(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
29 Oct 2008 - 11:30 pm

अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या! ;)

आशिक मी अन माल भेटली होती 'कविता'
नटलेली मी तिला समजलो माझ्याकरता

हसायची ती बघून मजला रोज तासभर
निघुनि जायची दोस्तासमवे गाडी येता

नादाला लागून तिच्या मी धन घालवले
आले नाही कधीच खाते मज गोठवता

दिले तिने जे फूल आजही वहीत आहे
'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता

अजून चमके डोळ्यांमध्ये आशा अवचित
जरा नेटकी दुरुन कोणी इकडे बघता

कुणी लाघवी दिसली की मी 'तरूण' होतो
सवयीने मज येते बघुनी लंपट हसता

खूप ठरवतो 'रंगा' 'कविता' विसरायाच्या
नवीन दिसता जातो मागे मुळी न चुकता!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Oct 2008 - 11:44 pm | बेसनलाडू

रंगाशेठचा आणखी एक चौकार. हा फारच आवडला.
(प्रेक्षक)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

31 Oct 2008 - 6:59 pm | आजानुकर्ण

रंगाशेठ ब्याटिंग फार आवडली.

आपला,
(विकेटकीपर) आजानुकर्ण

रामदास's picture

29 Oct 2008 - 11:58 pm | रामदास

फूलप्रूफ कविता कशा लिहाव्या बरं !

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 1:55 am | विसोबा खेचर

हसायची ती बघून मजला रोज तासभर
निघुनि जायची दोस्तासमवे गाडी येता

वा वा! मस्त रे... :)

तात्या.

रेवती's picture

30 Oct 2008 - 2:18 am | रेवती

पाडव्याची आपण आपल्या (च) पत्नीस छान भेट दिलीत.
विडंबन आवडले रंगाशेठ.
प्राजु म्हणते त्याप्रमाणे आपल्या घरचा दुरध्वनी क्र. आम्हासही ठावूक आहे. फोन करू का?;)
दुसरोंकेसाथ बातां : घरी बायकोला ह्यांचे हे प्रकार माहित असतील का?;)

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Oct 2008 - 2:24 am | बिपिन कार्यकर्ते

ताई घाबरू नकोस आज्जाबात. आमी हाय तुज्यासंगट. तुज्या खुलाश्यानंतर आता घाबरत न्हाय आमी दाजींना...

(दाजी = भैणीचं मालक)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

30 Oct 2008 - 2:25 am | चतुरंग

आता घरी फोन जातोय की काय? :T :O

(खुद के साथ बातां : रंगा, ह्या बायका परस्पर फोन नं. कसे काय कळवून टाकतात दुसर्‍यांना? काही खरं नाही तुझं, खातोयस मार आज! :SS )

चतुरंग

प्राजु's picture

30 Oct 2008 - 2:27 am | प्राजु

बघा.... सांभाळून घ्या हो..चतुरंग भाऊ..
वहिनी बाई बसल्या आहेत नजर ठेवून अगदी व्यवस्थित.. ;)
जबरा विडंबन...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

30 Oct 2008 - 7:46 am | सहज

धमाका. फटाके....

मस्त.

मदनबाण's picture

30 Oct 2008 - 7:49 am | मदनबाण

एकदम झकास विडंबन...

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अनिल हटेला's picture

30 Oct 2008 - 7:54 am | अनिल हटेला

दिले तिने जे फूल आजही वहीत आहे
'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता

झकास आहे !!!

येउ द्यात अजुन !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

एक नंबर विडंबन. फार आवडलं.

केशवसुमार's picture

31 Oct 2008 - 9:16 am | केशवसुमार

रंगाशेठ,
विडंबन झकास आवडलं..
(निवृत्त)केशवसुमार

हसायची ती बघून मजला रोज दातभर
बापाच्या त्या फोटोला ही मी घाबरता

नादाने मी तिच्या किती हे धन घालवले
ध्यानी आले बँकेने खाते गोठवता

तिने दिलेले फूल 'धोतरा' वहीत आहे
'एप्रिल फुल' झाल्याचे स्मरते वही उघडता

(खुद के साथ बातां : चला रंगा, केसूशेठ लिहिते झाले म्हणायचे! दिवाळीने मूड बदललेला दिसतोय! ;) )

चतुरंग

चाणक्य's picture

31 Oct 2008 - 5:11 pm | चाणक्य

एरवीच जमलंय