मनुस्मृति (भाग १)

Primary tabs

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
23 Jul 2017 - 6:11 am

मनुस्मृति (भाग १)

आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू.

वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री

माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्‍याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं..

मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्‍याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्‍या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू.

तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्‍या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून.

तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू...
आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्‍याकरिता भाग ३ आहेच.

(१) अद्याय १ (श्लोक ११९)
परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले.
निमिषापासून युगापर्यंत कालगणना;
कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत;
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत.
सर्वांनी सदाचारीच असावे.

(२) अध्याय २ (श्लोक २४९)
ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात.
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत.
भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये.
पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय.
प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते.
मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत.
दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते.
ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे.
माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत.
उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात.

(३) अध्याय तीन (श्लोक २८६)
गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.
ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत.
ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात.
ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो
स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे.
देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे.
संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात.
सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे.

(४) अध्याय ४ (श्लोक २६०)
सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय.
निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये.
धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा.
नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये..
कन्या विशेष कृपापात्र असते.
विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे.
तपाचरण करणार्‍याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्‍याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्‍याने दानाची वाच्यता करू नये
अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो.

परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो.
उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा.

(५) अध्याय ५ (श्लोक १६९)
आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.
शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.
सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात.
मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो.
मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये.
बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते.
(२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.)

(६) अध्याय ६ (श्लोक ९७)

माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे.
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत.
धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.

माहितीवाङ्मय

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Jul 2017 - 8:20 am | यशोधरा

वाचते आहे..

उगा काहितरीच's picture

23 Jul 2017 - 9:36 am | उगा काहितरीच

एका जुन्या लेखावर दिलेली माझी ही प्रतिक्रिया आठवली. यात थोडं ॲडवून असं म्हणेल की , बहुतेक सर्वच जुन्या ग्रंथाला ही गोष्ट लागू पडेल.

जाळून टाकले पाहिजेत अशा फालतू ग्रंथांचे सिलेक्टिव्ह उदात्तीकरण करणारा लेख. अजूनही काही लोकांना मनुस्मृती आणि इतर स्मृतीग्रंथ आदरणीय वाटतात हे पाहून आश्चर्य मुळीच वाटले नाही, परंतु या शोषणव्यवस्थेविरोधात लढा संपलेला नाही आणि त्याला बळच दिले पाहिजे याची अजूनच तीव्रतेने जाणीव झाली.

माहितगार's picture

24 Jul 2017 - 2:45 pm | माहितगार

मानवतावाद श्रेयस्कर की ग्रंथ प्रामाण्य ? ; विवेकवाद श्रेयस्कर की व्यक्तीवाद ?

पैसा's picture

25 Jul 2017 - 9:27 am | पैसा

मला तरी लेखाचा टोन उदात्तीकरण करायचा वाटला नाही. निव्वळ त्या काळच्या समाजरचनेची माहिती म्हणून अशा ग्रंथांकडे आता आपल्याला बघता यावे. बहुसंख्य संस्कृत वाङ्मय आता कालबाह्य आहे, अगदी लग्नातले मंत्र वगैरेसुद्धा. तरी केवळ माहितीसाठी किंवा मनोरंजक वाचन म्हणून आशा गोष्टींकडे बघता येते. मी मनुस्मृती वाचली नाही किंवा वाचण्याची शक्यता नाही. मात्र एवढे त्याबद्दल लिहिले जाते तर ते नेमके काय प्रकरण आहे याची जर कोणी माहिती देत असेल तर तेवढा वेळ खर्च करणे मला परवडते. अशी माहिती देताना समजा कोणी जुनाट मूल्यांची भलावण करत असेल तरी माझी मते त्याने बदलणार नाहीत त्यामुळे त्याला भिण्याचे मला कारण नाही.

मनुस्मृतीला बहुसंख्य लोक विसरले आहेत कारण स्त्री शूद्रांबद्दल त्यात लिहिलेले आज relevant नाही. ती जाळून टाकण्यासाठी तरी ती प्रचलित राहिली पाहिजे असा काहीतरी विचित्र विरोधाभास इथे झाला आहे. कोणे एके काळी मनुस्मृती हा स्मृतीचा भाग होता काळाबरोबर तो विस्मृतीत जाणार.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jul 2017 - 11:42 am | प्रकाश घाटपांडे

मनुस्मृती हा जाळण्याचा किवा पुजण्याचा विषय नाही. त्याकाळात लिहिलेले त्यावेळच्या समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने केलेले काही निति नियम आहेत. आज त्यातला अनेक गोष्टी कालबाह्य आहेत. खर तर मनुस्मृती वरुन राजकारण केले जातय. एक ऐतिहासिक्/पौराणिक ग्रंथसंपदा एवधेच त्याचे महत्व.
सोपी माहिती दिल्याबद्दल शरद यांचे आभार

सहमत आहे. तत्कालीन ग्रंथाना त्याच काळाच्या परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे.

यशोधरा's picture

23 Jul 2017 - 8:00 pm | यशोधरा

+१

सौन्दर्य's picture

23 Jul 2017 - 7:50 pm | सौन्दर्य

हिंदू धर्मातील किंवा धर्माविषयी खरी माहिती सर्वत्र न पोहोचण्याचे मूळ कारण, हिंदू धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. प्रत्येकाला जर संस्कृत छानपैकी येत असते तर निदान हे ग्रंथ वाचता आले असते, पण तसे न झाल्याने आपण इतरांनी लिहिलेले वाचतो व त्यावर आपले मत ठरवतो. कोणत्याही ग्रंथात मांडलेले आचार-विचार, नियम हे त्या त्या कालानुरूपच असतील ह्यात काही शंकाच नाही. कालाप्रमाणे जे काही चांगले असेल ते अंगीकृत करून, कालबाह्य ठरलेल्या गोष्टी टाळून पुढे जाण्यातच खरी बुद्धीमत्ता असते. साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास १९५०-६० आसपास लिहिलेल्या कथा कादंबर्या, सिनेमे आज वाचताना, पाहताना अगदी बाळबोध वाटतात, पण त्या काळासाठी ते सर्व अनुरूपच होते.

मनुस्मृतीतील सिलेक्टिव्ह श्लोक पुढे करून त्यावरून त्या ग्रंथाला बडवीणे बरोबर नाही. मनुस्मृतीतील विचार हे विचारपूर्वकच स्वीकारले पाहिजेत. जे काही कालबाह्य असेल ते सोडून व जे आजही उपयोगी असेल ते स्वीकारून पुढे जाण्यातच खरा शहाणपणा आहे.

शरद जी, तुम्ही फारच सोप्या पद्धतीने लेख लिहिला आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. अजून लिहा, वाचायला आवडेल, नव्हे ह्या विषयावर वाचायची ईच्छाच आहे.

.....काही कालबाह्य असेल ते सोडून व जे आजही उपयोगी असेल ते स्वीकारून.....

एखादे उदाहरण देता येईल का?

माहितगार's picture

24 Jul 2017 - 8:41 am | माहितगार

एखाद्या ग्रंथात ७ गोष्टी पटणार्‍या आहेत ३ तीन गोष्ट पटणार्‍या नाहीत, ७ पटणार्‍या गोष्टींनी ३ न पटणार्‍या गोष्टींचे समर्थन होत नाही. आणि ३ न पटणार्‍या गोष्टी आहेत म्हणून ७ पटणार्‍या गोष्टींचे समर्थन थांबवता येत नाही. अर्थात ७ आणि ३ हे आकडे उदाहरणा दाखल आहे.

१) ज्या काळात स्त्रीयांना सर्वाधीक संरक्षणाची गरज होती (किंवा आहे) त्या काळात किंवा या काळात स्त्रीला स्व आणि समुह संरक्षणाच्या शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचे समर्थन कसे होऊ शकते किंवा कसे ?

२) काळ कोणताही असो, आर्थीक स्वातंत्र्य हे उत्पादन कौशल्याधारीत असते अथवा वडलोपार्जीत संपत्तीवर आधारीत असेल. हिंदू समाजातीलच नायर समाजाने स्त्री सत्ताक पद्धत यशस्वीपणे चालून दाखवली होती, इंडोनेशीयातील एका बेटावर एका आदीवासी समाजाने मुस्लीम धर्मांतरणानंतरही स्त्री सत्ताक पद्धती यशस्वीपणे जोपासून दाखवली आहे. (त्यात वडील आणि मुले यांच्या नात्यातील जवळीक पुरेशी जपली जाऊ शकत नाही हा भाग निराळा) जुन्या काळातही एखादी स्त्री विणकर कलेचे शिक्षण उत्पन्न मिळवण्या साठी दिले आणि स्वसंरक्षण शिक्षण दिले आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर केला असता तर बिघडले असते का ? त्या एवजी एखाद्या ग्रंथाला धार्मीकतेची आणि शब्दपुजेची जागा देऊन सकारात्मक शक्यता दाबण्याचे समर्थन कसे होते किंवा कसे ?

अर्थात स्त्रीच्या दास्य ह्या भूमिका लादून पेक्षा टिमवर्कची संकल्पना आणि टिमलिडरच्या निर्णयांचा आदर अशी संकल्पना अधिक स्पृहणीय राहू शकली नसती का ? स्त्रीला शिक्षणाचा अधिकार देऊन नैसर्गिक बुद्धीमत्तेस अधिक वाव मिळवून देऊन आर्थीक उत्पादनात अधिक सक्रीय नोंद घेऊन समाजाची उन्नती साधावयाचे सोडून देऊन पायात बेड्या बांधण्याने काय साध्य झाले ?

