तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI

दिग्दर्शक :- जगदिश शर्मा
प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८

--------------------------------------------------------------------------------

कलाकार :-
क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी.
तुफान विनोदि आहे हा विचित्रपट. अतिभव्या असे सेट, तगडी स्टारकास्ट, उच्च दर्जाचे छायाचित्रण सगळे कसे अगदी वाह वाह आहे.

ह्या विचित्रपटातिल हिरो ला बघताना आपल्याला एकाच वेळी राजकुमारचा आवाज आणी दिलिप कुमारचा अभिनय असा दुहेरी आनंद मिळतो. ह्या वयातला आमचा देव आनंद सुद्धा ह्या विचित्रपटातिल हिरो पेक्षा कितितरी देखणा आणी चपळ वाटतो हा भाग निराळा. असो, इतर कलाकारांविषयी आनंदच आहे, बरेचशे आपण ह्याना पाहिलेत का ह्या सदरात मोडतात, उरलेले काहि यादव वंशिय आडनाव लावत असल्याने ह्या विचित्रपटात घेतले असावेत, काहि नाव परिचीत आहेत, त्या पैकी काहिनि म्हशीची व काहिनि ह्या विचित्रपटात कळशीची पाहुणी भुमिका केली आहे असे आमचा खास सुत्रधार सागंतो.
सर्वच कलाकार ज्या सहजतेने गोठ्यात वावरतात त्या सहजतेने विचित्रपट भर वावरले आहेत. पानाला ज्या सहजतेनी चुना लावताता ( आजकाल हे लोक महाराष्ट्राला चुना लावत आहेत असे आमचा एक खोचक साथिदार निर्माता म्हणाला व लवकरच ह्या विषयावर आपण 'भाग भय्या राज आया' ह्या नावाचा सिनेमा काढत आहोत असे त्यानी आमच्या कर्णेंद्रियावर घातले.) त्या सहजतेने प्रत्येकानी अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या रतिबाने पुर्णवेळ प्रेक्षकांना खुर्चित बांधुन ठेवण्याची जादु ह्या विचित्रपटात आहे. (काहि दुष्टबुद्धि लोक प्रेक्षक पहिल्या सिन लाच बेशुद्ध पडतात अशी बदनामी करत आहेत, देव त्यांना म्हशीच्या पायाखाली चिरडो.) ह्या विचित्रपटाला मोठ्या प्रमाणात गर्दि करुन आपदग्रस्तांना सहकार्य करावे.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

अगदी जसच्या तसं ऑर्कुट वरून उचललये !!

फार मेहेनत घेतलीस राजकुमारा ...कॉपी पेस्ट करण्याची.....

संपादक महोदय लक्ष घालतीलच.......

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हि हि हि अहो तो मृत्युंजय मीच आहे :)
लोभ असावा !

ओर्कुट वर सुद्धा मीच लिहिले आहे, काहि कारणामुळे इथे लिहिण्यास वेळ झाला त्या बद्दल क्षमस्व !!

खुलाश्याबद्दल धन्यवाद... हा लेख इथेच राहील..

सर्वच जणांनी मिपाच्या धोरणाचे कसोशीने पालन करावे इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते...

तात्या.

ब्रेकिंग न्युज : देशद्रोही सिनमा कू सारे लाइनो मा ऑस्कर मिलना चाही ( बिहार टाइम्स)
आत्ताच मिळालेल्या "ताज्या" बातमी नुसार, लालूंनी आपल्या १२व्या पोराच्या गोड बातमी बरोबर हे ही जाहिर केलं ते 'देशद्रोही' चित्रपटातील प्रत्येक गोष्टी ला ऑस्करच्या सगळ्या प्रकारात नॉमिनेट करतील .. उत्कृष्ठ कथा, अभिनेता, नेपथ्य, छायाचित्रण, निर्देशन, सॉप बॉय इतकेच नव्हे तर बेस्ट ऑस्कर व्युअर्स चं सुद्धा नॉमिनेशन लावणार आहे , तेंव्हा चला पटापट चित्रपट पहा , आणि स्वतःलाही ऑस्कर घ्या.

अवांतर : =)) =)) =))
अतिअवांतर : =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

ढापलेले असेल तर कारवाई योग्यच आहे.
पण हे चित्रपट परीक्षण वाचून अंमळ करमणूक झाली. सद्ध्या वेगवेगळ्या हिंदी चॅनेल्सवर या चित्रपटाची जाहिरात चालू आहे. त्यात नथूराम गोडसेंच्या नावाचा ही उल्लेख आहे.
हिरो पाहून तर जाम हसलो.

'भाग भय्या राज आया'
=))

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पण हे चित्रपट परीक्षण वाचून अंमळ करमणूक झाली

असेच म्हणतो , लै लै हसलो ...
आणि त्यावर कडी म्हणजे "तु नळी" वरचा तो व्हिडीओ पाहिला ...
=)) =)) =))

च्यायला काय डोकं असतं बौ एकेकाचं, काय खल्लास पिक्चर काढला आहे, असे बेक्कार खवट डायलॉक पार "जानी राजकुमार" चे पण नव्हते ...
अक्षरशः पोट धरुन हसलो, हसु अनावर झाले म्हणुन बाहेर जाऊन गच्चीत हसुन आलो ...

