आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 3:20 pm

'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना.

आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे.

माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम. दोघांनी मिळून मूळ संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. (आपल्यासारख्या ज्यांना संस्कृत अजिबात वाचता येत नाही त्यांच्यासाठी देखील ते उपलब्ध आहे. त्याचं मूळ संस्कृत काव्य व वाक्य बाय वाक्य मराठीत अनुवाद 'विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे' यांनी प्रकाशित केला आहे.)

वाचकांच्या प्रतिक्रिया मी आप्पांपर्यंत पोहोचवीनच आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत.

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

आधुनिक दृष्टिकोनातून रामायणाचा विचार करायचा म्हणजे शास्त्रीय दृष्टीनं. धार्मिक अगर श्रद्धाळू दृष्टीनं विचार करतांना कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट कृतीवर अगर एखाद्या घटनेवर “असं का?” असा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची योग्यायोग्यता ठरवता येत नाही. फक्त शास्त्रीय दृष्टिकोनांत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं.

रामायणाबद्दल पहिला प्रश्न हा आहे की हा इतिहास आहे की वाल्मीकि ऋषींच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली कथा आहे? अर्थात हा इतिहास असो अथवा कल्पित कथा असो, त्यामध्ये त्या काळच्या राजे लोकांचं, तसंच सामान्य लोकांचं जीवन वास्तववादी पद्धतीनं रंगवलेलं आहे. त्या काळच्या समाजपद्धती, धार्मिक प्रथा, रूढी अशा सर्व गोष्टींवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. असं सर्व असूनही वाल्मिकींनी ती अत्यंत रंजक केलेली आहे.

साहित्यिक कृति म्हणूनही तिच्याकडे पाहिलं तरी सर्व जगातल्या विद्वानांनी तिला वाखाणलं आहे. त्या कथेत मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे पहायला मिळतात. प्रेम, द्वेष, राग, लोभ, तिरस्कार अशा विविध अगदी टोकाच्या भावना बघायला मिळतात.

शास्त्रीय दृष्टीनं बघायचं तर अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या भूगोलाचं आणि त्यांत राहणार्या वेगवेगळ्या समाजांचं सविस्तर चित्र लेखकानं कसं रंगवलं याचं आश्चर्य वाटतं. कारण त्याकाळी सर्वत्र वन पसरलेलं, रस्ते नाहीत, दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत, एकट्यादुकट्यानं प्रवास करणं अत्यंत धोक्याचं, अशा सर्व अडचणींवर मात करून राम, सुग्रीव व त्याचे वानरसैन्य यांच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला सोडवतो हे सर्व चित्र विलक्षण आहे यात शंका नाही.

रामायणाची कथा सर्वांनाच उत्तम माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण त्यातल्या विविध घटना आणि विविध व्यक्तिमत्वं ही मात्र अभ्यासण्यासारखी आहेत.

पहिली कथा त्रटिकेची : विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणाला घेऊन वनातून जात असतांना पहिली गाठ त्राटिकेशी पडते. त्राटिका ही राक्षसीण अत्यंत सामर्थ्यवान आणि भयंकर जुलमी. तिनं वनावर पूर्ण ताबा मिळविलेला. तिला तोंड द्यायची कोणाचीही छाती नव्हती. पण राम धनुर्विद्येत अत्यंत पारंगत आणि बलवान म्हणून तिला ठार मारू शकत होता. तरीसुद्धा वीर पुरुषांनी स्त्रीला ठार मारायचं नाही हा दंडक. अशा वेळेला विश्वामित्र ऋषी रामाला सांगतात की ही स्त्री असली तरी समाजाची अत्यंत घातक शत्रू आहे. तिचा नाश करण्यात पाप नाही. याचा अर्थ असा की “कोणतेही तत्व पालन करतांना ते समाजाच्या कल्याणाच्या आड येत असेल तर त्याचा वेगळा विचार करावयाचा” असं ऋषी सांगतात. तत्वाचे अवडंबर माजविणार्या लोकांना हे उत्तम उत्तर आहे असं म्हणावंसं वाटतं.

श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो.

सर्वसाधारणपणे समाजात गाजलेली कथा अहिल्येची. (तिला सती अहिल्या असंही कधीकधी संबोधलं जातं.) या अहिल्येला “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” म्हणजे आदरणीय व पवित्र स्त्रियांच्या यादीत तिला बसवण्यात आलेलं आहे. तिची खरी कथा काय आहे?

अहिल्या ही एक असाधारण सुंदर तरूण स्त्री. तिचे पती गौतम ऋषी हे एकदा नदीतीरी स्नानाला गेलेले असतांना इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्येकडे येतो व मला तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे असं सांगतो. हा गौतम ऋषी नसून इंद्र आहे हे अहिल्येच्या लक्षात येतं पण तरीही देवराजाशी रत होण्याचा मोह तिला पडतो आणि ती त्याला संमती देते. समागम झाल्यानंतर “मी कृतार्थ झाले” असं समाधान व्यक्त करते म्हणजे हे आपण काही पापकर्म करतो आहोत असं तिला वाटत नाही. इतकंच नाही तर हे गौतम ऋषींना समजू नये म्हणून इंद्राला “तू आता इथून जा” असे सांगते. पण तिच्या व त्याच्या दुर्दैवाने इंद्र पळून जाण्याच्या आतच गौतम ऋषी परत येतात. काय घडलं हे त्यांच्या लक्षांत येतं, व ते त्या दोघांनाही शाप देतात. अहिल्येला ते “याच आश्रमांत तू वायू भक्षण करून अदृष्य व निराहार अशी राहशील, राम वनात येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल” असा शाप देतात आणि हिमालयात तपश्चर्येकरता निघून जातात. मात्र सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे “तू शिळा होशील” असा शाप तिला देत नाहीत.

वास्तविक अहिल्येने व्यभिचाराचं पाप केलं होतं आणि ते आपल्या पतीपासून दडवण्याचाही प्रयत्न केला होता. असं असूनही गौतम ऋषींनी तिला मर्यादित काळापर्यंतचीच शिक्षा दिली आणि नंतर तिचे समाजात पुनर्वसन व्हावे अशी व्यवस्था केली. तिला आयुष्यातून उठवलं नाही. आजचा समाज अशा स्त्रीकडे अशा उदार दृष्टीने पाहील का?

दुसरी गोष्ट. अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?

रामायणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुग्रीव. सुग्रीव हा वानरांचा राजा. त्याची त्याच्या वानरसेनेवर अत्यंत जरब होती असं दिसतं. सीतेच्या शोधाकरिता वानरांचे वेगवेगळे गट करून त्यानं चारही दिशांना पाठवले होते. त्यात हनुमान, जांबुवंत वगैरेंचा गट दक्षिण दिशेला पाठवला होता. त्या गटानं सारी दक्षिण दिशा पालथी घातली तरी त्यांना सीतेचा शोध लागला नव्हता. शेवटी निराश होऊन दक्षिण किनार्यावर ते बसले असतांना त्यांच्यात बोलणं निघालं की सीतेचा शोध न लावता आपण परत गेलो तर सुग्रीव आपणां सर्वांना ठार मारील. तेव्हा परत जाण्याऐवजी आपण इकडेच जीव देऊ. हनुमान, जांबुवंत यांच्यासारख्यांची ही स्थिती. यावरून सुग्रीवाची सर्व सैन्यावर किती जरब होती हे दिसून येते.

अर्थात त्या गटाच्या सुदैवाने तिथे जटायूचा भाऊ संपाती त्यांना भेटला. त्यानं त्यांचं आपसातलं बोलणं ऐकलं आणि त्यानंच रावणानं सीतेला पळवून लंकेत नेऊन ठेवल्याची माहिती त्यांना दिली. ती महिती मिळाल्यामुळे हनुमान लंकेत गेला व सीतेला प्रत्यक्ष भेटून तिची माहिती घेऊन आला. पण या गटाला जर संपाती भेटला नसता तर ते परत सुग्रीवाकडे जायला भीत होते हे उघड आहे.

असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती त्यामुळे त्याची व रामाची समस्या एकच होती. रामाची व सुग्रीवाची भेट होण्याला कारण एक कबंध ठरला. राम लक्ष्मण अरण्यातून प्रवास करीत असतांना कबंध त्या दोघांवर धावून गेला म्हणून रामानं बाण मारून त्याला ठार केलं. त्याला जाळून टाकतांना त्यातून एक सुंदर पुरुष बाहेर पडला व त्यानं रामाला “सुग्रीवाची व तुझी समस्या एकच आहे म्हणून तू सुग्रीवाला भेट” असा सल्ला दिला. मग रामाची सुग्रीवाशी भेट झाली तेव्हां रामानं वालीला मारण्याचं वचन सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवानं सीतेला शोधून काढण्याचं. वाली हा प्रचंड शक्तिमान असल्याचं सुग्रीवानं रामाला सांगितलं तेव्हा रामानं एका प्रचंड राक्षसाचं शरीर वनात पडलेलं होतं ते आपल्या पायाच्या अंगठ्यानं उचलून कित्येक योजनं दूर फेकून देऊन सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याविषयी खात्री करून दिली होती.

त्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे, सुग्रीवानं वालीला आव्हान देऊन द्वंद्वयुद्धाला बोलावलं. त्यांचं युद्ध चालू असतांना रामानं झाडाआड उभं राहून वालीला बाण मारला व तो खाली पडला. तो मरणासन्न असतांना त्यानं रामाला विचारलं “तू स्वतःला न्यायी राजा समजतोस. मी सुग्रीवाशी युद्धात गुंतलेला असताना तू झाडाआडून मला बाण मारलास हा न्याय झाला का? आणि मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू मला मारावंस?”

