शेजाऱ्याचा डामाडुमा- सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक - मालदीव भाग ८ (अंतिम)

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
13 Feb 2018 - 3:59 pm

मालदीव मालिकेतील या आधीचे ७ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सातवा भाग इथे आहे :-
https://www.misalpav.com/node/41903

आधीच्या भागांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून मालदीवमधल्या सद्यस्थितीबद्दल बरेच सांगून झाले आहे. सध्या मालदीवमधल्या प्रचंड राजकीय उलाढालींमुळे दुसरे 'कॅक्टस' घडेल की काय अशी स्थिती आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र आहेतच. याचवर्षी आपल्या अन्य काही शेजारी देशांप्रमाणे मालदीवमध्येही सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याही प्रसारमाध्यमे कव्हर करतील, त्यात मी आणिक वेगळे काय सांगणार? खरेतर सध्या मालदीवमध्ये घडणाऱ्या घटनांनी मनाला वाईट वाटते आहे. सर्व संबंधितांना योग्य ती उपरती होऊन सगळे स्थिरस्थावर होईल आणि मालदीवकर उज्ज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल करतील अश्या शुभेच्छा देऊन ह्या लेखमालेतील हा शेवटचा लेख.

स्वपत्नीच्या स्वागतासाठी माले विमानतळाला जातांना लेखक - अर्थात कॅमेऱ्याच्या मागे :-)

* * *

तर आता मालदिवबद्दल काही गमतीशीर तर काही गंभीर विषयांबद्दल थोडक्यात, ही रंजक रोचक तथ्ये :-

‘The lowest-lying nation on Earth’ / मालदीव हा जगात समुद्रसपाटीपासूनची उंची सर्वात कमी असलेला हा देश. संपूर्ण देशच समुद्रसपाटीपासून जेमतेम मीटरभर उंच असल्यामुळे वाढत्या समुद्रपातळीचा धोका भरपूर आहे. ४०-५० वर्षानंतर कदाचित संपूर्ण देश सागराने गिळला असेल अशी शक्यता जागतिक पर्यावरणतज्ञ वर्तवतात. ह्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती नाशीद यांनी वर्ष २००९ मध्ये एक धमाल युक्ती केली - खोल समुद्रात पाण्याखाली कॅबिनेट बैठक घेऊन तीत जगाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले. सर्व मंत्र्यांनी पाण्याखालीच चर्चा (!) करून त्या प्रस्तावावर सह्या पण केल्या ! एखाद्या देशाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक खोल समुद्रात पाण्याखाली होण्याचा हा एकमेवाद्वितीय सोहळा जगातील एक आश्चर्य ठरला.

पाण्याखाली मालदीवच्या राष्ट्रपतींची कॅबिनेट बैठक - १, १७ ऑक्टोबर २००९ गिरीफुशी, मालदीव.

पाण्याखाली मालदीवच्या राष्ट्रपतींची कॅबिनेट बैठक - २, १७ ऑक्टोबर २००९ गिरीफुशी, मालदीव.

मागच्या दशकात आलेल्या सुनामीची दहशत आहेच. आता खरोखरीच देश पाण्याखाली गेला तर त्याला उपाय म्हणून मालदीव स्वतःच्या नागरिकांसाठी जगात अन्यत्र जागा ‘विकत’ घेण्याचे नियोजन करीत आहे. त्यासाठी एक फंड स्थापन करण्यात आला असून सरकार त्यात दरवर्षी जमेल तशी भर टाकत आहे.

सुनामीचे स्मारक, माले, मालदीव

* * *

मालदीवच्या बेटांवर जन्म झाला म्हणून कोणालाही आपोआप मालदीवचे नागरिकत्व मिळत नाही. त्यासाठी आई किंवा वडील यापैकी एकानी मालदीवचे नागरिक असणे ही पूर्वअट आहे. मालदीवच्या नागरिक स्त्रीला अपत्यासाठी नागरिकत्व मिळवतांना त्याच्या पित्याचे नाव, ओळख, धर्म, देश, लग्न झाल्याचा दाखला असे काहीच विचारले जात नाही. अशी सोय पुरुषांसाठी नाही. कोण्या मालदिवकराशी लग्न केले म्हणून विदेशी व्यक्तीला नागरिकत्व अर्थातच मिळत नाही.

* * *

अमाप निसर्गसौंदर्याबद्दल मालदीव प्रसिद्ध आहेच, पण जगातील प्रतिमाणशी सर्वात जास्त कचरा निर्माण करणारा देश म्हणूनही प्रसिद्ध आहे. मालदीवमध्ये फारसे काही पिकत नाही. जगण्यासाठी लागणाऱ्या जवळपास सर्व वस्तू जगभरातून समुद्रमार्गे आयात होत असल्यामुळे प्लास्टिक, धातू, लाकूड आणि अन्य वेष्टनांचा प्रचंड मोठा कचरा ह्या बेटांवर निर्माण होतो. भारताकडून अर्थातच भरपूर आयात होते. अन्न-धान्य, फळे-भाजीपाला याबरोबर भारतातून सर्वात मोठी आयात होते ती सिमेंट आणि बांधकाम साहित्याची. भारत मात्र मालदीवमधून आयात करतो फक्त एक वस्तू - कचरा ! हो, पर्यटक आणि स्थानिकांच्या वापरामुळे उदंड झालेले लोखंड-अल्युमिनियम वगैरे भंगार विकत घेऊन भारतातील कारखान्यांना विकले जाते.

* * *

जगातील सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत मालदीवचा नंबर बहुदा पहिला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट होतो, कोणतेही कारण विचारल्या जात नाही. फक्त सरकारी कागदपत्रात तशी नोंद करावी लागते. बहुतेकवेळी तलाक महिला देतात, हे जरा वेगळे आहे. घटस्फोटित महिलांना कोणत्याही सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागत नाही, इतकेच नाही तर आधीच्या लग्नापासून झालेल्या सर्व अपत्यांची जबाबदारी घेण्याची लेखी हमी घेतल्याशिवाय घटस्फोटित महिला नवीन लग्न करत नाहीत. गेल्यावर्षीच्या सरकारी अंदाजानुसार तिशीच्या वर वय असलेल्या सुमारे ४० टक्के मालदीवकर महिलांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घटस्फोट घेतला आहे ! जोडप्याने एकमेकांना घटस्फोट देऊन पुन्हा एकमेकांशीच लग्न केल्याचे अनेक किस्से दिसतात. हा प्रकार इतक्यांदा होतो की त्यासाठी एक विशेष कायदा करण्यात आला आहे. ह्या कायद्याप्रमाणे असा पुनर्विवाह जास्तीत जास्त चारदा करता येतो.

