबरोबर २४ तास फिरणार आहे का, बळकट स्नायू, काठ्या, (रिल्हॉल्व्हर, एके ४७, ग्रेनेड लाँचर, अणुबाँब इ.इ.) घेऊन??

त्यासाठी मला वर सुचवलेल्या हत्याराचा काही उपयोग होणार नाही व ती सध्या भारतात सहज उपलब्द पण होत नाहीत
त्यासाठीच हे (गुंड तुमच्या बहिणीची टिंगल तुम्हाला दुबळा समजुनच करत असतो, त्यावेळी तुम्ही त्याला तुमच्या कृतीतुनच उत्तर दिले पाहिजे . म्हणजे बघणार्‍या बघ्याना व गुंडाला त्याची जरब बसेल.मग उद्या तुमची बहिण जर रस्त्यातुन एकटी निघाली तर तिच्या कडे वाकडी नजर करुन बघायची कोणाचेही धाडस होणार नाही.
)मी लिहले होते.
बाकी तुमचे विचार खुप चांगले आहेत. परत एकदा ह.घ्या.
वेताळ

धम्मकलाडू's picture

4 Dec 2008 - 1:39 pm | धम्मकलाडू

किती असंबद्ध प्रतिसाद आहे. हट. प्रियालीताईने, आधीच तुमच्या अंगावर गाडी घालायला हवी होती. :)
हलकेच घ्यायचं बरं का.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रियाली's picture

5 Dec 2008 - 12:01 am | प्रियाली

वेताळ भाऊ,

गाडीची दुखापत अद्याप बरी झालेली दिसत नाही. अजून कळवळताय. मलमपट्टी करून घ्या. तुमच्या विधानाचा तेव्हाही मला राग आला नव्हता आणि आताही आलेला नाही पण तुम्ही तुमचं पालुपद सोडायलाच तयार नाहीत. उगीचच आपलं राग आला राग आला म्हणून मागे लागायचं.

लवकर बरे व्हा बघू.

गेट वेल सून!!

आणि ह. घ्या. यापुढे गाडी आणि प्रियालीताईची आठवण झाली की पिवळा गुलाब नक्की.

वेताळ's picture

5 Dec 2008 - 9:30 am | वेताळ

पिवळा गुलाबा बद्दल धन्यवाद.
वेताळ

धमाल मुलगा's picture

4 Dec 2008 - 2:39 pm | धमाल मुलगा

१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?
मुळीच नाही!!!! खुप सौम्य शिक्षा असेल ती!

आता, आमच्यासारख्या "बदनाम", "गुन्हेगारी मानसिकतेच्या" माणसाचं मत कितपत विचारात घ्यायचं ते ज्याचं त्यानं ठरवावं

आपल्या घरातली स्त्री ही आपल्या संपुर्ण कुटुंबाचा सन्मान्/अब्रु मानली जाते (माझ्या पाहण्यात तरी बहुतांश ठीकाणी. नियमाला अपवाद असतीलही, मला कल्पना नाही!). तिच्याबाबतीत कोणि वेडंवाकडं काही करत असेल तर योग्य त्या प्रकारे ह्या गोष्टीचा इलाज करावाच लागतो!

ह्या प्रकरणांमध्ये एकतर पोलीस इतके वाईट वागवतात, घाणेरडे प्रश्न विचारतात आणि सर्वसामान्य माणसाला मानसिक त्रास होईल असं वर्तन करतात, हे एक निरिक्षण. त्यामुळे सरळ पोलीसांकडे गेलात तर ह्या सगळ्या त्रासाला सहन करण्याची तयारी ठेवावी. हे एक, आणि
असले गुंड बर्‍याचदा टेबलाखालच्या मैत्रीमुळे सहीसलामत सुटतात, आणि बदनाम होते ती आपली बहिण्/आई/वहिनी/जी कोण स्त्री असेल ती!

त्यापेक्षा, सरळ एकच काम करावं,
.त्या बहिणीला रिक्षात बसवून द्यावं आणि घरी पाठवावं. ती गेल्यानंतर त्या गुंडाला धरून निवांत त्याच्या नडग्या फोडाव्यात!
असा चेचुन काढावा, की त्याच्याबरोबर इतरांनाही कळेल की 'साला, ह्याच्या बहिणीला त्रास दिला अन् ह्याला कळलं तर आपलेही पुढे ४ महिने चालायचे वांधे होतील!'
मग सतत बॉडीगार्डसारखं सोबत रहायला नको.

आपलाच,
-(नडगीफोड तरुण) ध मा ल.