त्यावर उत्तर म्हणून “तू सुग्रीवाची बायको पळविलीस म्हणून मी तुला शिक्षा केली. सुग्रीवानं मला मदत मागितली म्हणून मी तुला मारलं. शिवाय मी माणूस आहे व तू वानर म्हणजे पशू आहेस. माणसाला पशूंची शिकार करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी तुला मारण्यात अन्याय केला असं होत नाही.” हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.

रामानं वालीला मारल्यामुळे सुग्रीवाला आपली बायको परत मिळाली. त्याचं काम झालं. त्यानं आता रामाला मदत करावयाची. पण आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रावणाविरुद्धची मोहीम आता आपल्याला सुरू करता येणार नाही असं सांगून सुग्रीव रामाच्या संमतीनं आपल्या राजधानी - किष्किंधेला परत गेला. तिकडे तो आपल्या बायकांच्यात इतका रमला की पावसाळा संपला तरी रामाकडे जाण्याचं तो पूर्ण विसरून गेला. शेवटी रामानं लक्ष्मणाला त्याला बोलावण्याकरता त्याचेकडे पाठवलं. त्यावेळचा प्रसंग लक्ष्मण, सुग्रीव व सुग्रीवची पत्नी तारा या तिघांच्या स्वभावावर उत्तम प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण स्वभावानं अत्यंत संतापी. पूर्वी दशरथानं रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलेलं त्याच्या कानावर गेलं तेव्हा तो दशरथाला ठार करायला निघाला होता. रामानं त्याला वाटेत अडवून शांत केलं होतं. आता सुग्रीवच्या वर्तनाचा त्याला राग आला होता. तो सुग्रीवाला बोलवायला गेला त्यावेळी सुग्रीव आपल्या बायकांच्यात पूर्ण रमून गेला होता. लक्ष्मण आला आहे ते कळताच तो खूप घाबरला. आपण रामाला दिलेलं वचन मोडल्याची त्याला आठवण झाली. लक्ष्मण संतापी आहे, आता तो आपलं काय करील कोणास ठाऊक! अशी भीती वाटून तो स्वतः बाहेर न येता त्यानं आपल्या पत्नीला - ताराला “ बाहेर पाठवलं. तारानं बाहेर येऊन लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला मुत्सद्दी सल्ला दिला. “अरे लक्ष्मणा, माणसंसुद्धा दिलेलं वचन विसरतात. सुग्रीव हा तर वानर आहे. तो विसरला तर त्यात आश्चर्य काय? पण तो आता जागा झाला आहे. तो तुमचं काम करील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. सुग्रीवाजवळ असंख्य वानरांची फौज आहे. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला सीतेला शोधून काढता येणार नाही. त्यामुळे तू त्याच्याशी सबूरीनं बोल. त्याला एकदम टाकून किंवा रागावून बोलू नकोस.” लक्ष्मणाला शांत केल्यानंतर सुग्रीव व लक्ष्मण रामाकडे गेले.

त्यानंतर सुग्रीव आपल्या वानरांना चारी दिशांना पाठवतो त्यावेळी तो विविध बेटांचं वर्णन करतो व तिथे काय काळजी घ्यावयाची याच्या सुचना आपल्या वानरांना देतो. त्यानं वानरांना पाठवलं त्यात जावा, सुमात्रा, जंबुद्वीप या आजच्या नावांचा उल्लेख येतो. त्यावेळी राम त्याला विचारतो, "या आर्यावर्ताच्या बाहेरच्या बेटांची इतकी सविस्तर माहिती तुला कशी?" त्या वेळी सुग्रीव रामाला सांगतो की ज्यावेळी वालीचं आणि त्याचं भांडण झालं आणि वाली त्याच्या मागे लागला त्यावेळी तो या बेटांवरून त्या बेटावर पळत होता त्यावेळी त्याला या बेटांची व प्रदेशाची माहिती झाली. आपल्याला आज आश्चर्य वाटतं की ही जर कल्पित कथा असेल तर वाल्मीकि ऋषींना या सर्व भागाची इतकी सविस्तर माहिती कशी?

त्यानंतर हनुमान सीतेला शोधून काढतो. त्यानंतरच राम वानरांचं सैन्य घेऊन रावणाच्या लंकेवर हल्ला करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे सर्व वानरसेना भारताच्या दक्षिण दिशेला प्रवासाला निघते त्या वेळी रामानं या प्रवासात सर्व सैन्याची कशी काळजी घ्यायची, रात्रीच्या वेळी कांही वानरांना पहार्याच्या कामावर ठेवावयाचे, रावणाचे हेर आजूबाजूला फिरतील त्यांच्यापासून सावध राहाणं इत्यादी अत्यंत वास्तववादी सूचना व अर्वाचीन इतिहासात सैन्य इकडून तिकडे जात असताना काय काय करावं लगलं असेल याची वास्तववादी जाणीव करून देणारा आहे.

सेना समुद्रापर्यंत आली. आता समुद्र कसा पार करावयाचा हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी आपल्यामध्ये नल नावाचा वानर आहे व तो सेतू बांधण्यातला तज्ञ आहे असे वानरांनी रामाला सुचवले. त्याप्रमाणे सर्व वानरांनी झाडं, शिळा, दगड इत्यादी साधनं गोळा करून नलाला आणून दिली व त्यानं त्यांच्या सहाय्यानं सेतू बांधला. आता हे सर्व प्रत्यक्षात कसं घडलं असेल? भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे खुद्द वाल्मीकि रामायणांत दगड पाण्यावर तरल्याचा उल्लेख कुठेही नाही.

हल्ली हल्ली काही लोकांनी या समुद्रात मधे उभं राहून फोटो काढून ते प्रसिद्ध केले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काहीही होऊ शकतं. त्याबद्दल न बोलणं बरं.

राम रावणाचं युद्ध संपतं. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण अशोकवनातून सीतेला घेऊन येतो. त्यानंतर राम सीतेला म्हणतो, "मी रावणाला शिक्षा केली. त्याच्या कैदेतून तुला सोडवलं. पण तू परपुरुषाकडे राहिलेली असल्यामुळे तुझ्या पावित्र्याबद्दल खात्री देता येत नाही. तेव्हा तू हवं तिकडे जाऊ शकतेस." हे शब्द कानावर पडताच सीतेला काय वाटलं असेल? तिच्या कोणत्या अपराधाकरता तिला ही शिक्षा मिळावी? राम रावणाला मारील, आपल्याला त्याच्या कैदेतून सोडवील आणि आपण रामाबरोबर आनंदानं अयोध्येला जाऊ अशा कल्पनेत असलेल्या सीतेवर हे शब्द अगदी वज्रासारखे कोसळले असतील. तिनं अग्निप्रवेश करायचं ठरवलं पण अग्निनं स्वतःच रामाला ग्वाही दिली की "सीता पवित्र आहे. तू तिचा स्वीकार कर."

पुराणकाली स्त्रियांना फार मानानं वागवलं जात असे असा काही लोकांचा दावा आहे. ते अजिबात खरं नाही. सीतेसारखीला ही वागणूक, मग सामान्य स्त्रियांचं काय? अग्नीच्या आश्वासनामुळे सीतेचा स्वीकार झाला व ती बहुमानानं अयोध्येला गेली खरी. पण पुन्हा अयोध्येच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली. रामानं एका धोब्याचं बोलणं ऐकलं. धोबी म्हणाला, "माझ्या बायकोच्या चरित्र्याबद्दल मला शंका आली म्हणून मी तिला घराबाहेर काढली. सीता तर इतके महिने रावणाच्या कैदेत राहिलेली. रामानं तिचा परत कसा स्वीकार केला?" हे ऐकून राम पुन्हा अस्वस्थ झाला. शेवटी त्यानं लक्ष्मणाला सांगितलं, "हिला वनांत सोडून ये. मला जास्त काही विचारू नकोस." लक्ष्मणानं त्याप्रमाणे सीतेला वनात नेऊन सोडलं. सीतेला जाताना कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे तिला लक्ष्मणानं वनात सोडल्यावर तिचा धीरच सुटला. तिनं लक्ष्मणाला विचारलं, "या भयंकर अरण्यात मी एकटी कुठे जाऊ?" लक्ष्मणाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यानं तिला सोडतांना इतकीच काळजी घेतली होती की तिला त्यानं वाल्मीकि ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ सोडलं, हेतू हा की आश्रमात जे कोणी असतील ते तिला आत घेऊन जातील आणि ती सुरक्षित राहील.

आणि तसंच झालं. वाल्मीकींचा एक शिष्य बाहेर आला असतांना त्यानं तिला पाहिलं आणि तो तिला आश्रमांत घेऊन गेला. त्यावेळी सीतेला दिवस गेलेले होते याचाही रामानं विचार केला नाही. थोड्याच दिवसांत लव आणि कुश तिच्या पोटी जन्माला आले.

आश्रमात सीतेचे पुत्र लहानाचे मोठे झाले. वाल्मीकींनी त्यांना सर्व तर्हेचं शिक्षण दिलं. त्याच काळात त्यांचं रामायण काव्य लिहून पुरं झालं होतं. ते त्यांनी त्या मुलांच्याकडून पाठ करून घेतलं व उच्च स्वरांत (आपल्याकडे पोवाडे गातात तसे) म्हणायला शिकवलं. मग त्यांना ते गाण्याकरिता अयोध्येला पाठवलं. हेतु हा होता की राम स्वतः ते केव्हातरी ऐकेल. त्याप्रमाणे रामानं एक दिवस ते ऐकलं. ‘ती मुलं कोण?’ असं विचारलं. पण वाल्मीकि ऋषींनीं पढवल्याप्रमाने आपण रामाचीच मुलं आहोत हे त्यांनी रामाला सांगितलं नाही. रामानं त्यांना ते काव्य राजदरबारात म्हणायला सांगितलं. सगळ्या दरबारानी ते ऐकलं. तेच जगप्रसिद्ध 'रामायण'.