* * *

एकत्र कुटुंबपद्धती भारतीय उपखंडात सर्वत्र बघायला मिळते. मालदीवमध्ये मात्र लग्न झालेले जोडपे आणि त्यांची मुले असे छोटे कुटुंब पसंत केले जाते. ९० टक्के अशी एकल कुटुंबे आहेत. मुलींसाठी लग्नाचे वय १५ वर्षे आहे, मुलांसाठी १८, पण इतक्या कमी वयात कोणीच लग्न करीत नाही. बहुपत्नीत्व कायद्याने गुन्हा नाही पण पूर्वापार ती पद्धत समाजात नाही. आजघडीला मालदीवमध्ये फक्त ४९ पुरुषांना दोन बायका आहेत.

* * *

देशातली सर्व जमीन कागदोपत्री सरकारच्याच मालकीची आहे, कोणाही व्यक्तीकडे जमिनीची व्यक्तिगत मालकी नाही. सामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी किंवा नारळ/इतर फळझाडे लावण्यासाठी सरकार जमीन भाडेपट्ट्याने देते. बहुतेकदा हा भाडेकरार ९९ वर्षे कालावधी आणि १ रुफिया भाडे असा असतो.

* * *

देशाचा आधिकारीक धर्म इस्लाम आहे आणि प्रत्येक नागरिकाला इस्लाम स्वीकारला असणे बंधनकारक आहे. धर्मांतरास परवानगी नाही, धर्मांतर कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. धार्मिक बाबतीत शरियाच्या मूळ सिद्धांतांवर आधारित इस्लामिक कायदे आहेत. कामकाजाची भाषा इंग्रजी आणि व्यापार-व्यवहाराचे कायदे ब्रिटिश लॉ / भारताप्रमाणेच.

* * *

मालदीवच्या कस्टम्स नियमाप्रमाणे पूजा करण्यासाठी कोठल्याही मूर्ती किंवा तसबिरी देशात आणायला बंदी आहे. दागिने, कीचेन, गृहसजावटीसाठी आणि अश्याच अन्य कारणासाठी आणलेली चित्रे-मूर्ती-तसबिरींवर अशी बंदी नाही. मद्य आणि पोर्क आणण्यावर मात्र सरसकट पूर्ण बंदी आहे. ह्या वस्तू प्रवाश्यांच्या सामानात असल्यास विमानतळावर अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्याव्या लागतात, परत मिळण्याची खात्री नसते.

* * *

माले आणि स्थानिक लोक राहत असलेल्या अन्य सर्व बेटांवर मद्यपानास कडक बंदी आहे, तो मोठाच गुन्हा मानल्या जातो. सरकारने ही बंदी घालण्यामागे कारणही तसेच गंभीर आहे, ते असे :-

सत्तरीच्या दशकात श्रीलंकेतून येणाऱ्या बोटी आणि मजुरांनी मालदीवला हेरोइनची पहिली ओळख करून दिल्याचे म्हणतात. हा हा म्हणता हा विषवृक्ष तिथे फैलावला. त्याला कसलेही नियंत्रण उरले नाही आणि जवळपास ४० टक्के मालदीववासी तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले. यात तरुणींची संख्याही लक्षणीय होती. पुढे पुढे तर अगदी १२-१३ वर्षाची कोवळी मुले हेरोइनची विक्री आणि सेवन करतांना दिसू लागली. शिक्षण आणि समाजजागृतीचाही आनंदच होता, त्यामुळे बहुतांशी पालकांना ह्या व्यसनाच्या गंभीर परिणामाची पुरेशी जाणीव नव्हती. तिथले सरकार ह्या प्रकारच्या विरोधात होते खरे पण व्यसनाला आळा घालण्याचे सरकारचे प्रयत्न मात्र फारच तोकडे होते. समाजातील काही सजग घटकांनी प्रयत्न करावे तर त्यांची लुडबुड सरकार आणि देशातील शक्तिशाली इस्लामिक कट्टर गटाला पसंत नव्हती. मुख्य कारण म्हणजे असा काही प्रकार आपल्या देशात चालतो हे बाहेर जगाला कळले तर अब्रू जाईल आणि पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होईल ही भीती. त्यात देशाच्या कडक धार्मिक नियमाप्रमाणे १८ वर्षाखालील मुलामुलींना लैंगिक तसेच अंमली पदार्थांविषयीचे शिक्षण देणे वर्ज्य ! जगभरात सगळीकडे 'सरकारी' पद्धत जवळपास सारखीच असते. त्याप्रमाणे मालदीवमध्येही अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी 'व्यसनमुक्ती केंद्र' स्थापन झाले, एका निर्जन बेटावर. काही दिवस झाले की कोठल्याही 'आफ्टर केअर' शिवाय ह्या रोग्यांची रवानगी परत त्यांच्या घरी. शेकडो मित्र व्यसनाधीन असतांना हे उपचार घेऊन आलेले तरुण पुन्हा ड्रग्सना पुन्हा बळी पडणार नाहीत याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे तरुण आणि मुले अशी एक पूर्ण पिढी ह्या व्यसनामुळे वाया गेली.

ह्यातून सरकारने घेतलेला धडा म्हणजे सरसकट सर्व व्यसनांवर लावलेली बंदी. अंमली पदार्थ बाळगल्यास मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी शिक्षा आहे. मद्य बाळगल्यास २५ वर्षे पर्यंत कैद होऊ शकते. धुम्रपानावर कायद्याने बंदी नाही, पण ते करू नये म्हणून जनजागृती केली जाते. कडक कायद्यांमुळे व्यसनाधीनतेला आळा घालण्यात मालदीव बरेच यशस्वी ठरले आहे.

* * *

स्थानिक तरुणांमधे बाईक रेसिंग चे वेड प्रचंड आहे. माले शहराच्या प्रचंड गजबजाट असलेल्या रस्त्यांवर ते शक्यच नाही पण शहरात एक चौपाटीवजा जागेत एक छोटा रस्ता ह्यासाठी राखीव आहे. तेथे रोज काही तरुण बाईक स्टंट करत दुधाची तहान ताकावर भागवत असतात. धूम -१-२-३-४ सारखे भारतीय चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. भारतात होणाऱ्या बाईक आणि कार रेसच्या लेह सर्किट, हिमालय, बुद्ध सर्किट सारख्या आयोजनांचे जबरदस्त वेड आहे, त्यांचे पास मिळवण्यासाठी मला दरवर्षी ह्या तरुण मित्रांकडून आर्जवे असतात. फुटबॉलचे चाहते खूप आहेत. कागदाचे मोठे पतंग तयार करणे आणि उडवणे हा तर राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखा महत्वाचा खेळ :-)

* * *

प्रत्येक मालदीवकराचे एक टोपणनाव असतेच. म्हणून 'जॉनी' शाहिद, 'रिको' मूसा, 'इशू' सुलेमान, 'लैला' अथिया, 'मुधु' मोहम्मद, 'बोटमॅन' अली अशी मजेशीर नावे कानावर पडतात. दोस्तमंडळी, परिवार आणि समर्थक त्यांना त्या टोपणनावाने संबोधतात. उदा. भूतपूर्व राष्ट्रपती नाशीद त्यांच्या समर्थकांमध्ये 'अन्नी' ह्याच नावाने प्रसिद्ध आहेत.

