प्रिय श्री स्वधर्म

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
5 Aug 2017 - 12:27 pm

प्रिय श्री. स्वधर्म
श्री. स्वधर्म, असे पहा, त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. स्मृति त्यात बदल करण्यासाठी लिहलेल्या नाहीत. राजा असावा का नसावा, त्या ऐवजी लोकशाही असावी का ? हा स्मृतींचा विषयच नाही. राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच. तर यां संस्थांमधील घटकांचे एकमेकाशी संबंध कसे असावेत हे "नियम" सांगणे हे स्मृतींचे काम. आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना". आता आपण हे मान्य कराल की " घटना लिहणारा माणुस कितीही विद्वान असला वा त्याच्या बरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील जाणकारांची टीम असली तरी तो सर्वांना मान्य असलेली व भविष्यातही सर्वांना मान्य होईलच अशी "अपरिवर्तनशील" घटना लिहू शकेल का ?" याचे उत्तर "नाही"
आजचे उदाहरण घ्या. डॉ, अंबेडकर यांनी घटना लिहली. जुन्या काळाप्रमाणे म्हणावयाचे तर हे झाली "बाबासाहेबस्मृति". आपण पन्नास वर्षात त्यात तीनशे बदल केले. आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ?
म्हणून तुम्ही "त्यांनी लिहलेली घटना "जाळून" टाका " असे म्हणता का ?
जगातील प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो; नव्हे, तो झालाच पाहिजे. डबक्यातील स्थिर पाणी म्हणजे रोग पसरविण्याची शक्यता तर खळाळणारे पाणी म्हणजे प्रत्यक्ष जीवन. तर ह्या डबक्यातील पाण्याला वाट काढून देणे हे महत्वाचे. त्यात दगड टाकणे नव्हे.
आपण विचारले म्हणून माझी भुमिका परत एकदा. जे ग्रंथ आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचणे शक्य नाही, अश्या ग्रंथांचा परिचय थोडक्यात करून देणे. मनुस्मृतीचे २६८४ श्लोक तुम्ही वाचणार आहात का ? शक्य नसेल तर तुमच्याकरिता हे थोडे परिश्रम. श्री. प्रचेतस यांनी मनुस्मृति वाचली त्यांच्याकरिता हे नव्हे. मी मनुवादी आहे का ? हे सर्वस्वी असंबंचित. "न स्त्री स्वातंत्र्य.." या संदर्भात द्रौपदीची गोष्ट केवळ मनुस्मृति व महाभारत या ग्रंथातील सामाजिक स्थिती दाखविण्याकरिता.
आपण केवळ टीका करावयाच्या ऐवजी भुमिका विचारण्याची आपुलकी दाखवलीत म्हणून हा पंक्तिप्रपंच
आ.न.
शरद . .

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

5 Aug 2017 - 1:25 pm | जेम्स वांड

शरदजी,

विषय संबंधी एक प्रश्न,

तिच्याकाळी (म्हणजे ती तुम्ही म्हणता तशी तात्कालीन समाजमनाला संयुक्तिक होती तेव्हा) मनुस्मृती पूर्ण 'इम्प्लिमेंट' झाली होती का समाजात ? तुम्ही स्मृतीवर लिहिलेत ते ठीक आहे अन तुम्हाला कुठल्या श्लोकांचा परामर्ष घ्यावा वाटला हे लेखक म्हणून तुमचे स्वातंत्र्य होय. मी त्यावर साधक बाधक बोलून तुमच्या अभिव्यक्ती आड येऊ इच्छित नाही. तरीही काही शंका आहेत ज्यांच्यावर भद्र लोकांप्रमाणे आपण बोलू शकू असा विश्वास आहे, तेव्हा जर वरच्या प्रश्नाला उत्तर दिलेत तर मला काही खुलासे होऊन अजून काही मुद्दे मांडायचे की नाही ते ठरवता येईल, धन्यवाद.

शरद's picture

5 Aug 2017 - 4:13 pm | शरद

तेव्हा मनुस्मृती पूर्ण 'इम्प्लिमेंट' झाली होती का समाजात ?
याचे उत्तर देणे अशक्य आहे कारण त्या काळी यावर काही लिहून ठेवावे हेच कोणाच्याही मनातही आले असणार नाही." समाजाचा इतिहास लिहून ठेवला " असे इथेच काय पण जगात कोठेही घडले नसावे. तरीही तुमच्या प्रश्नाचे दोन भाग करून त्यावर (मला असलेली) माहिती बघू. (इम्प्लिमेंट' चा मला लागलेला अर्थ गृहीत धरून )
(१) समाज "मनुस्मृतीला (आणि फक्त तीलाच) मानत होता का ?
नाही. कारण त्या वेळीही इतर स्मृति होत्याच.
(२) सगळा समाज या स्मृति प्रमाणे वागत होता का ?
नाही. व्यभिचार, चोर्‍या असणारच. म्हणून तर लगेच प्रायश्चित्त (दंड) सांगावे लागले.