३) पृथ्वीतलावर असंख्य समुदायांनी स्त्रीचा पुर्नविवाह मान्य केला आणि त्या समाजांचे असे कोणतेही नुकसान त्याने झाले नाही. तथाकथीत धर्मग्रंथांची शब्दपूजा आणि टोकाच्या पातीव्रत्याच्या दडपणातून स्त्रीच्या पुर्नविवाहाच्या शक्यता त्या अनुषंगाने हकनाक नाकारलेले निवड स्वातंत्र्य समर्थनीय ठरते किंवा कसे.

सौन्दर्य's picture

24 Jul 2017 - 8:47 am | सौन्दर्य

ज्या काही चांगल्या आणि पटणार्या गोष्टी आहेत त्या स्वीकाराव्यात आणि न पटणाऱ्या किंवा वाईट गोष्टी सोडून द्याव्यात. त्यासाठी संपूर्ण ग्रंथाला वाईट ठरवू नये.

माहितगार's picture

24 Jul 2017 - 11:27 am | माहितगार

हम्म.. धागा लेखक मित्र मी आणि तुम्ही म्हणतो आहोत तेच म्हणताहेत का काही वेगळे म्हणताहेत. एका बिल्डींग मधल्या लोकांना झोप प्रिय, जागे करणे अप्रिय असते पण त्या बिल्डींगला आग लागली तर अप्रिय सत्य सांगावे कि सांगू नये ?

धर्म्य काय आहे न्याय्यता कि अन्यायता ? समता की विषमता ? अन्यायतेला धर्म्य म्हणून खपवले तर समाजधारणेत विसंगती निर्माण होणार नाहीत का ? इतरांचे सोडून द्या, तुमचेच चुकलेले तर्क तुमच्याच समाजाचा घात करु शकतात किंवा कसे. उदाहरणार्थ इतर धर्मीयांना धर्मप्रवेशाची साधी सोपी सोय उपलब्ध नसणे ? नुकसान कुणाचे ? विधवा स्त्रीला पुर्नविवाह न करता येणे तिचे अधिकार सोडून द्या तुम्ही तुमच्याच समाजावर संतती नियमन लादता होता ते कशा पोटी ? असो.

वीणा३'s picture

31 Jul 2017 - 3:10 pm | वीणा३

याचं मुख्य कारण साततयाने होणारी गभधारणा आणि त्यामुळे येणार परावलंबीतव असाव असं वाटत.

माहितगार's picture

31 Jul 2017 - 5:39 pm | माहितगार

१) किमान वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधी बाळंतपणाचे प्रश्न नाहीत !
२) ब्रह्मचर्याची अट घालून मुलांना शिक्षण देणे शक्य होते तशीच ब्रह्मचर्याची अट घालून मुलींनाही शिक्षण देणे का शक्य नसावे ? (आजही वयाच्या १८ किंवा अधिक वर्षे बहुतेक मुली (तसे अधिकृत जाहीर करत नसल्यातरीही) ब्रह्मचारी शिक्षण घेतात ना ?
३) बाळंतपणाचा काळ ठीक पण त्या काळात एकत्र कुटूंब पद्धती होती, बाळंतपणाचा काळसंपल्यावर मुले घरात सांभाळण्यास ठेऊन स्व संरक्षणाचे धडे देता आले नसते ?

जेव्हा तत्वतः किंवा प्रॅक्टीकली तुम्ही त्यांना (साक्षरता आणि संरक्षण) शिक्षण नाकारत आहात तेव्हा गर्भधारणेमुळे सोपे जात होते अथवा नव्हते हा गैरलागू स्वसांत्वनार्थ मुद्दा आहे किंवा कसे.

मलाही आवडलं असतं जर त्या समाजाने स्त्रियांना नीट वागवलं असतं तर. पण जेव्हा मी विचार करते कि नक्की बायकांनी का दुय्यम स्थान स्वीकारलं असावं तेव्हा काही मुद्दे मनात येतातं. हे सगळे मुद्दे लॉजिक वर आधारित आहेत, कुठलाही अभ्यास / पुरावा नाही. थोडेसे विस्कळीत विचार आहेत :( . आणि काही सन्माननीय स्त्रिया त्या काळातही अपवाद असतील सुद्धा पण माझे खालील विचार अपवादांबद्दल नाहीयेत

१. असं वाचलं - ऐकलं आहे कि, गर्भातील बाळ मुलगी असेल तर जगण्याची शक्यता जास्त असते. मुलगी गर्भ जास्त ताकदवान असतो (survivor / जगण्याची क्षमता जास्त असलेला - या अर्थाने, तब्येतीने नाही ).

- या कारणाने समाजात एकूण स्त्रियांची संख्या जास्त असावी. त्या जरासंध राक्षसाने १६०० का १६०००
बायका पळवून आणल्या, आणि त्यांच्या घरचे त्यांना परत घ्यायला तयार नव्हते. जर १६,००० बायका पळवून आणल्या असतील तर कितीतरी पुरुष एकटे राहायला हवेत. आणि फक्त समाजाच्या नियमासाठी १६,००० पुरुष आपल्या हक्काच्या बायको ला नाकारून एकटे राहतील हि शक्यता फार कमी वाटते.
- बहुपत्नीत्व होतं, फ़क्त राजे-राजवाडे नाहीत तर सामान्य माणसान सुद्धा एकापेक्षा जास्त बायका असाव्यात असं वाटतं (राम आदर्श मानला जाण्यात त्याच्या एकपत्नी असण्याचा पण वाटा असावा, त्यावरून एकपत्नी असणं हि दुर्मिळ गोष्टं असावी असं वाटतं )
- जर स्त्रिया संख्येने कमी असत्या तर पुनर्विवाह ही गोष्ट खूप आधीपासून अस्तित्वात असती.

२. पुरुष युद्धातही / शिकार करण्यात भरपूर मारले जात असावेत, त्यांच्या मानाने स्त्रियांना बाळंतपण हि एकचं लवकर मरायची शक्यता असावी, म्हणूनही स्त्रियांची संख्या जास्त असावी.

३. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आपला दिनक्रम चालू ठेवणं हे आता खूप सोप आहे. वेग-वेगली सॅनिटेशन उत्पादने, कपड्यांची भरपूर उपलब्धता, आणि तुलनेने बैठं काम यामुळे अगदी शारीरिक त्रास होणारी स्त्री सुद्धा आपलं काम करत राहू शकते. पण जुन्या काळी शारीरिक कष्टाची कामं + कपड्याची उपलब्धता कमी (अंदाज असा कि राजे-राजवाड्यांकडे भरपूर कपडे असतील पण सामान्य लोकांकडे कमीच असणार ), यामुळे मासिक पाळीचे ४ दिवस सुद्धा महिला परावलंबी असतील.

४. आज आपण अशा समाजात राहतो जिथे आजारी असणं / काही काळ परावलंबी असणं आपल्याला परवडू शकत . पण ज्या अर्थी समाजात नियम हवेत असा ग्रंथ लिहिला गेला त्या अर्थी, त्या समाजात नियम कमी असणार, बळी तो कान पिळी - हा प्रकार सर्रास चालत असणार. अशा समाजात स्वतःच्या मालमत्तेचं रक्षण करणं हे एक सततच काम असणार. तसंच शेती / शिकारी सारखं कष्टाचं काम सातत्याने करणं मासिक पाळी + बाळंतपण + लहान मुलाचं संगोपन या कारणामुळे परावलंबी असलेल्या स्त्री ला अवघड जात असणार. तिच्याकडून मालमत्ता काढून /लुबाडून घेणं हे पुरुषाकडून मालमत्ता काढून घेण्यापेक्षा नक्कीच सोपं असणार.

आणि जर सामाजिक सुरक्षा / मुलांची पुढची सोय / मालमत्ता या सगळ्या गोष्टीने बहुतांशी स्त्रियांना एका लग्नात राहून नवऱ्याची सेवा करणं हा तुलनेने सोपा पर्याय उपलब्ध असणार. त्यात जर स्त्रीयांची संख्या जास्त असेल तर स्पर्धा जास्त, त्यामुळे संख्येने कमी असलेल्या पुरुषांना अतिशय महत्व मिळून त्यांनी आदर्श पत्नीचे क्रायटेरिया स्वतःला हवे तसे वाढवले असावेत.

मार्केट फोर्सस मध्ये ज्याचा सप्लाय अतिशय जास्त त्या गोष्टी ची किंमत कायमच कमी असते.. स्त्रिया जास्त त्यात परावलंबी, आधीच कमी असलेल्या रिसोर्सेस मध्ये स्वतः काही भर न घालता तोच कमी करत राहणार. हि आणि अनेक कारण लक्षात घेतली तर "त्या काळात" मनू ने स्त्री ला आदराने वागवायला सांगितलं हेच कौतुक म्हणायला लागेल. पुरुषांना स्त्रियांची असलेली शारीरिक गरज आणि प्रजोत्पादन ह्या दोनच गोष्टींमुळे स्त्रियाना आजतागायत किमान जगता आलं / पुरुषांनी जगू दिलं असं वाटतं. त्यांना फक्त नवऱ्याची सेवा करायला शिकवणं हि एकाच गोष्ट गरजेची होती आणि बऱ्याचशा स्त्रिया ती सहज करू शकत होत्या.

या आणि अशा अनेक वेग-वेगळ्या कारणामुळे पुर्वापार स्त्रीने समाजात दुय्यम भूमिका पत्करली असावी / तिला ती दिली गेली असावी असं वाटतं. स्त्रियांना स्वतःला हवं तसं जगण्याची संधी (स्वतःची मालमत्ता स्वतः कमावणं / आयुष्यातला कमी काळ परावलंबी असणं / माणूस म्हणून विचार केला जाणं) मिळायला फक्त गेली १-२ शतक (भारतात तर गेली ३०-५० वर्ष ) सुरवात झाली असावी.

मला वाटते त्या काळाच्या मानानेदेखिल स्त्रीविषयक मनुचे विचार अनाकलनिय आणि इल्लॉजिकल आहेत. आता बघा, स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा खुप जास्त होती अश्या काळात स्त्रिला अर्थार्जन करण्याचा अधिकार न देता केवळ पुरूषांची सेवा करणे एवढेच काम देणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचेच होते. कारण कमी पुरूषांवर जास्त स्त्रियांचा भार पडे. पुरूष नसलेल्या घरातल्या स्त्रीची जबाबदारी तिने न घेता कुठल्यातरी दुसर्‍या पुॠषानेच घ्यावी लागत होती किंवा मग ती स्त्री समाजाची जबाबदारी होती हे चुकीचे आहे की. समाजात प्रचंड आर्थिक सुबत्ता असल्याशिवाय हे सस्टेन होणे अवघड आहे/होते.
इस पुर्व १७००-१८०० या काळात हामुराबी नियम लिहिले गेले त्याचा आणि मनुस्मृतीमध्ये तुलना केली त्यामध्ये स्त्रीला व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे. बाकी स्त्रिचे स्थान समान नाहीच परंतू निदान अर्थार्जनाचा अधिकार हिरावला गेला नाहीये.

इस पुर्व १७००-१८०० या काळात हामुराबी नियम लिहिले गेले त्याचा आणि मनुस्मृतीमध्ये तुलना केली त्यामध्ये स्त्रीला व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे.

इंटरेस्टिंग! याबद्दल अधिक इथे वाचायला मिळाले http://www.womenintheancientworld.com/hammurabilawcode.htm

लिंक रोचक आहे. बरेच कायदे अजूनही तसेच आहेत.
पण मला एक कळलं नाही जर त्याकाळात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असेल तर bride price कसे होते हुंडा असायला हवा.

पुंबा's picture

1 Aug 2017 - 5:25 pm | पुंबा

एक्झॅक्टली..

जर त्याकाळात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असेल तर bride price कसे होते हुंडा असायला हवा.

याचे उत्तर खालील वाक्यात मिळेल असे वाटते

According to French anthropologist Philippe Rospabé, its payment does therefore not entail the purchase of a woman, as was thought in the early twentieth century. Instead, it is a purely symbolic gesture acknowledging (but never paying off) the husband's permanent debt to the wife's parents

https://en.wikipedia.org/wiki/Bride_price#Function

अॅमी's picture

2 Aug 2017 - 2:06 pm | अॅमी

नाय कळलं.

शेती करणाऱ्या कुटुंबातील एक कामगार व्यक्ती दुसऱ्या कुटुंबात गेली म्हणून दुसर्याने पहील्याला कॉम्पेनसेशन द्यावं हे ठीक आहे. त्याला बाई विकत घेणे नाही म्हणता येणार. *कामगार विकत घेणे म्हणता येईल ;))

पण मला वाटते bride price आणि हुंडा हे ज्याची संख्या कमी त्यानुसार ठरते. जर स्त्रिया > पुरुष असतील तर हुंडा; जर पुरुष > स्त्रिया असतील तर मेहेर असे असते/असायला हवे.

Duishen's picture

22 Oct 2017 - 1:11 am | Duishen

bride price ला महाराष्ट्रात 'देजा' असा शब्द वापरला जातो. हुंडा पद्धत ही मुलत: प्रथम तीन 'उच्च' जातीचे व्यव्वछेदक लक्षण होते. उर्वरित सर्व जाती-जमातींमध्ये एकतर हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती किंवा 'देजा' अस्तित्वात होते. आजही काही आदिवासी समाजात देजा बघायला मिळतो.

मध्यंतरी एक पुस्तक वाचनात आले होते.. कदाचित नामदार जाधवांचे असावे..फारसे स्मरत नाही... त्याच्या संदर्भानुसार अगदी २० शतकाच्या सुरवातीपर्यंत कुणबी समाजात देजाची पद्धत प्रचलित होती असा उल्लेख आहे. देजा पद्धतीला 'उच्च'जातींकडून नेहमीच हिणवल्या गेले आहे आणि हुंडा पद्धत श्रेष्ठ मानल्या गेली आहे..शेवटी काळाच्या ओघात सर्व जाती-जमाती बऱ्यापैकी हुंडा समर्थक बनत आहेत.

अजून एका परंपरेबाबत लिहितो ...एकदा पेशव्यांकडे एका 'शुद्र' जातीच्या मंडळाने सतीप्रथा त्यांच्यात सुरु करण्याची परवानगी मागितली..पण पेशव्यांनी निक्षून सांगितले की सती जाणे ही 'उच्च'जातींची परंपरा आहे आणि त्याची 'शूद्रा'ना परवानगी नाही. .....समाज वाईट चालीरीतींचे पण किती अंधानुकरण करू इच्छितो याचे हे उदाहरण...

...हुंड्याचेही तसेच अनुकरण...

माहितीसाठी आभार. रोचक आहे हे सगळं.

निम्न 'वर्गा'त 'देजा' पद्धतच असायला हवी. खरंतर मातृसत्ताकच!! स्त्रियांचं काँट्रीब्युशन फार असतं ती कुटुंब चालवण्यात.
तेच जसजशी श्रीमंती वाढत जाईल तसतसं स्त्रिया फक्त ट्रॉफी बनत जातात (जर स्वतःची काही ओळख/इन्कम नसेलतर). त्यामुळे तिथेदेखील हुंडापद्धत योग्य आहे.

ज्या आदिम काळात पुरुषांना त्यांचे प्रजोत्पादानातील महत्त्व समजत नसे त्या काळात 'बाळाला जन्म देणारी स्त्री; श्रेष्ठ ठरली...आणि कदाचित पुरुष हे करू शकत नाही याचा त्याला गंड निर्माण झाला असावा... हा गंड एक कारण असू शकतो स्त्रियांना गुलाम बनविण्याचा...!

असे मानले जात की पुरुष शिकारीमध्ये असतांना स्त्री गुहेत वा त्याच्या आसपास राहून (...पाळी किंवा गर्भवती असणे इ. कारणांमुळे..) तिने निसर्गाचे अवलोकन करून शेतीचा शोध लावला...पण तिचा नंतर कधी शेतीवर अधिकार राहिला नाही.. (आता कुठे ७/१२ वर स्त्रियांच्या नावाची नोंद असावी असा लढा चालू आहे...)

एक महत्त्वाचा मुद्दा असा की स्त्रीयाची नवीन जीव निर्माण करण्याची नैसर्गिक ताकदच तिच्या जीवावर बेतली... सर्व जात व्यवस्था स्त्रीला केंद्रीभूत करून निर्माण करण्यात आली आणि ती तिने कसोशीने पाळावी अशी धार्मिक आणि सांस्कृतिक बंधनेही!!! जीव निर्माण करू शकते म्हणजे भावी सैन्य हिच्याकडून उपलब्ध होऊ शकते. म्हणून मग युद्धात स्त्री पळविणे प्रचलित व्यवस्थेला मान्य झालं... म्हणजे तिचा वापर केवळ मालमत्तेसारखा!!!

जबाबदाऱ्या ह्या हळूहळू लादल्या गेल्या... कधी बळजबरीने तर कधी धर्माची भीती घालून...

,,,,कामाची विभागणी आणि जबाबदाऱ्याचे वाटप यात काही गैर नाही पण जेंव्हा हे वाटप जन्माधारित करून त्याला उच्च-नीचतेची जोड दिली ते मात्र भयानक..

ज्यादिवशी समस्त पुरुषवर्गाला कळेल की पितृसत्ताक व्यवस्थेचे त्यानाही तोटे जास्तच आहे; जेंव्हा समस्त ब्राह्मण्यवादी लोकांना कळेल की जातव्यवस्था त्यांच्यासाठीही घातक आहे आणि जेंव्हा समस्त स्त्री वर्गाला जाणवेल की त्यांना जातीव्यवस्थेचे केंद्र केले आहे आणि त्यांचा लढा हा जातीव्यवस्थेविरुद्धाचाच लढा आहे तो भारतासाठी सुदिन!!

त्यानंतर कधी मग मनुस्मृतीचा ग्रंथ बाहेर काढणारे असणार नाहीत आणि त्यावर लिहिणारेही!

सुबोध खरे's picture

24 Jul 2017 - 9:37 am | सुबोध खरे

जाता जाता -- मनुस्मृती किती लोकांनी मुळातून वाचलाय?

प्रचेतस's picture

24 Jul 2017 - 10:10 am | प्रचेतस

मी.

आणि मनुस्मृती प्रचंड अन्याय करणारी आहे हेही खरे.

कपिलमुनी's picture

24 Jul 2017 - 8:26 pm | कपिलमुनी

मराठी मनुस्मृती पीडीएफ आहे का ?
लिन्क असल्यास उत्तम!

प्रचेतस's picture

24 Jul 2017 - 9:14 pm | प्रचेतस

मराठी पीडीएफ तरी माझ्या पाहण्यात नाही पण sacred-texts.com वर इंग्रजी भाषांतर आहे.

अत्रे's picture

24 Jul 2017 - 9:41 am | अत्रे

रोचक आहे.

पण यातले सारे विचार वैयक्तिक/स्वत:च्या घरापुरते का आहेत?

भ्रष्टाचाराचा साधा उल्लेख सुद्धा कुठे दिसत नाही. यातून दोन अर्थ निघू शकतात -

१. त्या काळात सर्व काही आलबेल होते. सरकारी आणि बिन-सरकारी लोक आपापली कामे पैसे न खाता, मन लावून करत असत.

किंवा

२. ग्रंथकाराला या विषयात रस नव्हता.

तुम्हाला काय वाटते?

पण यातले सारे विचार वैयक्तिक/स्वत:च्या घरापुरते का आहेत?

प्रत्येक जातीने इतर जातींशी कसे वागावे आणि त्यासंबंधी शिक्षा; समस्त स्त्रियांचे कसे शोषण करावे याचे मनुस्मृतीतील सारे वर्णन वैयक्तिक कसे असू शकेल!!!