* * *

मालदीवला अध्यक्षीय लोकशाही प्रणाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी जोडी निवडणूक लढते. जनता पक्षाला मत न देता व्यक्तीला देते आणि प्रत्यक्ष जनतेतून निवडलेली व्यक्ती अध्यक्ष होते. अध्यक्ष आपले मंत्रिमंडळ एकहाती निवडतात. राष्ट्राध्यक्ष किंवा मंत्री होण्यासाठी स्त्री/पुरुष असणे (तृतीयपंथींना बंदी आहे) आणि मालदीवचा सज्ञानवयीन नागरिक असणे पुरेसे आहे. ह्या सर्व मंत्रीगणांना मालदीवच्या लोकसभेची म्हणजे मजलिसची मान्यता मिळावी लागते. खासदार आणि मंत्री एकाचवेळी होता येत नाही. (आपल्याकडे भारतात मंत्री होण्यासाठी खासदार असणे अटळ आहे). मजलिस हे संसदेचे एकच सभागृह आहे - म्हणजे भारतासारखी राज्यसभा नाही, सर्व ७७ प्रतिनिधी जनतेतून थेट निवडून येतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि खासदारांचा कार्यकाळ ५ वर्षे. मंत्र्यांचा कार्याकल मात्र राष्ट्राध्यक्षांच्या मर्जीवर.

इंडियन हाधिया १ - मालदीवला भारताकडून मिळालेली भेट: मजलिसची इमारत. माले, मालदीव

इंडियन हाधिया २ - मालदीवला भारताकडून मिळालेली भेट: मजलिसची इमारत. माले, मालदीव

* * *

पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वेशभूषेत स्थानिक पारंपरिक 'लिबास'चा वापर जास्त दिसतो. गडद लाल कुर्त्यासारखे वस्त्र आणि कमरेखाली काळ्या / चंदेरी रंगाची लुंगी घातलेल्या आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया/मुली लग्न किंवा परंपरागत सणांच्यावेळी हमखास दिसतात.

लाल लिबास ल्यालेल्या लुब्धसुंदऱ्या - मालदीव

पुरुष सुद्धा चंदेरी पट्ट्यांची काळी लुंगी आणि वर पांढरा/काळा शर्ट अश्या वेशात असतात. अन्यवेळी मात्र बहुतेक स्त्रीपुरुष पाश्चात्य पद्धतीचे आधुनिक कपडे घातलेले दिसतात.


* * *

ईद आणि शबेबरात सारखे सण दणक्यात साजरे होतात. ख्रिसमस आणि ३१ डिसेम्बरला वर्षसमाप्तीचे उत्सवही जोरात असतात. स्थानिक भारतीय एकत्र येऊन होळी-दिवाळी मजेत साजरी करतात आणि त्या पार्ट्यांना आमंत्रण मिळावे म्हणून स्थानिकांमध्ये अहमहमिका असते. मूर्तीपूजेला मात्र बंदी आहे. देशात शिया मुस्लिम एकही नसल्यामुळे मोहरम - मार्सिया - ताजिया वगैरे नसते. निरीश्वरवादाचेही ह्या देशाला प्रचंड वावडे आहे.

* * *

‘समुद्राखालील’ असामान्य सुंदर जागांमुळे हौशी समुद्रखेळांसाठी दरवर्षी शेकडो पर्यटक मालदीवला भेट देतात. त्यासाठी थोडा सराव, थोडे धाडस लागते. मालदीवमध्ये सर्रास उपलब्ध असलेल्या 'ग्लास बॉटम बोट' मधून आपण सागरतळाशी असलेली अलौकिक सृष्टी बघू शकतो. त्याहीपेक्षा पाणबुडीच घेतली तर? सर्वसामान्य माणसांना पाणबुडीने प्रवासाची संधी कमी मिळते. मालदीवमध्ये मात्र तुम्हाला जर्मन बांधणीच्या प्रवासी पाणबुडीत सुमारे ३० मीटर पाण्याखाली जाऊन सागरतळाच्या निसर्गाचे अद्भुत रूप बघता येईल. हजारो विविधरंगी मासे, पाण्याखालची रंगीबेरंगी कोरल सृष्टी आणि शार्कसारखे जीव पाणबुडीच्या पारदर्शी भागातून बघता येतील. अद्भुतरम्य अनुभव असतो पण अर्थात प्रचंड महाग !

प्रवासी पाणबुडी - आतून. मालदीव.

* * *

गेली काही वर्षे इसिसच्या आणि अन्य जिहादी गटांच्या नादी लागून मालदीवमधून 'बेपत्ता' होणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. जगभरातील तुरुंग जिहादी संघटना आणि माफिया लोकांमध्ये नवीन भरतीसाठीच्या जागा म्हणून प्रसिद्ध आहेतच, मालदीव त्याला अपवाद नाही. अल-कायदा आणि अन्य जहाल संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेलेल्या तरुणांना वर्ष-दोनवर्ष शिक्षा होऊन ते मोकळे सुटल्याची अनेक उदाहरणे दिसतात. तुरुंगात करमणूक म्हणून फक्त धार्मिक साहित्य/टीव्ही कार्यक्रम असल्यामुळे जिहादी गटांचे काम आणखी सोपे होते.

* * *

मालदीवमधे बांगलादेशी कामगारांची संख्या डोळ्यात भरण्याजोगी आहे, सुमारे पन्नास हजार ! स्थानिक मंडळी ज्या कामाला नाक मुरडतात ती कामे करण्यासाठी ही बांगलादेशी कामगारांची फौज तेथे आहे. बहुतेक बांगलादेशीयांकडे कामाचा परवाना, ओळखपत्र वगैरे नाही. समानधर्मी असले तरी स्थानिकांमध्ये ह्या बांगलादेशी मंडळींच्या 'चुकीच्या' धर्माचरणाबद्दल, स्थानिक लोकांच्या नोकऱ्या पळवल्याबद्दल आणि एकूणच उथळ वागणुकीबद्दल कुजबुज असते. आपल्याला कधीही हाकलून लावले जाईल हे बांगलादेशी कामगारांना माहित आहे.