जेम्स वांड's picture

8 Aug 2017 - 10:05 am | जेम्स वांड

उत्तर क्रमांक एक संबंधित

जर त्यावेळी मनुस्मृती एकमेवाद्वितीय नव्हती, अन तिचे पूर्ण इम्प्लेमेन्टेशन सुद्धा झालेलं नव्हतं, ह्याचा अर्थ तत्कालीन काळात पण मनुस्मृती इररेग्युलर/इनकंसिस्टंट होती असा काढता येईल का? काढला तर चूक असेल का? जे पुस्तक/संहिता त्याच्याकाळीच फक्त एक 'ऑप्शन' होते ते आजच्याकाळात जाळले काय अन फाडले काय , फरक काय पडणार आहे? इतर स्मृती सोडून एकट्या मनुस्मृतीचे इतके एक्सप्लॅनेशन द्यायची काय गरज पडत असावी? किंवा तिचाच उहापोह करायची काय गरज असावी?

बाकी मनुस्मृती बदललेली नाही, अन घटना परिवर्तनीय आहे ह्यावरून दोन्ही पुस्तकांत तुलना होऊ शकत नाही हे आत्तापर्यंत स्पष्ट झाले असेलच नाही का?

जर त्यावेळी मनुस्मृती एकमेवाद्वितीय नव्हती, अन तिचे पूर्ण इम्प्लेमेन्टेशन सुद्धा झालेलं नव्हतं, ह्याचा अर्थ तत्कालीन काळात पण मनुस्मृती इररेग्युलर/इनकंसिस्टंट होती असा काढता येईल का? काढला तर चूक असेल का?
बहुदा माझ्या इन्ग्रजीच्या (अज्ञानाचा) कमी जाणिवेचा परिणाम असावा पण एखादी गोष्ट अद्वितीय नसेल तर ती इररेग्युलर/इनकंसिस्टंट आहे असे म्हणता येईल का ? इतर स्मृति अस्तित्वात असल्या तरी कोणतीही मनुस्मृति इतकी समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करणारी नव्हती. उदा. आपस्तंबस्मृचा प्रमुख विषय प्रायश्चितविशी हा आहे तर गौतमस्मृतिला त्रेतायुगाचे धर्मशास्त्र म्हटले आहे. तर अशा इतर स्मृति आहेत म्हणून मनुस्मृति इनकंसिस्टंट ठरत नाही.
आता इम्प्लेमेन्टेशन . अस बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे सांगितले गेले तेव्हा समाजाने ते तात्काळ स्विकारले नाही. म्हणून ते इररेग्युलर/इनकंसिस्टंट होते का ?
इतर स्मृति व मनुस्मृति यात फरक एवढाच की इतर स्मृति ह्या फक्त धर्म/कर्मकाण्ड या संबंधित असल्याने त्यांचा समाजाच्या रोजच्या वागण्यावर परिणाम पडत नव्हता. रोजच्या जीवनावर आपली गडद छाया पाडणारी मनुस्मृतीच; म्हणून तिचा उहापोह होतो.
पुढील भाग तुमचे मत/विचार आहेत, त्यावर मी काय लिहावे ?

माहितगार's picture

9 Aug 2017 - 10:28 am | माहितगार

इतर स्मृति व मनुस्मृति यात फरक एवढाच की इतर स्मृति ह्या फक्त धर्म/कर्मकाण्ड या संबंधित असल्याने त्यांचा समाजाच्या रोजच्या वागण्यावर परिणाम पडत नव्हता. रोजच्या जीवनावर आपली गडद छाया पाडणारी मनुस्मृतीच; म्हणून तिचा उहापोह होतो.

जेम्स वांड यांचे प्रश्न शरदसरांनी कितपत निटसे लक्षात घेतले आहेत या बद्दल साशंकता वाटते. इंग्रजी विकिपीडियावरील Authenticity and inconsistencies in various manuscripts हा विभाग अभ्यासला असता जेम्स वांड प्रयत्न करत असलेल्या पद्धतीच्या धर्तीवर इतर अभ्यासकांनी मांडणी करण्याचे प्रयत्न केले असावेत असे दिसते.

ईंग्रजी विकिपीडिया लेखातील Significance and role in history या विभागात मनुस्मृतीच्या रोल/प्रभावा बाबत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या साशंकताही दखल घेण्या जोग्या असाव्यात असे वाटते.

