आधुनिक दृष्टिकोनातून रामायण
In reply to आवडले रामायण. आप्पांना by प्राची अश्विनी
In reply to एक बालिश शंका. हनुमान जर by मार्मिक गोडसे
In reply to एक शंका सेतूच्या संबंधित... by शशिकांत ओक
हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.वरील विधानाचा पूर्वार्ध मान्य. पण उत्तरार्धाबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. वालीने रामाला म्हंटलं की तुला सीताच हवी होती तर मला सांगायचं होतं ना. रावणाने माझ्या सांगण्यावरून तिला परत पाठवली असती. रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे. वालीने आपल्या वानरसैन्याच्या सहाय्याने पराक्रमी रावणाची पार दाणादाण उडवली होती. यावर रावणाने राजनैतिक तोडगा काढला. गोडीगुलाबीने वालीला आपल्या जाळ्यात ओढून घेतला आणि त्यासोबत मैत्रीचा तह केला. त्यानुसार त्या दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. आणि वालीच्या संरक्षणासाठी (काहीही हं.... !) रावणाचं सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस रुजू होईल. या सैन्याच्या सहाय्याने पुढे रावणाने बराच प्रदेश जिंकला. यांत कौसल्येचं माहेरही (=महाकौशल) आलं. रावणाचा बीमोड करण्यासाठी दशरथाने राजेलोकांना एकत्र आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण फारसं यश आलं नाही. पुढे वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी एकत्र येऊन रामलक्ष्मणांना शिक्षण द्यायच्या मिषाने त्यांच्या हातून राक्षसांच्या नाश करवून घेतला. त्याकाळी स्वयंवरे हे राजकारणाचे अड्डे असंत. सीतास्वयंवर ही अशीच एक नामी संधी होती. वसिष्ठांनी बहुधा काहीतरी खटपट करून दशरथास चारही पुत्रांचे विवाह जनकाच्या परिवारात लावून देण्याचं पटवून दिलं. वस्तुत: तशी काही गरज नव्हती. पुढे कैकेयीने आगामी राजकारणावर नजर ठेवून रामाला वनवास घडवण्याचा आग्रह धरला. दोन भाऊ अयोध्येच्या रक्षणासाठी मागे राहिले. रामाचा वनवास रावणाच्या सैन्यास निष्प्रभ करण्यासाठीच होता. पण मध्येच गडबड झाली व शूर्पणखेचा प्रसंग घडला. या घडामोडींचा रावणास सहजंच अंदाज आला आणि त्यानं सीतेस पळवलं. जर वालीने रावणाला विनंती केली असती तर सीता विनायुद्ध रामाकडे परत आली असती. मग राक्षसमुक्त भारताचं केवळ स्वप्नंच उरलं असतं. त्यामुळे वालीवध हा अन्यायकारक असला तरी तो रामचरित्रावरचा डाग मानता येणार नाही. असं आपलं माझं मत. २. अग्निपरीक्षा : ही सीतेने स्वत:हून केल्याचं वाचलं आहे. हा रामाचा आग्रह नव्हता. तो फक्त तिला म्हणतो की तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतेस. माझ्याव्यतिरिक्त लक्ष्मण, सुग्रीव वा बिभीषण हे तुझे पर्याय आहेत. याचं कारण सीताहरणात सापडतं. कांचनमृग हा कोणी पहिला वा ऐकला नसून हा एक मायावी प्रकार आहे असं रामाचं म्हणणं होतं. तरीपण सीतेने रामाला त्याच्यामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही बाहेर पाठवून दिलं. नंतर रावणाने तिला पळवली. यावरून सीता रावणाला फितूर तर नाही ना असा संशय येऊ शकतो. नेमक्या या संशयाची निवृत्ती करण्यासाठी रामाने तिला मोकळीक दिली. सीतेने हे अचूक ओळखलं होतं. म्हणूनंच तिनं हनुमानाच्या पाठीवरून पळून येण्यास नकार दर्शवला होता. रामाने रावणाला ठार मारून सीतेला सन्मानाने सोडवणं हाच एकमेव उचित मार्ग होता. आपल्यावर कसलाही संशय राहू नये याचसाठी तिने आपणहून अग्निपरीक्षा द्यायचं ठरवलं. ३.
अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?पावित्र्यामुळे तिने प्रत्यक्ष इंद्राला ओळखलं. हा गुण नक्कीच तिला पंचकन्यांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगा आहे. पण मोहात पडल्याने इंद्रासोबत रत झाली. हा दोष दूर व्हावा म्हणून गौतमांनी वायुआहाराचं प्रायश्चित्त सांगितलं. बाकी सारं पाहून घेण्यास श्रीराम समर्थ होतेच ! अ.न., -गा.पै.
In reply to माझं काही भाष्य by गामा पैलवान
रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे. प्रत्यक्ष युद्ध करूनही सावट हटलं का संशयाचं? हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).
In reply to रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं by गवि
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?मुळात रामायण हे संपूर्णतः काल्पनिक आहे असं मी मानतो आणि फक्त रामायणाच्या अनुषंगाने उत्तरे देतो. युद्ध कुठल्याही परिस्थितीत झालंच असतं, शेवटी रामायणाचा मुख्य हेतू तोच आहे दुष्टांचा नाश, जनांचे कल्याण. आदर्श पुरुषाची कथा जनसामान्यांत पोहोचवणे. सीता हनुमानाबरोबर थेट निघून का येत नाही ह्यांत अनेक कारणांचा सीतेने उहापोह केलेला आहे. ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, सीतेला घेऊन जात असताना एकाकी हनुमानावर लंकेतील राक्षस हल्ला करतील ही भिती, त्या लढाईत सीतेला राक्षसांनी परत मिळवण्याची किंवा तिचा वध करण्याची भिती. ह्या अनेक कारणांशिवाय लोकापवादाची भिती ही सुद्धा कारणे आहेत. एकतर हनुमान हा परका, त्यासह आली तर लोकापवाद शिवाय रामाच्या पराक्रमाला कमी लेखण्यासारखे. त्यामुळे संशयाचे सावट राहतेच.
शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.लढून सोडवून आणली ह्यात चारित्र्य चांगलं हा तर्क रामानेच पुढे फोल ठरवला, अग्निदिव्य करायला लावलं शिवाय उत्तरकांडात परत सीतेला वनवासात पाठवणे व लवकुशांसह परत आल्यावर पुन्हा अग्निदिव्याची मागणी करणे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करुनही संशयाचे सावट हटले नाहीच.
हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).पत्नी परत आलेली पाहून युद्ध करण्यात फारसा अर्थ नव्हता (जरी त्याही परिस्थितीत युद्ध झालं असतं तरीही). वानरांचाही उत्साह ओसरला असता. रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. सीतेला परत मिळवणं हेच ध्येय असेल तरच युद्धोत्साह आला असता. उदा. जिहाद्/क्रूसेड्स वगरे आजची कारणे.
In reply to का बरं? कसं काय? कोण सावट by प्रचेतस
In reply to ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला by मार्मिक गोडसे
In reply to वरील कारणे वाल्मिकीरामायणात by प्रचेतस
In reply to रोचक आहे ! by सस्नेह
....संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. ....मला वाटते हे वाक्य जरा अधिक सिंप्लीफाईड आहे. वाल्मिकी रामायण मूळ रामायण असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते , बाकी ट्रेडिशन्स मुख्यत्वे मौखिक असल्यामुळे वाल्मिकी रामायणास मूळ मानण्याशिवाय पर्यायही रहात नाही पण 'मानले जाते' ही कंडीशन महत्वाची रहाते. वाल्मिकी रामायणाच्या लिखीत प्रतींमध्येही भेद असावेत त्या बाबत क्रिटीकल एडीशन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या माहिती प्रमाणे आता काही साहित्य तज्ञांमध्ये बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त मानले जातात. (माझ्या व्यक्तीगतमते हे प्रक्षिप्त आहेतच रामायणातल्या उर्वरीत कांडातही प्रक्षीप्तता असणे संभव असावे अर्थात तो भाषा साहित्य अभ्यासकांचा विषय आहे) बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त धरलेतर उपरोक्त लेखामधील वाली सुग्रीव वगळता बराच भाग प्रक्षिप्ताची समिक्षा प्रकारात मोडेल अर्थात ती करु नये असे नव्हे. त्राटीका प्रकारात तीला असंख्य दुषणे देऊनही रामायणात तीचा नेमका अपराध काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे असे मला व्यक्तीशं: वाटले नाही. किंवा माझी माहिती अपूरी असल्यास वाल्मिकी रामायणातील मूळ + अर्थासहीत नेमक्या श्लोकांकडे निर्देश करावा. त्यामुळे मार ही त्राटीका असे गीतरामायणातले गीत ऐकताना कसे वेगळेच वाटते. असो.