प्रिती करन्दिकर's picture

4 Dec 2008 - 2:58 pm | प्रिती करन्दिकर

माझ्या मते तत्या॑नी जे केल॑ ते या प्रस॑गात तरी योग्यच आहे.
अही॑सेचा मला कि॑चितही अनादर नाही,पण अही॑सेसारखे प्रबळ शस्त्र वापरण्यासाठी समोरचा पण तेवढाच तोडीचा लगतो(म्हणजे ज्याला जनाची नाही मनाची तरी असणारा!)....आणि ज्याला मनाची पण शिल्लक नसते त्याच्यावर अही॑सेसरख्या शस्त्राचा काय उपयोग होणार?
(कारण मनाची तरी असणारा अशी कृत्य॑ करणारच नाही) अशा लोका॑ना हीच भाषा कळते.

प्रिती

तात्या ही प्रश्नोत्तरातुन तत्वे जाणून घेण्याची कल्पना आवडली.

भले कुणी त्याला "One fool can ask more questions than seven wise men can answer." असे म्हणून हिणवो! :)

आता माझे काही प्रश्न आपल्याला :

एक माणूस गच्च पान खाऊन भर रस्त्यावर पाच्चकन थूंकला. तिकडून जाणार्‍या आणखी एका व्यक्तिला हा त्याच्या मातृभूमीचा अनादर वाटला. त्यामूळे संताप होऊन त्याने ह्या थुंकणार्‍या व्यक्तिला लाथा बुक्क्यांनी यथेच्छ चोपला. आता..

१) त्या थुंकणार्‍या असभ्य व्यक्तिला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती आपल्याला योग्य वाटते का?

२) या कृतीमुळे त्या थुंकणार्‍याने मायभुमीचा केलेला अनादर दूर होऊन तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?

३) की सदर व्यक्तिने काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे मायभुला न्याय मिळेल आणि अनादर होणार नाही?

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 12:05 am | विसोबा खेचर

कलंत्रींनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली की मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन..!

बाय द वे, मी जे उदाहरण दिले आहे त्यात मी त्या गुंडाला बडवून एका अर्थी हिंसा केली आहे..कलंत्रींनी जो गांधीवाद मांडला आहे,त्या गांधीवादात हिंसेला स्थान नाही. तरीही एक उदाहरण देऊन त्यात मी केलेल्या कृतीबाबत योग्य किंवा अयोग्य या स्वरुपाचं कलंत्रींचं व्यक्तिगत मत मी विचारलं आहे ज्याचं योग्य वा अयोग्य इतक्या साध्या शब्दांची अपेक्षा असलेलं उत्तर मला कलंत्रींकडून अद्याप आलेलं नाहीये हे तुझ्यासारख्या कलंत्रींच्या पुळकेबाजांना लक्षात आलं असेलच!

असो,

तरीही, बेटा कोलबेर, अभी बच्चा है तू! तू भी क्या याद रखेगा!

ही घे तुझ्या प्रश्नांची उत्तरं!

१) त्या थुंकणार्‍या असभ्य व्यक्तिला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती आपल्याला योग्य वाटते का?

हो, योग्य वाटते!

२) या कृतीमुळे त्या थुंकणार्‍याने मायभुमीचा केलेला अनादर दूर होऊन तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?

हो, वाटते!

३) की सदर व्यक्तिने काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे मायभुला न्याय मिळेल आणि अनादर होणार नाही?

पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरांनुसार हा प्रश्न गैरलागू!

असो...

तू तुझ्या बुद्धीच्या आवाक्याप्रमाणे असे काहीसे प्रश्न मला विचारणार याची खात्री होतीच! ;)

आता कलंत्रींनी माझ्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास त्याबद्दल त्यांनाही जाब विचारलास तर बरे होईल!

तात्या.

--

च्यामारी, कालपरवाच्या पोरांना तात्यापुढे हुशार्‍या करतांना पाहून अंमळ गंमत वाटते! :)

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

बेटा वरूण,

हे घे तू इनडयरेक्ट विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर -

मी तात्या अभ्यंकर. मला पान खाऊन रस्त्यात थुंकायची सवय आहे. वर वर मी त्याचे समर्थनही करतो. परंतु मनापसून आणि प्रांजळपणे सांगायचे झाल्यास माझी ही सवय अत्यंत चुकीची, आणि अन्-हायजिनिक आहे! आणि त्याबाबत मला शरम वाटते. मी लौकरच ही सवय बदलायचा प्रयत्न करीन!
आपला,
(प्रांजळ अन् पारदर्शी!) तात्या.