नम्तर एका "भैय्या मित्राला ती युट्युबची लिंक" फॉरवर्ड केली व सांगिअतले तुमच्या महिसा चा पिक्चर आहे ...
त्याने नंतर मेसेंजर वर अगणीत शिव्या घातल्या ( व तिकडे रागाने केस उपटले असतील ... ;) )
आपला एकच रिप्लाय .... "भाग भय्या राज आया"
अगदी खुळ्यासारखं हसतो आहे गेली १० मिनीटे ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डान्या... मी ती लिंक आधी बघितली नव्हती. तू एवढी स्तुति केलीस म्हणून बघितली. मला पण याड लागलंय .... लै भारी इनोदी आहे. =)) =)) =))

पण तू एक गोष्ट नोट केलीस का? 'आज तुम्हारे कहनेसे मुंबई छोड दू, कल इसके कहनेसे दिल्ली छोड दू' .... म्हणजे या भय्या लोकांना दिल्ली मधून पण हाकलताहेत याची कबुलीच आहे ती.

काल एका बंगाली मित्रा बरोबर बोलत होतो, तो पण शिव्या घालत होता बिहार्‍यांना. त्याचं एक वाक्य, 'साला ये बिहारीयोको हमने पहलेसे उपर उठनेही दिया कोलकाता मे, तुम लोग वही गलती किया'.

बिपिन कार्यकर्ते

पण तू एक गोष्ट नोट केलीस का? 'आज तुम्हारे कहनेसे मुंबई छोड दू, कल इसके कहनेसे दिल्ली छोड दू' .... म्हणजे या भय्या लोकांना दिल्ली मधून पण हाकलताहेत याची कबुलीच आहे ती.

+१, भारी निरीक्षण आहे ...
मला त्या डायरेक्टरची आणि निर्माता, कथालेखकाची किव करावीशी वाटते ...

च्यायला एक पेद्रु, चिपाड, अस्सल बिहारी कळकट कार्ट हिरो म्हणुन उभा केले आहे आणि आव असा आणला आहे की जणु हा अन्यायाविरुद्ध लढणारा "मार्टीन ल्युथर किंग, महात्मा गांधी, भगतसिंग" ह्यांचा अर्कच, काय ती डायलॉक बाजी, काय ती हाणामारी, काय ती सटासट गोळ्यांची हाणामारी .... हा हा हा, लै लै हसलो बॉ !!!

शेवटी तर तो ज्या रितीने "मुंबई पोलीसांना" फटाफट गोळ्या मारतो ते पाहुन माझ्या डोळ्यातुन अश्रु आले .... हसुन हसुन हो !

सर्वांनी जरुर पहा ट्रेलर, असा चान्स वारंवार नाही मिळत ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मला तर तो 'रज्जिनिआन्ना' चा भय्या अवतार वाटला. काय कोलांट्याउड्या मारत होतं, फिट्ट माकडच जनू. गोळीबारीचे सीन पण लै भारी.

बिपिन कार्यकर्ते

मला तर तो 'रज्जिनिआन्ना' चा भय्या अवतार वाटला. काय कोलांट्याउड्या मारत होतं, फिट्ट माकडच जनू. गोळीबारीचे सीन पण लै भारी.

हो आणी त्यानी कसं पाय आपटून पिस्तूल उचललं ते पाहिलंत का?
बेक्कार! =))

बोलो कमाल आर खानकी, जय!

सर्वांनी जरुर पहा ट्रेलर, असा चान्स वारंवार नाही मिळत ....
=))
म्हणूनच पाहिला रे ट्रेलर. काय लै भारी आहे तो हिरो, आतापासून मी त्याची फॅन नं १ आहे.
आणि तुम्हाला पोरांना ग्रेसी सिंग नाही का दिसली त्या ट्रेलरमधे?

एवढं भयानक माकड दिसल्यावर त्यापुढं ग्रेसी सिंग कशी दिसणार? तू म्हणालीस म्हणून ट्रेलर परत पाहिला, यावेळी फक्त तिलाच पाहिलं. :)

मी हा ट्रेलर एका 'माणसाळलेल्या' मद्राश्याला दाखवाला इथे, तो पण हसतोय बेक्कार. :)

बिपिन कार्यकर्ते

तू म्हणालीस म्हणून ट्रेलर परत पाहिला, यावेळी फक्त तिलाच पाहिलं.
तिला पाहून तुम्हाला तुमच्या काळातल्या हिरवीणींची आठवण नाही का झाली?? ;-)

:)

बिपिन कार्यकर्ते

स्वारी हा ... माला माहित नव्हतं तुम्हाला ग्रेसी सिंग एवढी आवडते ते!
तुम्ही फॅन नं १ का तिचे?? तुमच्या काळातल्या हिरवीणी आणि ती यांत काही फार फरक नाही हो! ;-)

अदिती

=))

सुरय्या मध्ये व ग्र्सी मध्ये लई फरक हाय यमे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

सुरय्या मध्ये व ग्र्सी मध्ये लई फरक हाय यमे !

तो मला कसा कळणार? मी तर सगळा वेळ त्या हँडसम कमाल आर. खानाकडेच बघत होते! ;-)

>>>हँडसम कमाल आर. खानाकडेच बघत होते

=))

हसून हसून पडायचा राहीलो होतो.. आता पडतो ! :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

बिपीन सुरय्याच्या काळातला त्याला ग्रेसी कशी कळणार (दिसणार ) :-/

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

राजे मी युवाअड्डामधून नाव काढून घेईन हां..... X(

:)

बिपिन कार्यकर्ते

ठीक आहे बाबा, तुझ्या काळातील हेमामालनी ;)

खुष :?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

असं बोलायचं नाही ...