तसे वाटण्या मागे मनुस्मृती चे स्वरुप बायबल कुराणा प्रमाणे एकमेवाद्वितीय नसावे तसेच प्रचारकांचे अथवा पारायण ग्रंथजन्य सांप्रदायिक बळ नसावे, सर्वसामान्य बहुजन माणसाच्या हातात मनुस्मृती देऊन त्या प्रमाणे वागण्यास सांगितले जात असावे असे वाटत नाही. पुराण आणि प्रवचन कारांनी मनुस्मृती वाचलेली असल्याने त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनात प्रवचनात आणि मार्गदर्शनात पडणे संभव आहे पण असा प्रभाव मुख्यत्वे अप्रत्यक्ष प्रभाव ठरतो. ११ व्या शतकानंतर रामायण महाभारत आणि गीतेचे जेवढे मराठी अनुवाद आणि टिका झाल्या तेवढ्या मनुस्मृतीबद्दल त्या आधी अथवा त्या नंतर झाल्या असतील का याची शंका वाटते.

उलटपक्षी गुरुचरित्राशी तुलना करा, त्याला सांरदायि पारायण ग्रंथाचे रूप प्राप्त झालेले आणि पंथाचा आणि त्या पोथीचा महाराष्ट्रात प्रभाव दिसतो, मूळ गुरुचरित्र श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथम्हणून मर्यादीत असावयास हवे होते, मी मूळातून पराशर स्मृती पूर्ण वाचलेली नाही पण थोडी फार तूलना केली असता ग्रुरुचरित्रात पराशर स्मृतीतून काही भाग उचलले गेले आहेत का अशी प्रथम दर्शनी साशंकता वाटली. वसिष्ठांचे नातू पराशर आपल्या वडिलांच्या हत्येमुळे परशुरामाप्रमाणेच वसिष्ठांनी समजूत घालेपर्यंत प्रतिशोधाने पछाडले असल्याची आणि त्या दरम्यान त्यांनी विरोधकांच्या विरुद्ध भारत भ्रमंती केल्याची कथा कुठेशी वाचल्याची आठवते.

विषमतेच्या समर्थनाचा भाग सोडला तर दत्त संप्रदायातील काही गुणांबद्दल आदरही वाटतो. काही अभ्यासकाम्च्या मतानुसार अस्पृश्यतेचा दाह महाराष्ट्र आणि दक्षीण भारतापेक्षा उत्तरेत तौलनिक दृष्ट्या कमी असावा. या मागे संप्रदायी पारायण ग्रंथाचा प्रभाव राहीला असू शकेल का अशी शंका कधी कधी वाटते.

माहितगार's picture

9 Aug 2017 - 11:07 am | माहितगार

दत्त संप्रदायाचा बहुजनातील प्रसार तसा नोंद घेण्यासारखा आहे. कदाचित मागिल शतकातील समाजसुधारणा चळव्ळींचा परिणाम असेल पण ग्रांथिक विषमतेचा किमान सद्यकालिन दत्तसंप्रदायी पिढीवर तेवढा परिणाम दिसत नाही याची सुद्धा नोंद करणे गरजेचे वाटते.

माहितगार's picture

9 Aug 2017 - 11:12 am | माहितगार

आणि कदाचित बहुजन समाजच आश्रयदाता असल्यामुळे ग्रंथात लिहिले असेल ते असेल पण मनुस्मृतीचे समर्थक आधून मधून दिसतात तसे गुरुचरित्रातील विषमतेचे उघड समर्थक किमान नवीन पिढ्यांमध्येतरी फारसे दिसत नाहीत

जर त्यावेळी मनुस्मृती एकमेवाद्वितीय नव्हती, अन तिचे पूर्ण इम्प्लेमेन्टेशन सुद्धा झालेलं नव्हतं, ह्याचा अर्थ तत्कालीन काळात पण मनुस्मृती इररेग्युलर/इनकंसिस्टंट होती असा काढता येईल का? काढला तर चूक असेल का?
बहुदा माझ्या इन्ग्रजीच्या (अज्ञानाचा) कमी जाणिवेचा परिणाम असावा पण एखादी गोष्ट अद्वितीय नसेल तर ती इररेग्युलर/इनकंसिस्टंट आहे असे म्हणता येईल का ? इतर स्मृति अस्तित्वात असल्या तरी कोणतीही मनुस्मृति इतकी समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करणारी नव्हती. उदा. आपस्तंबस्मृचा प्रमुख विषय प्रायश्चितविशी हा आहे तर गौतमस्मृतिला त्रेतायुगाचे धर्मशास्त्र म्हटले आहे. तर अशा इतर स्मृति आहेत म्हणून मनुस्मृति इनकंसिस्टंट ठरत नाही.
आता इम्प्लेमेन्टेशन . अस बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे सांगितले गेले तेव्हा समाजाने ते तात्काळ स्विकारले नाही. म्हणून ते इररेग्युलर/इनकंसिस्टंट होते का ?
इतर स्मृति व मनुस्मृति यात फरक एवढाच की इतर स्मृति ह्या फक्त धर्म/कर्मकाण्ड या संबंधित असल्याने त्यांचा समाजाच्या रोजच्या वागण्यावर परिणाम पडत नव्हता. रोजच्या जीवनावर आपली गडद छाया पाडणारी मनुस्मृतीच; म्हणून तिचा उहापोह होतो.
पुढील भाग तुमचे मत/विचार आहेत, त्यावर मी काय लिहावे ?