आप्पा गोडबोले

कथाविचारलेखमत

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2018 - 4:00 pm | प्राची अश्विनी

आवडले रामायण. आप्पांना नमस्कार.
अवांतर- श्रीलंकेत गेले असताना तिथल्या स्थानिक लोकांना रामायणाबद्दल काय वाटते याचा थोडा शोध घेतला. बहुतेक बुद्ध धर्मीय आहेत. आणि त्यांना रामायणाची, रावणाची फारशी माहिती नाही. तिथे भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माचा इतिहास शिकवला जातो. दर रविवारी बहीतांश मुलं पारंपारिक कपडे घालून ( तो त्यांचा रविवार शाळेचा गणवेश असतो.) धर्मशिक्षण घ्यायला वेगळ्या शाळेत जातात. त्या अभ्यासाची वेगळी परिक्षा असते. आणि बौद्ध धर्म धर्म संस्कार त्यांना मुखोद्गत असतात. तामीळ लोकांना मात्र अर्थातच रामायणाची माहिती होती.

शशिकांत ओक's picture

25 Mar 2018 - 8:34 pm | शशिकांत ओक

जननायक प्रभू राम

शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला.

संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली.

रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्‍यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही.

रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे?

शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्‍या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली.

आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला.

श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्‍या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.

पगला गजोधर's picture

23 Mar 2018 - 4:32 pm | पगला गजोधर

आपला लेखं आवडला.

१+
===================

मला चांगल्या कथा / सादरीकरण नेहमीच खूप आवडतं. लाईफ में मजा आता है.

गेम ऑफ थ्रोन , बोर्डवॉक एम्पायर वैगरे दीर्घ कथा व त्यावरील रसग्रहण चर्चा खूप आवडते.

पश्चिमेकडील देशात गेऑथ्रो वैग्रे च्या विकी साईट किंवा फॅनडम साईट जश्या असतात, तश्याच
तुमच्या लेखा सारखे लेख एकत्र करून रामायण स्टोरी विकी साईट करता येऊ शकेल, अशी सूचना.

मार्मिक गोडसे's picture

23 Mar 2018 - 4:39 pm | मार्मिक गोडसे

एक बालिश शंका. हनुमान जर द्रोणागीरी पर्वत उचलून आणू शकत असेल तर रामसेतू करता वानरं एक एक दगड कशाला टाकत बसले होते? त्या मापाचा एखादा डोंगरच का तेथे ठेवला नाही?

शशिकांत ओक's picture

24 Mar 2018 - 8:43 pm | शशिकांत ओक

नमस्कार मला ह्याचे आश्चर्य वाटले की सेतू बांधायची गरज रामापेक्षा रावणाच्या सेनेला असायला हवी. रामांना फक्त एकच वेळी लंकेवर प्रहार करायला जावे लागले. पण रावणाला स्वत:ला जायला, अन्य सैन्याला बेट लंका ओलांडून प्रत्येक वेळी जावे यावे लागणार म्हणून त्यांनी पूल बांधणे जास्त गरजेचे होते.वरच्या मजल्यावर भेटायला जाणाऱ्यांना जिना किंवा शिडीची व्यवस्था करायला लागण्यापेक्षा जो वरच्या मजल्यावर राहतो त्याला वेळोवेळी खाली वर करायची गरज मोठी आहे नाही का?

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 9:02 pm | मार्मिक गोडसे

ते जाऊ द्या. वानरं जेव्हा समुद्रात दगड टाकून सेतू बांधत होती तेव्हा रावणाची सेना गोटया खेळत होती का समुद्रकिनारी.

असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती
>> तारा ही वालीची पत्नी होती. सुग्रीवची पत्नी "रुमा"

गामा पैलवान's picture

23 Mar 2018 - 7:58 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकरीणबाई,

अप्पांना नमस्कार सांगा. लेख आवडला. काही भाष्य करेन म्हणतो.

१.

हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.

वरील विधानाचा पूर्वार्ध मान्य. पण उत्तरार्धाबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. वालीने रामाला म्हंटलं की तुला सीताच हवी होती तर मला सांगायचं होतं ना. रावणाने माझ्या सांगण्यावरून तिला परत पाठवली असती.

रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.

वालीने आपल्या वानरसैन्याच्या सहाय्याने पराक्रमी रावणाची पार दाणादाण उडवली होती. यावर रावणाने राजनैतिक तोडगा काढला. गोडीगुलाबीने वालीला आपल्या जाळ्यात ओढून घेतला आणि त्यासोबत मैत्रीचा तह केला. त्यानुसार त्या दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. आणि वालीच्या संरक्षणासाठी (काहीही हं.... !) रावणाचं सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस रुजू होईल. या सैन्याच्या सहाय्याने पुढे रावणाने बराच प्रदेश जिंकला. यांत कौसल्येचं माहेरही (=महाकौशल) आलं.

रावणाचा बीमोड करण्यासाठी दशरथाने राजेलोकांना एकत्र आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण फारसं यश आलं नाही. पुढे वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी एकत्र येऊन रामलक्ष्मणांना शिक्षण द्यायच्या मिषाने त्यांच्या हातून राक्षसांच्या नाश करवून घेतला. त्याकाळी स्वयंवरे हे राजकारणाचे अड्डे असंत. सीतास्वयंवर ही अशीच एक नामी संधी होती. वसिष्ठांनी बहुधा काहीतरी खटपट करून दशरथास चारही पुत्रांचे विवाह जनकाच्या परिवारात लावून देण्याचं पटवून दिलं. वस्तुत: तशी काही गरज नव्हती.

पुढे कैकेयीने आगामी राजकारणावर नजर ठेवून रामाला वनवास घडवण्याचा आग्रह धरला. दोन भाऊ अयोध्येच्या रक्षणासाठी मागे राहिले. रामाचा वनवास रावणाच्या सैन्यास निष्प्रभ करण्यासाठीच होता. पण मध्येच गडबड झाली व शूर्पणखेचा प्रसंग घडला. या घडामोडींचा रावणास सहजंच अंदाज आला आणि त्यानं सीतेस पळवलं.

जर वालीने रावणाला विनंती केली असती तर सीता विनायुद्ध रामाकडे परत आली असती. मग राक्षसमुक्त भारताचं केवळ स्वप्नंच उरलं असतं. त्यामुळे वालीवध हा अन्यायकारक असला तरी तो रामचरित्रावरचा डाग मानता येणार नाही. असं आपलं माझं मत.

२. अग्निपरीक्षा :

ही सीतेने स्वत:हून केल्याचं वाचलं आहे. हा रामाचा आग्रह नव्हता. तो फक्त तिला म्हणतो की तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतेस. माझ्याव्यतिरिक्त लक्ष्मण, सुग्रीव वा बिभीषण हे तुझे पर्याय आहेत.

याचं कारण सीताहरणात सापडतं. कांचनमृग हा कोणी पहिला वा ऐकला नसून हा एक मायावी प्रकार आहे असं रामाचं म्हणणं होतं. तरीपण सीतेने रामाला त्याच्यामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही बाहेर पाठवून दिलं. नंतर रावणाने तिला पळवली. यावरून सीता रावणाला फितूर तर नाही ना असा संशय येऊ शकतो. नेमक्या या संशयाची निवृत्ती करण्यासाठी रामाने तिला मोकळीक दिली.

सीतेने हे अचूक ओळखलं होतं. म्हणूनंच तिनं हनुमानाच्या पाठीवरून पळून येण्यास नकार दर्शवला होता. रामाने रावणाला ठार मारून सीतेला सन्मानाने सोडवणं हाच एकमेव उचित मार्ग होता. आपल्यावर कसलाही संशय राहू नये याचसाठी तिने आपणहून अग्निपरीक्षा द्यायचं ठरवलं.

३.

अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?

पावित्र्यामुळे तिने प्रत्यक्ष इंद्राला ओळखलं. हा गुण नक्कीच तिला पंचकन्यांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगा आहे. पण मोहात पडल्याने इंद्रासोबत रत झाली. हा दोष दूर व्हावा म्हणून गौतमांनी वायुआहाराचं प्रायश्चित्त सांगितलं. बाकी सारं पाहून घेण्यास श्रीराम समर्थ होतेच !

अ.न.,
-गा.पै.

रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.

का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?

शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.

प्रत्यक्ष युद्ध करूनही सावट हटलं का संशयाचं?

हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).

प्रचेतस's picture

24 Mar 2018 - 11:18 am | प्रचेतस

का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?

मुळात रामायण हे संपूर्णतः काल्पनिक आहे असं मी मानतो आणि फक्त रामायणाच्या अनुषंगाने उत्तरे देतो.

युद्ध कुठल्याही परिस्थितीत झालंच असतं, शेवटी रामायणाचा मुख्य हेतू तोच आहे दुष्टांचा नाश, जनांचे कल्याण. आदर्श पुरुषाची कथा जनसामान्यांत पोहोचवणे.
सीता हनुमानाबरोबर थेट निघून का येत नाही ह्यांत अनेक कारणांचा सीतेने उहापोह केलेला आहे. ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, सीतेला घेऊन जात असताना एकाकी हनुमानावर लंकेतील राक्षस हल्ला करतील ही भिती, त्या लढाईत सीतेला राक्षसांनी परत मिळवण्याची किंवा तिचा वध करण्याची भिती. ह्या अनेक कारणांशिवाय लोकापवादाची भिती ही सुद्धा कारणे आहेत. एकतर हनुमान हा परका, त्यासह आली तर लोकापवाद शिवाय रामाच्या पराक्रमाला कमी लेखण्यासारखे. त्यामुळे संशयाचे सावट राहतेच.

शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.

लढून सोडवून आणली ह्यात चारित्र्य चांगलं हा तर्क रामानेच पुढे फोल ठरवला, अग्निदिव्य करायला लावलं शिवाय उत्तरकांडात परत सीतेला वनवासात पाठवणे व लवकुशांसह परत आल्यावर पुन्हा अग्निदिव्याची मागणी करणे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करुनही संशयाचे सावट हटले नाहीच.

हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).

पत्नी परत आलेली पाहून युद्ध करण्यात फारसा अर्थ नव्हता (जरी त्याही परिस्थितीत युद्ध झालं असतं तरीही). वानरांचाही उत्साह ओसरला असता. रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. सीतेला परत मिळवणं हेच ध्येय असेल तरच युद्धोत्साह आला असता. उदा. जिहाद्/क्रूसेड्स वगरे आजची कारणे.

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 8:55 pm | मार्मिक गोडसे

ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती,
रावणाने सीतेला सीटबेल्ट (प्रथम सीतेने वापरला असेल म्हणून त्याला सीटबेल्ट म्हणत असतील) बांधून लंकेला नेले होते का?
हनुमानाला वेग कमी करता येत नव्हता का? मग लँडिंग कसा करायचा?

वरील कारणे वाल्मिकीरामायणात सीता हनुमान संवादात खुद्द सीतेनेच सांगितली आहेत, ती माझ्या मनातील नव्हेत.

बाकी रावणाने सीताहरण मायावी दिव्य रथातून केले होते.

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 9:16 pm | मार्मिक गोडसे

रामालाही हनुमानाच्या जोडून असा रथ देता आला असता की.

सस्नेह's picture

23 Mar 2018 - 10:09 pm | सस्नेह

रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत.
गा पै यांच्या प्रतिसादात तथ्य आहे.
अप्पांना नमस्कार __/\__

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2018 - 10:44 pm | श्रीगुरुजी

>>> रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत.

सहमत. त्याचबरोबर हा आपला गौरवशाली इतिहाससुद्धा आहे.

माहितगार's picture

23 Mar 2018 - 11:30 pm | माहितगार

....संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. ....

मला वाटते हे वाक्य जरा अधिक सिंप्लीफाईड आहे. वाल्मिकी रामायण मूळ रामायण असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते , बाकी ट्रेडिशन्स मुख्यत्वे मौखिक असल्यामुळे वाल्मिकी रामायणास मूळ मानण्याशिवाय पर्यायही रहात नाही पण 'मानले जाते' ही कंडीशन महत्वाची रहाते. वाल्मिकी रामायणाच्या लिखीत प्रतींमध्येही भेद असावेत त्या बाबत क्रिटीकल एडीशन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या माहिती प्रमाणे आता काही साहित्य तज्ञांमध्ये बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त मानले जातात. (माझ्या व्यक्तीगतमते हे प्रक्षिप्त आहेतच रामायणातल्या उर्वरीत कांडातही प्रक्षीप्तता असणे संभव असावे अर्थात तो भाषा साहित्य अभ्यासकांचा विषय आहे)

बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त धरलेतर उपरोक्त लेखामधील वाली सुग्रीव वगळता बराच भाग प्रक्षिप्ताची समिक्षा प्रकारात मोडेल अर्थात ती करु नये असे नव्हे.

त्राटीका प्रकारात तीला असंख्य दुषणे देऊनही रामायणात तीचा नेमका अपराध काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे असे मला व्यक्तीशं: वाटले नाही. किंवा माझी माहिती अपूरी असल्यास वाल्मिकी रामायणातील मूळ + अर्थासहीत नेमक्या श्लोकांकडे निर्देश करावा. त्यामुळे मार ही त्राटीका असे गीतरामायणातले गीत ऐकताना कसे वेगळेच वाटते. असो.

उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे.
युद्धकांडाचे शेवटी फलश्रुती आहे त्यामुळे प्रक्षिप्तता सिद्धच आहे. बालकांडाचे सुरुवातीला नारद वाल्मिकिंना रामाची कथा ऐकवतात व ब्रह्मदेवाच्या आज्ञेने रामायण लिहितात. राम कथा आधी प्रचलित होती ह्यात काहीच शंका नाही. खुद्द महाभारतात रामायण दोन वेळा संक्षेपाने येते, आरण्यकपर्वात द्रौपदीसाठी सौंगंधिक कमले आणायाला जाताना भीम हनुमान संवाद आणि नंतर द्रोणपर्वात षोडषराजकीय आख्यानात रामकथा. अर्थात वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील संक्षिप्त रामकथेत काही भिन्नता आहेत. महाभारतातील कथा जास्त प्राचीन मानायला हवी असे मला वाटते कारण रामायण हे नंतर रचले गेले आहे.

रामायणात त्राटिका हा शब्द नसून ताटिका/ताटका हा शब्द आहे. आणि ती राक्षसीण नसून यक्षी आहे. सुकेतू नामक सदाचारी यक्षाची ती कन्या, सुंद दैत्य तिचा पती व मारिच हा पुत्र जो अगस्त्यांच्या शापाने राक्षस झाला. अगस्त्यांच्याच शापाने यक्षिणीची नरभक्षिणी राक्षसी झाली व ती आसमंत उजाड करु लागली व यज्ञांचा विद्ध्वंस करु लागली हेच तिच्या अपराधाचे कारण.

माहितगार's picture

24 Mar 2018 - 1:58 pm | माहितगार

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार

माहितगार's picture

26 Mar 2018 - 3:26 pm | माहितगार

रामायणाच्या आवृत्त्या आणि आधीच्या आणि नंतरच्या संस्कृत साहित्यातील नेमके उल्लेख संक्षेपाने शोधगंगावरील या प्रबंधात (पिडीएफ दुवा) आलेले दिसतात. प्रबंध अलिकडील असला तरी यात एशियाटीक सोसायटीला सापडलेल्या ६ व्या शतकातील प्रतिबाबत काहीच उल्लेख नाही. तसेच इंडो युरोपीय भाषांमधील शब्द साम्या बद्दल भाष्याचा अभाव आहे तरीही थोडक्यात असलेला सक्षेप वाचनीय आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2018 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख आवडला.

प्राचीन ग्रंथ/महाकाव्य इत्यांदीवर उथळ (एकतर त्यांचा दैविक रंग भडकतेने रंगवणारे किंवा त्याविरुद्ध त्या सगळ्या उथळ कपोलकल्पित कथा आहेत असे म्हणणारे) लेखन पदोपदी सापडते.

संस्कृत प्राचीन ग्रंथांच्या मूळ संस्कृत आवृत्तींचा समतोल (त्यातील पात्रे केवळ... त्या कालातील व त्या परिस्थितीतील व्यवस्थेप्रमाणे वागणारी, राग-लोभ-मोह-मद-मत्सर-भिती, इ असलेली माणसे असून, तेव्हा त्यांनी कसा विचार केला असता व ती कशी वागली असती... या पायावर केलेला अभ्यास) अभ्यास करून ते मराठीत मांडणारे लेखन फार विरळ आहे. तेव्हा हा लेख वाचून समाधान वाटले. गोडबोलेसाहेबांपर्यंत धन्यवाद पोहोचवावे.

माझ्या माहितीतले याप्रकारचे एक लक्षवेधी उदाहरण, इरावती कर्वे यांचे युगांत, हे महाभारतावरील टीकात्मक पुस्तक आहे. गोडबोलेसाहेबांचा अभ्यास त्याच दिशेने झाला आहे असे वाटते. त्यांचा अभ्यास वापरून त्यांनी रामायणावर एक समतोल टीकात्मक लेखन प्रसिद्ध करावे असा आग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचवावा... त्याबद्दल तुम्हाला आगवू धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

24 Mar 2018 - 3:13 am | मुक्त विहारि

"श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो.

ह्याला ऐतिहासिक पाठबळ आहे."कौटिल्याच्या अर्थशास्त्रात" पण त्यावेळी, नंदराज-कौटिल्य-चंद्रगूप्त ह्या काळात, मिश्र-संमिश्र विवाह होत होते असा उल्लेख आहे. हा चाणक्य काय-काय लिहून गेलाय....

आप्पांना नमस्कार .....

लेख प्रतिसाद वाचुन धन्य झालो !
अहिल्या संदर्भातील विवेचन तर कळस आहे .
असो.

लेखन फार आवडले. अगदी मनातलेच असे लिहिले आहे तेही अत्यंत ओघवत्या भाषेत.

वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2018 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत.

"राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)

प्रचेतस's picture

24 Mar 2018 - 12:30 pm | प्रचेतस

अगदी अगदी =))

प्रचेतस भाऊ या विषयावर एखांदा कट्टा करू कि राव पुण्यात तुमचे विचार ऐकायला मजा येईल.

मदनबाण's picture

24 Mar 2018 - 11:25 am | मदनबाण

भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही.

Ram Setu man-made? Discovery Science Channel says so, with scientific proof

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles

अर्जुन's picture

24 Mar 2018 - 12:41 pm | अर्जुन

मदनबाण, दुसरया विडिओमधे दाखवलेले दगड नसून प्रवाळ किंवा चुनखडी आहे, असे वाटते. चुनखडी सछिद्र असल्यामुळे त्यामधे हवा भरुन रहाते.

manguu@mail.com's picture

24 Mar 2018 - 1:28 pm | manguu@mail.com

असे दगड खरोखरच जरी असले तरी ते इतक्या लोकांचे वजन घेउन तरंगतील का ?