किती भारी चित्रपट आहे तो. किती विनोदी आहे तो कमाल आर. खान. आता तर शाहरुखचं नावपण किंग खान असं नाही घेता येणार. आता मात्र फरदीन खानालाही कांपिटीसनवा है।

>>>>आता मात्र फरदीन खानालाही कांपिटीसनवा है।

हा कोण :-/

असं कोड्यात नाय बोलायचं बॉ !

तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल
राजे, तुमचा सोहेल खान?? ;-)

राजेंनी कालच 'दोस्ताना' बघितला असेल

=))

बिपिन कार्यकर्ते

आम्ही मागे पडेल हिरोंची लिस्ट तयार केली होती.... भुषणकुमार पेक्षा कमी मते ह्याला मिळाली होती ;)
म्हणून आमचा पडेल सुपर -डुपर हिरो - सोहेलखान !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल>>>>>>>>>
छे छे तुम्ही लोक गुलशनकुमारचा भाउ किशनकुमारला कसे काय विसरु शकता बर?????????

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

तो तर पडेल होरोंचा बाप माणुस यार !
;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

तिला पाहून तुम्हाला तुमच्या काळातल्या हिरवीणींची आठवण नाही का झाली??

बिकां ना काय झाले ते माहित नाही पण आम्हाला नाय बॉ कोण आठवले ...
तश्या आम्हाला सगळ्या वयाच्या, सगळ्या भाषातल्या सगळ्य्क्षाच हिरवाणी आवडतात ...
आम्ही भेदाभेद करत नाही ...

अवांतर : परस्त्री मातेसमान असते ...
( कणेकर म्हणतात ह्याचा अर्थ "परस्त्री ला माता बनवण्याच्या मागे लागा असा होतो " )

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

त्या झैरातीत शिवाजी महाराजांचा उल्लेख " शिवाजी मराठे" असा आहे, शिवाजी महाराजांचे आडनाव इतके चित्पावन्न असेल असे वाटले असावे बहुतेक दिग्दर्शकाला

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

हो.. एक देशद्रोहीच असा पिक्चर बनवू शकतो.. जनतेचा छळ करायला.

तु नळीवरच्या ट्रेलरवरची एक प्रतिक्रीया:
ई सनिमा के ट्रैलर हमारा मने मोह ली. हमनि के लोग आ हमनि के इस्टैंडर्ड एकदम फीट !!. जैसा भोजपुरीए सनिमा चलल हिन्दी का मुखड़ा में. सनिमा का नामवा रख ली "देखा बुढवा साठियाल संग गोरी के ठुमका"
=)) ट्रेलर ही आवडले आणि त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रीया ही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

"देखा बुढवा साठियाल संग गोरी के ठुमका"

फिट्ट... =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

या 'सनिमा' चा अजून एक ट्रेलर येतो टीव्ही वर... त्यात हे माकड बर्‍याऽऽच देशभक्तांचं नाव घेतं. गांधींपासून विनोबा भाव्यांपर्यंत (व्हाया 'शिवाजी मराठे' =)) ), पण इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये. ;)

बिपिन कार्यकर्ते

>>>इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये

=))

असं नाय बॉ बोलायचं !
कोनाच्या तरी मनावर परिणाम होतो व मग देशद्रोही नावाचा भंगार चित्रपट तयार होतो !

;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

पण इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये>>> =))

कोनाच्या तरी मनावर परिणाम होतो >>>>>>> =))
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

या 'सनिमा' चा अजून एक ट्रेलर येतो टीव्ही वर... त्यात हे माकड बर्‍याऽऽच देशभक्तांचं नाव घेतं.

खी खी खी, लै कॉमेडी पिक्चर यायला लागले बॉ ...

असो, आमच्याकडे टीव्ही नाय हो, कॄपया कुणी तरी ह्या " नव्या ट्रेलरची लिंक" इथे डकवा ...
लै लै उपकार होतील हो !!!

आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ...
आयला उलटे झाले :(
आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ...
चुकले पुन्हा :(
आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ...
आरारा ... काय लिहले हे ? नको नको ...
आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ...
हां गश्शी, आता जमले ...

तर तात्पर्य : कुणी तर नव्या ट्रेलरची लिंक द्या हो, लै लै उपकार होतील !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

देशद्रोही या भोजपूरी (सिरीयस कॉमेडी) सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर 'शिमगा प्रॉडक्शन'ने याचा मराठी रिमेक करायचे ठरवले आहे.( अधिक माहितीकरिता www.deshadrohithefilm.com इथे भेट द्यावी.
प्र. भूमिकेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते तुकाराम बोळे('दादाच्या तंगड्या' फेम) आणि काळजाचा ठोका चूकवणारी (धाक धूकगर्ल)अभिनेत्री नयनतारा यांच्याशी बोलणी सुरु आहेत.
या सिनेमात काम करण्यासाठी काही साईड कलाकारांची गरज आहे. या सिनेमात फुकटात काम करु इच्छिणार्‍यांनी कृपया आपापले नाव नोंदवावे.

टिपः वेबसाईट अजून चालू झालेली नाही. ती फुकट बनवून घेण्याविषयीची बोलणी चालू आहेत. धन्यवाद!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

या सिनेमात काम करण्यासाठी काही साईड कलाकारांची गरज आहे. या सिनेमात फुकटात काम करु इच्छिणार्‍यांनी कृपया आपापले नाव नोंदवावे.