बेटा वरूण,

आता वरच्या प्रमाणेच माझ्याही प्रश्नांना अगदी साध्या व सोप्या शब्दात परंतु नेमके उत्तर देऊन माझ्या गुंडाला झोडपण्याच्या कृतीवर योग्य अथवा अयोग्य या स्वरुपचे व्यक्तिगत मत देण्याची पाळी कलंत्रींची! राईट? :)

तात्या.

कोलबेर's picture

5 Dec 2008 - 1:12 am | कोलबेर

तात्या तुम्ही प्रश्न विचारलेत तेव्हा तुमची अक्कल (बुद्धीचा आवाका वगैरे) कुणी काढलेली दिसली नाही, तुम्ही मात्र रागावुन काहीसे व्यक्तिगत होताय असं वाटल्याने ह्यावर बोलण्यात काही हशील नाही. माझ्याकडून हा विषय संपला.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 1:14 am | विसोबा खेचर

कुणी काढलेली दिसली नाही, तुम्ही मात्र रागावुन काहीसे व्यक्तिगत होताय असं वाटल्याने ह्यावर बोलण्यात काही हशील नाही. माझ्याकडून हा विषय संपला.

दॅट्स बेटर..! :)

भास्कर केन्डे's picture

5 Dec 2008 - 2:00 am | भास्कर केन्डे

कोलबेर शेठ,

तुम्ही ताकाला जाऊन भांडे का लपवताय? तुमचे प्रश्न वाचून हे प्रश्न तात्यांच्या रोखाने होते हे कोणीही मिपाकर सांगेन. बाकी तुमच्या टाइमिंग बद्दल तुम्हाला मानले बॉ! तुमच्या छुप्या प्रश्नांना तात्या काय उत्तर देतात याची उत्सुकता मला पण लागून राहिली होती. त्यांनी मोठ्या मनाने त्यांची थुंकण्याची सवय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल तात्यांचे तसेच ते प्रश्न उपस्थित करुन तात्यांना हा निर्णय येथे लिहायला भाग पाडल्याबद्दल तुमचे सुद्धा अभिनंदन!

तात्या, तुमच्या प्रमाणे लोक असे निर्णय घेऊ लागले तर रस्ते बरेच स्वच्छ दिसतील हो. बाकी तुम्ही पान खाणे बंद करणार की थुंकणे? खाणे बंद नका करू... कारण उगीच त्या बिचार्‍या पानावाल्यांचा धंदा बसेल. आधिच मंदीचे दिवस अन त्यात घंदे बंद... अंमळ वाईट चित्र आहे. :) त्यापेक्षा पान खा पण न थुंकण्यावर ठाम रहा.

आपला,
(पान आवडूनही थुंकणे आवडत नसल्याने ते न खाणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

तुम्ही ताकाला जाऊन भांडे का लपवताय? तुमचे प्रश्न वाचून हे प्रश्न तात्यांच्या रोखाने होते हे कोणीही मिपाकर सांगेन.

अहो चलता है! तात्याला व्यक्तिगत रोख ठेऊन टारगेट करणे हा बर्‍याच मंडळींचा आवडता छंद आहे! कोलबेरला वाटलं की पान खाऊन थुंकायच्या संदर्भातले छुपे प्रश्न विचारले की तात्या अडचणीत येईल! पण झालं भलतंच! त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मला अर्धा मिनिटही लागलं नाही! :)

पण कलंत्रींनी मात्र याच पद्धतीने, प्रांजळपणाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं टाळलं आहे. मी केलेली कृती योग्य आहे म्हणावं तर गांधीवाद अडचणीत येऊ शकतो आणि अयोग्य आहे म्हणावं तर स्वत: कलंत्रीच अडचणीत येऊ शकतात हे त्यांना पक्के ठाऊक आहे म्हणून ते उत्तर देण्याचे टाळत आहेत..! ;)

असो..

तात्या.