In reply to ....संस्कृतमधलं वाल्मीकि by माहितगार
In reply to उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे by प्रचेतस
In reply to उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे by प्रचेतस
In reply to लेखन फार आवडले. अगदी मनातलेच by प्रचेतस
वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत.
"राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)In reply to वालीवधाविषयी रामाने दिलेली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेखन फार आवडले. अगदी मनातलेच by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray CharlesIn reply to मदनबाण, दुसरया विडिओमधे by अर्जुन
In reply to छान by manguu@mail.com
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray CharlesIn reply to प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद by अभिजीत अवलिया
In reply to हनुमानाचं लंकेत काही बरं वाईट by मार्मिक गोडसे
In reply to हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण by अभिजीत अवलिया
In reply to नाऊ द्याट वी आर ऍट इट, दोन by गवि
दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.मग कोलॅटरल ड्यामेज नसते झालं का , इनोसंट सिविलीयन्सचे ???
In reply to हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण by अभिजीत अवलिया
In reply to प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद by अभिजीत अवलिया
In reply to मुळात रामसेतू हाच काल्पनिक by प्रचेतस
In reply to त्यापेक्षा हनुमानाने by मार्मिक गोडसे
In reply to त्यापेक्षा हनुमानाने by मार्मिक गोडसे
In reply to लेख आवडला. by यशोधरा
In reply to अगदी अगदी ! by सस्नेह
In reply to दशरथ जातक अशी सुद्धा एक by माहितगार
In reply to सीतेवरचा फितुरीचा आरोप by गामा पैलवान
In reply to एक अॅड करतो by दीपक११७७
In reply to लक्ष्मणरेषा by गामा पैलवान
In reply to सीतेवरचा फितुरीचा आरोप by गामा पैलवान
प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.प्रबळ रामसेवक आल्यावर त्याच्यासह परत येणं हे टोपी फिरवणं असेल तर प्रत्यक्ष श्रीराम आल्यावर आणि रावणाचा युद्धाने पाड़ाव केल्यावर त्यांच्यासह परत येणं यात टोपी फिरवणे असा संशय का नाही? म्हणजे आता इलाजच राहिला नाही, यावंच लागलं असा भाव नाही का येणार? उलट हनुमानासोबत आली असता पहिल्या संधीत दुष्ट रावणापासून सुटका करुन घेतली, अर्थात रावणाकडे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती उलट सुटकेसाठीच आतुर होती असं दिसलं असतं. तुम्ही म्हटलेलं लॉजिक उलट असं दर्शवतं की शक्यतो (म्हणजे खुद्द श्रीराम येईपर्यंत) परतायची इच्छा नव्हती. जर तुमचं उपरोक्त लॉजिक अचूक असेल तर तो संशय कोणालाही येऊ नये अशी काळजी घेऊन श्रीरामांनी हनुमानाला मुळात पाठवलेच नसते. असं वाटतं.