अत्रे's picture

5 Aug 2017 - 2:14 pm | अत्रे

पाव
स्वगृह
साहित्य प्रकार
नवे लेखन
नवे प्रतिसाद
मिपा पुस्तकं
मिपा विशेषांक
घोषणा
मदत पान
प्रिय श्री स्वधर्म
Primary tabs
बघा(active tab)
What links here
शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
5 Aug 2017 - 12:27 pm
प्रिय श्री. स्वधर्म
श्री. स्वधर्म, असे पहा, त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. स्मृति त्यात बदल करण्यासाठी लिहलेल्या नाहीत. राजा असावा का नसावा, त्या ऐवजी लोकशाही असावी का ? हा स्मृतींचा विषयच नाही. राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच. तर यां संस्थांमधील घटकांचे एकमेकाशी संबंध कसे असावेत हे "नियम" सांगणे हे स्मृतींचे काम. आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना". आता आपण हे मान्य कराल की " घटना लिहणारा माणुस कितीही विद्वान असला वा त्याच्या बरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील जाणकारांची टीम असली तरी तो सर्वांना मान्य असलेली व भविष्यातही सर्वांना मान्य होईलच अशी "अपरिवर्तनशील" घटना लिहू शकेल का ?" याचे उत्तर "नाही"

कदाचित थोडे अवांतर - स्वतन्त्र भारताच्या घटनेत बदल करण्याचे नियम घटनेतच दिलेले आहेत. म्हणून कदाचित घटनेत बदल करणे हे सोडून घटना कोणी जाळत नाही. (काही अज्ञानी लोक बाबासाहेबांची घटना आम्ही बदलू देणार नाही असे बरळत असतातच :) )

गेल्या सत्तर वर्षात अनेक बदल आपल्या घटनेत झाले. प्राचीन मनुस्मृतीत एवढ्या कालावधीत किती बदल झाले असावेत..?

जेम्स वांड's picture

5 Aug 2017 - 3:44 pm | जेम्स वांड

नेमका माझा मुद्दा पकडलात की हो,

सेम प्रश्न माझा आहे, फक्त शरदजींच्या प्रतिसादा करता थांबून बसलो होतो. मनुस्मृती मध्ये 'अमेन्डमेंट' संबंधी काही सोयी आहेत का? नसल्यास ते जाळले त्यात चूक काय? अन जिथे दुरुस्ती होऊ शकते अश्या घटनेसोबत त्याची तुलना अव्यवहार्य नाही का म्हणता येणार? दुरुस्ती उपलब्ध असल्यास त्याचे संदर्भ कृपया द्यावेत.

शरद's picture

5 Aug 2017 - 4:42 pm | शरद

आपल्या समोर आज जी मनुस्मृति आहे ती ओरिजिनल नाही. तीवर अनेक संस्करणे झाली आहेत. अर्थात याला सत्तर वर्षे नव्हेत तर अनेक शतके लागली. परंतु इ.स. दुसरे शतक या नंतर बदल झनंतला नाही.

शरद's picture

5 Aug 2017 - 4:44 pm | शरद

कृपया बदल झालेला नाही असे वाचावे.

प्रतापराव's picture

5 Aug 2017 - 8:23 pm | प्रतापराव

बदल झाले म्हणजे काय सुधारणा करण्यात आल्यात?

मनुस्मृति आणि कुरान याम्च्यात कोणतेही बदल करता येत नाहीत

आपण केवळ टीका करावयाच्या ऐवजी भुमिका विचारण्याची आपुलकी दाखवलीत म्हणून हा पंक्तिप्रपंच

:)

अापणांस मुळात वर्ण व्यवस्था मान्य असल्यासारखे पहिल्या वाक्यावरून वाटते. अापण अापली भूमिका स्पष्ट करू शकाल काय?