भ्रष्टाचाराचा साधा उल्लेख सुद्धा कुठे दिसत नाही.
भ्रष्ट मातीने लिहिलेला ग्रंथ भष्टाचार शब्दाचा उल्लेख करील काय! पूर्ण स्मृतीच भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.

मला तर वाईट काहीच आढळत नाही, चांगलेच विचार मांडले आहेत मनुने. त्यावेळच्या परिस्थितित थे योग्य होते.

माहितगार's picture

24 Jul 2017 - 11:39 am | माहितगार

तदानुभूती म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेऊन त्याच्या भावना, विचार, व वागण्याची पद्धत समजून घेऊन त्यानुसार केलेले वर्तन होय. समोरील व्यक्तीला काय वाटत असेल, तो व्यक्ती असे का वागत असेल, तसेच परिस्थितीमुळे त्याने केलेले वर्तन आणि निर्माण झालेल्या भावना समजून घेऊन तसेच त्यानुसार प्रतिक्रिया देऊन एखादा व्यक्ती वागते तेव्हा ती तादानुभूतीपूर्वक वागते असे म्हणण्यास हरकत नाही.

बराच वेळा आपण फक्त सहानुभूतीपूर्वक वागतो. म्हणजेच आपल्याला फक्त त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीच वाटते. त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे आपल्याला त्याची कीव येते. आपण फक्त अरेरे असे म्हणून सोडून देतो. परंतु जेव्हा आपण तदानुभूती चा वापर करतो तेव्हा त्या व्यक्तीची कीव न करता पूर्णपणे त्याच्या जागी जाऊन विचार करू लागतो. असा विचार करून त्याच्या भावना समजून घेणे खरतर सोप्पे नसते . त्यासाठी स्वतः मानसिक दृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे असते.

संदर्भ - मराठी विकिपीडिया लेख

Duishen's picture

21 Oct 2017 - 11:12 pm | Duishen

...म्हणजे औरंगजेबाने 'काफिरां'वर जिझिया कर लावून "मला तर वाईट काहीच आढळत नाही, चांगलेच विचार मांडले आहेत औरंगजेबाने... त्यावेळच्या परिस्थितित ते योग्य होते." .....म्हणावयाचे आहे का?.

वाईट न वाटू शकणारी बरीच उदाहरण देता येतील... इतिहासातील आणि सद्यपरिस्थितीतील!!!

माहितगार's picture

24 Jul 2017 - 12:31 pm | माहितगार

सामाजिक उतरंड रचताना वर्णांची संख्या घेताना ती ४ घ्या ५ किंवा जेवढे जातीय स्तरीकरण तेवढी, सामाजिक उतरंडीची संकल्पनाच मुदलातच झोल असते. भारतीय चातुर्वण्य संकल्पनेतील शुद्रत्वाची संकल्पना तर सगळ्यात मोठा झोल आहे. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु आणि सेवांच्या उत्पादन आणि विनीमयावर आर्थीक संस्कृती उन्नत होते. भारतीय चातुर्वर्ण्य संकल्पनेत वैश्यांचा विचार केला असला तरी त्यांना प्रामुख्याने व्यापारी समजून. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादक जो अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधार असतो त्यांच्या करता स्वतंत्र विशेष वर्णाची व्यवस्था नाही मग त्यांचे वर्गीकरण वैश्यांमध्ये करणार की शुद्रांमध्ये ? अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादन यात प्रत्यक्षात तथाकथीत चारही वर्णिय सहभागी होताना दिसतात. तिच गोष्ट अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादन साठी लागणार्‍या सेवांच्या उत्पादनांचीही आहे. च होताना असणारे सपोर्ट लेव्हल्स सेवा क्षेत्र काळजी घेत असते. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु आणि सेवा उत्पादन होताना उन्नत होणार्‍या संस्कृतीस जशा इतर सेवा आहेत तशाच ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार या वस्तुतः सेवाच आहेत. म्हणजे एका अर्थाने कुणी कुणाची सेवा करायचीच असेल तर उन्नत संस्कृतीत ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार करणार्‍यांनी अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादकांची सेवा करावयास हवी. पण भारतीय चातुर्वर्ण्य संकल्पनेत ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार सेवा देण्याची ज्यांच्या कडून अपेक्षा करावी तेच बळी तो कान पिळी ह्या न्यायाने उत्पादकांकडूनच सेवा मागत होते एवढेच नाही त्यासाठी विषमतेचे तत्वज्ञान रचणे आणि त्याचे घाऊक समर्थन करण्यापर्यंत मजल जाऊन त्या ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार करणार्‍या समुहांच्या हितसंबंधांचे संरक्षण झाले . आपल्याच समाजाच्या मह्त्वपूर्ण अंग असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादकांना हिन ठरवण्यातून काय साधले गेले ? केवळ हिन ठरवणे अथवा धार्मीक ग्रंथांच्या वाचनाचा अधिकार नाकारणे ह्या मानसिक समस्या झाल्या. पण साक्षरता निर्माण करण्याची क्षमता असूनही अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादकांमधील बहुसंख्य गटास कौशल्य विकासाचे आणि त्यातून समाजाची आर्थीक उन्नती साधण्याचे सा़क्षरतेचे साधन नाकारले गेले. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादना बद्दल ज्या ज्ञानाच्या निर्मितीची बांधणी व्हावयास हवी होती ती त्यांना ज्ञानाची एकच व्याख्या करणे आणि ते नाकारण्यातून उत्पादकाशी संवादाचा धागाच सांधला न जाण्याची प्रक्रीया निर्माण झाली. (आजही आमची विद्यापिठे उत्पादकांशी कितपत नीट जोडली गेली आहेत की जुनाच कित्ता गिरवत आहेत हा वेगळ्या चर्चेचा विषय असावा)

आध्यात्मिक ज्ञान जरावेळ बाजूला ठेवा. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादनाच्या आर्थीक प्रक्रीयेच्या बळावर तुम्ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष म्हणजे क्षत्रिय आणि वैश्यांकडून दान (कि कराचा हिस्सा) मिळवत होता त्या अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादनाच्या आर्थीक विकासात तुम्ही केलेल्या ज्ञान विकासाचे कोणते म्हणून योगदान होते ?

अभ्यास विषयातील रस-गती आणि प्रतिभा ह्या जन्माधारीत कदाचित असणार नाहीत ह्या शक्यता विश्वामित्र परशुराम असा कथांमधून समोर आल्या तरी त्यांच्याकडे ओढून ताणून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या कथा रचल्या जाऊन वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष झालेच. म्हणजे अंगात गुण आणि इच्छा असूनही संधी नाकारणारी विषम व्यवस्था राबवली गेली. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादन करणार्‍या व्यक्तीच्या मुलास ज्ञान संरक्षण आणि व्यापार यात गती असण्याची शक्यता असून संधी दिल्या नसतील तर शेवटी नुकसान कुणाचे झाले ? सबंध समाजाचे झाले नाही का ?

अगदी ब्राह्मण्याची समान संधी देऊन धार्मीक सांस्कृतीक संबंधांसाठी पश्चिम आशिया सेंट्रल आशिया चिन आदी देशात पाठवून राजकीय भौगोलीक आर्थीक विकासाच्या संधी अभ्यासता आल्या नसत्या का ? त्या एवजी संस्कृतीस पूर्ण उलट दिशेने नेत आपल्याच समाज घटकांना हिन लेखून संधी नाकारून; परकीयांना सामाजिक भेदाच्या फटी मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्यात शहाणपणा होता किंवा कसे.

पुंबा's picture

1 Aug 2017 - 8:17 am | पुंबा

प्रतिसाद आवडला सरजी..

कपिलमुनी's picture

24 Jul 2017 - 8:25 pm | कपिलमुनी

मनुस्मृति मी वाचली नाही.
एखादी गोष्ट चांगली की वाइट हे ठरवायला ती महिती असावी लागते.
त्याप्रमाणे इतिहासातील , पुराणातील ग्रंथाविषयी माहिती असे लेखाचे स्वरूप आहे त्यामुळे त्याविषयी गळे काढणार्‍यांचे प्रयोजन कळले नाही.

उत्तम लेख ! पुभाप्र

माहितगार's picture

24 Jul 2017 - 9:14 pm | माहितगार

मराठी विश्वकोशातील तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मनुस्मृती विषयक लेख दोन पानांचा आहे. लेखात बराच उहापोह आहे. पण त्या लेखाचा शेवट आपणास अपेक्षीत प्रयोजन सांगत असावा. तो खालील प्रमाणे

.......मनुस्मृतीमध्ये स्त्री-पुरूषनियमन,स्त्रियांचे पारतंत्र्य आणि जातिबध्द विषम समाजरचना ह्यांचे जोरदार समर्थन आहे. ब्राम्हण जात सर्वश्रेष्ठ व अस्पृश्य जमात ही सर्वात कनिष्ठ, बहिष्कार्य आणि सर्वसामान्य उच्चवर्णीयांच्या किंवा सवर्णांच्या वसतिस्थानांपासून दूर, अलग राहण्यास पात्र होय असे मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे. म्हणून मनुस्मृतीच्या आणि परंपरागत धर्मशास्त्राच्या विरूध्द आजचे हिंदुसमाजसुधारक वारंवार लिहितात व प्रचार करतात.

संदर्भ: मनुस्मृति मराठी विश्वकोशातील जोशी, लक्ष्मणशास्त्री. लिखीत नोंद हा प्रतिसाद देण्याच्या वेळी जशी दिसली.