ए इन्या, माझी शिफारस कर ना, प्लीज .... ;-)

सद्ध्या मूळ सिनेमाची पटकथा जशीच्या तशी लिहून काढण्याविषयी ढापूराम खोटवाल यांच्याशी बोलणी चालू आहेत. तेवढे काम झाले की पटकथेत तुझ्यासाठी एखादा 'एलियन' मधे घुसडायला लावतो. टेंशन नक्को.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा, तुमचा हिरो फिक्स झाला, हिरवणी झाली, बाकी साईड ऍक्टर + इलियन्स झाले ...
पर त्या "व्हिलन" शिवाय काय मज्जा भौ , हाणामार्‍या करायला, डायलॉक टाकायला, पटकथेची गरज म्हणुन हिरवणीच्या मागे लागुन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रतत्न करुन हिरो आणि हिरवणीची ओळख होण्यास मदत करणारा, झालच तर पार्ट्या ठेऊन "आयटाम सॉंग्ज" ची सोय करणारा खरा महानायक "व्हिलन उर्फ डॉन" हवाच ना ...

आम्ही एकदम फिट्ट आहे बघा, घाला आमचे नाव तुमच्या वहीत ..

हां, पण आपण त्या भैय्यांकडुन मार बिर नाय खाणार सांगुन ठेवतो, नडग्या फोडु एकेकाच्या ...

बघा काय तरी शेटिंग करा !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डान्या, मग 'मोना' कोण रे?

इनोबा, बघ रे बाबा याच्या मोनाचंही काही सेटींग होतं का ते! आपण निर्मितीताईंशी बोलूया का??

(पळा आता, डान्या काय सोडत नाही आज मला!)

च्यायला मी एकावेळी किती गोष्टी करायच्या ???
मी आमचा बिसीनेस बघु, राजकारण्यांना डोस देऊ , सच्चा पोलीसवाल्याला त्रास देऊ, सामान्य पब्लिककडुन हप्ता घेऊ की आता तुमची "मोना" हुडकु ???

ते काही नाही, ते मोना बिना तुम्हीच पहा ...
अजुन एक, तो शाकाल बिकाल करणार असला तर " आपण केस कापणार नाही", आधीच सांगुन ठेवतो !!!

समजा मोना नाही मिलाली तर नगाला नग कोणबी चालेल, आपल्याला क्वालीटीशी मतलब आहे.
ओ निर्माते साहेब, बघा तेवढे ...

अदितीला बक्षिस : २ पेट्या पैसे + १० बेश्ट वाईन्स + १ पोते कोकेन , कर मज्जा !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्र. भूमिकेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते तुकाराम बोळे('दादाच्या तंगड्या' फेम) आणि काळजाचा ठोका चूकवणारी (धाक धूकगर्ल)अभिनेत्री नयनतारा यांच्याशी बोलणी सुरु आहेत.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आरं इन्या .. तुझ्या जिभेला काही हाड ? नयनतारा हॉलीवुड मधे काम करणारी !!! ति काय तुकाराम बोळे बरोबर काम करतेय !! इसरा इनो .. तुम्ही प्रस्ताव घेउन गेलात तर शिव्या खाणार याची खात्री मी देतो !

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

इन्या ष्टार काष्ट हे बघ रे....
हीरो म्हणून फुकाराम पटने चालेल का?
त्याने दादाचे धोतर शिणेमात धोतराचे काम केले आहे.
जोशीबैना मारकुट्या शाळामास्तरणीचे काम मिळेल.
डॉन्याला सरपंच डानवाडी चे काम
इनोबा स्टील फोटोग्राफी
धमाल मुलगा / आनन्द्यात्री हे फाईट मास्टर
कुमार टारझन हा संत मास्टर अर्र स्टन्ट मास्टर
विजुभौ बिपीन कार्यकर्ते राजे हे भजनी मंडळात
विप्र कीर्तनकार
मनस्वी नयनी प्राजु वरदा दोन्ही स्वात्या शीतल यशोधरा या करवल्या कम भोंडला कम नळावरच्या मारामारीत
पिडाकाका तपोवृद्ध तेजस्वी मार्गदर्शकाच्या भूमिकेत
प्रकाश घाटपांडे गुप्त पोलीसाच्या भुमीकेत
रामदास काका संवाद लेखक
क्यामेरामन मदनबाण
आणि स्पेशल भूमिकेत..........( क्रमशः)

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

=)) =)) =)) =)) =))
बे क्का र SSSSSSSSSS !!!

तरी म्हटले एवढ्या वेळ विजुभाऊ शांत बसलेच कसे ?
मज्जा आली ...

आणि स्पेशल भूमिकेत..........( क्रमशः)

हे आहेच का अजुन ? चालु द्यात ?

आमची एक डिमांड आहे, आम्हाला तुम्ही डानवाडीचे सरपंच तर केलेत पण समोर कोण नाही ना "डाव खेळायला" , मग काय मज्जा ?
आम्ही कुनाबरोबर राजकारण खेळणार ??? आणि ते जर नाही केले तर दुसरे आम्ही करणार काय ?
मुझे तो हल भी चलाना नही आता ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आमची एक डिमांड आहे, आम्हाला तुम्ही डानवाडीचे सरपंच तर केलेत पण समोर कोण नाही ना "डाव खेळायला" , मग काय मज्जा ?
तुम्ही डाव उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला?