वर्ण व्यवस्था मान्य आहे किंवा नाही ? या संबंधाने मनुस्मृती धागा लेखकाच्या व्यक्तिगत भूमिकेचे स्पष्टीकरण स्वधर्म यांना त्यांच्या या प्रतिसादातून हवे असावे. भात शिजला आहे किंवा नाही ? या क्लोज एंडेड स्पेसिफीक प्रश्न , आदरणीय धागा लेखक मित्र वेगळा विशेष धागा काढूनही अनुत्तरीत ठेऊ इच्छितात.

स्वधर्म यांच्या प्रतिसादात मनुवादी हा शब्द धागा लेखकासाठी वापरलेला दिसत नाही पण 'मनुवादी' असण्या बाबतच्या इतर टिकात्मक प्रतिसादाला मात्र धागा लेखक "मी मनुवादी आहे का ? हे सर्वस्वी असंबंचित" (असंबंधित ?) असे म्हणताना दिसताहेत.

आणि व्यक्तिगत टिकेस तर उत्तर द्यायचे पण वैचारीक टिके पेक्षा आपुलकीस अधिक महत्व असावे. असो भूमिका ज्यांची त्यांची.

माहितगार's picture

6 Aug 2017 - 9:35 pm | माहितगार

स्वधर्म यांच्या मूळ प्रतिसादाचा दुवा या लेखात आणि चर्चेत अद्याप आला नाही तो दुवा संदर्भासाठी

माहितगार's picture

7 Aug 2017 - 8:41 am | माहितगार

निसटत्या बाजू १, निसटत्या बाजू २

वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. असे संस्कृत सुभाषित आहे त्यावर धागा लेखकाचा विश्वास किती आहे माहित नाही पण ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा निसटत्या बाजू मांडण्याचा पंक्ती प्रपंच.

त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती

इथे धागा लेखक वेगळा मुद्दा मांडताहेत का की; वर्ण व्यवस्था समाजाचे स्तरीकरण म्हणून आपसूक निर्माण झाली, वर्ण व्यवस्थेच्या निर्मितीत ग्रंथ जबाबदार नाहीत; अशी काहीशी भूमिका धागा लेखकाची असल्यास वर्ण व्यवस्था ग्रंथ निर्मित नव्हती पण सदरहू ग्रंथांनी समाजातील चांगल्या वाईट प्रथांना आधी लिहून काढले मग आपले नियम लादले. असा काहीसा अर्थ ध्वनित होतो.

वर्ण व्यवस्था ग्रंथांनी निर्मित केली नाही ती आपसूक तयार झाली असे असू शकते (संदर्भ आफ्रीकेतील सामाजिक स्तरीकरण), पण एखाद्या समुह गटात आपसूक झालेले सामाजिक स्तरीकरण ग्रंथ आणि त्याच्या प्रचाराचे पाठबळ नसेल तर लहान समुह आणि भौगोलीक प्रदेशा पुरते मर्यादीत रहाते.

प्रंथांचे ग्रंथीकरण त्यात विषमतेचे समर्थन करणारे नियम जोडणे आणि ग्रंथ प्रामाण्याचा आग्रह आणि प्रचार, विषमतेच्या झालेल्या प्रचारात संबंढीत ग्रंथांची आणि त्यातील विषमतेचे समर्थन करणार्‍यांची जबाबदारी वाढवतो, कमी करत नाही. अगदी त्यातील उदात्त बाजू दाखवत संकुचीत बाजूचा निषेध टाळत टाकलेली पांघरुणे विषमतेचा निषेध टाळला गेला हि वस्तुस्थिती झाकू शकत नाहीत.

निषेध टाळण्या मागे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा रेट्यातून येणारी निषेध करु इच्छिणार्‍याची हतबलता समजता येते पण...

उदात्त विचार हे कालातीत असतात ते दाखवायाचे आणि संकुचित विचार त्या काळासाठी योग्य होते म्हणावयाचे हा दुटप्पीपणा आहे. उदात्त विचाराच्या समोर संकुचित विचार सर्व काळात संकुचितच रहातो किंवा कसे ? एखाद्या विचारसूत्रातील तार्कीक उणिवा काढल्या नाहीततर तो खरा वाटत रहाण्याची शक्यता असते.

"आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना" " हे वाक्य बर्‍याच अंगांनी तपासण्याची गरज असावी नाहीतर ते काहींना खरे वाटू शकते. स्मृतींचा प्रभाव जुन्या काळातील समाजात निर्माण झाला असला तरी त्या प्रभावास मर्यादाही असाव्यात. कागदपूर्व काळात ग्रंथांच्या प्रतींची संख्या कमी रहात असावी घोकंपट्टने स्मरण करणे हा मार्ग होता घोकंपट्टी करणार्‍या प्रत्येकाला आपण काय घोकतो आहोत त्याचा अर्थ समजतच असे नव्हे. त्याशिवाय सावरकरांनी म्हटल्या प्रमाणे भारतीय धर्मग्रंथ अनेक होते त्यात विरोधाभासही खूप सगळे होते. आणि विरोधाभास प्रभाव कमी करणारे असतात हे ओघाने येते. हे ग्रंथ प्रत्येक व्यक्तीस वाचणे बंधन कारक असणे दूर बहुजनांना ते अनुपलब्ध असावेत अशीच व्यवस्था भारताता झाली होती. त्यातील नियमांना राजसत्तांचा सर्वकालीक आश्रय कितपत सर्वकालिक होता हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा. सगळी मदार अंधश्रद्धांचे गुलाम झालेल्या परंपरा आणि व्यक्ति अथवा कुटूंब परत्वे गुरुजनांचे आधून मधून होणारे मार्गदर्शन, पुराण आणि किर्तन करणार्‍या पौराणीक आणि किर्तनकार यांच्या तर्फे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारा प्रचार विवीध ग्रंथातले त्यांना जेवढे हाती लागले समजले आणि समजवावे वाटले यावर असत. प्रसंग परत्वे अपवादात्मक वाद वरीष्ठ धर्ममार्तंडांपर्यंत पोहोचत असावेत. ब्रिटीशोत्तर काळात मनुस्मृतीची जेवढी माहिती आणि प्रभाचा आभास निर्माण झाला तेवढा ब्रिटीशपूर्व काळात खरेच होता का या बद्दल साशंकता व्यक्त करणार्‍यांच्या मतात अंशतः तथ्य असावे (संदर्भ) , पण या मतात मनुस्मृतींशिवाय इतर स्मृतींचा प्रभाव आणि व्यक्ति अथवा कुटूंब परत्वे गुरुजन पौराणिक आणि किर्तनकारांचा प्रभाव निटसा लक्षात घेतला जातोच असे नव्हे. स्मृतींचा काहीच प्रभाव नसता तर ज्ञानेश्वर आणि बंधूंवर जी वेळ आली ती कदाचित आली नसती असे म्हटता येते का ? पण त्याच वेळी आधूनिक कालीन राज्य घटनेशी तुलना करावी एवढाही त्यांचा प्रशासकीय प्रभाव होता का ?

"आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना" या तुलनेतील दुसरी निसटती बाजू म्हणजे आधूनिक कालीन राज्य घटनांना सहसा सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असलेल्यांच्या घटना समितीतून व्यापक राजकीय वैधता (पॉलिटीकल लेजिटीमसी) प्राप्त होत असते.

काळाच्या ओघात ग्रंथ प्रामाण्याबाबतच्या अंधश्रद्धेतून काही स्मृतीं नियमांना सामाजिक वैधता लादण्यात यश आले असले तरीही स्मृतीकारांना नियम करण्याचे आधीकार त्यांचे त्यांनी आधीग्रहीत म्हणजे समाज गटांचे अधिकार अतिक्रमित केले, त्यांना सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असलेल्यांच्या घटना समितीतून व्यापक राजकीय वैधता (पॉलिटीकल लेजिटीमसी) प्राप्त झालेली नव्हती त्यामुळे आधुनिक कालीन राज्य घटनेशी तुलन कितपत प्रस्तुत आहे या बद्दल शंका घेण्यास जागा आहे किंवा कसे.

माहितगार's picture

7 Aug 2017 - 8:58 am | माहितगार

...आजचे उदाहरण घ्या. डॉ, अंबेडकर यांनी घटना लिहली. जुन्या काळाप्रमाणे म्हणावयाचे तर हे झाली "बाबासाहेबस्मृति". आपण पन्नास वर्षात त्यात तीनशे बदल केले. आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ?...

पहिले अंबेडकरांचे योगदान आणि मार्गदर्शन गौरवास्पद असेल पण वस्तुनिष्ठपणे पहावयाचे झाल्यास भारतीय राज्यघटनेचे लेखन आणि स्विकार सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असलेल्यांच्या घटना समितीतून व्यापक विचार विमर्शातून झाली असल्यामुळे त्यास राजकीय वैधता (पॉलिटीकल लेजिटीमसी) प्राप्त होते.

दुसरे भारतीय राज्यघटना समता बंधूता आणि स्वातंत्र्य यांना स्थान आहे. "..आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ?" असा प्रश्न विचारताना धागा लेखक आजही शूद्रांवर अन्याय होतात हे स्विकारतो पण त्याची जबाबदारी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठेवणार्‍या भारतीय राज्य घटनेची नाही. उलटपक्षी पुरातन (कि तथाकथीत सनातन) विषमतावादी विचारसरणी बाळगणारे विचार आणि समाज घटक यास जबाबदार आहेत हे लक्षात न घेता जबाबदारीची पेरणी (जाणीवपूर्वक ?) उलटा चोर कोतवाल को डाटे या प्रकारात मोडत नाही ना हे तपासण्याची गरज असावी किंवा कसे.