Nitin Palkar's picture

24 Jul 2017 - 9:28 pm | Nitin Palkar

+१

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2017 - 12:05 am | श्रीगुरुजी

जग पुढे चालले आहे आणि काही जण अजूनही मनुस्मृती चांगली का वाईट, ती जाळावी का पूजावी याविषयावर मंथन करीत आहेत. मनुस्मृती चांगली असली किंवा वाईट असली, ती जाळली किंवा पूजली तरी कोणालाही शष्प फरक पडणार नाही. मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिले आहे यामुळे आजच्या काळात अजिबात फरक पडत नाही कारण मनुस्मृतीप्रमाणे कोणी वागत असेल असे वाटत नाही. मी मनुस्मृती नावाचे पुस्तक/ग्रंथ अजून पाहिलेला सुद्धा नाही व त्यात काय लिहिले आहे त्याविषयी अजिबात उत्सुकता नाही. त्यात जे काय लिहिले असेल ते त्या काळाला अनुसरून असेल जे आजच्या काळाशी सुसंगत नाही.

अभिदेश's picture

25 Jul 2017 - 12:21 am | अभिदेश

पण अजूनही समाजातले काही लोक जुनाट धर्मग्रंथ नुसार राहतात आणि ते प्रमाण मानतात शब्द: ....

गामा पैलवान's picture

25 Jul 2017 - 3:36 am | गामा पैलवान

माहितगार,

मानवतावाद श्रेयस्कर की ग्रंथ प्रामाण्य ? ; विवेकवाद श्रेयस्कर की व्यक्तीवाद ?

पहिल्याप्रथम तर्कतीर्थांच्या लेखाबद्दल धन्यवाद. या लेखानुसार :

ज्ञानी,सज्जन, रागद्वेषापासून नित्य मुक्त अशांच्या ह्रदयाला पटलेला असा धर्म या मानवधर्मशास्त्रात सांगितलेला आहे

त्यामुळे मनुस्मृतीचं ग्रंथप्रामाण्य मानवतावादाच्या आजिबात विरोधात नाही.

आ.न.,
-गा.पै.

मनुस्मृतीत नक्की काय आहे याचे कुतुहल शमने एवढेच या लेखाने होऊ शकेल असे वाटते. लेखकाने अतिशय सुगमपणे आणि मुद्देसूद भाषांतर दिले आहे त्याबद्दल आभार. याचा उपयोग असा होऊ शकेल की बुद्धोत्तर काळापासून जे यम-नियम समाजात प्रचलित होते त्यांची माहिती होते. त्या नियमाप्रमाणे वर्तन किती होत होते हे अन्य साधनांच्या आधारे पडताळता येते. विशेषतः जातीप्रथा, स्त्रीदास्य याचे खरेखुरे चित्र कळण्यामागे अशा अभ्यासाचा उपयोग होऊ शकेल. मनुस्मृतीचा आजच्या काळातील उपयोग(नियम म्हणून) शुन्य आहे आणि तसाच तो रहावा. तिचा पुरस्कार किंवा घाऊक विरोध करुन उगाच अति महत्व देऊ नये असे वाटते. आजच्या नैतिक चौकटी आणि सामाजिक व्यवहाराचे नियम हे आधुनिक व्यवस्थतूनच(जसे संविधानः कालानुरूप नविन सामाजिक कंत्राटातून तयार झालेली व्यवस्था) घ्यावेत, मनुस्मृती तिथे(कितीही चांगल्या काही गोष्टी असतील तरीही) अनुकरणिय नसावी.

स्नेहांकिता's picture

31 Jul 2017 - 4:46 pm | स्नेहांकिता

भाषांतरासोबत मूळ श्लोकही द्यायला हवे, तर रेडी रेफरन्स मिळेल आणि पडताळणीसुद्धा करता येईल.

माहितगार's picture

31 Jul 2017 - 5:48 pm | माहितगार

भाषांतरासोबत मूळ श्लोकही द्यायला हवे, तर रेडी रेफरन्स मिळेल आणि पडताळणीसुद्धा करता येईल.

सहमत असलो तरी संस्कृतच्या अनुवादकात अशी परंपरा फार कमी दिसते. खरेतर शब्दवार शब्दार्थ मग लिटरल अर्थ त्या नंतर भावार्थ असा पारदर्शक क्रम हवा . असो.

ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर मनुस्मृतीचा मराठी अनुवाद उपलब्ध दिसतो. श्लोक क्रमांक कदाचित जसेच्या तसे जुळत नाहीत जरा अधिक मेहनत घेतली तर भेटून जातात किंवा किमान अंदाजा येतो.

शरद's picture

1 Aug 2017 - 2:29 pm | शरद

मिपावरील किती जणांना उपनिषदे किंवा मनुस्मृति चे संस्कृत कळत असेल ? २% ? की हा अंदाजही फार फारच जास्त वाटतो ? मी स्वत: या २ टक्क्यात बसत नाही. माझी धाव फार फार तर संस्कृत सुभाषितांपुरती.
मला शालेय संस्कृत-मराठी शब्दकोष पुरतो. ओकांचा शब्दकोश घेण्याचे राहून गेले. खैर. ह्या वेळीही संग्रहण या शब्दाचा अर्थ जाणकारांना विचारावा लागला..
सुभाषितांच्या धाग्यावरून लक्षात आले अशी माणसे फार फार तर १०-२० असतील. मग ह्या सुसंस्कृत महाजनांकरिता संस्कृत देण्यात काय अर्थ आहे ?. परत अशा लोकांना स्वत: उपनिषदे/मनुस्मृतीसारखे ग्रंथ माहीत असतातच. मी जेव्हा इथे महाभारतावर लिहतो तेव्हा ते लेखन श्री. प्रचेतस किंवा श्री.माहितगार यांच्याकरिता नाही हे उघड आहे. त्यांनी " हे ठीक " असे लिहले की अंमळ बरे वाटते हेही खरे.
मग इथे हे लेखन कशाकरिता ? आजच्या धावपळीच्या जीवनात बर्‍याच गोष्टी वाचावयाच्या राहून जातात. अनेक पुस्तके कोठे मिळतील तेही माहित नसते संपूर्ण ग्रंथ वाचावयास वेळही नसतो. थोडक्यात काही माहिती मिळाली तर हवी असते. मी एक नशिबवान माणुस आहे. मी अनेक विषयांवरील ग्रंथ वाचले; गोळा केले. आता तसा मोकळा वेळही असतो. तेव्हा अशा लोकांकरिता, ज्यांना कमी वेळात तोंडओळख करून घ्यावी असे वाटते , त्यांच्याकरिता हे लेखन. लेखांची मर्यादा, जाणूनबुजुन, ५-१० मिनिटात वाचून होईल, एवढीच ठेवतो. हे लेखन म्हणजे Ph.D चा Thesis नव्हे. तेव्हा संस्कृत श्लोक, शबदांचा अर्थ, भावार्थ, मतितार्थ इत्यादी येथे देणे मला अपेक्षित नाही. शिवाय माझ्यासारख्या रिकाटेकड्या ( पण आळशी) माणसालाही हे संस्कृत टंकलेखन करावयास किती वेळ लागेल याचा विचार करावयास लागले की दडापण येते हो.

यशोधरा's picture

2 Aug 2017 - 5:37 pm | यशोधरा

तुम्ही लिहा, काका.

स्वधर्म's picture

31 Jul 2017 - 5:47 pm | स्वधर्म

अादरणीय शरदजी,
अापण (मनुस्मृतीने नव्हे) लिहिलेली वाक्ये अशी अाहेत:
>> एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही.
तसेच,
>> भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा.
अापणांस मुळात वर्ण व्यवस्था मान्य असल्यासारखे पहिल्या वाक्यावरून वाटते. अापण अापली भूमिका स्पष्ट करू शकाल काय? वर्ण हे मुळात समाजाचे अशास्त्रियच नव्हे, तर अन्यायकारक वर्गीकरण अाहे. असे असेल, तर मनुस्मृती अाणखी चिवडण्याचे कारणच काय रहाते? हे लिहिण्याचे कारण म्हणजे अापले दुसरे वाक्य! जे मनूस्मृतीला प्रखर विरोध करतात, त्यांचा तुंम्ही तीव्र उपहास केलेला अाहे. विषय बराच सगळीकडून चघळला गेला अाहे, पण अापली भूमिका समजून घ्यावीशी वाटली म्हणून विचारतो.

गामा पैलवान's picture

2 Aug 2017 - 12:32 pm | गामा पैलवान

स्वधर्म,

वर्ण हे मुळात समाजाचे अशास्त्रियच नव्हे, तर अन्यायकारक वर्गीकरण अाहे.

प्रत्येकास आवडनिवड असतेच. त्या त्या व्यक्तीचा नैसर्गिक कल म्हणजे वर्ण.

आ.न.,
-गा.पै.

स्वधर्म's picture

3 Aug 2017 - 1:18 am | स्वधर्म

वा! छान!! कसंय ना गामाजी, अापण जर पिढ्यानुपिढ्यांच्या लाभार्थी समाजगटातून अालो असू, तर सगळ, कसं नैसर्गिक दिसतं ना! अन्याय कुठे झालाच नाही. बधा बघा अाजूबाजूला जग केवढं सुंदर अाहे, अापली संस्कृती किती महान होती. अाता काही लोकांचा नैसर्गिक कलच इतरंची घाण सा़फ करण्याचा होता, दुसर्यांनी हिसकावलेली संपत्तीच परत न मागण्याचा होता, याला ‘समाजाची सुयोग्य घडी बसवणारे’ महान ग्रंथ तरी काय करणार?
खरं म्हणजे, मूळ प्रश्न लेखकाच्या भूमिकेसंबंधी होता. इतर अनेक प्रश्नांना त्यांनी विद्वत्तापूर्ण उत्तरे दिली तरी अर्थातच त्यांना तो उत्तर देण्यासारखा वाटत नाही. असं निरागस बौध्दिक कुतूहल असणं किती छान आहे! मात्र त्याला पूर्वजन्माची पुण्याईच पाहिजे. नाहीतर अाहेतच मायावतींसारखे नतद्रष्ट लोक! इतक्या महान ग्रंथाला जाळू पहाणारे!!

