कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
14 Jul 2020 - 2:32 pm

माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली.

....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS
चे डॉ. रणदीप गुलेरीया आणि प्रा. वेंडी बार्कले यांच्या बद्दलच्या तीन वेगवेगळ्या वृत्तांची गोळाबेरीज केली तर समोर येणारे चित्र वेगळे आहे असे दिसून येईल. वृत्तांचे संदर्भ दुवे खाली दिले आहेत मला जे आकलन तीन वृत्तांचे मिळून झाले त्याचे एकत्रिकरण केले तर खालील चित्र तयार होताना मला दिसते.

* कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही.

* कोणतीही लस येण्यास -यशस्वीपणे आलीचतर- अद्यापही किमान वर्षभराचा आणि सार्वत्रिक उपलब्धतेसाठी किमान दोनेक वर्षांचा कदाचित अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे जुन्या सर्वसाधारण स्थितीत पोहोचणे अगदी नजिकच्या भविष्यात दिसत नाही.

* ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांना तो पुन्हा होणार नाही हे अद्यापही सिद्ध झालेले नाही.

* ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

* कोविड-१९ चे सुक्ष्म तुषार, आधी समज होता त्यापेक्षा, वातावरणात जरासे अधिक दूरवर आणि जरासा अधिक काळ रहात असू शकतात. पण वीषाणूचे जरासे अधिक दूरपर्यंत आणि जरासा अधिक काळ वातावरणाचा सामना कराव्या लागणार्‍या व्यक्तींना भारी पडत असू शकतात. विशेषतः 'व्यवस्थीत' खेळती हवा नसलेल्या जागा आणि अधिकतम शारीरीक अंतराचे व्यवस्थीत पालन न करणे, मास्क व्यवस्थितपणे न वापरणे जोखीमीचे असू शकते (संदर्भ- संशोधक प्रोफ वेंडी बर्कले.)
.
.
मी अशात फॅमिली सोबत एका गर्दी नसलेल्या छोट्या शॉपवर गेलो.

भारतातील बहुतेक दुकान गाळ्यांना व्यवस्थित क्रॉस व्हेंटीलिएशन नसते . शक्यतोवर सिलींग फॅन वर खेळत्या हवेची हौस भागवली जाते. एसी प्रमाणेच सिलींगफॅनही तिच ती हवा सगळ्यांना फिरवत असू शकतो. धूर किंवा पादण्याचा वास जसा सगळ्यांच्या नाकात जाऊ शकतो तसे एखादी व्यक्ती सिलींग फॅनखाली शिंकली खोकलली किंवा अगदी मोठ्याने बोलत तुषार उडवती झाली तर वीषाणूंची भेट सिलींग फॅनची हवा खाणार्‍या सर्वांना मिळू शकते.

आम्ही गेलेल्या शॉपच्या काऊंटरवर मालक आणि नाक तोंड उघडे ठेऊन हनुवटीवर मास्क ठेवलेला सेल्समन त्याच्या डोक्यावर सिलींग फॅन फिरतोय. वस्तु घ्यायची असेल तर दुकानात फिरुन पाहून निवडता येते . पण आम्ही जाण्याच्या आधी जर त्या दुकान मालकाने किंवा सेल्समनने किंवा आमच्या दृष्टोत्पत्तीस न पडलेल्या आधीच्या ग्राहकाने शिंकुन घेतले असेल किंवा ते जस्ट मोठ्याने बोलले असतील आणि प्रोफ वेंडी बार्कले म्हणतात तसे तासभर जरी वीषाणू त्या हवेत वावरणार असेल तर अशी दुकानात फिरुन केलेली खरेदी महागात पडू शकते हे पाहून आम्ही दुकानात खरेदीचा मोह टाळून काढता पाय घेतला.

कोरोना झाल्यास मदतीला ना येतो सगा ना सोयरा
दुकान आणि मॉलचा मोह आवरा ,
आपला फेरी मारणारा गाडीवाला बरा
अधिकतम शारीरीक अंतर आणि नाकातोंडाला मास्क
हात आणि प्रत्येक स्पर्ष करण्याची जागा निर्जंतुक हाच अवतार बरा

* Nations 'heading in wrong direction' with Covid-19 - जागतिक आरोग्य संघटनेच्या वक्तव्याचे बीबीसी वृत्त

* Longitudinal evaluation and decline of antibody responses in SARS-CoV-2 infection -

* Coronavirus vaccine: Covid immunity may not last for too long, says new UK study |

* Coronavirus droplets can hang in the air for more than an HOUR, top SAGE expert warns - Professor Wendy Barclay of Imperial College London चे वक्तव्य

* Professor Wendy Barclay of Imperial College London चे वक्तव्य युट्यूब दुवा

* Covid-19: Complications even after recovery डॉ. रणदिप गुलेरीया

* An Expert Explains: New insights on Covid-19, key learnings from managing it - Dr Randeep Guleria, Director of the All India Institute of Medical Sciences (AIIMS)

.
.
आनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे व्यक्तीगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

राहणीऔषधोपचारराहती जागाविज्ञानमाध्यमवेधआरोग्य

प्रतिक्रिया

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा !
करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते.
बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते !

संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals
Coronavirus: What does Covid-19 do to the brain?
Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms
New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients
Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19
How the novel coronavirus attacks our entire body
Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium
Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find
Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease'
Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find
Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart

आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली.

बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान.

मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...!

-दिलीप बिरुटे
(कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

मदनबाण's picture

14 Jul 2020 - 4:57 pm | मदनबाण

-दिलीप बिरुटे
(कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)
बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार's picture

14 Jul 2020 - 5:29 pm | माहितगार

कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही.

हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत.

कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात.

त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली.

तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही.

आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही..
आणखी एक मास्टरस्ट्रोक !"

कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला.

डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.*

त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता.

डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत.

डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले.

याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे."

रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते.

तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले."

याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला.

अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे.

युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत.

यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत.

WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत.

आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे.

कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे.
*कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.*
*कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.*

✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते*
Article published on: 9 July 2020

Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus...
https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ?
आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली.

मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो.

माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते.

वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे?

इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत.

जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार.

-दिलीप बिरुटे

नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे.

ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात.

खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१'s picture

15 Jul 2020 - 1:26 am | Prajakta२१

भारतात mutation होऊन पसरत असावा
अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण
mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते)
तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता
पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही
लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही
आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला
तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत
त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते
बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच
कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच
तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला
ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर .
संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला.
चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली.
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे .
खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला.
बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते.
योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही.
आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही.
सर्व bindast चालू होते.
Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते.
कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल.
कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात.
कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor.
बाजारातून दोन्ही वस्तू गायब.
मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही.
असे बरेच तमाशे झाले.
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर.
ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला.
आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली.
गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही.
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले.
प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

माहितगार's picture

15 Jul 2020 - 6:47 pm | माहितगार

* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?

या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

शा वि कु's picture

15 Jul 2020 - 7:34 pm | शा वि कु

blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय

कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?

आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.

अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ?

लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?

लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.

अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 7:50 pm | सुबोध खरे

चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे .

मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली?

चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात?

तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे.

आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा?

क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार.

एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण?

याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता?

धन्य आहे

आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे.
व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना.
मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न.
ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू.
जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले.
आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी.
हा आत्मविश्वास कोठून आला.
चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो.
तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते.
विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे.
कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव

या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू

तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188's picture

15 Jul 2020 - 10:50 pm | Rajesh188

साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल
बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी
आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे.
Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची.
साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत.
Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही .
आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत.
एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही.
आणि कोणी काळजी पण घेत नाही.
हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे.
व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही