मराठीपणा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
26 Oct 2008 - 4:32 am

सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा.
दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा.

ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते.

मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे. महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही.

महाराष्ट्राबाहेर 'मराठीयत' मूळ स्वरुपात जपण्याचे हे उदाहरण
http://www.esakal.com/esakal/10262008/SpecialnewsA0077EAFD8.htm
इथे वाचायला मिळेल. शुद्ध, अशुद्ध कशाला म्हणावे? महाराष्टात 'बाहेरून' आलेल्यांचे 'हक्क' काय असावेत ह्या प्रश्नांचा विचार करतांना मराठीपळ्या गावासारखे समाज काय शिकवतात इकडेही लक्ष द्यायला हवे.

संस्कृतीदेशांतरसमाजसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

नंदन's picture

26 Oct 2008 - 4:49 am | नंदन

बातमीकडे लक्ष वेधलंत. परप्रांतात राहूनही आपली अस्मिता, संस्कृती टिकवण्याच्या या मंडळींच्या प्रयत्नांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तुमच्या लेखावरून तमिळनाडूत राहणार्‍या मराठी भाषकांबद्दलच्या या लेखाची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अरुण मनोहर's picture

26 Oct 2008 - 5:05 am | अरुण मनोहर

परप्रांतात मराठीपणा टिकवल्याचे तुम्ही दिलेले उदाहरण वाचले. धन्यवाद.

प्रमोद देव's picture

26 Oct 2008 - 10:50 am | प्रमोद देव

अरूणराव आणि नंदन दोघांनाही धन्यवाद!

सहज's picture

26 Oct 2008 - 11:19 am | सहज

दुव्याबद्दल धन्यवाद

पण आपला गैरसमज झाला आहे. आजकाल जो महाराष्ट्रात मराठी विरुध्द उत्तरभारतीय हा जो वाद चालु आहे ,तो नेमका काय आहे ह्याची माहिती घ्या.कर्नाटकात कशी मराठी कुंटुबे मराठी संस्कृती टिकवुन आहेत तशी महाराष्ट्रात देखिल खुप कन्नड गावे आपली कानडी संस्कृती टिकवुन आहेत्.परंतु दोन्ही कडे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या अस्मितेशी खेळण्याचा कधी ही मुजोरपणा केला जात नाही.
महाराष्ट्रात जवळ जवळ प्रत्येक गावात, शहरात एक तरी पटेल किंवा शहा नावाचे गुजराती कुटुंब आढळते. त्याना कधी महाराष्ट्रात त्रास झाला नाही. आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत. पण ह्या उलट हे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जिथे राहतात तिथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.एक दोन वर्षात तेथील स्थानिकाना डावलुन,त्याचा रोजगार हिरावुन घेतात. एक आला की त्याच्या पाठोपाठ त्याचे गाव इथे स्थाईक होते.मग प्रत्येक स्थानिक गोष्टीत त्याची ढवळाढवळ सुरु होते.सण साजरे करताना आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करतात.बिहारी राजकिय नेत्यांनी आपले सण आपल्या राज्यात साजरे करावे ,त्यासाठी महाराष्ट्रात येण्याची काय गरज? आपली संस्कृती जपताना दुसरयाची मुस्कटदाबी करणे अयोग्य आहे.त्यासाठी भारतात सर्व भारतीय विरुध्द युपी-बिहारी वाद चालु आहे.
जगात कोठेही मराठी स्थाईक झाले आहेत ,ते तेथील प्रगतीत आपला हातभार लावत आहेत्.त्याच्या संस्कृतीशी आपली नाळ जोडत असतात. आपला वेगळेपणा जपताना तिथल्या स्थानिकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतात.म्हणुन मुळात महाराष्ट्राबाहेर चे मराठी व महाराष्ट्रातले बिहारी ह्याची तुलना करणे अयोग्य आहे.
वेताळ