पुंबा's picture

3 Aug 2017 - 10:43 am | पुंबा

++११११

विशुमित's picture

3 Aug 2017 - 11:43 am | विशुमित

प्रतिसादाला आपले +111

गामा पैलवान's picture

3 Aug 2017 - 12:35 pm | गामा पैलवान

घंटा तिच्यामारी लाभार्थी समाजगट!

माझा बाप रोज बारा तास मशीनीवर झिजायचा आन माझी माय धा तास हापिसात नडायची फायलींना. घरापास्नं लई दूर. आमी चार बुकं शिकलो कसेबसे म्हून पोटात घास पडतोय.

सांगायचा मुद्दा काये की 'लाभार्थी समाजगट' वगैरे गोंडस लेबले सरकारी मदत वितरीत करण्यासाठी उत्पन्न झालेली म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात उत्पन्न झालेली आहेत. पारंपरिक भारतीय समाजाशी तिचा काडीमात्र संबंध नाही.

-गा.पै.

गापै आपणा बद्दल आणि आपल्या वडील धार्‍यांबद्दल संपूर्ण आदर ठेऊन; आपण स्वतःचेच्याच पालकांचे उदाहरण दिलेच आहे तेव्हा आपले दोन प्रतिसाद एकत्र ठेवल्यानंतर आपल्याला स्वतःला हे कसे पटते आणि आपण विषमतेच्या (आर्थीक नव्हे उच्च नीचतेच्या मानसिक) समर्थनार्थ आपल्या मनाची समजूत नेमकी कशी काढता असा प्रश्न पडला.

मनुस्मृती भाग २ मधील आपला हा प्रतिसाद जे ब्राह्मण ...., कारू (कामगार) आहेत, ............ आहेत त्यांना शूद्र समजावे. या वाक्याचे समर्थन करतो. आपण त्या प्रतिसादात ".......विद्या विकायला काढली तर मला लोकं शूद्रच म्हणणार ना?" असे म्हटले आहे, विद्या विकणारे कामगारही असू शकतात पण रोज बारा तास मशीनीवर झिजणारा कामगार त्याचे कौशल्य विकतो. ऑफीस मधील फाईल्स लावणारी व्यक्ती सेवा विकणारी कामगार असते. आर्थीक विषमता मुक्त अर्थव्यवस्थेत टाळणे कठीण असते..

१)...पण त्यांच्या सेवांचा आणि कष्टांचा गौरव करणे दूर त्यांना ऊच्च नीचतेतील नीचत्वाची भूमिका मानसिक दृष्ट्या स्विकारावयास लावण्याचे समर्थन नेमके कसे होते ? अथवा आपण आपल्या स्वतःच्या मनाची समजूत नेमकी कशी काढता ?

२)(कामगार असून स्वतःस अभिमानाने ब्राह्मण समजून स्वतःवर वैदीक संस्कार करुन घेणारे आहेत पण मागच्या आपल्याच प्रतिसादात आपण ग्रंथ प्रामाण्याचे समर्थन करता असे म्हटले आहे म्हणजे कामगार झालेला जन्माने ब्राह्मण स्वतः आणि त्याच्या पुढील पिढ्यांसह शुद्रत्वास पोहोचतो -यात ब्राह्मणांनी स्वतःसाठी पळवाटा ठेवल्या आहेत त्या तुर्तास बाजूस ठेऊन तशा पळवाटा नाहीत असे या चर्चेपुरते समजू- अथवा कामगार होऊन शूद्रत्वास पोहोचलेल्या ब्राह्मण आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी सज्जनपणे पळवाटा शोधण्याचे नाकारुन स्वतःचे शूद्रत्व मान्य केले तर) आता माझा प्रश्न ... शूद्रांच्या मूलांना वेद शिक्षणाचा आधिकार नाकारला जातो त्या शिवाय वेदोक्त संस्कारही नाकारले जातात त्या शिवाय प्रॅक्टीकली शिक्षणही नाकारले जात होते. आपले पालक तीन शतकांपूर्वी (जन्म घेऊन) कामगार होऊन शूद्रत्वास पोहोचले असते आणि आपला जन्म त्या काळात झाला असता आणि या ग्रंथ प्रामाण्य स्विकारले तर आपणास चार बुके शिकुन पोटात घास टाकण्याची समान संधी प्राप्त झाली असती का ? तसे आपणा कडे बर्‍याच कठीण प्रश्नांची उत्तरे असतात याही प्रश्नाचे उत्तर असेल ते समजून घेण्यात रस आहे.

३) समजा आपण पळवाटीचा मुद्दा स्विकारला आहे आणि पळवाटॉत्तर बुके शिकुन पुन्हा ब्राह्मण झाला आहात तरी आपण स्वतः ब्राह्मण व्हाल पण आपले कामगार असलेले पालक ब्राह्मण कसे होतील ? आणि आपण स्वतःस आपल्या पालकांशी उच्च नीचतेची भूमिका ग्रंथ प्रामाण्याच्या दृष्टीने बाळगता का ?

आमच्या मनात उच्च नीचतेची भूमिका तीळमात्रही नाही तेव्हा आम्ही आपल्या पालकांचा स्वतःच्या पालकांप्रमाणे आदर करतो पण आपल्यासारखे ग्रंथप्रामाण्यवादी उच्चनीचतेची भूमिका योग्य म्हणून स्वतःच्या घरात स्वतःच्या मनाची समजूत कशी काढता.

आपणास चुक ठरवण्याचा अट्टाहास केलाच पाहीजे असे काही नाही. आपणास हा प्रतिसाद झेलणे हलके जावे म्हणून आपणास वाटल्यास संपदकांना विनंती करुन हा प्रतिसाद जरुर उडवावा. पण आमच्या मनात आपल्याशी मतभेद असूनही आदरच आहे हे लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

आ.न.

माहितगार

गापै, अहो, लाभार्थीचा तुंम्ही एकच अर्थ घेताय, तो म्हणजे अार्थिक. सामाजिक प्रतिष्ठा/ पायरी, शिक्षणाची संधी या तर अात्ताच्या काळातल्या ठळक गोष्टी झाल्या. वैदिक समाजव्यवस्थेचा, वर्णव्यवस्थेचा पगडा असलेल्या काळात तर एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा मनुस्मृतीने सांगितल्यात असे वर लेखकच म्हणतात. त्या काळीसुध्दा अशी व्यवस्था कुणाला कशी समर्थनिय, काही त्याज्य नसलेली वाटू शकते?

अरविंद कोल्हटकर's picture

20 Oct 2017 - 3:24 am | अरविंद कोल्हटकर

ह्याच श्लोकावरून अगदी अलीकडे थोडे वादळ ऐसीवर उमटले होते. तेव्हा मी तेथे लिहिलेले (अंगभूत आळसामुळे) आहे तसे चिकटवतो.

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने |
पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति || मनुस्मृति ९.३
कुमारवयात पिता, तरुण वयात पति आणि वार्धक्यात पुत्र (स्त्रीचे) रक्षण करतो. स्त्रीला स्वातन्त्र्याची आवश्यकता/गरज नाही - ती स्वातन्त्र्याला योग्य नाही.
(असे वेगवेगळे अर्थ अशासाठी दाखविले आहेत की 'अर्हति' ह्याचे चपखल आणि सर्वांना पटेल असे भाषान्तर करता येत नाही,)

काही थोड्या चर्चेनंतर हेच अधिक स्पष्ट केले होते. ते असे:

'न अर्हति' ह्याचे दोन अर्थ होतील. दोन्हीमध्ये ध्वनित नकार आहे पण एकापेक्षा दुसऱ्यामध्ये तो नकार जास्त कडक आहे.
एक अर्थ म्हणजे 'आवश्यकता नाही - does not need'. दुसरा 'पात्र नाही - does not deserve'. मनूकडे त्या काळच्या समाजाचे चित्रण करणारा म्हणून पाहायचे असेल तर पहिला अर्थ वापरला पाहिजे. मनूला धोपटायचे असेल आणि स्त्रियांवरील अन्यायाचा तो एकमेव author होता असे प्रतिपादन करायचे असेल तर दुसरा अर्थ वापरावा, पहिल्याकडे ढुंकूनहि पाहू नये.
मनूच्या काळात भारतीय समाज आजच्याइतका प्रगत आणि उदार नव्हता हे उघड आहे. हे दुष्ट-ब्राह्मणी इ.इ. आज त्याज्य वाटणारे विचार भारतीय संस्कृतीतच होते असे नाही तर जगभर असेच स्त्रियांना अनुदार वाटणारे विचार समाजधुरीण स्त्रियांवर लादत होते. इस्लाममध्ये जित समजातील स्त्रिया आणि मुलांना गुलाम करून विकणे संमत होते. गुलामाच्या मालकाला आपल्या गुलाम स्त्रीचा लैंगिक वापर करण्याची पूर्ण मुभा होती. अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्‍या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. पैगंबरकालीन इस्लामचे राज्य जगावर लादू पाहणारे ISIS चे लोक हे आज प्रत्यक्षात आणून दाखवीत आहेत. मोझेसच्या कायद्याप्रमाणे अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्‍या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. मनूला स्त्रियांच्या नीच स्थितीचे कारण ठरवायचे असेल तर दुसरा अर्थ - does not deserve - वापरून ते करता येते.
पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:
पितृभिर्भ्रातृभिश्चैता: पतिभिर्देवरैस्तथा ।
पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमीप्सुभि: ॥ ३.५४
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥३.५५
स्वत:चे कल्याण इच्छिणार्‍या पिता, बन्धु, पति आणि देवर ह्यांनी त्यांना (स्त्रियांना) पूज्य मानावे आणि त्यांना भूषवावे. जेथे नारींची (स्त्रियांची) पूजा होते तेथे देवता आनन्दी असतात. जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व कार्य निष्फल आहे.
तेव्हा ’न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति’मधील ’अर्हति’ चा 'does not need' असा अर्थ लावायचा असेल तर मनूच्या लेखनाकडे अधिक उदारपणे पाहता येते - तो केवळ समाजाची तत्कालीन स्थिति दाखवीत होता असे म्हणता येते.
अर्थात आजच्या विचाराने पाहिले तर स्त्रियांना हे सक्तीचे देवपण आणि देव्हार्‍यात बंद होणे मान्यच नाही तेहि ठीक आहे. फक्ता त्यासाठी येताजाता मनूला शिवीगाळ करण्याची गरज नाही इतकेच.