आम्ही कुनाबरोबर राजकारण खेळणार ??? आणि ते जर नाही केले तर दुसरे आम्ही करणार काय ?
आणि आनंदराव शहाळकरांना आपण दुसरे राजकारणी बनवू! ;-)

>>>>उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला?

हो का नाही चालणार डॉनला त्याच्याच वयाची तर आहे ती ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

हो का नाही चालणार डॉनला त्याच्याच वयाची तर आहे ती
राजे, आज तुम्ही लोकांची वयं काढताय फार .... तुम्हाला पण दिलं पाहिजे चित्रपटात काम!

तुम्ही हिरवीणीचे बाबा!

>>>>तुम्ही हिरवीणीचे बाबा!

:(

नको बॉ !
त्यापेक्षा मला गावात उभा असलेला पुतळा करा ते चालेल !

* हिरवणी च्या बा ला पिचर मध्ये तसे बी काई काम नस्तंच ना ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

राजेंना , हिरवणीचा बा म्हनुनच घ्या ...

हेहेहे , आयेशा टाकियाच्या बा चा रोल, इज्जतीचे भजे पार , मजा आली !!!
आता बसा घरासमोर येणारी पाखरे हाकलत ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हिरविन आयेशा टाकिया असेल तर आपल्याला सोडून तिच्या बर्बर कोणलाच काम करून देणार न्हाय ...
आम्हाला हिरो नाय बनायचं .. पण हिरवीन आयेशा टाकिया असेल तर बाकिच्यांना माना खाली घाला !!
सगळे हाडं आणि हाडं रहित (जिभ वगैरे) प्रकार तोडून ठेवण्यात येतिल ..

कळावे

आयेशा - टारया

>>>>उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला?
ही कोण बया ?
उर्मीला मार्तोंडकर तर नव्हे , हाहाहा ... लै भारी , चाले काय धावेल ना !!!

स्वगत : ह्या लोकांना ताज्या दमाच्या " आयेशा टाकिया / बिपाशा / निशा कोठारी / तनुश्री दत्ता " वगैरे माहित नाहीत काय ?

आनि हो, राजकारणी दुसरा शोधा बॉ, तुम्ही सुचवलेल्या नावाबद्दल तुर्तास " नो कमेंट" !!!
कोणीतरी तोडीस तोड शोधा ...

अवांतर : राजे, उर्मीलाचे वय आणि आमचे वय ह्यातले साम्य दाखवन्याचा जबरदस्तीने प्रयर्न केल्याबद्दल आमचे "युवाअड्डावरचे खाते डीलीट करावे तसेच आमचे सर्व लेख + प्रतिसाद उडवावेत " ही विनंती ...
आयेशा टाकिया आल्यास आम्ही अजुन १० नवे आयडी घेऊ तिथे ... :)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

जा दिली आयेशा टाकिया व संगे कॅटरिना पण मुफ्त मध्ये ;)
डब्बल लव्ह स्टोरी करा !

पण ते दहा आयडि चं लक्ष्यात असु द्या बंर डॉन साहेब !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

आयेशा संगे कत्रिना मुफ्त दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ...

आता फक्त कत्रीनाप्रेमी टारुबाळाला आवरा !!!
बाकी ते आयडीचे काम लगेच होईल ...

अहो, आमचे लग्न तर होऊद्यात, १० काय तुम्ही म्हणाल तितके आयडी उघडु ... ;)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

>>>आमचे लग्न तर होऊद्यात, १० काय तुम्ही म्हणाल तितके आयडी उघडु

=))

अगायाया !!

राखीव आयडी ठेऊ का १०० एक :?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

राखीव आयडी ठेऊ का १०० एक

१०० ???
झालं, काढलीत ना आमची इज्जत ???

मी तुम्हाला खास एक "नवे संस्थळ काढा" असे सुचवणार होतो तर तुम्ही म्हणताय "१०० आयडी राखीव" ...
त्यात काय मजा आहे का ? अहो डॉनराव शेळके पाटील आम्ही हे तर लक्षात घ्या !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

व्हयं व्हयं ईसरलोच होतो बघा !

एक डेडीकेटेड सर्वरच आपण बुक करु तुमच्या फॅमिलीसाठी कसं पाटिल हे ठीक हाय नव्हं आता ?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

एक डेडीकेटेड सर्वरच आपण बुक करु तुमच्या फॅमिलीसाठी कसं पाटिल हे ठीक हाय नव्हं आता ?

बेश्ट !!!!
आता कसे दमदार काम झाले, आम्ही लै खुष आहोत ...

सांच्याला या वाड्यावर, खास विलायती दारु मागवली आले आणि वरुन एक बोकडही कापु ...
आजकाल "इंद्रा तासगावकरीण" मुक्कामाला मळ्यातल्या बंगल्यावरच आहे, बघा ४ घडी नाचगाणे तिचे ...
ती ही बिचारी खुष होऊन जाईल .....