* * *

इझ्राएलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या मोजक्याच 'इस्लामिक' देशांमध्ये मालदीवचा समावेश होतो.

* * *

मालदीवचा आधिकारिक नकाशा तयार करण्याचे काम आणि जीपीएस यंत्रणेद्वारे मालदीवच्या सर्व बेटांचे मोजमाप भारतीय संस्थांनी केले आहे. मालदीवच्या GPS प्रणालीचे संचालन भारताकडून होते.

* * *

देशात तांदूळ कुठेही पिकत नसला तरी भात हे मालदीवच्या जनतेचे प्रमुख अन्न आहे. शतकानुशतके ते कायम आयात केले जात आहे. सकाळच्या न्याहरीसाठी स्थानिकांचा आवडीचा प्रकार म्हणजे मास हुनी आणि रोशी. वेगवेगळ्या प्रकारचे ताजे/सुके मासे आणि त्याचे कालवण, खारवलेले मांस, भाज्या, भात आणि रोशी असे जेवण असते. भजी, कोशिंबिरी असतातच. टुना आणि शार्क मासे मुबलक / विशेष प्रिय आहेत.

मालदीवकरांचे कलिंगड प्रेम हे अगदी जपान्यांना मात देईल असे आहे. जवळपास दररोज एकदातरी, अनेकदा न्याहारी, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण अश्या सर्व मेजवान्यांमध्ये कलिंगडाचा रस किंवा कलिंगड असतो.

जेवल्यानंतर सुपारी, लवंग आणि चुना लावलेले पान खाण्याची पद्धत आहे. पानाला ‘फोह’ म्हणतात आणि फोहला कोणी नाही म्हणत नाही. गुडगुडा म्हणजे हुक्का धूम्रपानासाठी प्रचलित आहे.

भारतीय पंजाबी पद्धतीच्या जेवणाचे चाहते भरपूर आहेत, हैदराबादी बिर्यानी आणि तंदुरी नान घरी करता येणं ही सुग्रणपणची सर्वमान्य सर्वोच्च पातळी आहे :-)

* * *

जुन्या हिंदी चित्रपटांचे चाहते सर्वत्र आहेत, लता आणि मुकेशची गाणी तोंडपाठ असलेले अनेकजण आहेत. बहुतेक सर्व प्रसिद्ध हिंदी फिल्मी गाण्यांचे धिवेही व्हर्जन ऐकायला मिळतेच. नव्या पिढीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ यांचे प्रचंड आकर्षण आहे.

* * *

माले हे राजधानीचे शहर सोडले तर इतर बेटांवर असलेली लोकं एकमेकांची नातेवाईक मंडळीच आहेत. पिढ्यानपिढ्या एकाच जागी राहिलेल्या लोकांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध आहेत. म्हणून एका घरचा पाहुणा सगळ्याच बेटवासियांचा पाहुणा असतो. पाहुण्यांचे स्वागत ताजे नारळपाणी देऊन आणि कलिंगड कापून करण्याची प्रथा आहे.

मालदीवच्या लोकप्रिय स्वागतिका - कलिंगडाच्या फोडी आणि नारळपाणी

* * *

मालदीवमध्ये प्राथमिक शाळेत 'कार्यानुभवाचा' तास म्हणजे पाण्यात खेळणे ! शाळेपासून समुद्र हमखास काही मीटरवर असतो. शिक्षक लहान मुलांना पोहणे, वेगवेगळे समुद्री जीवजंतू आणि मासे ओळखणे अश्या गोष्टी शिकवायला समुद्रात घेऊन जातात. मालदीवमध्ये राहून समुद्रात पोहता न येणे म्हणजे जस्ट नॉट अलाऊड :-)

एका शाळेतील लहानग्यांचा 'कार्यानुभवाचा' तास. लामू, मालदीव.

* * *

लेखमालेत अन्यत्र लिहिल्याप्रमाणे मालदीव हे ४ लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे एकधर्मीय, एकभाषक राष्ट्र आहे. शेकडो वर्षे जपलेला सांस्कृतिक एकजिनसीपणाही आहे. असे असतांना खरेतर जनतेत एकोपा आणि भातृभाव तीव्र असायला हवा. तसे दिसत नाही, हा छोटासा समाज अनेक शकलांमध्ये विभागलेला दिसतो. ज्या देशात सर्व लोकांचा धर्म, इतिहास, संस्कृती, भाषा एकच असेल त्या देशात सगळेकाही सुरळीत आणि सोपे होईल / होते असा बहुतेक लोकांचा समज असतो. तो खरा असेल तर अश्या 'यूनिकलर' देशांमध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने राहायला हवे. तसे खरंच आहे का असा प्रश्न मनात घेऊन आज जगाच्या नकाश्यावर एक नजर टाकली तर काय दिसेल? वस्तुस्थिती अनेकदा वेगळी दिसेल असे माझे मत, तुमचे मत काय ?

* * *

सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.

ह्या लेखमालेमुळे आपल्या दोन शेजारी देशांबद्दल थोडेफार सांगता आले आणि ते बऱ्याच वाचकांना आवडले ह्याचा आनंद वाटतो. सर्व मिपाकर वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.

समाप्त.

===============================================================================

* * *

लेखाच्या शीर्षकात, लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये वापरलेल्या सर्व धिवेही शब्दांचे अर्थ:

कानुहुरा = लाकूड
राधून = राजा
रुफिया = मालदीवचे चलन
कुरुंबा = नारळ
हायो धुआ = शुभेच्छा, तथास्तु
हाधिया = भेटवस्तू, नजराणा
सलाम = नमस्कार
मानीकुफानू = महोदय, सन्माननीय व्यक्ती
मिस्की = मस्जिद
रानींन / रातीन = राणी
आदीत्ता / आधित्ता = आदित्य, सूर्य
होमा = सोम, चंद्र
बुधू = बुद्ध
लोमाफानू = ताम्रपट्टिका
मास = महिना / महिने
अहारु = वर्ष / वर्षे
गारुनु = शतक / शतके
जाहिल = मूर्ख / अज्ञानी
जाहिलिया = अज्ञानाचा/ मूर्खपणाचा (धार्मिक अर्थ - इस्लामपूर्व काळ)
भास = भाषा
ओडी = होडी
रासगेफानू = राजपुरुष / राजा
महाराधून = महाराजा
राय = लाल
फेही = हिरवा
आधीतथा = रविवार
होमा = सोमवार
अंगारा = मंगळवार
बुधा = बुधवार
बुरासफथी = गुरुवार
हुकुरू = शुक्रवार
होनीहिरू = शनिवार
बिधेयसी = विदेशी
गौमी = राष्ट्रीय / कौमी
धुवस = दिवस
बोडा बेरू = मोठा ढोल
बेबे = मोठा भाऊ
कोक्को = लहान भाऊ
ईकुवेरीन = मित्र
रोशी = रोटी / चपाती
हुनी = कालवण