"""""दुसरे भारतीय राज्यघटना समता बंधूता आणि स्वातंत्र्य यांना स्थान आहे. "..आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ?" असा प्रश्न विचारताना धागा लेखक आजही शूद्रांवर अन्याय होतात हे स्विकारतो पण त्याची जबाबदारी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठेवणार्‍या भारतीय राज्य घटनेची नाही. उलटपक्षी पुरातन (कि तथाकथीत सनातन) विषमतावादी विचारसरणी बाळगणारे विचार आणि समाज घटक यास जबाबदार आहेत हे लक्षात न घेता जबाबदारीची पेरणी (जाणीवपूर्वक ?) उलटा चोर कोतवाल को डाटे या प्रकारात मोडत नाही ना हे तपासण्याची गरज असावी किंवा कसे.""""

+1

माहितगार's picture

7 Aug 2017 - 10:55 am | माहितगार

ग्रंथातील विषमता आता कालबाह्य आहेत पण त्या काळासाठी सुसंगत होत्या असा विचीत्र दावा करण्यात बर्‍याच जणांना रस दिसतो. आता एक उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तिचे वडील स्वजातीयांसाठी खूप उदार होते पण त्या वडीलांनी एका स्त्रीवर आणि एका नौकरावर अत्याचार केला होता. तर त्या वडिलांच्या पुढील पिढीस त्या वडीलांची अन्याय्य कृती त्या काळासाठी सुसंगत असल्याचा दावा करता येईल का ? किंवा त्यांचे इतर क्षेत्रातील कतृत्व पाहून केलेला अन्याय विसरता येईल.

भारता बाहेरचे उदाहरण घेऊ . आमेरीक स्वातंत्र्याचा उद्गाता जॉर्ज वॉशिंग्टन ने आमेरीकेची स्वातंत्र्याधारीत घटना लिहवून घेतली असणार (चुभूदेघे) पण आफ्रीकन आणि नेटीव्ह काळ्या गुलामांसोबत त्यांचे वर्तन वर्ण-वंश वादी होते. त्यांच्या इतर कतृत्वाने त्यांनी बाळगलेल्या विषमदृष्टीकोणाचे समर्थन होते का ? कि त्यांच्या वागण्याला त्या काळासाठी कालसुसंगत मानता येते ?

आपल्या महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रीकेत सत्याग्रह केले पण ते केवळ भारतीय वंशीयांसाठी आफ्रीकनांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन वर्णवादी विषमतेची भलावण करणारेच होते त्याला त्या काळासाठी कालसुसंगत कसे ठरवता येईल - इतर बाबीत गांधी कितीही महान असले तरीही. रावण दशग्रंथी ब्राह्मण असला त्याच्या बहिणीवर अन्याय झाला तरी त्याने अन्याय करणार्‍याशी युद्ध करावयास हवे त्याने केलेल्या सितेच्या बलपूर्वक अपहरणाचे समर्थन त्या काळासाठी सुसंगत अथवा बघा बाकी किती विद्वान होता म्हणून होऊ शकेल का ?

त्यामुळे स्मृतींमधील विषमतेचे समर्थन त्या काळासाठी सुसंगत होते असे म्हणणे स्वतःच्या आणि इतराम्च्या मनाची दिशाभूल करुन घेण्या पलिकडे काही असू शकेल का या बद्दल साशंकता वाटते किंवा कसे

स्वधर्म's picture

7 Aug 2017 - 1:42 pm | स्वधर्म

प्रिय श्री शरदजी,
मला उत्तर द्यायला उशीर होतोय, त्याबद्दल प्रथम अापली क्षमा मागतो. तसेच, इतर वेळीही अगदी पटकन उत्तर देणे कदाचित शक्य होणार नाही. समजून घ्याल, ही अाशा.
मला वाटत होते, की अापण मूळ धाग्यावरच अापला प्रतिसाद द्याल. ‘प्रिय स्वधर्म’ असा वेगळा धागा का काढला ते समजले नाही. मूळ धाग्यावर चर्चा झाली असती, तर नंतर तो वाचणार्यांना तिथेच खुलासा मिळाला असता. माझा प्रश्नही अनुत्तरीत दिसला नसता.
संपादक मंडळास विनंती, की जर शक्य असेल, तर मूळ धाग्यातच हा धागा विलीन करावा. तिकडे गामा व माहितगार यांची सुसंबध्द चर्चा चालू अाहे.