In reply to छान by manguu@mail.com
In reply to मिपाकरांच्या , रामायणावरील by सस्नेह
In reply to आधुनिक दृष्टिकोनातून शंका by मार्मिक गोडसे
In reply to मुळात रामायण हे काल्पनिकच by प्रचेतस
In reply to काल्पनिक कथा नसून सत्य आहे by सतिश गावडे
In reply to जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी) by मार्मिक गोडसे
In reply to काल्पनिक कथा नसून सत्य आहे by सतिश गावडे
काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण, हे फोटो सिद्ध करतात सत्यपूर्वीच्या इंडिया टीव्हीची आठवण झाली.
In reply to मुळात रामायण हे काल्पनिकच by प्रचेतस
महाभारत मात्र इतिहास असू शकतो.माझ्यामते महाभारत रामायण इतिहास असूच शकत नाही. व्यास नामक क्रिएटिव्ह रायटर ने "जय" नामक साहित्य तयार केले. तत्कालीन बेस्टसेलरच म्हणाना जणू. आणि आज सुपरहिट कलाकृती चे काय होते, ती सुपरहिट झाल्यावर?? तिचे पार्ट 2, 3....निघतात. किंवा स्पिनऑफ निघतात, किंवा प्रिल्युड निघतात... लॉर्ड ऑफ रिंगस => हॉबीट, पायरेट्स ऑफ कॅरेबियन..... खूप उदा देता येतील. त्याप्रमाणे जय मध्ये अनेक अपेंडीक्स प्रक्षेपित झाले, त्याचे अनेक स्पिन ऑफ निघाले असतील, वेग वेगळी व्हर्जन्स निघाली असतील....त्या सर्वांचे कंसॉलिडेशन, म्हणजे आजचे महाभारत... लिहीणार्या माणसाने समजा तत्कालीन शहरांची नावे जशीच्या तशी त्याच्या कथेत वापरली (उदा. एका चित्रपट दाखवतो की न्यू यॉर्क शहरात एलियन्सने हल्ला केला), तर 1000 वरश्यानी, कोण्या एका काळी न्यू यॉर्क शहर होते, आणि या कथेत त्या शहाराबाबत उल्लेख आहे म्हणून तो इतिहास आहे, असा दावा केला तर्, हस्तभालयोगमुद्रा करावी लागेल. रामायणाचा लेखक कदाचित भारतभर फिरला असेन, एखाद्या सागरी बंदराजवळ त्याची धर्मशाळा असेल, अनेक पूर्व व दक्षिण प्रदेशांशी व्यापार करणारे नाविक त्याच्या संपर्कात आलेली असतील, त्यांच्याकडून त्याला वेगवेगळ्या देशाबद्दल प्रदेशाबद्दल समुद्रबद्दल माहिती मिळाली असेल, ती त्याने त्याच्या कथा रचनेत फिट केली असेल... म्हणून काय रामायण व महाभारत या उपखंडात इतिहास म्हणून होऊ शकत नाही... बाकी इतिहास हा घटना झाल्यावर, तत्कालीन पत्रव्यवहार, शिलालेख, राजपत्रे , उत्खनन वै होऊन लिहिला जात असावा.... इथे तर व्यास एकरकमी सर्व कथा डिक्टेट करताना दिसतात, गणपती बिचारा खाली मान घालून शॉर्टहँड प्रकारचे डिक्टेशन घेत आहे.... कसा असू शकतो इतिहास ????? रामायण महाभारत या साहित्याला, बहुजनांच्या माथी इतिहास / संस्कृती म्हणून थोपवण्याचे कारस्थान अनेक शतके होत आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
In reply to महाभारत मात्र इतिहास असू शकतो by पगला गजोधर
In reply to महाभारत मात्र इतिहास असू शकतो by पगला गजोधर
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
In reply to तुम्हाला प्रत्येक ठिकाणी by प्रचेतस
In reply to महाभारत हा इतिहास आहे, याचा by पगला गजोधर
In reply to स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी by प्रचेतस
तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.तेच तर त्यांचं काम आहे. बाकी चर्चा चांगली चालली आहे.
In reply to तुम्ही मात्र नीट चर्चा न करता by शलभ
मी तर् असेही वाचलंय,हे वाक्य कंटेक्स्टमधे न घेता, आपण खेद व्यक्त केला, त्याबद्दल मला खेद आहे, असो.