* * *
लेखमालेसाठी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी (अपूर्ण): -

• The Island States of the Indian Ocean: A View from the South Pacific – By R. V. Cole
• Maldives :- Government and Policies - By Mr. Verinder Grover
• The Maldives : Islamic Republic, Tropical Autocracy - By J. J. Robinson
• The Maldive Islanders: Culture of Ancient Ocean Kingdom – By Xavier Romero-Frias (English Edition)
• Operation Cactus - By Squadron Leader (Rtd) A. K. Chordia
• Operation Cactus: India’s 1988 intervention in the Maldives - By Mr. David Brewster
• Maldive Papers - By Mr. Satyabrata Pal, Member - NHRC
• India’s Relations With Her Neighbours – By Mr. Ramesh Trivedi
• Security and Security Building in the Indian Ocean – By Desmond Ball and Paul Dibb - Canberra Strategic and Defence Studies Centre Series
• The Maldives: Development and Socio-Economic Tensions - By South East Asian Economic Review- Various.
• The Maldives: An Introductory Economic Report 2010 - By World Bank
• India, Sri Lanka and the Tamil crisis 1976-1994: An International Perspective – By Alan J. Bullion
• The Maldives: The Politics of the Western Indian Ocean Islands - By Adney M. and W. K. Carr
• International Tourism and the Economic Importance of the Maldives - By J. L. Kaminarides and H. Hoogendonk
• The Republic of Maldives, 1980 – By H. A. Maniku
• A Guide to the Languages of Maldives – by Oxford University Press Ver 1.0
• The Maldive Islands; Monograph on the History, Archaeology and Epigraphy = By H. C. P. Bell (Edited Reprint by Council for Linguistic and Historical Research, Maldives)
• The Maldive Islanders: A Study of the Popular Culture of an Ancient Ocean Kingdom - By Xavier Romero-Frias (Reprint)
• Faiythoora monthly magazine and other papers published by the National Council for Linguistic and Historical Research, Male (Traslations, Multiple)

लेखहे ठिकाण

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 4:01 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

मालदीव मालिकेतला हा शेवटचा भाग कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 4:09 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

मालदीव मालिकेतला हा शेवटचा भाग कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

एस's picture

13 Feb 2018 - 5:00 pm | एस

देखणा समारोप.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2018 - 5:08 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्व लेख वाचले. लिखाण आणि मालदीव दोन्हीही ऊत्तम.

पद्मावति's picture

13 Feb 2018 - 7:50 pm | पद्मावति

अप्रतिम, खरोखर अप्रतिम!

राघवेंद्र's picture

13 Feb 2018 - 9:06 pm | राघवेंद्र

अनिंद्य भाऊ खूप धन्यवाद !!! लेखमाला खूपच मस्त झाली.
सबमरीन ने समुद्राची सहल करायची ठरवलेले आहे. बघू कधी जमेल ते.

http://www.whalesubmarine.com.mv

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 3:16 pm | अनिंद्य

@ राघवेंद्र,

नक्की कराच समुद्रतळाची यात्रा. आयुष्यभर सदैव आठवणीत राहील असा अनुभव आहे तो.

Actually आपल्याकडे अंदमान-निकोबार किंवा लक्षद्वीप बेटांवर पर्यटकांसाठी हे सहज करता येण्यासारखे आहे पण ... ... असो.

तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हायो धुआ _/\_ आणि प्रतिसादासाठी आभार.

अनिंद्य

उत्तम लेखमाला. सध्याच्या मालदीवच्या परिस्थितीबद्द्ल एखादा परिच्छेद आला असता तर बरे झाले असते. असो.

मालदीवच्या कस्टम्स नियमाप्रमाणे पूजा करण्यासाठी कोठल्याही मूर्ती किंवा तसबिरी देशात आणायला बंदी आहे.

असले नियम अजुनही बर्‍याच आखाती देशात आहेत. त्यामुळेच बर्‍याच वर्षापुर्वी आलेली आखाती नोकरीची संधी मी नाकारली. आता हळुहळु नियम शिथिल होताहेत हे ही खरे !

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 4:57 pm | अनिंद्य

@ धर्मराजमुटके

सद्य परिस्थितीबद्दल मागील भागात आणि प्रतिसादात लिहिलंय हो.
यावेळी तर मी थोडेफार "अफु आणि हेरॉईन" सुद्धा वापरले :-) :-)

आणि तसेही मालिकेत माहितीचा ओव्हरडोस होतोय असे जाणवले म्हणून संक्षिप्त केले.

आभार!
- अनिंद्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2018 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सखोल महितीने आणि सुंदर चित्रांनी भरलेली लेखमालिका ! पुढच्या मालिकेची प्रतिक्षा आहे.

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 5:24 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे ,

नेपाळ मालिकेप्रमाणेच तुम्ही मालदीवच्या लेखमालेलाही पहिल्या भागापासून सदैव दिलखुलास प्रोत्साहन दिले, संक्षिप्ताऐवजी अधिक लिहिण्याचे सुचवले. तुमच्यामुळे माझी फोटो टाकतांनाची एक चूक लक्षात आली आणि वेळीच दुरुस्ती करता आली. माहिती तपासून घेण्याच्या बहाण्याने मला मालेमधील जुन्या मित्रांशी संपर्क करून गप्पाटप्पा करण्याची संधी मिळाली.

तुमचे अनेक आभार !

- अनिंद्य

अभिजीत अवलिया's picture

14 Feb 2018 - 6:53 am | अभिजीत अवलिया

लेखमाला खूपच मस्त झाली. अनेक आभार.

diggi12's picture

14 Feb 2018 - 9:48 am | diggi12

उत्कृष्ठ मालदीव मधील सद्य परिस्थितिवर विवेचन केल्यास आवडेल

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:16 pm | अनिंद्य

@ diggi12,

सद्य स्थितीबद्दल मागील भागांमध्ये आणि प्रतिसादांमध्ये बऱ्यापैकी अपडेट आहे की.