असो. माहितगार यांनी मधल्या काळात, अनेक मुद्देसूद विचार मांडलेच अाहेत. पण त्यांनी मांडलेला सर्वात महात्त्वाचा मुद्दा हाच, की तुमची स्वत:ची वर्णव्यवस्थेसंबंधी भूमिका काय, हे अजूनही स्पष्ट होत नाही. माझा मूळ प्रश्न तोच होता, अाणि त्याचे उत्तर या नव्या धाग्यातही अजून मिळाले अाहे, असे वाटत नाही. माफ करा, पण अजूनही अापण एक बौध्दिक कुतूहल म्हणूनच चर्चा करत अाहात की काय असे वाटते.
खरे तर, कोणत्याही वादात जर कोणी काही एक भूमिका घेतली असेल, तर ती अाधी तपासणे अावश्यक असते. बाकी मुद्दे तपशीलाचे. अन्यथा केवळ तार्किक मुद्दे अाणि वाद-प्रतिवाद अनंत काळापर्यंत चालू राहतात. काही विचार करून अापले मत बदलण्याची शक्यता असलेले लोकही ‘काय ठरलं शेवटी?’ असा कंटाळा दाखवणारा प्रश्न विचारू लागतात. तरी जर अापण धागा लिहीताना खोलवर असलेली भूमिका स्पष्ट करू शकलात तर चर्चा सफल होईल, असे वाटते.
** माहितगार यांनी अनेक महत्वाचे मुद्दे चर्चेत अाणून अमूल्य भर घातली अाहे, त्याबद्दल त्यांचे अाभार.
टीप: १. मी कुठेही मनूवादी हा शब्द कुणासाठीही वापरला नाही.
२. घटना ही फक्त डाॅ. अांबेडकरांनीही लिहीली, (जशी मनूस्मृती मनूने लिहीली असे मानतात) असे मला वाटत नाही. घटना लिहीण्यासाठी समिती होती व त्यात अनेक विद्वानांचा समावेश होता, अशी माझी माहिती अाहे.

विशुमित's picture

7 Aug 2017 - 2:07 pm | विशुमित

<<<< १. मी कुठेही मनूवादी हा शब्द कुणासाठीही वापरला नाही.>>>
==> मीच ते वाक्य वापरला होते की 'लेखक मनुवादी आहेत तर"
http://www.misalpav.com/comment/951590#comment-951590

मनुस्मृतीचे उदात्तीकरण करण्याबाबत माहितीगार जी आणि स्वधर्म जी यांनी जे विस्तृत लिहले आहे ते मी एका वाक्यात लिहले होते. ते धाग्याच्या संबंधितच होते. धागा लेखकाने आपली भूमिका न मांडताच प्रतिसादच असंबंधित करून टाकला.

स्वधर्म's picture

7 Aug 2017 - 4:25 pm | स्वधर्म

+१

त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती.

शोषणाची कुठलीही संकल्पना रूढ झालेली असत नाही; ती रूढ केल्या गेलेली असते...अगदी साम, दाम, दंड, भेद ...

राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच.
राजा आणि विवाह संस्था या जवळपास वैश्विक आहेत... पण जन्माधारित वर्ण संस्था फक्त भारतात? ...

आपण पन्नास वर्षात त्यात तीनशे बदल केले. आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ?
राज्यघटना मंजूर करीत असतांना डॉ. बाबासाहेब यांनी संसदेत दिलेले भाषण कदाचित आपल्या वाचताना आले नसावे... (ते भाषण तसे मनुस्मृती सारखे दुर्मिळ नाही ज्या अथक प्रयत्नांनी आपण मनुस्मृती इथे आमच्या सारख्या सामान्य जणांना उपलब्ध करून दिले तसे त्यांच्या भाषणाची लिंक आणि त्यातील महत्त्वाचा भाग उद्धृत करीत आहे...
https://thewire.in/81969/ambedkar-constitution-assembly-democracy/

Because I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it, happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution. The Constitution can provide only the organs of State such as the Legislature, the Executive and the Judiciary. The factors on which the working of those organs of the State depend are the people and the political parties they will set up as their instruments to carry out their wishes and their politics. Who can say how the people of India and their parties will behave ? Will they uphold constitutional methods of achieving their purposes or will they prefer revolutionary methods of achieving them ? If they adopt the revolutionary methods; however good the Constitution may be, it requires no prophet to say that it will fail. It is, therefore, futile to pass any judgement upon the Constitution without reference to the part which the people and their parties are likely to play.

जगातील प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो;
अपौरुषेय आणि सनातन मानल्या जाणाऱ्या वेदांबाबत आपले मत काय आहे?