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 1:39 pm | मार्मिक गोडसे

समुद्रातील लाटांमुळे ही दगडं एका जागी स्थिर राहणे शक्य आहे का?७

मदनबाण's picture

24 Mar 2018 - 2:49 pm | मदनबाण

==========================

अधिक शोध केल्यावर हे सुद्धा दिसले...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles

अभिजीत अवलिया's picture

24 Mar 2018 - 6:32 pm | अभिजीत अवलिया

प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद आवडले.

माझी शंका तर मार्मिक गोडसे ह्यांच्या शंकेपेक्षाही बालिश आहे.
सर्व वानरांना एखाद्या पर्वतावर बसवायचे आणि तो पर्वत हनुमानाने उचलून लंकेत नेऊन ठेवायचा असा सरळ मार्ग का अवलंबला नाही?

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 6:47 pm | मार्मिक गोडसे

हनुमानाचं लंकेत काही बरं वाईट झालं असतं तर परतीचा पर्याय राहिला नसता वानरसेनेला.

अभिजीत अवलिया's picture

24 Mar 2018 - 7:04 pm | अभिजीत अवलिया

हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण हनुमान हा खूपच शक्तिशाली होता, दस्तुखुद्द रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही.
पण तुम्ही सांगताय तसे यदाकदाचित झालेच तर (०.०००१% शक्यता) लक्षात घेऊन माझ्या डोक्यात आलेय तसे काही वानर सेनेने केले नसावे.

नाऊ द्याट वी आर ऍट इट, दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.

पगला गजोधर's picture

24 Mar 2018 - 7:55 pm | पगला गजोधर

दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.

मग कोलॅटरल ड्यामेज नसते झालं का , इनोसंट सिविलीयन्सचे ???

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 8:17 pm | मार्मिक गोडसे

रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही.
तसं नाही हो, हार्ट अटॅक किंवा डीहायड्रेशन सारखं काही.

प्रचेतस's picture

24 Mar 2018 - 9:07 pm | प्रचेतस

मुळात रामसेतू हाच काल्पनिक असावा.

आता राहिली हनुमानाने समुद्रात न टाकण्याची कारणं तर रामायणातील दक्षिण समुद्रतट आणि रावणाची लंका ह्यातील अंतर १०० योजन इतके उल्लेखित केलेले आहे . (एक योजन म्हणजे म्हणजे सुमारे ८ ते १३ किलोमीटर) म्हणजे रामायणातील १०० योजने म्हणजे ८०० ते १३०० किलोमीटर. जे आजच्या भारतीय दक्षिण तट आणि श्रीलंका ह्यांच्यातील सागरी अंतराचा विचार करता असंभाव्य आहे. आजचे अंतर (सध्याचा रामसेतू किंवा अॅडम्स ब्रिज) हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त 35 किलोमीटर आहे.
अगदी रामायणातील १०० योजन (किमान ८०० किमी) किंवा आजचे अंतर (३५ किमी) जरी धरले तरी इतका भलामोठा पर्वत समुद्रात हनुमानाने आणून समुद्रात टाकणे तत्कालीन दंतकथेप्रमाणेदेखील अशक्य आहे, शिवाय समुद्र उल्लंघन करत असता खुद्द मैनाक पर्वत प्रकटला होता पण त्यालाही मारुतीने पाण्यात ढकलले, शिवाय त्याला सेतू साठी असंख्य पर्वत टाकावे लागले असते, परत पर्वतावर चढउतार करण्यापेक्षा नलरुपी अभियंत्याकडून सेतूबंधन हा सोपा उपाय, मारुतीने द्रोणागिरी देखील वनस्पती न ओळखू आल्यामुळेच उचलून आणला होता.

गणामास्तर's picture

25 Mar 2018 - 10:13 am | गणामास्तर

एकचं भला मोठा पर्वत समुद्रात आणून टाकण्यापेक्षा हनुमानाला २५-३० द्रोणगिरी आणून टाकायला काय झालं होतं?

-गार्लिक बेडसे

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 7:58 pm | मार्मिक गोडसे

त्यापेक्षा हनुमानाने श्रीलेंकेलाच उचलून आणून अयोध्येत फुरसतीत युद्ध करता आलं असतं.

माहितगार's picture

24 Mar 2018 - 8:22 pm | माहितगार

:) तसे नव्हे हो ईश्वराला सुद्धा सारे मानवी टक्के टोणपे खावे लागतात, असे मानवी अनुभ्वव स्वतः घेतलेला इश्वर मानवी जनतेच्या समस्या अधिक चांगल्या समजतो .(असे समजून घ्या हा का ना का)

आमची रिसर्च टीम असे कळविते की हनुमानास पर्वत उचलणयाचे ट्रेनिंग होते परंतु बेट उचलणयाचे नव्हते.

यशोधरा's picture

24 Mar 2018 - 8:05 pm | यशोधरा

मिपा आणि मिपाकर का नव्हते आपल्या काळी, असा विचार रामराय करत असणार नक्की ;)

लेख आवडला.

सस्नेह's picture

25 Mar 2018 - 10:12 am | सस्नेह

अगदी अगदी !
मिपा वाचून रावणाचा पराभव करणे जास्त सोपे होते, असं नक्कीच वाटलं असेल रामरायांना =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2018 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाय तर काय ! एकुलत्या एका परिटाने इतका त्रास दिला. डझनभर मिपाकर त्या काळात सोडून दिले असते तर काय हा:हा:कार माजला असता !!! =)) =)) =))

दर मिपाकरामागे रामायणाचे एक वेगळे व्हर्शन निघाले असते !

माहितगार's picture

24 Mar 2018 - 8:18 pm | माहितगार

दशरथ जातक अशी सुद्धा एक व्हर्शन आहे.

गामा पैलवान's picture

24 Mar 2018 - 9:21 pm | गामा पैलवान

गवि,

का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?

सीता रावणाला आतून फितूर तर नव्हती ना असा संशय सतत राहणार. कांचनमृग मायावी दिसतोय असं रामाने स्पष्टपणे सांगूनही सीतेने त्याला हरणामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही पाठवून दिलं. त्यामुळे रावणासा सीताहरण करणं सुकर झालं. त्यानंतर प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.

आ.न.,
-गा.पै.

दीपक११७७'s picture

25 Mar 2018 - 12:15 am | दीपक११७७

तिसर, लक्ष्मण रेषाही ओलांडली

गामा पैलवान's picture

25 Mar 2018 - 1:42 am | गामा पैलवान

दीपक११७७, माझ्या माहितीप्रमाणे मूळ रामायणात लक्ष्मणरेषा नाही. पण अर्थात चूकभूल देणेघेणे.
आ.न.,
-गा.पै.

दीपक११७७'s picture

25 Mar 2018 - 12:32 pm | दीपक११७७

ओके,
पण लक्ष्मण रेषा हे वाक्य खुप प्रचलित आहे
असो

गवि's picture

25 Mar 2018 - 9:24 am | गवि

धन्यवाद गा.पै.

खालील भाग:

प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.

प्रबळ रामसेवक आल्यावर त्याच्यासह परत येणं हे टोपी फिरवणं असेल तर प्रत्यक्ष श्रीराम आल्यावर आणि रावणाचा युद्धाने पाड़ाव केल्यावर त्यांच्यासह परत येणं यात टोपी फिरवणे असा संशय का नाही?

म्हणजे आता इलाजच राहिला नाही, यावंच लागलं असा भाव नाही का येणार?

उलट हनुमानासोबत आली असता पहिल्या संधीत दुष्ट रावणापासून सुटका करुन घेतली, अर्थात रावणाकडे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती उलट सुटकेसाठीच आतुर होती असं दिसलं असतं.

तुम्ही म्हटलेलं लॉजिक उलट असं दर्शवतं की शक्यतो (म्हणजे खुद्द श्रीराम येईपर्यंत) परतायची इच्छा नव्हती.

जर तुमचं उपरोक्त लॉजिक अचूक असेल तर तो संशय कोणालाही येऊ नये अशी काळजी घेऊन श्रीरामांनी हनुमानाला मुळात पाठवलेच नसते.

असं वाटतं.

manguu@mail.com's picture

25 Mar 2018 - 9:07 am | manguu@mail.com

रामाला सेतू बांधावा लागला.

रावण , शूर्पणखा व इतर राक्षस ये जा कसे करत होते ?

अभिजीत अवलिया's picture

25 Mar 2018 - 11:11 am | अभिजीत अवलिया

रावणाचा मायावी रथ उडायचा ना?
शूर्पणखा व इतर राक्षस कसे ये जा करायचे ते माहीत नाही.

मिपाकरांच्या , रामायणावरील बालसुलभ शंका वाचून वारल्या गेले आहे =))

इरसाल's picture

27 Mar 2018 - 3:31 pm | इरसाल

इतक्या सगळ्या वारल्या कुठे गेल्या? वारली डिजाईन काढायला का?

मार्मिक गोडसे's picture

25 Mar 2018 - 11:04 am | मार्मिक गोडसे

आधुनिक दृष्टिकोनातून शंका विचारल्या गेल्या आहेत.

प्रचेतस's picture

25 Mar 2018 - 11:37 am | प्रचेतस

मुळात रामायण हे काल्पनिकच समजावे, त्यातील गोष्टी उत्कृष्ट फँटसी कथा म्हणून वाचल्या तर असल्या शंका येत नाहीत.

महाभारत मात्र इतिहास असू शकतो.