In reply to स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी by प्रचेतस
In reply to प्रचेतसजी आपल्या प्रति आदर by पगला गजोधर
In reply to रेफ:https://www.forwardpress by पगला गजोधर
In reply to प्रचेतसजी आपल्या प्रति आदर by पगला गजोधर
In reply to रेफ:http://www by पगला गजोधर
In reply to रेफ:http://www by पगला गजोधर
In reply to तुम्हाला प्रत्येक ठिकाणी by प्रचेतस
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
In reply to प्रमाण ऐतिहासिक साधनांचा आग्रह एकतर्फी का ? by माहितगार
महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे.असे वाचले, त्यामुळे, ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ? आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
In reply to येस्सार.... by पगला गजोधर
ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?नक्कीच पुरेसे नाही. प्रमाण ऐतिहासिक साधनांची गरज शिल्लक रहातेच. प्रचेतस "स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'." या गोष्टीवर भर देत असावेत -याचा अर्थ रामायणाच्या तुलनेत महाभारताच्या घडले असण्याची शक्यता त्यांना अधिक वाटते एवढाच असावा' असा माझा कयास आहे, अर्थात त्यांनी मी काढलेल्या महाभारत विषयक धाग्यात महाभारतात प्रक्षीप्त भाग बर्याचपैकी मोठा असलेले मान्य केलेले आहे. प्रचेतस त्यांचा तो विचार बदलत असतील अशी शक्यता तुर्तास कमी वाटते. ज्यात प्रक्षिप्त भाग खूप मोठा आहे आणि नेमका कोणता भाग प्रक्षिप्त आहे हे ओळखणे बर्या पैकी कठीण आहे . मी त्यांच्या प्रमाणे कयास करण्या पेक्षा माहित नाही घडले असू शकते किंवा घडले नसू शकते असे म्हणेन. (मी महाभारतातील प्रक्षिप्त भागाच्या संदर्भाने घेतलेल्या चर्चेस पहिला प्रतिसाद आपलाच होता असे दिसते)
आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?प्रियता आणि अप्रियता या भावनिक आणि सब्जेक्टीव गोष्टी आहेत मी माणूस आहे म्हटल्यावर आजीबातच प्रभावीत होत नसेन असे नसावे पण तरीही सर्वसामान्यपणे सर्व सामान्य लोकांपेक्षा खूप अधिक तर्कप्रधान आहे असा किमान माझा माझ्या बद्दलचा समज आहे (आणि कदाचित काही जणांना चुकीचा वाटत असू शकत असलेला समज असावा) आणि यामुळे प्रसंगी क्लिष्ट बोजड अशी विशेषणांनी माझा बर्ञापैकी सत्कार होत असतोच :) अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते. अगदी या धागा लेखात रामायणाच्या एकाच व्हर्शनचा उल्लेख आहे , त्याबद्दल शंका दाखवून इतर गोष्टींसोबत मी बौद्धधर्मीय दशरथ जातकाचाही हवाला दिला आणि त्या बद्दल विरुद्ध बाजूचे मत दुवाही दिला. मनात कोणतीही अढी न ठेवता मी रामवामी पेरीयारांचे मत वाचलेले असते . टिपू सुल्तान विषयावर धागा काढण्यापुर्वी कन्नड इतिहासकार अली आणि त्यांच्या विरुद्ध बाजू दोन्हीही शक्यतो पुर्वग्रहा शिवाय, मुख्य म्हणजे निष्कर्ष आधी न काढता वाचलेल्या असतात. प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचा आग्रह सहसा सर्वांसाठी सारखाच वापरतो . प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचे निकष पूर्ण न करताही आमचेच दृष्टीकोण बॅलन्स्ड म्हणा हे कथित पुरोगाम्यांचा दृष्टीकोण कथित पुर्वी तथा हा उपसर्ग जोडून तथाकथित हे विशेषण योग्य असल्याचे सिद्ध करत असतात असा माझा बर्याचदा अनुभव आहे. आपले इमले पोकळ असू नयेत याची नैतीक जबाबदारी तथाकथित सनातनी तसेही घेत नाहीत, सनातन्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे पोकळपण दाखवून देणे हा उद्देश पुरोगामी ठेवत असतील तर त्यांचे स्वतःचे इमले पोकळ असणे भूषणावह नसावे . मुरोगाम्यांचा पोकळपणा सनातन्यांना आपला पोकळपणा जपण्यास अधिक मदतच करत असावा त्यामुळे आपल्या लेखनात पोकळपणा नाही हे बघण्याची समतोलाची जबाबदारी पुरोगाम्यांची अधिक असावी किंवा कसे आणि म्हणूनच कदाचित माझा पुरोगाम्यांकडे अधिक कटाक्ष असेल तर तो आक्षेप मला मान्य आहे आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही ही माझी भूमिका असो.