कुमार१'s picture

14 Feb 2018 - 10:24 am | कुमार१

लेखमाला खूपच मस्त झाली.
धन्यवाद

डिटि इन्गोले's picture

14 Feb 2018 - 10:57 am | डिटि इन्गोले

मध्यम वर्गिय भारताच्या आजुबाजुला जाण्याची हि॑मत करतो, त्यामधे मालदिव हम्खास असते. अशा पर्यटका॑साठी तुमचे लेख अतिशय उपयोगाचे आहेत.

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 4:30 pm | अनिंद्य

@ डिटि इन्गोले,

मालदीव हळूहळू मध्यमवर्गाच्या आवाक्यात येते आहे, थोडा कमी खर्चिक 'गेस्टहाऊस टुरिझम' असा प्रकार निघाला आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे तेथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या अजूनही फारच कमी आहे.

मी जे लिहिले आहे त्यातील बहुतेक भाग हा पर्यटकांच्या अनुभवाबाहेरचा आहे.
पर्यटकांच्या मालदीवचे ब्रिदवाक्य म्हणजे 'नो न्यूज नो शूज' :-)

- अनिंद्य

अनिंद्य धन्यवाद. _/\_ खूप मस्त लेखमालिका. आणि सुंदर समारोप.
आता नेपाळ, मालदीव नंतर काय याची उत्सुकता लागलीय.
एक विनंती. पुढच्या लेखमालिकेला वेळ लागला तरी चालेल पण चालु झाल्यावर भाग १-२ आठवड्यांत येऊ द्या.

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:40 pm | अनिंद्य

@ शलभ,

पुढच्या देशाबद्दल आता थोड्या ब्रेक नंतर.

शेजाऱ्याचा डामाडुमा मालदीव मालिका संपली की माझा दीर्घ संपर्क आलेल्या कलकत्ता, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद ह्या शहरांविषयी लिहिण्याचे मनात आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी पैकी एक किंवा तीनही भाषेत. हजारों ख्वाहिशें ऐसी ................ :-) बघू कसे जमते ते.

तुम्ही न चुकता प्रतिक्रिया कळवता, आनंद वाटतो.

अनिंद्य

वरुण मोहिते's picture

14 Feb 2018 - 11:36 am | वरुण मोहिते

लेखमाला, आता पुढचा कुठला देश ह्याचा विचार करतोय. चालू राहूदे.

वरुण मोहिते's picture

14 Feb 2018 - 11:36 am | वरुण मोहिते

लेखमाला, आता पुढचा कुठला देश ह्याचा विचार करतोय. चालू राहूदे.

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:12 pm | अनिंद्य

@ वरुण मोहिते,
आभार.
पुढचा देश आता ब्रेक के बाद !

कुमार१'s picture

14 Feb 2018 - 11:45 am | कुमार१

. ज्या देशात सर्व लोकांचा धर्म, इतिहास, संस्कृती, भाषा एकच असेल त्या देशात सगळेकाही सुरळीत आणि सोपे होईल / होते असा बहुतेक लोकांचा समज असतो. >>>>
नाही, हा फार मोठा गैरसमज आहे !
कुठल्याही गटातटात फूट पाडणे हा मानवी स्वभाव आहे

रुपी's picture

14 Feb 2018 - 11:45 am | रुपी

सुरेख!
इतक्या सुंदर लेखमालेसाठी खूप धन्यवाद! आधी नेपाळ आणि आता मालदीव या दोन्हींबद्दल इतके अभ्यासपूर्ण लेखन करणे कौतुकास्पद आहे. शिवाय फोटो आणि तुमच्या लेखनशैलीमुळे हे सगळं वाचताना आणखीच रोचक वाटतं.

आता पुढच्या शेजारी देशाची वाट पाहणार :)

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:53 pm | अनिंद्य

@ रुपी,

उत्साहवर्धनासाठी अनेक आभार. _/\_

अनिंद्य

कुमार१'s picture

14 Feb 2018 - 11:46 am | कुमार१

. ज्या देशात सर्व लोकांचा धर्म, इतिहास, संस्कृती, भाषा एकच असेल त्या देशात सगळेकाही सुरळीत आणि सोपे होईल / होते असा बहुतेक लोकांचा समज असतो. >>>>
नाही, हा फार मोठा गैरसमज आहे !
कुठल्याही गटातटात फूट पाडणे हा मानवी स्वभाव आहे

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 10:06 pm | अनिंद्य

@ कुमार१

सहमती. सध्या जगभर गृहयुद्धासम / अस्थिर परिस्थिती असलेल्या एकूण ६० पैकी ५७ देश-प्रदेश हे असेच 'यूनिकलर' आहेत. हा योगायोग नक्कीच नसावा.

लेखमालेबद्दल तुमच्यासारख्या गुणग्राहक व्यक्तीकडून वेळोवेळी मिळालेली दाद माझ्यासाठी बहुमोल आहे, अनेक आभार!

अनिंद्य

कुमार१'s picture

14 Feb 2018 - 11:48 am | कुमार१

. ज्या देशात सर्व लोकांचा धर्म, इतिहास, संस्कृती, भाषा एकच असेल त्या देशात सगळेकाही सुरळीत आणि सोपे होईल / होते असा बहुतेक लोकांचा समज असतो. >>>>
नाही, हा फार मोठा गैरसमज आहे !
कुठल्याही गटातटात फूट पाडणे हा मानवी स्वभाव आहे

उपेक्षित's picture

14 Feb 2018 - 12:30 pm | उपेक्षित

खरच अप्रतिम झाली हि मालिका पण अजून १/२ भाग ताणता आली असती (समाधानी वृत्ती नाही बघा आमची :) )

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:49 pm | अनिंद्य

@ उपेक्षित,

आभार.

मालिका उगाच कशाला ताणायची ? सगळे भाग मिळून २५-३० हजार वाचने झाली असतांना जेमतेम २५ वाचकांनी मालिका चांगली / वाईट / कंटाळवाणी / बरी वगैरे सांगितले.
त्यावरून समारोप योग्यवेळीच झाला असे वाटते :-)

अनिंद्य

अतिशय उत्तम मालिका !!! देखणे फोटो आणि मस्त माहिती.
सगळे भाग मिळून २५-३० हजार वाचने झाली असतांना जेमतेम २५ वाचकांनी
मी २०१२-१३ पासून मिसळपाव ची सभासद आहे, पण कितीतरी वेळा वेग-वेगळ्या कांरणामुळे लॉगिन करायला जमतच नाही. पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कि सगळ्या २५-३० हजार वाचकांना लेख नक्कीच आवडला असेल पण वेळ नाही / लॉगिन आयडी - पासवर्ड विसरला / मराठी टाईप करता येत नाही / काय लिहायचं कळत नाही इ इ कारणामुळे प्रतिसाद देत नसतील. त्यामुळे प्लिज असे छान छान लेख लिहीत रहा, प्रतिसाद कमी म्हणून थांबू नका.

