पालखी

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
30 Oct 2008 - 12:19 am

पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८

'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

कवितागझलप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:40 am | विसोबा खेचर

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

क्या बात है..! या ओळी क्लासिक आहेत..!

अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :)

आपला,
(मिपाकर) तात्या.

प्राजु's picture

30 Oct 2008 - 12:53 am | प्राजु

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

अतिशय सुरेख..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:59 am | विसोबा खेचर

हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..!

असो,

मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..!

(मिपाकर) तात्या.

केवळ वे़ळेअभावी मागे पडते आहे याचा खेद आहे.
(आंतरजालीय)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 1:42 am | विसोबा खेचर

केवळ वे़ळेअभावी मागे पडते आहे याचा खेद आहे.

चालायचंच..! :)

(समजूतदार!) तात्या.

बेसनलाडू's picture

30 Oct 2008 - 2:10 am | बेसनलाडू

(++समजूतदार)बेसनलाडू

शितल's picture

30 Oct 2008 - 1:11 am | शितल

कविता/गझल संपुर्ण आवडली. :)

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

हे तर सुंदर झाले आहे .:)

शितल's picture

30 Oct 2008 - 1:11 am | शितल

कविता/गझल संपुर्ण आवडली. :)

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

हे तर सुंदर झाले आहे .:)

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Oct 2008 - 6:54 am | चन्द्रशेखर गोखले

छानच, सुंदर, अप्रतिम........

मुक्तसुनीत's picture

30 Oct 2008 - 8:13 am | मुक्तसुनीत

कविता वाचली. बेसनलाडूंच्या कवितेमधे वृत्तादि बाबींमधे बोट दाखवायला जागा नसते , कवितेच्या शुद्धतेबद्दलची मूलभूत तत्त्वे त्यांची कधी चुकत नाहीत. या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत ते आपल्याला लौकिकास जागलेले आहेतच.

कवितेच्या आकलनाच्या आणि रसास्वादाच्या बाबतीत थोडा गोंधळात पडलो आहे. एकेक पंक्तिद्वय हे आपापल्यामधे अर्थपूर्ण आहेत; परंतु कवितेचा एकसंध परिणाम असा (मला ) जाणवला नाही. या दृष्टीने, कविच्या मनात , ही एक गझलसदृष्य रचना असावी का काय असे मला वाटले. तसे असल्यास शार्दूलविक्रीडीतात (बरोबर ना ?) बांधलेली कविता, पण परिमाण गझलेचे असे काहीतरी काँबिनेशन माझ्या मनात झाल्याने माझा गोंधळ उडाला.

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

या सर्व पंक्ति अतिशय आवडल्या ! मनसोक्त दाद द्याव्यात अशा !

बेसनलाडू's picture

30 Oct 2008 - 8:47 am | बेसनलाडू

वर्गीकरणात 'कविता' असे दिसत असले तरी ही शार्दूलविक्रीडितातली एक गझलच आहे. अर्थात, प्रत्येक द्विपदी एक स्वतंत्र कविता हा परिणाम त्या ओघाने आलेलाच आहे. त्यामुळेच एकसंध, उलगडत जाणारी अशा स्वरूपाची ही 'कविता' नाही. रदीफ (कायम राहणारे अंत्ययमक) दिसत नसल्याने गझलेचा विशिष्ट आकृतीबंध दिसत नसेल; आणि त्यामुळे ही 'गझल नाही' किंवा 'गझलसदृश कविता आहे' असे वाटायची शक्यता आहे, पण ही 'गैरमुरद्दफ' म्हणजे रदीफ नसलेली अशी गझल आहे.
(स्पष्टीकारक)बेसनलाडू

मदनबाण's picture

30 Oct 2008 - 10:01 am | मदनबाण

पालखी जबरदस्त आहे..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

आनंदयात्री's picture

30 Oct 2008 - 12:34 pm | आनंदयात्री

काय सुरेख लिहलस बेला. कविता पाझरायला वेळ मिळाला तर शेवटी. अजुन येउदे भावड्या.

>>तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

मस्त !!

-
(++आनंदित) आंद्या

दत्ता काळे's picture

30 Oct 2008 - 3:30 pm | दत्ता काळे

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

- हे फार आवडलं