मार्मिक गोडसे's picture

25 Mar 2018 - 12:16 pm | मार्मिक गोडसे

जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी) येथे जखमी अवस्थेत रामाला आढळला व त्याने रावण सीतेला घेवून कोणत्या मार्गाने गेला ह्याचे मार्गदर्शन केले व तेथेच प्राण सोडला असताना लेपाक्षी मंदिर जटायू जेथे पडला त्याठिकाणी बांधले ,हे कसे?

सतिश गावडे's picture

25 Mar 2018 - 12:32 pm | सतिश गावडे

हे तुम्ही दिव्य मराठीच्या वेब आवृत्तीला पत्र पाठवून विचारु शकता.

वरच्या प्रतिसादात "shared as it is" हा इशारा लिहायचा राहीला त्याबद्दल क्षमस्व.

काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण,
हे फोटो सिद्ध करतात सत्य

पूर्वीच्या इंडिया टीव्हीची आठवण झाली.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 12:19 pm | पगला गजोधर

महाभारत मात्र इतिहास असू शकतो.

माझ्यामते महाभारत रामायण इतिहास असूच शकत नाही.
व्यास नामक क्रिएटिव्ह रायटर ने "जय" नामक साहित्य तयार केले.
तत्कालीन बेस्टसेलरच म्हणाना जणू. आणि आज सुपरहिट कलाकृती चे काय होते, ती सुपरहिट झाल्यावर??
तिचे पार्ट 2, 3....निघतात.
किंवा स्पिनऑफ निघतात, किंवा प्रिल्युड निघतात...
लॉर्ड ऑफ रिंगस => हॉबीट, पायरेट्स ऑफ कॅरेबियन.....
खूप उदा देता येतील. त्याप्रमाणे जय मध्ये अनेक अपेंडीक्स प्रक्षेपित झाले, त्याचे अनेक स्पिन ऑफ निघाले असतील, वेग वेगळी व्हर्जन्स निघाली असतील....त्या सर्वांचे कंसॉलिडेशन, म्हणजे आजचे महाभारत...
लिहीणार्या माणसाने समजा तत्कालीन शहरांची नावे जशीच्या तशी त्याच्या कथेत वापरली (उदा. एका चित्रपट दाखवतो की न्यू यॉर्क शहरात एलियन्सने हल्ला केला), तर 1000
वरश्यानी, कोण्या एका काळी न्यू यॉर्क शहर होते, आणि या कथेत त्या शहाराबाबत उल्लेख आहे म्हणून तो इतिहास आहे, असा दावा केला तर्, हस्तभालयोगमुद्रा करावी लागेल.

रामायणाचा लेखक कदाचित भारतभर फिरला असेन, एखाद्या सागरी बंदराजवळ त्याची धर्मशाळा असेल, अनेक पूर्व व दक्षिण प्रदेशांशी व्यापार करणारे नाविक त्याच्या संपर्कात आलेली असतील, त्यांच्याकडून त्याला वेगवेगळ्या देशाबद्दल प्रदेशाबद्दल समुद्रबद्दल माहिती मिळाली असेल, ती त्याने त्याच्या कथा रचनेत फिट केली असेल...
म्हणून काय रामायण व महाभारत या उपखंडात इतिहास म्हणून होऊ शकत नाही...

बाकी इतिहास हा घटना झाल्यावर, तत्कालीन पत्रव्यवहार, शिलालेख, राजपत्रे , उत्खनन वै होऊन लिहिला जात असावा....
इथे तर व्यास एकरकमी सर्व कथा डिक्टेट करताना दिसतात, गणपती बिचारा खाली मान घालून शॉर्टहँड प्रकारचे डिक्टेशन घेत आहे....
कसा असू शकतो इतिहास ?????

रामायण महाभारत या साहित्याला, बहुजनांच्या माथी इतिहास / संस्कृती म्हणून थोपवण्याचे कारस्थान अनेक शतके होत आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

तुम्ही तुमच्याच समजात आनंदाने राहा.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2018 - 2:47 pm | श्रीगुरुजी

धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकण्याच्या आपल्या कौशल्याला व सातत्याला सलाम! _/\_

धर्मराजमुटके's picture

25 Mar 2018 - 11:58 am | धर्मराजमुटके

आज श्रीराम नवमी आहे. सगळ्यांना श्रीराम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा !

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 12:54 pm | पगला गजोधर

मी तर् असेही वाचलंय,
भारताचा
बौद्धधर्मीय सम्राट अशोक यांचा पणतू (बहुदा पणतूच, पण चू भू दे घे) हा राजसिंहासनावर होता (तो काही आपल्या पणजोबा सारखा हुशार व सावध व पराक्रमी नसावा), त्याला त्याच्याच वैदिक ब्राम्हण धर्मीय सेनापती, पुष्यमित्र शुंग याने, छद्मीपणे सैन्य संचलन कार्यक्रमात हत्या करून , (इजिप्तच्या अन्वर सादात यांची आठवण होते का ?)स्वतः स राज्य घेतले.
इतर सरदार व जनतेस, मागील काही वर्षे जो अनागोंदी कारभार चालला होता, त्याचा बंदोबस्त करतो, असे सांगुन त्यांचा पाठिंबा मिळवला,
(काही जणांना कर्तृत्ववान नेहरू व पणतू राहुल आणि साध्याला भारतातील एक प्रसिद्ध गुजराती मनुकश्य, यांची आठवण झाली तर् निव्वळ योगायोग समजावा)
असो एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे.
असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.

प्रचेतस's picture

25 Mar 2018 - 1:34 pm | प्रचेतस

तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्राम्हण, नॉन ब्राम्हण असा जातीयवाद काढायला आनंद होतो असे दिसते तेही पुराव्यांशिवाय.
मिपा मालक, मिपा संपादक वरील विधानांची दखल घेतील काय?

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 1:55 pm | पगला गजोधर

महाभारत हा इतिहास आहे, याचा पुरावा , वाचायला आवडेल.

स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'. वैशंपायनांनी त्याचे भारत व तदनंतर सौतीने त्यात अजून भर टाकून त्याचे महाभारत केले. अर्थात हे केवळ तिघांनीच केले असेही नव्हे, इतरांनीही भर घालत आजचे महाभारत आकाराला आले. महाभारताच्या क्रिटिकल प्रतीने त्याचा काळ जास्तीतजास्त इस १० व्या शतकापर्यंत आणून ठेविला आहे.
हा काळ म्हणजे ह्या प्रतितली भर ही जास्तीत जास्त १० व्या शतकापर्यंत घातली गेली ह्याची सिद्धता. मूळ कथा बुद्धपूर्वकालीन आहे ह्यात काहीच शंका नाही कारण तत्कालीन साहित्यात महाभारतातील काही वर्णने आहेत.

मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच.
त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे. तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.

तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.

तेच तर त्यांचं काम आहे.

बाकी चर्चा चांगली चालली आहे.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 4:13 pm | पगला गजोधर

मी तर् असेही वाचलंय,

हे वाक्य कंटेक्स्टमधे न घेता, आपण खेद व्यक्त केला, त्याबद्दल मला खेद आहे, असो.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 4:30 pm | पगला गजोधर

प्रचेतसजी आपल्या प्रति आदर बाळगून, व पूर्ण जबाबदारीने लिहितोय,
आपल्यासारखे ज्ञानभांडार व विद्वत्ता व शब्दप्रभुत्व, यासारख्या बाबींचे आम्ही मालक नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला अपेक्षित चर्चा मला जमत नसावी, आम्ही जे आजूबाजूला माहिती उपलब्ध आहे ती वाचून प्रकटलो.

त्यातली जी लगेचच सापडली ती खाली दिली आहे, बाकीची खूप शोध घेऊन, आंतरजालावर उपलब्ध झाली तर देईन, नाहीतर दुसऱ्या प्रकारे रेफ देईन, तोपर्यंत जरा वेळ द्या,

रेफ: https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%...

पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक क्रौर्यपूर्ण कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याची एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस दगाफटका करून हत्या केली व स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.

इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयसचे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्‍या राजकीय सुविधा बंद केल्या.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 5:33 pm | पगला गजोधर

रेफ:https://www.forwardpress.in/2015/10/bahujan-reading-of-festivals-hindi/

दस मुंह का आदमी – रावण, इन दस मौर्य बौद्धवादी राजाओं का प्रतीक है। दशहरा मतलब दस मुख वाला हारा हुआ। इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया और दशमुखी रावण मतलब इन 10 राजाओं को जलाने की प्रतीकात्मकता खड़ी की गई

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2018 - 5:39 pm | श्रीगुरुजी

हिदीतही ब्रिगेडी दिसताहेत. गुढीपाडव्याच्या फिरणा-या पोस्टप्रमाणे वरील लेखन सुद्धा विकृत मानसिकतेचा आविष्कार आहे.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 5:43 pm | पगला गजोधर

रेफ:
http://www.pratibhaekdiary.com/ramayn-aur-ram-ki-aitihasik-pdtal/

रामायण और महाभारत एक काल्पनिक साहित्य रचना है, न कि कोई इतिहास की गाथा. पर हम यह भी जानते हैं कि कोई भी रचना वगैर वस्तु केन्द्रित नहीं हो सकती है अर्थात्, कल्पना की उड़ान भी वस्तु की तुलना में ज्यादा ऊंची नहीं उड़ सकती. यही कारण है कि रामायण और महाभारत की कोई भी ऐतिहासिक तथ्य सीधे तौर पर नहीं मिल सकी. पर इतिहास खुद को हमेशा साबित करता है, चाहे वह कल्पना की कितनी भी उंची उड़ान क्यों नहीं हो. विगत दिनों सोशल मीडिया पर वायरल हो रही इसी एक जानकारी को हम यहां अपने पाठकों को देना चाहेंगे. सोशल मीडिया व्हाट्सअप के द्वारा वायरल हो रही इस तथ्य को शब्दशः यहां लिख रहा हूं:

‘‘जिस मगध की राजधानी पाटलिपुत्र में चक्रवर्ति सम्राट अशोक के वंशज मौर्य वंश के बौद्ध सम्राट राजा बृहद्रथ मौर्य की हत्या उसी के सेनापति ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने धोखे से कर दी थी और खुद को मगध का राजा घोषित कर लिया था.