अनिंद्य's picture

28 Feb 2018 - 1:20 pm | अनिंद्य

@ वीणा३,

थँक्यू !

थोड्या विश्रांती नंतर पुढील देशाबाबत लिहीन.

अनिंद्य

समीर स. पावडे's picture

14 Feb 2018 - 5:51 pm | समीर स. पावडे

सर्व लेख वाचले, खूप आवडले. धन्यवाद.

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 2:41 pm | अनिंद्य

@ समीर स. पावडे,

तुमच्यासारख्या नवीन मिपाकरांचा प्रतिसाद माझ्यासाठी बहुमोल आहे.
अनेक आभार !

- अनिंद्य

समीर स. पावडे's picture

14 Feb 2018 - 5:55 pm | समीर स. पावडे

नवा मिपा सदस्य असल्यामुळे आधी तुमचे मालदीव वाचून काढले, आता नेपाळ ला सुरवात करतोय.

अनिंद्य's picture

16 Feb 2018 - 2:43 pm | अनिंद्य

जरूर.

निशाचर's picture

14 Feb 2018 - 7:33 pm | निशाचर

माहितीपूर्ण तरीही रंजक लेखमालेसाठी धन्यवाद! मालदीवच्या अनेक अनोळखी अंगांची या लेखमालेतून ओळख झाली.
आता पुढचा देश कोणता याची उत्सुकता आहे.

अप्रतिम लेखमाला, मालदिवच्या इतिहासापासून थेट सद्यःस्थितीपर्यंत मालदिवची समग्र अंगाने ओळख झाली. धन्यवाद ह्या लेखमालेबद्दल.

सुमीत भातखंडे's picture

15 Feb 2018 - 2:09 pm | सुमीत भातखंडे

मस्त झाली लेखमाला.
पुढचा देश लवकर हातात घ्या आता.

नि३सोलपुरकर's picture

15 Feb 2018 - 2:37 pm | नि३सोलपुरकर

अप्रतिम लेखमाला .
साहेब धन्यवाद __/\__. ...छान ओळख करून दिलीत .

पुलेशु .

बबन ताम्बे's picture

15 Feb 2018 - 4:40 pm | बबन ताम्बे

सुंदर ओळख करुन दिलीत मालदीवची.
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत .

अनन्त अवधुत's picture

17 Feb 2018 - 6:10 am | अनन्त अवधुत

इतर पूर्व भागांप्रमाणेच हा भाग पण छान झाला. नेपाळची मालिका आणि हि मालिका दोन्ही चांगल्या झाल्या आहेत. तुमची मेहनत लक्षात येते. सकस लेखन आणि सोबत फोटोज (मिपावर फोटो टाकणे हे एक फार मेहनतीचे काम आहे :) )
संदर्भ ग्रंथासाठी धन्यवाद.
नवीन मालिकेच्या प्रतीक्षेत....

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:02 pm | अनिंद्य

@ अनन्त अवधुत,

आभारी आहे.
फोटो डकवण्याबद्दल सहमत, जिकरीचेच काम आहे ते.

अनिंद्य's picture

17 Feb 2018 - 9:09 pm | अनिंद्य

@ एस
@ अमरेंद्र बाहुबली
@ पद्मावति
@ अभिजीत अवलिया
@ निशाचर
@ प्रचेतस
@ सुमीत भातखंडे
@ नि३सोलपुरकर
@ बबन ताम्बे

कौतुकाच्या शब्दांबद्दल आपणा सर्वांचे आभार. _/\_

अनिंद्य

पैसा's picture

28 Feb 2018 - 1:45 pm | पैसा

हीसुद्धा अप्रतिम मालिका झाली. मालदीवबद्दल बातम्या काळजी वाटण्याजोग्या येत आहेत.

आता पुढची मालिका कोणती आहे याबद्दल उत्सुकता!

अनिंद्य's picture

1 Mar 2018 - 10:59 am | अनिंद्य

@ पैसा,

_/\_

पुढचा देश बांगलादेश किंवा श्रीलंका.

पैसा's picture

1 Mar 2018 - 11:03 am | पैसा

तब्ब्येतीत लिहा. दोन्ही शेजारी अनेक कारणांनी जाम इंटरेस्टिंग आहेत.

अनिंद्य's picture

26 Mar 2018 - 2:35 pm | अनिंद्य

जरूर !

अनिंद्य's picture

28 Feb 2018 - 2:19 pm | अनिंद्य

समारोप

मालदीवमध्ये गेल्या काही महिन्यात घडणाऱ्या घटना फारश्या उत्साहवर्धक नाहीत. सध्या मालदीवमध्ये राजकीय आणीबाणी आहे आणि विपक्षातील नेत्यांना तुरुंग/विजनवास आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला आणि भारताच्या विनंतीला अजिबात भीक न घालता तेथील सरकारने आणीबाणीची मुदत पुन्हा एक महिन्यासाठी वाढवली आहे. सरकारच्या दोन महत्वपूर्ण मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या वर्षाअंती होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका सुयोग्य पद्धतीने पार पडण्याकरिता ही परिस्थिती योग्य दिसत नाही.

एकूणच २००८ पासून आजवर बहुपक्षीय लोकशाहीच्या प्रयोगात केलेली प्रगती पुसून पाटी पुन्हा कोरी होते की काय असे दिवस आहेत. अस्थिरता वाढली तर पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन देशाची अर्थव्यवस्था डचमळण्याचा धोका आहेच.

मालदीवमधील मानुकूधू बेटाजवळ ‘ओशन ऑबझर्वेशन सेंटर’ अश्या फसव्या गोंडस नावाखाली चीनच्या पाणबुड्यांसाठी एक तळ बांधला जाईल/जातोय अशी कुजबुज आहे. (दक्षिण चीन समुद्रात चीनचा असाच तळ गेली काही वर्षे मोठ्या आंतराष्ट्रीय वादाचा विषय आहे) काही बेटे सौदीला विकल्याचीही चर्चा आहे. भारतीय नौदलासोबत होणाऱ्या हिंद महासागरातील आठ देशांच्या संयुक्त कवायतीत सामील होण्यास मालदीवने नुकताच नकार कळवला आहे. ही लक्षणे भारतीय प्रभाव-वलय आटत असल्याची आहेत.