मोनिअर विल्यम्सने 'अर्ह्' (१ प.) ह्याच्या अनेक अर्थच्छटा दाखविल्या आहेत. उदा. to deserve, to merit, to be worthy of, to have a claim to, to be entitled to, to be allowed to (do something), to be obliged or required to (do something), to be worth, to counterbalance. हाच धातु विनन्तीच्या अर्थानेहि वापरला जातो, जसे की 'तं सन्त: श्रोतुमर्हन्ति सदसद्व्यक्तिहेतव:।' चांगल्यावाईटाची पारख करू पाहणार्‍या सज्जनांनी ते ऐकून घ्यावे. (कालिदास.)

एवं च काय तर 'न अर्हति' चा सोयीस्कर अर्थ निवडून डोकी फोडण्यात काही अर्थ दिसत नाही.

पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:

१-
विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचार्यः स्त्रिया साध्व्या सतत देववत् पतिः ५-१५४

पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे.

२-
नास्ति स्त्रीणा पृथग् यज्ञो न व्रत नाप्युपोषणम् । पति शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ५-१५५
पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा । पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत् कि चिदप्रियम् ५-१५६
काम तु क्षपयेद् देह पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृह्णीयात् पत्यौ प्रेते परस्य तु ५-१५७
आसीतामरणात् क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीना काङ्क्षन्ती तमनुत्तमम् ५-१५८

स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते
( ज्ञानेश्वर माऊली देखील याच लाइनवर आत्महिताचा सोपा मार्ग सांगतात = पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते -अ-१६ ओ-४५६)

पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये.

एव वृत्ता सवर्णा स्त्री द्विजातिः पूर्वमारिणीम् । दाहयेदग्निहोत्रेण यज्ञपात्रैश्च धर्मवित् ५-१६७
भार्यायै पूर्वमारिण्यै दत्त्वाऽग्नीनन्त्यकर्मणि । पुनर्दारक्रिया कुर्यात् पुनराधानमेव च ५-१६८

पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे.

३-
पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ९-१५
एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् । परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ९-१६
शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् । अनार्यतां ] द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ९-१७
नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः । निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ९-१८

स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे.
झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे.

४-
अक्षमाला वसिष्ठेन संयुक्ताऽधमयोनिजा । शारङ्गी मन्दपालेन जगामाभ्यर्हणीयताम् ९-२३
एताश्चान्याश्च लोकेऽस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं योषितः प्राप्ताः स्वैः स्वैर्भर्तृगुणैः शुभैः ९-२४

अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात.
या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात.

५-
अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा । सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा -९-७८
उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणम् । न त्यागोऽस्ति द्विषन्त्याश्च न च दायापवर्तनम् -९-७९

जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे
परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये.

मनुच्या वरील नियमा संदर्भात एक बाब बघण्यासारखी आहे इथे वरील नियमात मनु पती जरी पतित असला तरी त्याची सेवा करणे ही श्रेष्ठ बाब मानतो धर्म मानतो. मात्र नारद स्मृती पाच कारणांसाठी त्यापैकी एक पतित असणे साठी स्त्रीला त्या पुरुषाचा अगदी त्याग करुन दुसरा विवाह करण्याची परवानगीही देत होती. मात्र कलिवर्ज्य या ट्रीकच्या नावाखाली हा अधिकार काढुन घेण्यात आला. मनु देखील तेच करतो मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो सरळ सरळ उलटा नियम अशा स्त्रीचा त्याग उलट पतित पुरुषानेच तीन महीन्यासाठी करावा असा आदेश देतो.

पती पतित असेल तर एकीकडे त्याच्या त्यागाची व पुनर्विवाहाची परवानगी नारद स्मृती सारख्या स्मृती देतात
व मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो )

कलिवर्ज्य संबंधातील अन्यत्र दिलेले विवेचन इथे पुन्हा चिकटवतो.

जुना मुळ नियम- स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार.

कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.

पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:

१-
विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचार्यः स्त्रिया साध्व्या सतत देववत् पतिः ५-१५४

पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे.

२-
नास्ति स्त्रीणा पृथग् यज्ञो न व्रत नाप्युपोषणम् । पति शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ५-१५५
पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा । पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत् कि चिदप्रियम् ५-१५६
काम तु क्षपयेद् देह पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृह्णीयात् पत्यौ प्रेते परस्य तु ५-१५७
आसीतामरणात् क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीना काङ्क्षन्ती तमनुत्तमम् ५-१५८

स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते
( ज्ञानेश्वर माऊली देखील याच लाइनवर आत्महिताचा सोपा मार्ग सांगतात = पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते -अ-१६ ओ-४५६)

पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये.

एव वृत्ता सवर्णा स्त्री द्विजातिः पूर्वमारिणीम् । दाहयेदग्निहोत्रेण यज्ञपात्रैश्च धर्मवित् ५-१६७
भार्यायै पूर्वमारिण्यै दत्त्वाऽग्नीनन्त्यकर्मणि । पुनर्दारक्रिया कुर्यात् पुनराधानमेव च ५-१६८

पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे.

३-
पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ९-१५
एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् । परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ९-१६
शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् । अनार्यतां ] द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ९-१७
नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः । निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ९-१८

स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे.
झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे.

४-
अक्षमाला वसिष्ठेन संयुक्ताऽधमयोनिजा । शारङ्गी मन्दपालेन जगामाभ्यर्हणीयताम् ९-२३
एताश्चान्याश्च लोकेऽस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं योषितः प्राप्ताः स्वैः स्वैर्भर्तृगुणैः शुभैः ९-२४

अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात.
या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात.

५-
अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा । सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा -९-७८
उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणम् । न त्यागोऽस्ति द्विषन्त्याश्च न च दायापवर्तनम् -९-७९

जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे
परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये.

मनुच्या वरील नियमा संदर्भात एक बाब बघण्यासारखी आहे इथे वरील नियमात मनु पती जरी पतित असला तरी त्याची सेवा करणे ही श्रेष्ठ बाब मानतो धर्म मानतो. मात्र नारद स्मृती पाच कारणांसाठी त्यापैकी एक पतित असणे साठी स्त्रीला त्या पुरुषाचा अगदी त्याग करुन दुसरा विवाह करण्याची परवानगीही देत होती. मात्र कलिवर्ज्य या ट्रीकच्या नावाखाली हा अधिकार काढुन घेण्यात आला. मनु देखील तेच करतो मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो सरळ सरळ उलटा नियम अशा स्त्रीचा त्याग उलट पतित पुरुषानेच तीन महीन्यासाठी करावा असा आदेश देतो.

पती पतित असेल तर एकीकडे त्याच्या त्यागाची व पुनर्विवाहाची परवानगी नारद स्मृती सारख्या स्मृती देतात
व मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो )

कलिवर्ज्य संबंधातील अन्यत्र दिलेले विवेचन इथे पुन्हा चिकटवतो.

जुना मुळ नियम- स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार.

कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.

'आवश्यकता नाही - does not need'. दुसरा 'पात्र नाही - does not deserve'.

...भाषांतर काहीही असो स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराची भयावहता बदलत नाही. आपल्याच जीवनात एखादा अपमानजनक प्रसंग आला तर आपण आयुष्यभर विसरू शकत नाही... कदाचित चवताळून उठतो! ...मनुस्मृतीने ही चवताळून उठण्याची सोयही बंद केली!

इतर धर्मीयांची अत्याचाराची माहिती देऊन मनुस्मृतीने केलेल्या अत्याचाराची भयावहता कमी होत नाही. किंवा त्यामुळे मनू श्रेष्ठ ठरत नाही.


स्वत:चे कल्याण इच्छिणार्‍या पिता, बन्धु, पति आणि देवर ह्यांनी त्यांना (स्त्रियांना) पूज्य मानावे आणि त्यांना भूषवावे.

सुटे श्लोक देऊन मनुस्मृतीचा गाभितार्थ टाळता येत नाही. उदा:
कल्याण म्हणजे काय? ते कशात असते? आणि ते कल्याण आहे की नाही हे कोण आणि कसे ठरवणार? ....जे धर्मात नाही आणि किंवा जे धर्माधारित नाही ते अकल्याण! कल्याण कशात तर धर्म, स्मृती यात जे सांगितले आहे त्यात... हे कोण ठरवणार तर... पिता, बंधू, पती, आणि देवर ...म्हणजे पुरुषच ना! ...आणि कशाच्या आधारे तर ..मनुस्मृतीच्या आधारे... आणि मनुस्मृतीने कसले 'भव्य' विचार मांडले आहेत ते तुम्हालाही ठावूक आहेच..

फक्ता त्यासाठी येताजाता मनूला शिवीगाळ करण्याची गरज नाही इतकेच.

जशी शिवीगाळ करण्याची गरज वाटत नाही तशी मनुने स्त्री आणि शुद्रांप्रती काय 'आदर' दाखवला हे ही अनावश्यकच ना!

कविता१९७८'s picture

20 Oct 2017 - 7:32 am | कविता१९७८

मनुस्मृती हा त्या काळातील चालीरीतींप्रमाणे लिहीला गेलाय , शेकडो वर्षे लोटलीत आजकाल फक्त आपले मत पटवुन देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. माणसाने त्यातुन चांगल्याचा अंगिकार करावा व वाईट अथवा जाचक नियम / परंपर सोडुन द्याव्यात.