साखरसम्राट, कर्मयोगी डॉनराव शेळके पाटील ( सरपंच, डॉनवाडी, पश्चिम म्हाराष्ट्र )
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आलो असतो व्ह पण सध्या निवडनुकिची रण्धुमाळी सुरु झाली नव्ह आता... आम्हि दिल्लित नाय राहिलो तर लै मोठा धुरळा उडल येथं ... लई डोक्याचं काम आहे... बाईच्या नादी लागण्याचा हा काळ नव्हे पाटिल.. पब्लिक कॅमेरे घेउन फिरते आज काल ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

बायलीला, हे मिडीयावाले लै हरामखोर जात आहे, जिकडं तिकडं कॅमेरे व माईकच बोंडुक घेऊन हिंडत्याती ...
एकदा हिस्का दावलाच पाहिजे ...
तरी परवा कारखान्याच्या वार्षीक सभेचा वृत्तांत घ्यायला आले होते, बसली २ उसाची फोकं पेकाटात त्या रणधुमाळीत, ४ दिस कोकलत होते आमच्या नावाने टीव्हीवर, जपा त्यांना ...

बाकी दिल्लीला चालला आहात तर "श्रेष्ठींना नम्स्कार" सांगा, म्हणावं मंत्रीमंडळात नेतॄत्व न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.
म्होरच्या निवडणुकीत अवघड जाईल !!!
बाकी समदं ठीक ना ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बाईला निरोप देतो तुमचा पण आम्ही आता नवीनच पक्ष काढायाचा म्हणतो हाय !
आम्हाला बी टिकीट नाय दिलं त्या बयेने ... थुतीच्या मायला ३० वरीस काढली पक्षात व फक्त दोन दा टिकीट.. जमानत कोनाची जप्त नाय होत आमची बी झाली पण आमची काय ईज्जत हाय काय नाय पक्षात :-/

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

बाईला निरोप देतो तुमचा पण आम्ही आता नवीनच पक्ष काढायाचा म्हणतो हाय !

आक्ष्क्षी मनातलं बोललात बघा !!!
आमच्या बी मनात हेच होतं पण म्हटलं की ३० वर्षं तुम्ही शेवा केलीत पक्षाची आता कसा सोडणार ?
ती दिल्लीत बसलेली चांडाळचौकडी लै इब्लिस आहे, ताकास तुर लाऊ देत नाही ...

तुम्ही काढा पक्ष, आम्ही आहोत साथीला, झालच तर " इकडे ४, मराठवाड्याचे १२ व कोकण, विदर्भाचे ८-१०" आमदार आहेत संपर्कात ...
घेऊ सगळ्यांना बरोबर ...
पहिली सभा घ्या "शिवाजी पार्कावर", आम्ही आणातो १०० ट्रक भरुन माणसं कारखान्यावरुन, आक्ष्क्षी शिवशेनेगत मैदान भरवु ...
होऊन जाऊ द्या दनका ...

ह्या निवडणुकीत त्या फोकलीच्या "राज्य प्रभारी टाराज देशमुखाला" त्याचा मतदारसंधात नाय माती चारली तर इचारा ...

होऊन जाऊ द्या.
"राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!"
"राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!"

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

लई धन्यवाद बघा पाटिल तुमचा सपोरट असला की झालं !
चला उद्या भेटतो .. नाव व बाकींच ठरवू !
बाकी पैशाची पण जुळना करतो वाईच कितीला येईल एक आमदार ?
टाराज ला पण विकत घेऊ या का ?
वळवू आपल्या कडे वळला तर ठीक नाय तर... विसर्जन करु टाकू कसं ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

मायला... डानराव, ह्ये काय हो?

बाकी दिल्लीला चालला आहात तर "श्रेष्ठींना नम्स्कार" सांगा, म्हणावं मंत्रीमंडळात नेतॄत्व न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.

आमी कदी कम्प्लेट केली काय तुमच्या कडं? आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती... तुमी व्हा फुडं... आमी हायेच तुमच्यासंगट...

तुमचं बळ म्हंजी आमच्या सारखे कारयकरतेच न्हवं का? (पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय :) साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं? पिच्चार तर बगितलाच आसंल)

मा. बिपिन कार्यकर्ते,

च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी,
च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती,
संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी

अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा

च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी,
च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती,
संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी

अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा

=)) =)) =)) =))

हे असले दोन-चार कारयकरते आम्हाला बी द्याकी राव,
नाय आमची मंडळी म्हणजे.... राहु दे उगाच वाईत शब्द नको तोंडातुन तो बघतो व मग करंल नस्सटं हे लिहलेलं सगळ !

बाकी कारयकरते मंडळी जरा वाई सपोरट आम्हाला वी द्या बरं का ह्या येळी.. आम्ही निवडूण आल्यावर देउ तुमच्या कडं पण लक्ष !
अवखळवाडी मध्ये पंचायत निवडनुका हाईत नव्हं आता... तुम्हालाच निवडून देउ बघा... जमलं तर !

संग संग चालायला हवं नाय तर एक पडला की मागची सगळीच पडत्यात लक्ष्यात राहू द्या कारयकरते सायब !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

हे असले दोन-चार कारयकरते आम्हाला बी द्याकी राव,

सध्या आमच्याकडं २ कारयकरते तयार हायेत, जरा ल्हान हायेत, पन तरीबी लै डेंजर हायेत. तुम्हाला अजून २-४ हवे आसतील तर जरा येळ लागंल. ;)

मा. बिपिन कार्यकर्ते

सध्या आमच्याकडं २ कारयकरते तयार हायेत, जरा ल्हान हायेत, पन तरीबी लै डेंजर हायेत. तुम्हाला अजून २-४ हवे आसतील तर जरा येळ लागंल.

=)) =)) =)) =))
देवा , काय हे ?
आज हाकलताहेत मला हापीसातुन !!!