भास्कर केन्डे's picture

6 Dec 2008 - 12:02 am | भास्कर केन्डे

पण कलंत्रींनी मात्र याच पद्धतीने, प्रांजळपणाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं टाळलं आहे. मी केलेली कृती योग्य आहे म्हणावं तर गांधीवाद अडचणीत येऊ शकतो आणि अयोग्य आहे म्हणावं तर स्वत: कलंत्रीच अडचणीत येऊ शकतात हे त्यांना पक्के ठाऊक आहे म्हणून ते उत्तर देण्याचे टाळत आहेत..!
यामुळेच तर मी थक्क होतो. ते चिकाटीने त्यांचे एकांगी विचार टंकीत असतात पण अशा प्रश्नांना एक तर उत्तरे देत नाहीत वा द्यायची वेळ आलीच तर विषयांतर करतात व काहीतरी दुसरेच बरळतात नव्हे आपल्यालाच गोल-गोल फिरवायचा प्रयत्न करतात. त्यांचा हा अनुभव २००५ पासून घेत असल्याने मला तरी त्यांच्या या वागण्याने आश्चर्य झाले नाही. वैषम्य मात्र वाटते.

दुसरा एखादा धागा सुरु होऊ द्यात व काहीही प्रश्नांवर चर्चा होऊ द्यात. कलंत्री साहेब आलेच समजा तेच जुने तुणतुणे वाजवत. आणी पुन्हा अशी उत्तर द्यायची वेळ आली की चिडी चुप!

आपला,
(तथाकथित गांधीवाद्यांच्या गुळगुळीत व गोलगोल वक्तव्यांनी त्रस्त) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धमाल नावाचा बैल's picture

6 Dec 2008 - 4:24 am | धमाल नावाचा बैल

>>मी तात्या अभ्यंकर. मला पान खाऊन रस्त्यात थुंकायची सवय आहे. वर वर मी त्याचे समर्थनही करतो. परंतु मनापसून आणि प्रांजळपणे सांगायचे झाल्यास माझी ही सवय अत्यंत चुकीची, आणि अन्-हायजिनिक आहे! आणि त्याबाबत मला शरम वाटते. मी लौकरच ही सवय बदलायचा प्रयत्न करीन!

गांधीवाद सावरकरवाद ह्यापैकी कसल्याही वादांच्याबाबतीत आमचे ज्ञान शुद्ध बैल म्हणावे इतपतच आहे.

तरीही आज पहिल्यांदा हृदय परिवर्तन का काय म्हणतात ते प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने आमी धन्य झालो

तात्या ह्या निर्णयाबद्दल हाबीणंदन!!

_/\_

बैलोबा.

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 7:23 am | विनायक प्रभू

प्रष्न विचारले. उत्तर कुठे आहे.
अवांतरः इथे भारी विनोद होउन राहीले की हो तात्याबा. जगातले बहुतेक खुन, मारामा-या ,गोळीबार स्पॉन्टेनियसली होतात. हे माहित नव्हते हो.

कलंत्री's picture

5 Dec 2008 - 8:09 am | कलंत्री

मी जर तात्या असेल तर पर्याय क्र. १ च वापरेल. ( कारण शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात.).

अवांतर : मी जर कलंत्री सारखा विचारांच्या जंजाळात अडकणारा असेल आणि परत प्रत्येक गोष्टीमागे तत्त्वज्ञान शोधणारा असेल तर,

दुसर्‍या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 8:25 am | विसोबा खेचर

कलंत्रीसाहेब,

आपण पुन्हा गोंधळ करताय. कलंत्री म्हणून आपण काय कराल हे मी विचारलेले नाही किंवा आपण जर तात्या असतात तर आपण काय केले असते हेही मी विचारलेले नाही!

तात्याने केलेली कृती आपल्याला योग्य वाटते की अयोग्य वाटते इतकेच फक्त मी आपले व्यक्तिगत मत विचारलेले आहे.

मला त्याचे कलंत्रींच्या व्यक्तिगत मतानुसार त्याचे 'योग्य' अथवा 'अयोग्य' असे उत्तर अपेक्षित आहे!

तात्या.

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 11:55 am | यशोधरा

>>दुसर्‍या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.

हे अजिबात पटणारे नाही!! माफ करा श्री. कलंत्री, पण हा धादांत पळपुटेपणा आहे!! तुमच्या बहिणीने स्वरक्षणार्थ सज्ज असावे हाच यातून एक निष्कर्ष मला काढता येतो! समजा राखी घेऊन आलेल्या बहिणीची परत गुंडाने छेड काढली तर?? मग काय करायचे?? आणि छेड काढणार्‍या व्यक्तीला भाऊ मान असे सांगताना बहिणीच्या मानसन्मानाची काही पर्वा नाही का???

आणि बहिणीने आपली छेड काढणार्‍या व्यक्तीला का म्हणून राखी बांधावी?? हिंदी सिनेमा आहे की काय??