उसने राजा बनने पर पाटलिपुत्र से श्यालकोट तक सभी बौद्ध विहारों को ध्वस्त करवा दिया था तथा अनेक बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम किया था. पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर बहुत अत्याचार करता था और ताकत के बल पर उनसे ब्राह्मणों द्वारा रचित मनुस्मृति अनुसार वर्ण (हिन्दू) धर्म कबूल करवाता था.

उत्तर पश्चिम क्षेत्र पर यूनानी राजा मिलिंद का अधिकार था. राजा मिलिंद बौद्ध-धर्म के अनुयायी थे. जैसे ही राजा मिलिंद को पता चला कि पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर अत्याचार कर रहा है तो उसने पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र की जनता ने भी पुष्यमित्र-शुंग के विरुद्ध विद्रोह खड़ा कर दिया. इसके बाद पुष्यमित्र-शुंग जान बचाकर भागा और उज्जैनी में जैन-धर्म के अनुयायियों के बीच शरण ली.

जैसे ही इस घटना के बारे में कलिंग के राजा खारवेल को पता चला तो उसने अपनी स्वतंत्रता घोषित करके पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र से यूनानी राजा मिलिंद को उत्तर-पश्चिम की ओर धकेल दिया.

इसके बाद ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने अपने समर्थकों के साथ मिलकर पाटलिपुत्र और श्यालकोट के मध्य क्षेत्र पर अधिकार किया और अपनी राजधानी साकेत को बनाया. पुष्यमित्र-शुंग ने इसका नाम बदलकर अयोध्या कर दिया. अयोध्या अर्थात, बिना युद्ध के बनायी गयी राजधानी.

राजधानी बनाने के बाद पुष्यमित्र-शुंग ने घोषणा की कि जो भी व्यक्ति, भगवाधारी बौद्ध भिक्षु का सर (सिर) काट कर लायेगा, उसे 100 सोने की मुद्राएं इनाम में दी जायेंगी.

इस तरह सोने के सिक्कों के लालच में पूरे देश में बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम हुआ. राजधानी में बौद्ध भिक्षुओं के सर आने लगे. इसके बाद कुछ चालाक व्यक्ति अपने लाये सर को चुरा लेते थे और उसी सर को दुबारा राजा को दिखाकर स्वर्ण मुद्राएं ले लेते थे. राजा को पता चला कि लोग ऐसा धोखा भी कर रहे हैं तो राजा ने एक बड़ा पत्थर रखवाया और राजा, बौद्ध-भिक्षु का सर देखकर उस पत्थर पर मरवाकर उसका चेहरा बिगाड़ देता था. इसके बाद बौद्ध-भिक्षु के सर को घाघरा नदी में फेंकवा देता था.

राजधानी अयोध्या में बौद्ध भिक्षुओं के इतने सर आ गये कि कटे हुये सरों से युक्त नदी का नाम सरयुक्त अर्थात ‘सरयू’ हो गया.

इसी ‘सरयू’ नदी के तट पर पुष्यमित्र-शुंग के राजकवि वाल्मीकि ने ‘रामायण’ लिखी थी, जिसमें राम के रूप में पुष्यमित्र-शुंग और रावण के रूप में मौर्य सम्राट का वर्णन करते हुए उसकी राजधानी अयोध्या का गुणगान किया था और राजा से बहुत अधिक पुरस्कार पाया था.

इतना ही नहीं रामायण, महाभारत, स्मृतियां आदि बहुत से काल्पनिक ब्राह्मण धर्मग्रन्थों की रचना भी पुष्यमित्र-शुंग की इसी अयोध्या में ‘सरयू’ नदी के किनारे हुई.

बौद्ध भिक्षुआंे के कत्लेआम के कारण सारे बौद्ध विहार खाली हो गए. तब आर्य ब्राह्मणों ने सोचा कि ‘‘इन बौद्ध विहारों का क्या करे कि आने वाली पीढ़ियों को कभी पता ही नही लगे कि बीते वर्षों में यह क्या थी ?’’

तब उन्होंने इन सब बौद्ध विहारों को मन्दिरों में बदल दिया और इसमें अपने पूर्वजों व काल्पनिक पात्रों को भगवान बनाकर स्थापित कर दिया और पूजा के नाम पर यह दुकानें खोल दी.

ध्यान रहे उक्त ब्रह्द्रथ मौर्य की हत्या से पूर्व भारत में मन्दिर शब्द ही नहीं था और ना ही इस तरह की संस्कृति थी. वर्तमान में ब्राह्मण धर्म में पत्थर पर मारकर नारियल फोड़ने की जो परंपरा है यह परम्परा पुष्यमित्र-शुंग के बौद्ध-भिक्षु के सर को पत्थर पर मारने का प्रतीक है.

पेरियार रामास्वामी नायकर ने भी ‘सच्ची रामायण’ नामक पुस्तक लिखी है जिसका इलाहबाद हाई कोर्ट केस नम्बर 412/1970 में वर्ष 1970-1971 व सुप्रीम कोर्ट में 1971 -1976 के बीच केस अपील नम्बर 291/1971 चला. जिसमें सुप्रीम-कोर्ट के जस्टिस पी0 एन0 भगवती, जस्टिस वी0 आर0 कृष्णा अय्यर, जस्टिस मुतजा फाजिल अली ने दिनांक 16.9.1976 को निर्णय दिया की सच्ची रामायण पुस्तक सही है और इसके सारे तथ्य वैध हैं.

सच्ची रामायण पुस्तक यह सिद्ध करती है कि ‘रामायण’ नामक देश में जितने भी ग्रन्थ हैं वे सभी काल्पनिक हैं और इनका पुरातात्विक कोई आधार नहीं है अर्थात् फर्जी है.’’

प्रस्तुत तथ्य के आलोक में रामायण और महाभारत साहित्य की रचना का समय और तथ्य सही प्रतीत होती है क्योंकि अयोध्या की पुरातात्विक विभाग द्वारा करवाई गई खुदाई से वहां जीवन का अवशेष भी इसी समय से मेल खाता है. अयोध्या के से प्राप्त पहली शताब्दी के एक शिलालेख में पुष्यमित्र-शुंग के एक वंशज का उल्लेख है. पर्याप्त उत्खनन और अन्वेषण के बाद भी हम वर्तमान अयोध्या को गुप्तकाल से पूर्व कहीं भी राम के साथ नहीं जोड़ सकते. शेष आस्था पर विषय है, जिसका इतिहास के किसी भी तथ्य से कोई मेल नहीं और पुष्यमित्र बाल्मीकि द्वारा रचित रामायण में ‘‘राम’’ के रूप में अमर हो गया और बौद्ध बृहद्रथ मौर्य ‘‘रावण’’ के रूप में कुख्यात हो कर इतिहास में दर्ज हो गया. राम और रावराा जैसे काल्पनिक पात्र, जो बाल्मीकि के कल्पना की उपज थी ठीक वैसे ही थे जैसे विभिन्न रचनाकारों के द्वारा रचित काल्पनिक पात्र रोमियो-जुलियट, हीर-रांझा, लैला-मजनू, देवदास आदि जैसे जीवन्त पात्र.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2018 - 6:03 pm | श्रीगुरुजी

हिंदीतले ब्रिगेडी

गब्रिएल's picture

25 Mar 2018 - 6:11 pm | गब्रिएल

आरारारारारा.

व्हास्साप राज्कारनात्ली पीयच्डी देतय म्हाय्ति व्हतं. पन आता तितं राजकार्नाच्या रस्त्यानं इतिहास आनि धर्मकारनात्ली पीयच्डी मिळ्तिया आसं दिस्तंय !

LLRC, LLRC, LLRC (यकच LLRC कमी पडतिया बगा, म्हनून !)

पैसा's picture

25 Mar 2018 - 5:23 pm | पैसा

अतिशय उत्तम आणि खेळीमेळीने चर्चा सुरू असताना हा आयडी फक्त जातीय विष ओकायला तिथे येतो. दर वेळी तेच वाचून आता मिपावर यायचाही कंटाळा यायला लागलाय. वातावरण बिघडवणे याची अजून काय वेगळी व्याख्या आहे का?

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2018 - 5:42 pm | श्रीगुरुजी

+ १

धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकणे हे अशांचे व्यवच्छेदक कौशल्य आहे.

माहितगार's picture

25 Mar 2018 - 3:39 pm | माहितगार

प.ग. दशरथ जातक नावाचे बौद्धधम्रीय रामायण आहे, दशरथ जातकाचा काळ तुम्ही पुष्यमित्र शुंगाच्या आधी लावा बरोबर लावा किंवा नंतर लावा तुमची थेअरी खोडली जाते. आत्ताच थिरी रामायण म्हणजे सिरि रामायण नावाची मयन्मारची गाथा गुगल पुस्तकावर वाचत होतो. पूर्व आशियायी देशात बौद्ध धर्म बहुसंख्य होऊन बरीच शतके झाली तरी रामायणाचे कार्यक्रम आवर्जून होतात. मयन्मारचे बौद्ध धर्मीय एरवी किती हट्टी असू शकतात हे तुम्ही सध्या बातम्यातून पहातच असाल. असो.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2018 - 5:12 pm | श्रीगुरुजी

>>> एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे.
असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.

पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!