अवांतर : प्रभुसर हवे होते ह्या धिंगाण्यात ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बिपीनपंत, कायतरी गैरसमजाचे राजकारण चालु आहे, तसं काही नाही ...

आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती...

भले !!!
आम्ही हे कंदी इसरलो ???
म्हनुन तर नवा "कालवा" तुमच्या तालुक्यातनं काढला ना ? ( हा आता त्यामुले तुमचा १५० एकराचा उस झाला पण तो भाग वेगळा )
आनं ती "ग्रामरोजगार योजना" तुमच्याकडे दिली, तुमच्या गावाला "आदर्स गाव पुरस्कार मिळवुन" दिला ...
शिवाय दुधसंध व पतपेढी गेली १० वर्से तुमच्याकडेच आहे की ...
आता बोला आम्ही विसरलो का तुम्हाला ???

पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं?

आक्ष्क्षी बराबर ध्यानात आला, कळतयं आमालाबी सगळं ...
बरं ते इरोधी पार्टीचे "टाराज देश्यमुख" वाडावर येऊन गेले म्हणे परवाच्याला ???
काय गोम आहे ???

असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ...

च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी,
च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती,
संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी
अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा

=)) =)) =))
अशक्य !!! _/\_

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

रातच्याला वाड्यावर नगं... मळ्यातल्या बंगल्यावर भेटू, त्ये मारुति कांबळे ब्येनं लै फिराय लागलंय गावात रातीचं, हिंदुराव हाय म्हना त्याच्यावर नदर ठेवायला (मायला त्ये हिंदुराव ब्येनं पन लै अवघाट हाय... नुसतं नदर ठेव म्हनलं तर जाऊन धरलाच त्येला)

आनि टारभाऊंच काय इतकं मनावर घ्येउ नगासा... आशे छप्पन्न देशमुख आले आन् ग्येले... तुमी आपलंच हो शेवटी. आसं लोकांना भ्येटायला कसं मना करायचं हो... कामं आसतात त्येंची बी.

वयनीसायबान्ला दंडवत सांगा. रातच्याला मळ्यावर येनार हाय ते सांगू नगा... या बायका म्हंजी... लगं आमच्या घरी फोन जाईल.

मा. बिपिन कार्यकर्ते

या मग फार्महौस वर, रात्री गाडी पाठवतो, बिनानंबरप्लेटची आहे, कुनाला आज्जाबात संशय येनार न्हाय !!!

त्या हिंदुराव ने डोक्याला ताप करुन ठेव्लाय निस्ता, आता चुलत का होईना म्हेवना आहे म्हनुन गप्प रहावं लागतं ...
मागं एकदा त्या पतपेढीवरुन भांडण झालं तर ह्याने भरबाजारातुन " जयश्या पवाराला" उचलला, अहो ८ दिवस निस्ती मिडीयात बोंबाबोंब ...
त्याच्या बायडीने महिला मंडळ आम्हाला घेराव घातला ...
शेवटी आम्ही शीयेमला फोन करुन कसेबसे मितवले, त्या फोलकीच्या कमीन्सराला २० लाख सारावे लागले ...

ते टारुभौचं मनावर नाय वो घेत,, पण सावध असा. माणुस लै डेंजर आहे, नुस्ता तालमीतले पैलवान घेऊन हिंडतो बरुबर ...
काय पैश्याची वगैरे बात नाही ना केली ? उगाच गुंडी सोडुन माल काढायचा ...

आणि हो, ते "ब्रितीश टीव्ही" वाले आले की त्यांची डोस्की व कॅमेरे फोडुन हकलुन द्या भडव्यांना ...
काल तुमची एक " शीडी" घेऊन आले होते मला दाखवायला, न्हेऊन डांबला फार्महौसवर आणि मरुस्तोवर हानला ...
आज सकाळीच पार्सल डायरेक्ट "चंद्रपुर" ला सोडायची व्यवस्था केली आहे, आता काळाजी न्हाई ...
तुम्ही सावध आसा, इलेक्शनचे दिस आहेत साहेब, इमेज महत्वाची !!!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

तुमी टारुभाऊची आज्याबात काळजी करु नका... लै उडतंय ते, पन आपलंच हाय ते, चड्डीत मुतत व्हतं तवापासून बसतंय बाजूला आपल्या... आता कुटं मिसरूडं फुटायलीत त्या मुळं जरा हवेत हाय ते... तसं चड्डीत र्हातं त्ये बरुबर.

आनि त्ये शीडीचं कश्या पायी म्हन्ताय. हिकडं या, अजून ४ शीड्या देतो तुमास्नी... आम्ही बरुबर सगळं कट्ट्रोल मदी ठिवतो. बाकी २ म्हैन्यापूर्वी त्या गंगीचं कायतरी आलं होतं पेप्रात. आपलं बाळासाहेब आलं होतं हितं आमच्याकडे, नमस्कार करून ग्येलं, म्हनत व्हतं, 'आबा, डोक्यावर हात राहू द्या. आमचा बाप काय करत न्हाई, त्याच्या हाता बाहेर ग्येलाय घोळ या वक्ताला.' म्या सबूद दिला, 'गुमान जावा कुठंतरी पावण्याकडं, आमी बघतो हितलं सगळं'

आटवन ठिवा.

आनि आत्ता या वक्ताला त्या कांबळ्याकडंच नदर ठेवा. आपल्या बोलात, त्ये मायचं ब्येनं लोनी खाऊन जायचं.