विसोबा खेचर's picture

5 Dec 2008 - 11:57 am | विसोबा खेचर

समजा राखी घेऊन आलेल्या बहिणीची परत गुंडाने छेड काढली तर?? मग काय करायचे?? आणि छेड काढणार्‍या व्यक्तीला भाऊ मान असे सांगताना बहिणीच्या मानसन्मानाची काही पर्वा नाही का???

सहमत आहे!

असो..! आता आपण जास्त काय बोलत नाय बा! नायतर पुन्हा पुळक्यांचे पूर यायचे! ;)

आपला,
कोलबेर अभ्यंकर.

कलंत्री's picture

5 Dec 2008 - 9:18 pm | कलंत्री

यशोधराजी,

यात पळपुटेपणा कोठे आला? त्या गुंडात आणि आपल्या बहिणीमध्ये आपल्याला आदर्श भाऊ-बहिणीचे नाते थोडेच प्रस्थापित करावयाचे आहे? लोकांना गोळा करुन अप्रत्यक्षपणे आपण त्या गुंडाचा पाणउताराच करीत असतो की नाही? समजा त्याने परत बहिणीचा पाणउतारा केला तर इतर उपाय आहेच की.

आपले आयुष्य अखंडित आहे. एखाद्या प्रसंगाने, चुकीने, वाईट अनुभवाने सगळेच सार काढण्याचा मी विरुद्ध आहे.

पूर्वी असे उदाहरण देत आणि काथ्याकूट करीत असत. जसे सर्प आणि रज्जु उदाहरण. आपण असे धार्मिक पुस्तकात असे संवाद वाचले तर यातील फोलपणा लक्षात येईल.

असो.

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 10:31 pm | यशोधरा

कलंत्रीजी, मुळात ज्या गुंडाकडून बहिणीची छेड काढली जाते, त्यालाच आता तू राखी बांध हे सांगणे योग्य आहे का? आणि त्यांच्यात, आदर्श सोडूनच द्या, पण दाखवण्यापुरते बहिण भावाचे नाते तरी कशासाठी तिच्यावर लादायचे? कोणाही स्त्रीला हे विचारुन पहा, की हे तिला मान्य असेल का? माझ्या मते तरी असणार नाही.

म्हणजे केवळ आपली मते जपायची आणि नसलेल्या वा असलेल्या शक्तीचे प्रदर्शन नको वा चार लोकांसमोर फजिती नको (शक्ती - हिंम्मत नसल्याने) यासाठी बहिणीचा मानभंग झाला तरी चालेल काय?? हा मानसिक पळपुटेपणाच आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे म्हणजे यशोधरा म्हणते तसं अगदी हिंदी चित्रपटासारखंच आहे. अगदीच टोकाला जाऊन हिंदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्याची "शिक्षा" म्हणून त्या दोघांचं लग्नं लावून देणं हे ही मान्य करायचं का?
... यासाठी बहिणीचा मानभंग झाला तरी चालेल काय?? हा मानसिक पळपुटेपणाच आहे.
+1
कोणी फक्त(!) काही अश्लील बोलला म्हणून स्त्रीचा मानभंग, अपमान होत नाही; शक्ती आणि हिंमत नसेल विरोध करायची तर तिथून सरळ निघून जावं, पण राखी बांधायला लावणं यासारखा तर त्या स्त्रीचा अपमान नाही.

शितल's picture

5 Dec 2008 - 9:49 pm | शितल

>>>दुसर्‍या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.

राखी बांधुन घेणार्‍याच्या मनात ही आपली बहिण आहे, तीच्या शीलाची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव करून देते, ज्या व्यक्तीला स्त्रीच्या स्त्रीत्वाचा आदर नाही त्या व्यक्तीला कोणतीही स्त्री भावाचा दर्जा देणार नाही.

हे समस्त स्त्री वर्गास त्या दुबळ्या आहेत हे दाखवुन दिल्या सारखे आहे.
मी तर म्हणते अशा कोणत्या गुडांने कधी छेड काढली तर भावाची ही वाट न पहाता त्याला , तु़ला तु़झ्या घरीच हेच शिकवतात का विचारून, सॅन्डलने मारावे, अजिबात मानहानी वाटुन घेऊ नये, आणि भावाला त्या गुंडाला मारण्यात मदत करावीच .

भास्कर केन्डे's picture

7 Dec 2008 - 11:31 am | भास्कर केन्डे

वा कलंत्री साहेब वाह! क्या बात है!! :)

कारण शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात
व्यत्यास - हिंसेने प्रश्न सोडवण्याची कुवत अशक्त माणसांत नसते.
अर्थात - अशक्त माणसे अहिंसेच्या नावाखाली पळपुटेपणा लपवतात. ;)
भावार्थ - शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात म्हणून प्रश्न लवकर सोडवण्यासाठी शक्तिवान बनावे व प्रश्न सोडवावेत. :)

धन्यवाद कलंत्री साहेब!