अरुण मनोहर's picture

26 Oct 2008 - 1:44 pm | अरुण मनोहर

वेताळजी, माझा नेमका हाच मुद्दा आहे. असे बघा, मराठीपळ्या गावातल्या मराठी लोकांचे पुर्वज तर तिथे 'जेते' म्हणून गेले होते. त्यानंतर आजपर्यंत, ते गाव पूर्णतः मराठी आहे. आता मनसे सारख्याच चष्म्यातून पाहीले, तर तिथल्या कानडी लोकांना असेही म्हणता येईल, की मराठींनी आपले गाव इथे वसवले. त्यांचीच मराठी संस्कृती पाळतात. कन्नडांचा रोजगार हिरावून घेतात. वगैरे वगैरे. पण दोघांच्याही सुदैवाने असे काही झाले नाही. उलट मराठींनी कन्नड भाषा शिकून घेतली, दोन्ही संस्कृतींचा मिलाप घडवून रहात आहेत. कर्नाटक, तामिळनाडूच्या मराठी लोकांचा आपणास अभिमान वाटतो. महाराष्ट्रा वसलेल्या बिहारी आणि उत्तरप्रदेशींना आपण वेगळा मापदंड का लावतो?
बिहारींना आपण इथे नावे कां ठेवावी? ह्याचे एक कारण, बिहार मधील गुंडागर्दीच्या परिस्थितीमुळे, त्यांचे नाव बदनाम झाले असेल. पण सगळ्या बिहारींना एकाच मापात का तोलावे? अरुण साधुंची एक डोळे उघडायला लावणारी कथा वाचली होती. बिहार मधून मुंबईत पोटासाठी आलेल्या पापभीरू आणि सज्जन आजोबा आणि नातवाची ह्रदयद्रावक कहाणी होती ती.

महाराष्ट्रात असलेल्या केंद्राच्या नोकर्यात मराठी लोकांना प्राधान्य द्या असे म्हणणे वेगळे पण सध्या जे चालले आहे, त्याचे समर्थन करणे वेगळे. (हे वाक्य मी 'वेताळ'ला उद्देशून लिहीलेले नाही.)

सध्या झालेल्या वादळाने, बाहेर इतकी वर्षे मराठींशी मिळून मिसळून रहाणारे इतर भारतीय, मिश्र सोशल सर्कल मधे (विनोदाने, किंवा उपहासाने) आता महाराष्ट्रीयांचा मराठीपणा खड्यासारखा वेगळा दाखवण्यात मागे रहात नाही. अशी काही उदाहरणे दिसू लागली आहेत. हे वातावरण दुषीत करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

ऋषिकेश's picture

26 Oct 2008 - 8:18 pm | ऋषिकेश

चांगले दुवे.... मात्र हे अपवाद आहेत हे लक्षात घ्यावे.

आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत

असहमत!! तीन तीन पिढ्या महाराष्ट्रात राहूनहि मराठी बोलत नाहित अशी बहुसंख्य परप्रांतिय कुटुंबं आहेत आणि त्यात हे गुजरातीही आले. मग हे मराठी कसे? असे तीन पिढ्यानंतरहि राज्याची भाषा न बोलता राहता येईल असे केवळ महाराष्ट्र हे एकच राज्य असेल.

बाकी चालु दे :)

-(मराठी) ऋषिकेश

रामदास's picture

26 Oct 2008 - 1:54 pm | रामदास

माहीतीबद्दल आभार.

मनोहर साहेब,
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. देव करो आणि त्यांच्यावर रस्त्यावर उतरायची वेळ न येवो. रस्त्यावर कुणी उगाच येत नाही हो. त्यांच्या गावात परके घुसले आणि त्यांचीच नाकेबंदी करु लागले वर सरकारदरबारी त्यां घुसखोरांनाच अभय मिळाले तर कदाचित त्यांनाही उतरावे लागेल.

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 4:10 pm | विसोबा खेचर

साक्षीशी सहमत आहे!

अजून त्या गावात बिहारी-यूपीवाले भैय्ये घुसले नाहीयेत म्हणून ठीक आहे! :)

साला, मनसेला का उगाच रस्त्यावर उतरायची हौस नाय!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

26 Oct 2008 - 4:24 pm | इनोबा म्हणे

सर्वसाक्षी आणि तात्यांशी सहमत आहे.

जय महाराष्ट्र!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर