फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग १)

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
20 Nov 2008 - 6:02 pm

फोनवर पलिकडे कोणीतरी !
(स्थळ: पेन्शनरांचे पुणे शहर)
(वेळ: रात्री ११:०५)
चोहीकडे सामसूम आहे. बाहेर कुठलीच हालचाल वर्दळ नाही. अचानक फोनची घंटी ऐकून आपटे चमकतात. यावेळी कधी फोन येत नसे. तसातर आता दिवसाही येणे कमी झाले आहे. बाहेर पाऊस पडतोय.सोबत गार हवाही आहे. रस्त्यावर कोणीच नसणार. रस्त्यावर पिवळट हॅलोजनमधून पाऊस झरताना दिसतोय. आकाशात चांगलेच ढग जमले असणार. बागेतील झाडे झुडुपे नि:शब्द भिजताहेत. एकूण वेळ बरीच अनुकुल आहे.
अलका स्वयंपाक घरात आहे. गॅसवर दूध तापवते आहे. रात्रीच्या जेवणानंतर दूध पिण्याचा आपटे दांपत्याचा रिवाज आहे.
अलका जवळ असती तर तिनेच फोन उचलला असता. अजून फोन तसाच वाजतोय.
आता पर्याय नाही. आपटे सोफ़्यावरुन उठतात.
- हॅलो
पलीकडून घोगरा आवाज येतो नरहरी आपटे आहेत का ?
- हो. बोलतोय.
- मी देशमुख. बळवंतराव देशमुख

आपटे चाट पडतात. कोण बळवंतराव देशमुख? मी ओळखतो का? नाही. आठवत नाहिये.
क्षणभर स्तब्ध होतात. आत्ता फ़ोन आला या मागे काही कारण असेल विशेषत: रात्रीच्या या वेळी. अलका स्वयंपाक घरात आहे.
तिने असेल का फोनची घंटी ? ऐकली असेल तर नक्कीच चिडणार. लोकांना फोन करायला दुसरी वेळ मिळत नाही ? कोणाचे काय काम आहे?
आपट्यांना फोन ठेऊन द्यावासा वाटला.
- हॅलो
पलीकडून कोणीतरी उपस्थिती दाखवली. कोणीतरी म्हणजे देशमुखांनी. आपट्यांनी टेबलाच्या खणातली डायरी काढून चाळली.
कोणि देशमुख सापडले नाहीत. चला आता रॉंग नंबर म्हणून काटायाला हरक़त नव्हती. पण त्या मनुष्याने आपट्यांचे नाव बरोबर उच्चारले होते. म्हणजे जरी आपटे त्या मनुष्याला ओळखत नसले तरी तो मनुष्य त्यांना ओळखतो. कोण असतील हे ?
आपट्यांना प्रश्न पडला. असो दोन चार मिनिटात सारे स्पष्ट होईल. मला काही काम नसले तरी पलीकडच्या मनुष्याचे काही काम असेल. म्हणून थोड्या रुक्ष आवाजात आपटे म्हणाले
- मी तुम्हाला ओळखले नाही.
उत्तर म्हणून एक हलके हसु ऐकू आले. हसणे संपल्यावर देशमुख म्हणाले.
- मी पण तुम्हाला ओळखत नाही. कधी पाहिलेही नाही. परिचय - बिरिचय पण नाही. फक्त थोडा त्रास द्यावा म्हणून फोन केला.

क्षणात आपट्यांना राग आला. रात्री ११ ही काय त्रास द्यायची वेळ झाली? लोक झोपतात ह्या वेळी. अनोळखी माणसांना त्रास द्यायची गोष्ट किती सहज बोललले हे !
जणू आपटे त्रास घ्यायलाच बसले होते. मधे मधे असे त्रासदायक फोन यायचे. कोण्या बँकेची सुलभ कर्ज योजना, कधी कोणत्या भिशीची स्कीम. हल्ली त्यांचे बोलणे ही आपटे ऐकत नसत.'मला तुमच्या स्कीम मधे रस नाही' असे शांतपणे सांगत आणि फोन ठेऊन देत.
आताही तसेच व्हायला हवे पण होत नाही. विशेषत: रात्री ११ वाजता सारे चराचर जेव्हा पाऊसाने भिजतेय, रस्त्यावर कोणी नाही तेव्हा आवाजावरुन सत्तरीतल्या वाटणार्‍या गृहस्थांशी कठोरपणे वागणे आपट्यांना जमत नाही.
ते शांत स्वरात विचारतात, 'काय काम आहे?'