आपला,
(कृतकृत्य) भास्कर
आम्ही येथे वसतो.

पक्या's picture

5 Dec 2008 - 8:27 am | पक्या

तात्यांची कॄती योग्य वाटते. फक्त मारहाण जीवावर बेतणारी नको उलट त्या गुंडाला जरब बसेल आणि असले कृत्य करण्यास तो पुन्हा धजावणार नाही इतपत .

कलंत्री यांच्या उत्तराची मला ही उत्कंठा आहे.

मला वाटते तात्यांच्या म्हणण्यातील मतितार्थ लक्षात न घेता भलेभले मिपाकर फक्त शब्दांचा किस पाडत आहे.
तात्यांनी स्वतःवरील प्रसंग न सांगता असे विचारायला हवे होते की कलंत्री साहेब त्यांच्या बहीणीबरोबर रस्त्यावरून जात आहेत आणि वरील प्रसंग उद् भवला तर ते गांधीवादी विचार अमलात आणतील की त्या गुंडाला तिथल्या तिथे धडा शिकवतील.

कलंत्री's picture

5 Dec 2008 - 9:25 pm | कलंत्री

शेवटी सारासार विचार करुनच सगळ्या गोष्टी करावयाला लागतात की नाही?

कधी पडते घेऊन तर कधी हमरीतुमरीवर येऊन प्रश्न सोडवावेच लागतात.

न अतिका गिरना ना अतिकी धुप, न अतिका बोलना ना अतिकी चुप.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2008 - 9:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी पडते घेऊन तर कधी हमरीतुमरीवर येऊन प्रश्न सोडवावेच लागतात.

हा हा हा
आवडला आम्हाला आपला गांधीवाद. मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्‍दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते.

वरील तात्यांच्या उदाहरणात गांधीविचारांनी उत्तरे अशी असली असती, माझा एक तर्क....

स्त्रीत्वावरुन शिव्या देण्यार्‍याचे र्‍हदयपरिवर्तन करणे. ( सभ्य, सुसंस्कृत समाज निर्माण करायचा )
आणि बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल यासाठीही तिचेही र्‍दयपरिवर्तन करणे.

आणि दुर्दैवाने गांधीविचाराला विरोध करणार्‍यांना या गोष्टी कधीच झेपल्या नाहीत. म्हणून त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती अनेकांना योग्य वाटते.

-दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

5 Dec 2008 - 10:22 pm | लिखाळ

>> मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. <<
म्हणजे?

>> म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्‍दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते. <<
असेलही तसे.. पण जगामध्ये गांधीविचाराला जो मान आहे तो कसा काय?..

तात्यांच्या प्रश्नाला माझी उत्तरे
१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?
हो वाटते.

२) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?
हो वाटते.
३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल?
तसे पर्याय म्हणजे त्याला न तुडवता जरबेत घेणे आणि सर्वांसमक्ष बहिणीची क्षमा मागायला लावणे. म्हणजे बळाचा वापर आलाच. किती करावा हे आपल्या शक्तीवर ठरवावे.

-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2008 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. <<
म्हणजे?

असे की, गांधीविचारांची जी वैशिष्टे म्हणता येईल त्यात-

'सर्वांना सारखेच सुख व समाधान मिळणे व पोटभर अन्न मिळणे' हे सांगणे सोपे पण त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाच्या तुकड्यातून भुकेल्यांना काहीही न देता येणे. 'मानवाच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करायच्या मात्र चैन करायची नाही' हे सुखी माणसाला जमणारे नव्हते.ग्राम सफाई, अस्पृश्यता निवारण, समाजात विषमता नसणे, या गोष्टी सुखात राहाणारा केवळ बोलू शकत होता. प्रत्यक्षात त्यावर काम करणे हे शक्य होत नव्हते. म्हणजे गांधी विचार अनेकांच्या अंगी मुरला होता पण प्रॅक्टीकली त्यातले काहीच नव्हते. खरे तर त्यांच्या याच विचाराने खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या सर्वोदयाची जी काही कलमे होती त्याचा प्रभाव उमटला त्याला कारण त्यांचे विचार असतीलही, पण त्यांचे साधुशील व्यक्तित्व होते. त्यांच्या सुदैवाने टिळकांच्या मृत्युनंतर राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व गांधी यांच्याकडे आले. ते थोर समाजचिंतक जसे होते तसे ते अध्यात्मिकही होते त्याचाही प्रभाव जनसामान्यांवर पडला होता. त्याचबरोबर भारतीय समाजाची पुनर्चना कशी केली पाहिजे याचा विचार त्यांनी ' हरिजन' व ' यंग' या साप्ताहिकामधून मांडला हे सर्व विचार तेव्हा काहींना प्रगतीवादी,परिवर्तनशील वाटले. त्याचबरोबर...जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी केलेले असहयोगाचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, या आणि अशा काही घटनांनी गांधीविचाराबद्दल कुतूहुल निर्माण झाले आणि त्यापुढे सर्वोदयाच्या विचाराबद्दल आदर निर्माण झाला असावा असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

