ती मला आवडते

Primary tabs

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
11 Aug 2017 - 2:56 pm

ती मला आवडते

जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा किरकोळ गोष्टीला
खट्याळपणे Oh My God म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते

माझ्या टोमण्यांवर
गुद्द्यांचा प्रसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते

मी टकाटक आवरून बाहेर जाताना
हूं... करून नाक मुरडते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा माझा पचका होतो
तिला कशी जिरली एकाची
असा लहान मुलासारखा आनंद होतो
तेव्हा ती मला खूप आवडते

कधी कधी माझ्या रागवण्यावर
भोळा भाबडा चेहरा करते
तेव्हा ती मला खूप आवडते

खाण्या पिण्याचे पदार्थ
चाखून ऊष्टे करून देते
तेव्हा ती मला खूप आवडते

अपरात्री कामावरून आल्यावर, माझ्या चाहूलीवर
अर्धवट झोपेत, ओठांचा चंबू करून प्रतिसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते

नवरा बायकोनं एकाच पांघरूणात झोपायचे
असं जेव्हा म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताशृंगारहास्यकविताचारोळ्याप्रेमकाव्यविनोद

प्रतिक्रिया

एस's picture

12 Aug 2017 - 11:53 am | एस

कविता आवडली हो! :-)

निओ's picture

12 Aug 2017 - 1:56 pm | निओ

धन्यवाद ! :-)