मजा म्हणजे देशमुख उत्तर देत नाहीत. उलट गमतीच्या स्वरात म्हणतात, माझ्या अन्दाजाने तुमचे वय साठीच्या वर असेल. बायको वारली नसेल तर आपण दोघे स्वत: बांधलेल्या जुन्या घरात एकटे राहत असाल.
आपटे त्रासिक झाले आणि थोडे चकितही झाले. देशमुख त्यांना ओळखत नाहीत. ते साठीच्या वर म्हणाले. दोघे असु हा अंदाज करणे सोपे पण दोघे एकटे - मुलांशिवाय राहतो हे कसे कळाले? अंदाज इतका बिनचुक असावा?

आपट्यांचे इंगित ओळखून देशमुख स्वत:च म्हणाले. अहो समजणे अवघड नाहिये. फ़ोनची डिरेक्टरी उघडली की सारे समजते.
आजकाल कोणा तरण्याचे नाव 'नरहरी आपटे' नसते. तुम्ही कुठल्या फ़्लॅटमधे राहत नाही हे पत्ता पाहून समजते. घर नं १३, गल्ली नं ९, प्रभात रोड.
घरी एकच फोन आहे. घरासमोर छोतीशी बाग असेल. गुलाब, जाई, मोगरा लावला असेल. अशा ठिकाणी तुम्ही व पत्नी एकटेच राहत असणार.
लॉर्‍यांचा त्रास वगेरे नसणार. पानावरुन उठून ही बराच वेळ झाला असेल.

आपटे शांतपणे सारे ऐकत होते. लॉरी, जेवणाच्या ताटाला पान असे शब्द आजकाल फ़ारसे कोणी वापरत नाही. आवाजावरून वाटत होते पण आता आपट्यांना देशमुखांच्या वयाची खात्री पटली.पण यांचे माझ्याशी काय काम?

देशमुख म्हणाले - काम आहे. फ़ार महत्वाचे काम आहे. कृपा करुन फोन ठेऊ नका. मला सांगा मी जे अंदाज लावले त्यात तथ्य आहे ?
- त्याने काय फायदा होणार ? आपट्यांच्या आवाजातली विरक्ती लपली नव्हती.

देशमुख हसून म्हणाले. फायदा आहे आपटे साहेब. माझे वय सध्या बहात्तर आहे. आजारी बायको सोबत एकटा राहतो. मानसिकता जुळली तरच बोलणी होऊ शकतात ना ?आधी सांगा माझे अंदाज बरोबर आहेत?

आपट्यांना आता थोडे कुतुहल निर्माण झाले. ते हसून म्हणाले.
- बर्‍यापैकी बरोबर आहेत.
- छान आता तुम्हाला काही गोष्टी मोकळेपणाने सांगता येतिल. अर्थात तुमची हरकत नसली तर.
- बोला काही हरकत नाही.
- आता बघा. काही गोष्टी अशा असतात की सगळ्यांशी नाही बोलता येत. गुपितच असतात ती. समवयस्कांशीच बोलता येतात.
मी अंदाज केला की तुमच्याशी बोलणे होऊ शकेल.
असे म्हणून देशमुख गप्प बसले. प्रकरण काय असावे हे आपट्यांना समजेना. रात्री अकरा वाजता एक अनोळखी फोन. काही असंबद्ध बोलणी. देशमुखांचा अंदाज बरोबर होता. 'मातृस्मृती' बंगल्यासमोर एक छोटीशी बाग होती.
दोन -चार फ़ुलाटुलांची रोपटी होती. घराच्या आजुबाजुस कोणी नव्हते. बाहेर पाऊस पडत होता. रस्त्यावर चांगलेच पाणी साठले असणार. अशी पावसाळी रात्र आणि फोनवर पलिकडे कोणीतरी एक.

हळूहळू आपटे बोलण्यात शिरत होते. त्यांचा कोरडेपणा सरला होता. उलट देशमुखांशी बोलण्यात त्यांना रस वाटु लागला.
हळूहळू कोणते तरी एक रहस्य आपट्यांसमोर आपले जाळे उलगडत होते.
जाळे उलगडत होते की विणले जात होते ?

(क्रमश:)

पुढील भाग

वाङ्मयभाषांतर

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

20 Nov 2008 - 6:19 pm | अभिज्ञ

छान लिहिले आहेस.
पुढे काय होईल ह्याची उत्सुकता मस्त ताणून धरली आहेस.
पुढचा भाग लवकर येउ द्यात.

अभिज्ञ.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 11:00 pm | बिपिन कार्यकर्ते

भिरभिरे मास्तर,

सुरूवात लै मस्त. पुढचा भाग लिही लवकर.

बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी's picture

20 Nov 2008 - 6:20 pm | ऍडीजोशी (not verified)

लय भारी रे भावा. ग्लेन ड्रम्मॉन्ड इतकी प्रभावी असेल असं वाटलं नव्हतं :)

सुनील's picture

20 Nov 2008 - 6:25 pm | सुनील

अरे, कुठलेही ग्लेन xxxxxx प्रभावीच असतं. तात्याला विचार!

