तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
6 Nov 2008 - 10:57 am

चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI

दिग्दर्शक :- जगदिश शर्मा
प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८

--------------------------------------------------------------------------------

कलाकार :-
क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी.
तुफान विनोदि आहे हा विचित्रपट. अतिभव्या असे सेट, तगडी स्टारकास्ट, उच्च दर्जाचे छायाचित्रण सगळे कसे अगदी वाह वाह आहे.

ह्या विचित्रपटातिल हिरो ला बघताना आपल्याला एकाच वेळी राजकुमारचा आवाज आणी दिलिप कुमारचा अभिनय असा दुहेरी आनंद मिळतो. ह्या वयातला आमचा देव आनंद सुद्धा ह्या विचित्रपटातिल हिरो पेक्षा कितितरी देखणा आणी चपळ वाटतो हा भाग निराळा. असो, इतर कलाकारांविषयी आनंदच आहे, बरेचशे आपण ह्याना पाहिलेत का ह्या सदरात मोडतात, उरलेले काहि यादव वंशिय आडनाव लावत असल्याने ह्या विचित्रपटात घेतले असावेत, काहि नाव परिचीत आहेत, त्या पैकी काहिनि म्हशीची व काहिनि ह्या विचित्रपटात कळशीची पाहुणी भुमिका केली आहे असे आमचा खास सुत्रधार सागंतो.
सर्वच कलाकार ज्या सहजतेने गोठ्यात वावरतात त्या सहजतेने विचित्रपट भर वावरले आहेत. पानाला ज्या सहजतेनी चुना लावताता ( आजकाल हे लोक महाराष्ट्राला चुना लावत आहेत असे आमचा एक खोचक साथिदार निर्माता म्हणाला व लवकरच ह्या विषयावर आपण 'भाग भय्या राज आया' ह्या नावाचा सिनेमा काढत आहोत असे त्यानी आमच्या कर्णेंद्रियावर घातले.) त्या सहजतेने प्रत्येकानी अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या रतिबाने पुर्णवेळ प्रेक्षकांना खुर्चित बांधुन ठेवण्याची जादु ह्या विचित्रपटात आहे. (काहि दुष्टबुद्धि लोक प्रेक्षक पहिल्या सिन लाच बेशुद्ध पडतात अशी बदनामी करत आहेत, देव त्यांना म्हशीच्या पायाखाली चिरडो.) ह्या विचित्रपटाला मोठ्या प्रमाणात गर्दि करुन आपदग्रस्तांना सहकार्य करावे.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

6 Nov 2008 - 7:26 pm | छोटा डॉन

मुळात हा धागा "सिरीअस " नव्हता आणि त्याला आधी जे प्रतिसाद पडत गेले ते पण चेष्तेचे होते ...
सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ...

अति विषयांतर झाले हे मान्य आहे.
पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ...

असो. आपली इच्छा असेल तर " हा शेवटचा प्रतिसाद" ह्या धाग्यावरचा ...

बाकी आमचा हेतु व भुमिका आपल्याला माहित आहेच ...
धन्यवाद !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 10:49 pm | विसोबा खेचर

सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ...
अति विषयांतर झाले हे मान्य आहे.
पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ...

टीपी करण्याकरता खरडवहीची सोय केली आहे हे आपल्याला माहीत नाही का??

असो, या धाग्यातले सर्व अनावश्यक प्रतिसाद उडवावेसे वाटत आहेत, सवडीने उडवीनच. तूर्तास वेळ नाही...

परंतु खरडवहीची सोय केलेली असताना प्रत्येकच ठिकाणी असा फालतू टाईमपास पाहिला की खूप वाईट वाटते...

(खिन्न) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2008 - 7:40 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या,

डॉन्याशी सहमत. त्याने भूमिका मांडलीच आहे. कुठलाही त्रास झाला असल्याबद्दल क्षमस्व.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2008 - 7:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉन आणि बिपीनभौंशी सहमत.

रेवती's picture

6 Nov 2008 - 10:14 pm | रेवती

मेरेकू नही आवड्या.
हा बंडलपट दिसतोय.
त्यात त्या कमाल ने म्हटलय की राजकारण्यांच्या धमक्यांना घाबरून राज्य सोडून जाणार नाही.
आता लालू साहेबांना घाबरून तर पळून आलेत कि बरेच जण(घाबरून म्हणा कंटाळून म्हणा).
पोलीस तर फक्त मरायलाच ठेवल्यासारखे होते.

रेवती

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 10:57 pm | विसोबा खेचर

सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, अदिती, राज जैन आणि छोटा डॉन यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा मालक म्हणून मला अत्यंत लाज वाटते...!

मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे...

वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्‍या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे..

तात्या.

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 11:00 pm | विसोबा खेचर

असाच जर प्रकार मिपावर यापुढेही चालणार असेल तर खरडफळ्याचा काहीही उपयोग नसून तो रद्द करणे इष्ट होईल असे खेदाने म्हणावेसे वाटते!

(संतप्त) तात्या.

अनामिका's picture

7 Nov 2008 - 12:45 pm | अनामिका

मराठीच्या आंदोलनाचा मुद्दा करुन तयार करण्यात आलेल्या या भिकार चित्रपटाला सेंसॉर बोर्डाची परवानगी मिळू शकते मात्र याच विषयावर निर्मिती करण्यात आलेल्या मुंबई आमचीच या मराठी चित्रपटाला परवानगी नाकारण्यात येते .
किती हा दुजाभाव?
असले टुकार विचित्रपट जो कोणी पैसे खर्च करुन बघेल त्याची किव करावी तितकी कमी आहे.

"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Nov 2008 - 3:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

ओ डॉन राव मी करु का काही मदत आप्ल्याला लय अनुभव हाय शिन्मा लायनी चा बरका हव असल्यास खात्री करा एक डाव
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

विकि's picture

8 Nov 2008 - 12:32 am | विकि

या चित्रपटाची दूरचित्रवाणीवरील दृध्य ,संवाद पाहून हा चित्रपट कीती टूकार आहे याची लगेचच कल्पना येते त्यामुळे अशा चित्रपटाविषयी चर्चा न करणेच उत्तम.

विवेक's picture

10 Apr 2009 - 10:51 pm | विवेक

सह्ज फेरि मारली म् जा आलि

यन्ना _रास्कला's picture

11 Apr 2009 - 9:54 am | यन्ना _रास्कला

राहुल राजचा बाप म्हन्तो की राहुल राजचा मर्डर करनाऱया मुंबई पोलिसांना क्लिन चिट देनारे सर्वे लाचखाउ आहेत.

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2009 - 11:52 am | अविनाशकुलकर्णी

हा चित्रपट खुप उदात्त असा संदेश देतो याचा विसर पडला आहे.या देशाचि एकात्मता व अखंडता टिखवण्या साठी अश्या चित्र पटाचि निर्मीति आवश्यक आहे..हाताला काम नाहि खायला अन्न नाहि मग अश्या लोकांना मुंबईच मावशि सारखि वाटते...जि त्यांना मायेने जवळ घेवुन २ वेळेचे अन्न देते व घरी पाठवण्या साठी पैसे पण देते..सिनेमाचा दर्जा साधारण..व कलाकार सुमार असले तरी पुढे काहि वर्षातच जेंव्हा मुंबई केंद्र शाशित करण्याचा प्रस्ताव येइल त्या वेळी अभिशेक बच्च्चन ह्या मधे काम करेल..मग तर कौतुक करतालच ना सिनेमाचे.. :''(