बिपिन कार्यकर्ते

>>असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ...

चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना!
त्याचं काय झालं?

चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना!

ब्रिटीश टिंग्यामहाशय, आपण नवे दिसता आमच्या प्रदेशात ...
अहो तसाच प्रघात आहे म्हणायचा ...
तुम्ही येऊन कसलेही "काम" करणार असला तरी "जेवायला या" असेच म्हणातात ...

आता त्या "इंद्रीला" काय खरकटं काढयला बोलावलं आहे का ?
समजेल हळुहळु तुम्हाला ...
तुम्ही ते आमच्या विरोधात बोंबाबोंब करणे बंद करा म्हणजे तुम्हालाही बोलवु एकदा "जेवायला" , काय समजलात ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डानराव,

ह्यो टीवीवाला त्या कांबळ्याचाच मानूस हाय असा हिंदुरावाला डाउट हाय... पाटवायचा का त्या कांबळ्याकडं?

मा. बिपिन कार्यकर्ते

अवो शेळके पाटील,
आमच्या पार्टीची रहान्याची नीट सोय करा. मागच्या खेपंला आमच्या मावशीला लई तरास झाला बगा तुमच्या वाड्यावर! आनी त्ये कोन कोन गोरं पावनं आनलं होतंत त्ये समद्या ठीकानी घुसून ह्ये काय त्ये काय, फारच झाकपाक करत होतं. तवा या येळंला असं काही होनार नाही ते बगा.
बाकी आपन भेटूच.

चंदा बोरगावकरीन.

बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला...

(मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#)

मा. बिपिन कार्यकर्ते

बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला...
आता ग बया! तुमी का वो मापी मागता? तुमच्यामुलंच तर आमची हंशी मागल्या येलंस केवडी शिरीमंत जाली व्हती. खरं तर तुमच्याकडं आमचं लक्षचं नव्हतं, पर तुमी त्ये च्येर्मन का फिर्मन जाल्यापासून येकदम मोटी मान्सं जालात.

(मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#)
अवो, तुमाला काय बी माहित नाय. म्हनं कायतरी इंटर्व्हु का कायतरी घ्येचा मावशीचा आनि इचारतो काय तुमी बाई का मानूस! आता मावशी काय बोल्नार यावर!
मग मीच हातात लाकूड घेऊन घालवून दिला त्या मुडद्याला.

चंदी

कशी हाय हंशी? तिला पन आना बरुबर, आता तुमीच आटवन करून दिली म्हून म्हन्लं.

बिपिन कार्यकर्ते

>> चंदा बोरगावकरीन.
ठार मेलो !!!! अशक्य ...

अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ...
तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ...

बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे.
त्यासाठी थोडे सहन केलं आम्ही, आमची म्हातारी बी लै कावली होती पघा, पन काय करणार, हे राजकारण असच आहे ...

असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो.
म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ?
काय पाठवु का माल वगैरे ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आमची म्हातारी बी लै कावली होती पघा

पन डानराव म्या म्हंतो, त्ये लोक म्हातारीपर्यंत पोचलंच कसं? तिलाबी न्हाय सोडलं? :O

मा. बिपिन कार्यकर्ते

अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ...
तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ...

अवो पाटील, आमी कदी फारीनला जानार? तुमीच कायतरी येवस्था लावा पघा. तुमचा कायतरी दौरा-बिवरा असेल तर सांगा "भारतीय संस्क्रूती आनी लोककला" दावायला नेताय म्हनून. आमी बी कंदी जानार फारीनला. आमच्या मायला फार वाटायचं वो फारीनला जावसं. पण तवा काय ते राजकारनी लोकं निस्तं लोकांची कामंच करायचे. आता तुमी आहात, कारयकरते सायब आहेत म्हनून आमाला पन थोडं नाव हाय, तमाशाला लोकं इचारत्यात, कसं?

बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे.
म्हंजी, त्ये काय इजंच्या तारा टाकतात व्हय? आनी दोनशे करोड म्हंजे किती वो शून्य दोनावर?

असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो.
म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ?
काय पाठवु का माल वगैरे ???

अवो तुमी अशी मापी मागून लाजवू नका गरीबाला! मी आपलं बोललू, मावशीची काळजी वाटते हो ... ती म्हतारी व्हयला लाग्ली आता.
बाकी समदं येवस्थित तुमच्या क्रूपेनं. त्यो शेताचा तुकडा दिलायत तुमी, तो आता आमचा धाकला भाव पघतो. बाकी आमची तमाशा पार्टी सुरू हाय येवस्थित. आनी तुमी, ते कार्यकरते सायेब असे लोक असल्यावर काय चिंता आमास्नी!
आनी माल पाठवा जरूर... कधी येयचं ते पण जरा आटवडाभर आदी कळवलं तर बरं होईल.

चंदी बोरगावकरीन.

कार्यकरते सायेब, हंशी आटवन काडते वो तुमची!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रकाटाआ, वर तोच दिला आहे ..

मुझे तो हल भी चलाना नही आता ....

ई बम्बै मे आके हल काहे चलावत ह बबुआ.
हल वल भूल जावो बम्बै मा चवपाटीया पे खडे रहके "नल" चलाना सीखो.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

काष्टिंग मध्ये आमाला न घेतल्यानं! X(

विजुभाऊ, इस्त्रीच्या रोल साठी काष्टिंग अजून झालेलं नाहीये.

विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..!

तात्या.

Pages