(कुठल्याही ग्लेन xxxxx चा प्रभाव आवडणारा) सुनील

असो, भिरभिर्‍या, सस्पेन्स चांगला राखला आहे. अजून येउद्यात

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Nov 2008 - 6:26 pm | ब्रिटिश टिंग्या

पुढचा भाग टाक लवकर!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 6:26 pm | लिखाळ

छान..
पुढचा भाग येऊद्या लवकर.
-- लिखाळ.

शाल्मली's picture

20 Nov 2008 - 7:29 pm | शाल्मली

छान..
पुढचा भाग येऊद्या लवकर.

असेच म्हणते..
--शाल्मली.

शितल's picture

20 Nov 2008 - 6:35 pm | शितल

छान लिहिले आहे.
पुढचा भाग लवकर लिहा.:)

टारझन's picture

20 Nov 2008 - 6:48 pm | टारझन

सहमत

शितल's picture

20 Nov 2008 - 6:35 pm | शितल

छान लिहिले आहे.
पुढचा भाग लवकर लिहा.:)

टारझन's picture

20 Nov 2008 - 6:48 pm | टारझन

सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

20 Nov 2008 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार

उत्कंठा वाढली आहे....

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

अनंत छंदी's picture

20 Nov 2008 - 6:57 pm | अनंत छंदी

फारच छान, वाचकांची उत्कंठा ताणून धरण्यात यश मिळविले आहे. आता पुढचा भाग लवकर लिहा.

अवलिया's picture

20 Nov 2008 - 6:59 pm | अवलिया

मस्तच
येवु द्या लवकर पुढचे भाग....

नाना

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2008 - 7:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहित आहेस.
योग्य ठिकाणी क्रमशः टाकलं आहेस, पण पुढचा भाग लवकर टाक रे!

कपिल काळे's picture

20 Nov 2008 - 7:16 pm | कपिल काळे

छान भिरभिरया

डेक्कन, प्रभात रस्त्यावरचे वातावरण, देशमुख, आपटे आडनावे, बंगल्यासमोर बाग वगैरे तुझी एडिशन आहे का?

http://kalekapil.blogspot.com/

अभिरत भिरभि-या's picture

20 Nov 2008 - 7:18 pm | अभिरत भिरभि-या

पुणे त्यातही प्रभात रोड मला बेष्ट वाटले.
(पुणेकर) अभिरत

इनोबा म्हणे's picture

20 Nov 2008 - 11:57 pm | इनोबा म्हणे

पुणे त्यातही प्रभात रोड मला बेष्ट वाटले.
लढ रे बाप्पू!
मस्त लिहीत आहेस, उत्सुकता ताणली गेली आहे. आता पुढचा भाग द्या लवकर.

'दम' मारणं चांगलं.....पण त्याची सवय लागणं वाईट!
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रेवती's picture

20 Nov 2008 - 9:59 pm | रेवती

लिहा ना भाऊ पुढचा भाग.
ह्या भागाने सुरूवात मस्त झालीये.

रेवती

यशोधरा's picture

20 Nov 2008 - 10:16 pm | यशोधरा

अभिरत, छान लिहिले आहेस. आवडले.

प्राजु's picture

20 Nov 2008 - 10:26 pm | प्राजु

पुढे काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिका's picture

20 Nov 2008 - 10:59 pm | अनामिका

सुरुवात मस्तच
उत्सुकता ताणुन धरली आहेस.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत .
लवकर येऊ द्या पुढील भाग.

"अनामिका"

भाग्यश्री's picture

20 Nov 2008 - 11:29 pm | भाग्यश्री

फार इंटरेस्टींग ! लवकर येऊद्या!

http://bhagyashreee.blogspot.com/

baba's picture

21 Nov 2008 - 12:36 am | baba

हळूहळू कोणते तरी एक रहस्य आपट्यांसमोर आपले जाळे उलगडत होते.
जाळे उलगडत होते की विणले जात होते ?

उत्सुकता वाढली आहे.. पुढील भाग लवकर येऊ द्या..

..बाबा

घाटावरचे भट's picture

21 Nov 2008 - 1:18 am | घाटावरचे भट

उत्तम लिहिलंयस. पुढचे भाग लवकर टाक रे बाबा.
अवांतरः असलं काहीतरी कॉलेजच्या मॅगझिनसाठी लिहून द्यायला काय झालं होतं???? मला तेव्हा एक से एक कचरा कथा/लेख छापावे लागले.

नंदन's picture

21 Nov 2008 - 2:40 am | नंदन

छान झालीय. देशमुखांचे तर्कशास्त्र आवडले, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

21 Nov 2008 - 4:48 am | मदनबाण

अभिरत मस्त लिहले आहेस्...पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 11:21 am | अभिरत भिरभि-या

उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी सगळ्यांना धन्यु :)
तुम्हा सगळ्यांच्या अपेक्षा कितपत पुर्‍या झाल्यात हे पुढील भागात समजेलच :)