In reply to असो by माहितगार
अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते.. अगदी म्हणुनच, समोरच्याला (मिपावरील एका मोठ्या गटाला प्रिय) म्हणून तार्कीक दृष्ट्या न पटलेले निर्देशित न करणे अथवा , फक्त वाचनमात्र डॉर्मंट राहणे कधीकधी शक्य होत नाही, असो, इकडे तौलनिकदृष्टया अलीकडील इतिहासातील शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक मतप्रवाद आहेत, तर इतक्या प्राचीन कालीन साहित्यात केवळ लेखक/व्यास म्हणतोय की हा इतिहास आहे, त्यावर मी झटकन विश्वास ठेवण्यास धजावू शकत नाही, कदाचित "जय पुस्तिका हा इतिहास आहे" , असे लेखकाचे विधानाच प्रक्षेपित असू शकते, कदाचित व्यासांनी असे काही लिहिलेच नसेल, कोणी सांगावे ? बौद्ध विद्यापीठे ज्ञान संपदा अचानक जळली/जाळली गेली ? हा योगायोग होता का ? असूही शकतो, नसुही शकतो एका गोष्टीची आपण जाणीव ठेवण्यास हवी, की ज्ञान/माहितीच्या भांडाराची प्रवेशिका व कुलूप किल्ल्या ह्या कित्येक शतके नव्हे हजारो वर्षे फक्त एकाच छोट्या लोक समूहाकडेच होता, दे वर द सोल कस्टडीअन, त्या समूहाव्यतिरिक्त कोणालाही ज्ञान मिळवणे दुरापास्तच नव्हे तर मृत्यस आमंत्रक होते, (रेफ: रामायणातील एका व्हर्शन मधे, एका शूद्राने तप केले त्यास मृत्यू दंड दिला होता रामाने),त्यामुळे महाभारत रामायणात जर काही प्रक्षेपित माहिती अथवा फेरबदल केलेली माहिती असेल, तर माझ्या दृष्टीने प्रमुख संशयित कोण असेल ? हे विचारण्याची तसदी कोणाला घ्यावी लागणार नाही. . इट्स एलमेंटरी माय डिअर वॉटसन ... :)
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.@ प.ग. आपण जबाबदार पुरोगामी असाल तर या वाक्यास ऐतिहासिक प्रमाण साधने उपलब्ध करावीत किंवा हे वाक्य मागे घ्यावे असे माझे प्रांजळ मत आहे.
In reply to माझे प्रांजळ मत by माहितगार
मी तर् असेही वाचलंय,असे स्पष्टपणे लिहून, पुढे कुठे वाचलंय, त्याच्या त्यातल्यात्यात लगेच सापडणाऱ्या लिंक देऊनही, आपण त्याचे पितृत्व माझ्या वर लादणे, हा माझ्यावर आपण अन्याय तर करत नाही ना अनाहूतपणे ?
In reply to मी तर् असेही वाचलंय, by पगला गजोधर
In reply to प.ग. ंनी आणलेल्या चित्राच्या निसटत्या बाजू १ by माहितगार
उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना.... याचा तुमच्यामते काय क्रायटेरिया आहे सर ?
आवडले रामायण. आप्पांना