5 Dec 2008 - 11:09 pm | लिखाळ

सर.
उत्तराबद्दल आभार.
-- लिखाळ.

टग्या's picture

5 Dec 2008 - 11:37 pm | टग्या (not verified)

विश्लेषणाशी सहमत आहे.

वरील तात्यांच्या उदाहरणात गांधीविचारांनी उत्तरे अशी असली असती, माझा एक तर्क....

स्त्रीत्वावरुन शिव्या देण्यार्‍याचे र्‍हदयपरिवर्तन करणे. ( सभ्य, सुसंस्कृत समाज निर्माण करायचा )
आणि बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल यासाठीही तिचेही र्‍दयपरिवर्तन करणे.

अगदी!

अर्थात हे म्हणणे सोपे आहे, म्हणजेच

गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे

पण प्रत्यक्षात आणणे अवघड, आणि त्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी किंवा इच्छा नसल्यामुळे,

दुर्दैवाने गांधीविचाराला विरोध करणार्‍यांना या गोष्टी कधीच झेपल्या नाहीत,

मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्‍यांना गांधीवाद पेलवला नाही

आणि

म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्‍दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते.

हे अतिशय पटण्यासारखे.

'अव्यावहारिक' याचा अर्थ येथे 'आपल्या आवाक्याबाहेरचे'पेक्षासुद्धा 'आपल्याला जे करण्याची इच्छा नाही' असा असावा. (अर्थात हा मानवी स्वभाव आहे.)

'एका समाजाला झुकते माप' हा आरोप चळवळीमागची भूमिका ज्यांना कळली नाही अथवा ती कळून घेण्याची ज्यांना इच्छा नव्हती अशांकडून असंख्य वेगवेगळ्या संदर्भांत केला गेला. अर्थात चळवळीमागचे सामर्थ्य, भूमिकेमागील सच्चाई आणि अशा विचारसरणीची गरज ज्यांना कळली ते अशा आक्षेपांना महत्त्व न देता चळवळीकडे आकर्षित झाले आणि म्हणूनच चळवळ फोफावली आणि याच कारणांस्तव गांधीविचारांना आज जगात मान आहे.

अर्थात 'गांधीवाद' किंवा 'अहिंसावाद' म्हटल्यावर गांधीविचारांचे जे एक अत्यंत विटंबित स्वरूप आज आपल्याला समजते त्याचे श्रेय गांधीविरोधकांइतकेच गांधीविचारांचा स्वतःला सोयिस्कर असा अर्थ लावून स्वतःची पोळी भाजणार्‍या स्वतःला 'गांधीवादी' म्हणवणार्‍या राजकारण्यांकडेही आहे.

(अवांतर: आपल्या विचारसरणीला 'गांधीवाद' किंवा 'गांधी-इज़्म' म्हणवले जाऊ नये - आपण हिंदुपरंपरेत जे काही सांगितले आहे त्यापेक्षा वेगळे काहीच सांगत नाही आहोत - अशी खुद्द गांधींची भावना असल्याबद्दल वाचल्याचे आठवते. त्या अनुषंगाने 'गांधीवादा'ऐवजी 'गांधीविचार' हा शब्दप्रयोग आवडला.)

केदार's picture

5 Dec 2008 - 11:28 pm | केदार

दुसर्‍या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल >>>>

कलंत्री साहेब तूम्ही त्या गूंडाला मारवे की नाही ह्या बाबत मी काही बोलनार नाही. तो तूमचा निर्नय. पण तूम्ही जे लिहील त्यावर प्रतिक्रिया द्याविच लागेल.