@ प.ग. ; इतिहास म्हणून वर्गीकरण करण्यासाठी ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा आग्रह आपल्या ठिकाणी योग्य असला तरी काऊंटर नॅरेटीव्ह (विरोधी कथासूत्र) मांडतानाही ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा वापर करावयास हवा ; तेव्हा मात्र हे बहुतांश तथाकथित विद्रोही प्रमाण साधनांचा वापर टाळून संशयवाद पेरण्यासाठी कल्पनांचे पंतंग हवे तसे उडवतात हे स्मितीत करणारे पण तर्कांच्या कसोट्यांवर न टिकणारे असते किंवा कसे. प्रमाण ऐतिहासिक पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी कमी होते किंवा कसे ? या मंडळींकडे पुरोगामी धर्मजात निरपेक्ष म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 6:24 pm | पगला गजोधर

येस्सार....
परंतु वरील एका प्रतिसादात
.

महाभारतातील काही वर्णने आहेत.

मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच.
त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे.

असे वाचले, त्यामुळे, ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे
'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?
आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी :
विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

माहितगार's picture

25 Mar 2018 - 9:01 pm | माहितगार

एखाद्या गोष्टीस प्रमाण ऐतिहासिक साधनांचा पुरावा नाही याचा अर्थ केवळ 'माहित नाही' आणि ऐतिहासिक प्रमाण साधन मिळेपर्यंत सिद्ध करता येत नाही, एवढाच होतो. ( माहित नसलेल्या गोष्टींवर आधारलेल्या तर्कांना मर्यादा असते) अबकड दंत(लोक)कथेत इतिहास आहेच आणि इतिहास नाहीच . यातील 'च' हा प्रत्यय विवाद्य असतो. मग तो प्रत्यय मी आपण प्रचेतस किंवा अजून कुणी लावला तरी त्यास क्रेडीबल म्हणता येईल असे वाटत नाही.

ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?

नक्कीच पुरेसे नाही. प्रमाण ऐतिहासिक साधनांची गरज शिल्लक रहातेच.

प्रचेतस "स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'." या गोष्टीवर भर देत असावेत -याचा अर्थ रामायणाच्या तुलनेत महाभारताच्या घडले असण्याची शक्यता त्यांना अधिक वाटते एवढाच असावा' असा माझा कयास आहे, अर्थात त्यांनी मी काढलेल्या महाभारत विषयक धाग्यात महाभारतात प्रक्षीप्त भाग बर्‍याचपैकी मोठा असलेले मान्य केलेले आहे. प्रचेतस त्यांचा तो विचार बदलत असतील अशी शक्यता तुर्तास कमी वाटते. ज्यात प्रक्षिप्त भाग खूप मोठा आहे आणि नेमका कोणता भाग प्रक्षिप्त आहे हे ओळखणे बर्‍या पैकी कठीण आहे . मी त्यांच्या प्रमाणे कयास करण्या पेक्षा माहित नाही घडले असू शकते किंवा घडले नसू शकते असे म्हणेन. (मी महाभारतातील प्रक्षिप्त भागाच्या संदर्भाने घेतलेल्या चर्चेस पहिला प्रतिसाद आपलाच होता असे दिसते)

आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी :
विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

प्रियता आणि अप्रियता या भावनिक आणि सब्जेक्टीव गोष्टी आहेत मी माणूस आहे म्हटल्यावर आजीबातच प्रभावीत होत नसेन असे नसावे पण तरीही सर्वसामान्यपणे सर्व सामान्य लोकांपेक्षा खूप अधिक तर्कप्रधान आहे असा किमान माझा माझ्या बद्दलचा समज आहे (आणि कदाचित काही जणांना चुकीचा वाटत असू शकत असलेला समज असावा) आणि यामुळे प्रसंगी क्लिष्ट बोजड अशी विशेषणांनी माझा बर्‍ञापैकी सत्कार होत असतोच :)

अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते. अगदी या धागा लेखात रामायणाच्या एकाच व्हर्शनचा उल्लेख आहे , त्याबद्दल शंका दाखवून इतर गोष्टींसोबत मी बौद्धधर्मीय दशरथ जातकाचाही हवाला दिला आणि त्या बद्दल विरुद्ध बाजूचे मत दुवाही दिला. मनात कोणतीही अढी न ठेवता मी रामवामी पेरीयारांचे मत वाचलेले असते . टिपू सुल्तान विषयावर धागा काढण्यापुर्वी कन्नड इतिहासकार अली आणि त्यांच्या विरुद्ध बाजू दोन्हीही शक्यतो पुर्वग्रहा शिवाय, मुख्य म्हणजे निष्कर्ष आधी न काढता वाचलेल्या असतात.

प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचा आग्रह सहसा सर्वांसाठी सारखाच वापरतो . प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचे निकष पूर्ण न करताही आमचेच दृष्टीकोण बॅलन्स्ड म्हणा हे कथित पुरोगाम्यांचा दृष्टीकोण कथित पुर्वी तथा हा उपसर्ग जोडून तथाकथित हे विशेषण योग्य असल्याचे सिद्ध करत असतात असा माझा बर्‍याचदा अनुभव आहे. आपले इमले पोकळ असू नयेत याची नैतीक जबाबदारी तथाकथित सनातनी तसेही घेत नाहीत, सनातन्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे पोकळपण दाखवून देणे हा उद्देश पुरोगामी ठेवत असतील तर त्यांचे स्वतःचे इमले पोकळ असणे भूषणावह नसावे . मुरोगाम्यांचा पोकळपणा सनातन्यांना आपला पोकळपणा जपण्यास अधिक मदतच करत असावा त्यामुळे आपल्या लेखनात पोकळपणा नाही हे बघण्याची समतोलाची जबाबदारी पुरोगाम्यांची अधिक असावी किंवा कसे आणि म्हणूनच कदाचित माझा पुरोगाम्यांकडे अधिक कटाक्ष असेल तर तो आक्षेप मला मान्य आहे आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही ही माझी भूमिका असो.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 9:52 pm | पगला गजोधर

अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते.

. अगदी म्हणुनच,
समोरच्याला (मिपावरील एका मोठ्या गटाला प्रिय) म्हणून तार्कीक दृष्ट्या न पटलेले निर्देशित न करणे अथवा , फक्त वाचनमात्र डॉर्मंट राहणे कधीकधी शक्य होत नाही, असो,

इकडे तौलनिकदृष्टया अलीकडील इतिहासातील शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक मतप्रवाद आहेत, तर
इतक्या प्राचीन कालीन साहित्यात केवळ लेखक/व्यास म्हणतोय की हा इतिहास आहे, त्यावर मी झटकन विश्वास ठेवण्यास धजावू शकत नाही, कदाचित "जय पुस्तिका हा इतिहास आहे" , असे लेखकाचे विधानाच प्रक्षेपित असू शकते, कदाचित व्यासांनी असे काही लिहिलेच नसेल, कोणी सांगावे ?

बौद्ध विद्यापीठे ज्ञान संपदा अचानक जळली/जाळली गेली ?
हा योगायोग होता का ? असूही शकतो, नसुही शकतो

एका गोष्टीची आपण जाणीव ठेवण्यास हवी, की ज्ञान/माहितीच्या भांडाराची प्रवेशिका व कुलूप किल्ल्या ह्या कित्येक शतके नव्हे हजारो वर्षे फक्त एकाच छोट्या लोक समूहाकडेच होता, दे वर द सोल कस्टडीअन, त्या समूहाव्यतिरिक्त कोणालाही ज्ञान मिळवणे दुरापास्तच नव्हे तर मृत्यस आमंत्रक होते, (रेफ: रामायणातील एका व्हर्शन मधे, एका शूद्राने तप केले त्यास मृत्यू दंड दिला होता रामाने),त्यामुळे महाभारत रामायणात जर काही प्रक्षेपित माहिती अथवा फेरबदल केलेली माहिती असेल, तर माझ्या दृष्टीने प्रमुख संशयित कोण असेल ? हे विचारण्याची तसदी कोणाला घ्यावी लागणार नाही.
.
इट्स एलमेंटरी माय डिअर वॉटसन ...
:)

माहितगार's picture

25 Mar 2018 - 6:16 pm | माहितगार

............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.

@ प.ग. आपण जबाबदार पुरोगामी असाल तर या वाक्यास ऐतिहासिक प्रमाण साधने उपलब्ध करावीत किंवा हे वाक्य मागे घ्यावे असे माझे प्रांजळ मत आहे.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 6:30 pm | पगला गजोधर

मी तर् असेही वाचलंय,

असे स्पष्टपणे लिहून, पुढे कुठे वाचलंय, त्याच्या त्यातल्यात्यात लगेच सापडणाऱ्या लिंक देऊनही, आपण त्याचे पितृत्व माझ्या वर लादणे, हा माझ्यावर आपण अन्याय तर करत नाही ना अनाहूतपणे ?

उसने आणलेले कांद्याचे चित्राच्या काही बाजू फसव्या आहेत हे कुणी निदर्शनास आणल्यावर, कांद्याचे चित्र माझे नाही म्हटले तरी उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडायचे राहून गेले हे सुटत नसावे. त्यांना बास्केटमध्ये कांद्याचे चित्र दिसले होते त्यांनी कांच्याचे चित्र नेमक्या कोणत्या बास्केट मधन उचलला ते त्यांना नेमके सांगता येत नाही आता त्यांनी दाखवलेल्या दोनचार बास्केटमध्ये आपण वाकून पहाणे आले. ते पुढच्या प्रतिसादातून एक एक करुन पाहू.

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 9:56 pm | पगला गजोधर

उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना

....
याचा तुमच्यामते काय क्रायटेरिया आहे सर ?