* * *

अनिंद्य's picture

28 Feb 2018 - 2:40 pm | अनिंद्य

मला ही लेखमाला लिहितांना सर्वात जास्त आनंद झाला तो फोटो डकवण्याचे तंत्र जमल्याचा. ह्या मालिकेत स्थानिक लोकांबरोबरच थोडे येणाऱ्या पर्यटकांबाबत, संपर्कात आलेल्या मालदीवकरांबद्दल लिहिले.

धर्मराजमुटके, पैसा आणि कपिलमुनी यांच्या प्रतिसादांमुळे मी स्थानिक राजकारण आणि वाढत्या धार्मिक कट्टरतेवरही लिहिले, तो माझ्या फारश्या आवडीचा प्रांत नसूनही :-)

आदूबाळ यांनी लक्षद्वीप-मालदीव साम्याबद्दल महत्वपूर्ण प्रतिक्रिया लिहिली, त्यामुळे त्याबद्दल विस्ताराने सांगितले.

अमितदादा आणि पैलवान यांचे प्रतिसाद तर अभ्यासपूर्ण असतातच. अमितदादा यांच्यामुळे FATA, चीन, भारतीय प्रभावक्षेत्राचा संकोच अश्या पैलूंवर चर्चा झाली.

रुपी, एस, पैसा आणि डॉ सुहास म्हात्रे यांनी जवळपास प्रत्येक भागावर प्रतिसाद देऊन उत्साह वाढवला. सुखी यांनी मालदीवमधील बेटांमध्ये वाहतूक कशी होते याबद्दल औसुक्य दाखवले तर राघवेंद्र आणि स्मिता. यांनी मालदीवला भेट देण्याचे त्यांचे स्वप्न बोलून दाखवले.

डिटि इन्गोले, समीर स. पावडे या अगदी नव्या मिपाकरांनी मालिका वाचून प्रतिक्रिया दिल्या, त्याचा आनंद वाटला. अनन्त अवधुत यांनी तर भाग टाकायला उशीर झाल्याबद्दल प्रेमळ दटावणी सुद्धा केली.

सांरा यांनी मालदीवच्या ऑपरेशन कॅक्टसबद्दलच्या भागात 'लाल डोरा' बद्दल प्रतिसाद टाकून मला मॉरिशस आणि सेशेल्स च्या इतिहासात फिरवून आणले. त्यांच्यामुळे भारतीय नौदलाबद्दल बरीच माहिती मला नव्याने कळली आणि असलेल्या माहितीची उजळणी झाली.

पहाटवारा यांनी आपल्या देशातील पाठ्यपुस्तकात शेजारी देशांबद्दल सोप्या भाषेत लिहिलेले धडे हवेत, तोंडओळख तरी व्हावी असे सुचवले. ते पटले. खरे तर आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शेजाऱ्यांबद्दल ठो माहित नसतांना त्यांना अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिकाचा अभ्यास करायला लावणे म्हणजे घरी रांधल्या जाणाऱ्या पिठल्याची कृती जेमतेम माहित असलेल्या लोकांनी फ्रेंच उमरावांच्या घरी होणाऱ्या Boudin Noir Aux Pommes किंवा Lamprey à la Bordelaise सारख्या किचकट रेसेपीबद्दल चर्चा करण्या सारखे आहे. :-)

अभिजीत अवलिया यांना 'आय फॉर डिटेल' उत्तम असल्यामुळे सनावळींमधली माझी चूक त्यांनी लक्षात आणून दिली. अरविंद कोल्हटकरांसारख्या व्यासंगी वाचकांची पायधूळ माझ्या धाग्यावर झडली. राही, सुखीमाणूस,पद्मावति आणि स्मिता. यांनी या मालिकेमुळे माझे आधीचे लेखन वाचले आणि आवडल्याची पावती दिली.

एस, पैसा, डॉ सुहास म्हात्रे आणि नीलकांत यांनी संपादनासाठी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ आहे. कुमार१ यांच्यामुळे ही लेखमाला अन्यत्र प्रकाशित केली, त्यांचे प्रोत्साहन सदैव मिळाले.

एकूणच ह्या मालिकेत वाचकांचा सहभाग नेपाळपेक्षा अधिक होता त्यामुळे मला फार आनंद झाला. पुढील देश मनाशी ठरला की लिहीनच पण तत्पूर्वी थोडी लेखन-विश्रांती घेत आहे.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे, व्यक्तिगत संदेशातून प्रोत्साहन देणाऱ्यांचे आणि मूक वाचकांचे पुनःश्च आभार.

मिपाकरांचा लोभ आहेच, असाच कायम असू द्यावा,

अनिंद्य

स्मिता.'s picture

1 Mar 2018 - 2:37 am | स्मिता.

एका अत्यंत सुंदर लेखमालेचा समारोप बघून थोडं वाईटच वाटलं. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत!

अनिंद्य's picture

1 Mar 2018 - 10:55 am | अनिंद्य

@ स्मिता.,
आभार !
पुढचा शेजारी देश आता ब्रेक के बाद :-)
बांगलादेश किंवा श्रीलंका.

विचित्रा's picture

2 Apr 2018 - 3:21 pm | विचित्रा

नेहमीप्रमाणेच. आता पुढच्या देशाच्या प्रतीक्षेत.

अनिंद्य's picture

2 Apr 2018 - 4:23 pm | अनिंद्य

@ विचित्रा,

आभार !

मी सध्या 'विश्राम' मोडमध्ये आहे, मिपा पण बरेच दिवस विश्रांती घेतंय : -)

अतिशय संदर्भसंपृक्त तरीही रसाळ शैलीत लिहिलेली मालिका. आवडली.
लवकरच नव्या शेजार्‍याविषयी लिहा. पुभाप्र.

अनिंद्य's picture

12 Apr 2018 - 11:18 am | अनिंद्य

@ पुंबा,

आभारी आहे.

तुमचा 'संदर्भसंपृक्त' शब्द विशेष आवडला.

सध्या दुसऱ्या लेखनात व्यस्त असल्याने शेजाऱ्याचा डामाडुमा थोडा बाजूला ठेवला आहे, थोड्या विश्रांती नंतर पुढच्या शेजारी देशाबद्दल लिहीन.

अनिंद्य

अनिंद्य's picture

12 Apr 2018 - 11:18 am | अनिंद्य

BTW तुमचे सदस्यनाम आधी 'सौरा' होते काय ?

पुंबा's picture

12 Apr 2018 - 1:19 pm | पुंबा

होय.. :)

अनिंद्य's picture

12 Apr 2018 - 2:26 pm | अनिंद्य

जय हो !