मूळात त्या गुंडाला एखादी सक्खी, मावस, चूलत बहिन असन्याची शक्यता नाकारता येत नाही मग आधीच बहिन असताना देखील तो छेड काढतो, मग ह्या फाल्तू राखीचे काय ते महत्व? आणी गुंडानां आया बहिनी नसतात असा तर तूमचा समज नाही ना? एखाद्या मानलेल्या बहिनीकडे पाहून तो उमाळा येउन छेडने थांबवेल हे समजने म्हणजे ??? मुन्नाभाई एम बी बी एस ला वास्तव समजल्यामूळे ही गफलत.

अनामिका's picture

6 Dec 2008 - 12:04 am | अनामिका

तात्या !!!!!!!!!!!!!
तुमच्या बहीणीच रक्षण करायला तुम्ही खमके आहात्......................
पण आमच्या सारख्या भाऊ नसलेल्या स्त्रियांनी अश्या प्रसंगी काय करायच राव!
आमच रक्षण करायला कोणता कृष्ण धावुन येणार?.......देवाने हात हा अवयव हा फक्त ठराविक कामांसाठीच दिलाय का माणसाला?योग्य वेळी त्याचा वापर करायला लागतोच की .?गावगुंडांना बुकलुन काढायची क्षमता नसेल कदाचित आमच्यात पण दोन सणसणीत कानशिलात हाणून भर दिवसा तारे दाखवण्याची ताकद असायला हवीच की प्रत्येक स्त्री मधे
काय बिशाद लागुन गेली आहे कुणाची वाटेस जायची. :>
अश्या प्रकारचा प्रसंग कुणा स्त्रीवर कधी ओढवु नये खर पहाता.पण तरी वेळ आलीच तर मात्र..................
तुम्ही निवडलेला पहिला पर्याय एकदम योग्य.
माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?
याचे उत्तर म्हणजे त्या मवाल्याची तुम्ही केलेली पुजा सफल झाल्यावर बहिणीच्या हस्ते त्याची उत्तर पुजा देखिल तेथेच घालुन घ्यावी.कसें!
आणि असल्या मुर्ख लोकांच्या बाष्कळ बडबडिकडे लक्ष देऊन आपली मान खाली घालण्याचे कुठल्याही स्त्रीला कारणच काय?

"अनामिका"

सर्वसाक्षी's picture

6 Dec 2008 - 8:42 pm | सर्वसाक्षी

वाखाणण्याजोगी आहे!

द्वारकानाथजी अडचण करणार्‍या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत हे माहित असतानाही तु विचारतो आहेसः).

यांच्या क्र. २ च्या लेखात मी काही प्रश्न विचारले होते. सारे मिळुन जेमतेम ५-६ ओळी. पण साहेबांनी उत्तर देणे टाळले वर प्रश्न पुन्हा विचारा असे सांगितले. असो. गेली अनेक वर्षे आपण त्यांचे निरूतर होणे पाहत आहोतच.

कलंत्री's picture

6 Dec 2008 - 8:54 pm | कलंत्री

सर्वसाक्षी,

परत एकदा विनंती, कृपया आपली प्रश्ने विचारा.

समस्या अशी आहे की तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तरे हवी आहेत ती जगातील कोणालाही देणे शक्य नाही. तरी एकदा परत प्रश्न विचारा आणि त्यावर पडदा पाडा.

द्वारकानाथ

सर्वसाक्षी's picture

6 Dec 2008 - 9:07 pm | सर्वसाक्षी

उगाच निमित्त् कशाला सांगता.

मी माझ्या शब्दात उत्तर द्या असे म्हटले नाही, उगाच वाचकांची दिशाभूल करु नका. आपण उत्तर दिले आहेत तर ते दाखवा आणि ते दिले असूनही मी असत्य कथन करीत असेल तर तसे दाखवुन द्या - हा सूर्य हा जयद्रथ! हे तुमचे उत्तर आणि हा त्याला माझा प्रतिसाद की तुमच्या नको माझ्याच शब्दात उत्तर हवे असा. कृपया दाखवुन द्या.

उत्तर द्यायचे असेल तर प्रश्न आपल्याला दिसतीलच.

असो. आपल्या प्रश्नातच आपले उत्तर मिळाले.

कलंत्री's picture

6 Dec 2008 - 9:17 pm | कलंत्री

प्रिय सर्वसाक्षी,

तुमच्या जुन्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. तरी पण तुम्ही जर प्रश्न परत विचारले तर मी माझ्या प्रामाणिकपणानेच उत्तर देईल असे परत एकदा लिहितो.

या उप्पर तुमची मर्जी.

सस्नेह,

द्वारकानाथ कलंत्री