मारवा's picture

20 Oct 2017 - 9:06 am | मारवा

जग पुढे चालले आहे आणि काही जण अजूनही मनुस्मृती चांगली का वाईट, ती जाळावी का पूजावी याविषयावर मंथन करीत आहेत. मनुस्मृती चांगली असली किंवा वाईट असली, ती जाळली किंवा पूजली तरी कोणालाही शष्प फरक पडणार नाही. मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिले आहे यामुळे आजच्या काळात अजिबात फरक पडत नाही कारण मनुस्मृतीप्रमाणे कोणी वागत असेल असे वाटत नाही. मी मनुस्मृती नावाचे पुस्तक/ग्रंथ अजून पाहिलेला सुद्धा नाही व त्यात काय लिहिले आहे त्याविषयी अजिबात उत्सुकता नाही. त्यात जे काय लिहिले असेल ते त्या काळाला अनुसरून असेल जे आजच्या काळाशी सुसंगत नाही.

श्रीगुरुजी आपण जो मुद्दा मांडता आहे तो जुनाच आहे . याच व अशाच मुद्द्याला श्री नरहर कुरुंदकर यांनी आपल्या मनुस्मृती : काही विचार या ग्रंथात मार्मिक उत्तर दिलेले आहे भुमिका मांडलेली आहे. असा विरोध का करावा लागतो याची कारण मीमांसा त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे आहे ( जाड ठसा मी वापरलेला आहे मुळ पुस्तकात नाही ) पटवर्धन नावाच्या विद्वानांनी केलेल्या मनुस्मुतीच्या भलामणीचा समाचार घेतांना
कुरुंदकर म्हणतात

मनुच्या समर्थकांचा हा विचार मी मुद्दामच केलेला आहे. पुष्कळदा आजचा सुशिक्षीत तरुण असे म्हणतो की, मनु गेला, मनुचा काळ गेला. आज मनुस्मृती प्रमाण मानतोच कोण ? जुन्या काळातला एक जुनाट ग्रंथ , त्याच्याविरुद्ध एवढे मोठे आकांडतांडव करण्यात अर्थ काय आहे ? या नव्या तरुण मनाला हे लक्षात आले पाहीजे की, मनुस्मृतीविरुद्ध जो प्रचार चालतो त्याचे कारण हजार वर्षापुर्वीच्या एका ग्रंथात विषमतेचे समर्थन आहे व विषमतेला पुज्य ठरवले आहे हे नाही. हा विरोध एखाद्या लेखकाच्या ग्रंथाचा नाही. मनुस्मृती हा धर्मशास्त्राचा आधारभुत ग्रंथ मानला गेला. त्या ग्रंथात नोंदवलेली समाजरचना बहुअंशी अस्तित्वात होती आणि या ग्रंथातील मनोवृत्ती तर जवळजवळ सर्वअंशी अस्तित्वात होती. पण हेही निषेधाचे प्रमुख कारण नाही.

निषेधाचे प्रमुख कारण हे आहे की, आजही मनुला आदर्श आणि पुज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.

मनुचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्र्लोक समतेचा आधार म्हणुन सांगतील. सर्वांना कमाल दारिद्र्यात राहणे भाग पाडणार्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम " ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी तिला वहीवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील.

हे सारे प्रयत्न मनुचे समर्थन करता यावे यासाठीच आहेत. हे प्रेम मनु नावाच्या माणसाविषयी नाही. मनु हा ब्राह्मणांचा व ब्राह्म्य़्णाचा संरक्षक म्हणुन ब्राह्मणांचे स्वत:च्या हितसंबंधावरील प्रेम आहे. हे हितसंबंध टिकावेत हा आग्रह च मनुच्या प्रेमाचे रुप घेतो. इहलौकिक व आर्थिक हितसंबंध धार्मिक पुज्यबुद्धीचे रुप घेऊन समोर येतात. आजही ही प्रक्रिया चालु आहे.ती स्पष्टपणे समोर असावी म्हणुनच या मनुसमर्थकांचा विचार करणे भाग असते..

ज्यांना काहीही माहीती नाही. ज्यांच्याजवळ धर्मप्रेम व श्रद्धा यापेक्षा अधिक काहीच नाही, त्यांना क्षमा करता येते व त्यांच्या सुधारणेचा प्रयत्नही करता येतो. पण जे जाणुनबुजुन आपल्या हितसंबंधांची सोय पाहतात त्यांना केवळ ज्ञान देणे पुरत नाही. त्यांना क्षमाही करता येत नाही. मनुस्मृती दहनाची कारण दिड हजार वर्षापुर्वीचा ग्रंथ नसतो. मेघातिथी व कुलुकभट्टासारखे हजार -आठशे वर्षांपुर्वीचे लोक नसतात. विसाव्या शतकातील पटवर्धनांच्यासारखे लोक या दहनाचे खरे कारण आहेत. विसाव्या शतकाचे प्रश्न विसाव्या शतकात जे दहाव्या शतकाला आदर्श मानुन करतात त्यांचा निषेध करुन प्रतिकार करुन सोडवावे लागतात. भांडण भुतकालातील मृतांशी नाही. भांडण वर्तमान काळातील हयात परंपरावाद्यांशी आहे.

शब्दबम्बाळ's picture

21 Oct 2017 - 12:29 am | शब्दबम्बाळ

सगळ्याच प्रतिसादांना अनुमोदन!
खूप व्यवस्थित आपण मांडले आहेत मुद्दे!
खास करून हे

निषेधाचे प्रमुख कारण हे आहे की, आजही मनुला आदर्श आणि पुज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.

मनुचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्र्लोक समतेचा आधार म्हणुन सांगतील. सर्वांना कमाल दारिद्र्यात राहणे भाग पाडणार्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम " ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी तिला वहीवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील.

काही लोकांचे गावकुसाबाहेर घर असणे कसे योग्य होते आणि ती त्या लोकांनीच केलेली निवड होती हे इथे मिपावरच पटवून द्यायचा प्रयत्न केला गेला आहे.
शिकलेले लोक देखील आपापल्या स्वार्थासाठी बुद्धीभेद कुठपर्यंत करतील याचा नेम नाही! मिपावर देखील वेळोवेळी याचा प्रत्यय येतोच!
त्यामुळे त्या ग्रंथातले "चांगले तेवढे घ्यावे आणि वाईट सोडून द्यावे" हे म्हणताना कुठल्या गोष्टी "चांगल्या" म्हणून लादल्या जाऊ शकतात याचीही माहिती असणे आवश्यक आहे!

आज २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश मनुचे वचन निकाल पत्रात देतो ते ही जे धडधडीत विषमतामुलक असलेले. आजही २०१७ मध्ये त्याचा पुतळा लावला जातो.
ते तर असो कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे सुशिक्षीत ज्यांना सर्व कळते आधुनिक मुल्यांचा परीचय आहे ज्यांना हिस्ट्री अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी सर्व सर्व माहीत आहे ते ज्या कहर दांभिकतेने मनु चे समर्थन करतात ते अधिक भयावह आहे.
वरील कुरुंदकरांचे निरीक्षण किती अचुक होते याचे प्रत्यंतर वारंवार येते.
मनु स्मृती चा एक संख्याशास्त्रीय अभ्यास होणे फार च गरजेचे आहे. म्हणजे उदा स्टॅटीस्टकली एकुण स्त्री संबंधातील श्लोक जी काय संख्या असेल ते सर्व एकत्र करुन. त्या नंतर त्यातील किती पॉझीटीव्ह आहेत स्त्री संदर्भात किती न्युट्रल आहेत किती काल सापेक्ष घेता येतात व किती नकारात्मक याचे वर्गीकरण व्हावे.
त्यानंतर मनुस्मृतीपुर्व वा समकालीन ग्रंथ घेउन त्यातील स्त्री संदर्भातील टेक्स्ट शी तुलना असे केल्याने
जे काय सत्य आहे तो ढोबळ टाळुन बाहेर येइलच
पण त्याने ही वर्णवर्चस्व्वादी मानसिकता जी नेणीवेत खोलवर रुजुन बसलेली आहे जी माणसांना जनावर मानते ती काय ब दलेल असे वाटत नाही.
मनुस्मृती त ले अनेक श्र्लोक भयानक आहेत उदा. हे बघा

वाणिज्यं कारयेद् वैश्यं कुसीदं कृषिमेव च । पशूनां रक्षणं चैव दास्यं शूद्रं द्विजन्मनाम् ९-४१०
शूद्रं तु कारयेद् दास्यं क्रीतमक्रीतमेव वा । दास्यायैव हि सृष्टोऽसौ ब्राह्मणस्य स्वयंभुवा ९-४१३
न स्वामिना निसृष्टोऽपि शूद्रो दास्याद् विमुच्यते । निसर्गजं हि तत् तस्य कस्तस्मात् तदपोहति ९-४१४

राजाने वैश्या कडुन व्यापार करवुन घ्यावा, सावकारी करण्याचा वा शेती करण्याचा वा पशुपालनाचा आदेश द्यावा आणि शुद्रा कडुन तिन्ही वर्णाची सेवा करवुन घ्यावी
शुद्रा कडुन सेवा दास्यकर्म करवुन घ्यावे जरी शुद्र हा विकत घेतलेला असो वा नसो. कारण शुद्र हा स्वयंभु ने (ईश्वराने ) ब्राह्मणाचा दास गुलाम म्हणुनच निर्माण केलेला आहे.
शुद्र जरी त्याच्या मालकाकडुन दास्यत्वातुन गुलामीतुन मुक्त करण्यात आला तरीही तो शुद्र दास्यातुन मुक्त होउच शकत नाही. कारण शुद्राच्या अंगात निसर्गत:च दास्यत्व आहे त्यातुन त्याला कोण मुक्त करु शकेल ?

मौण्ड्यं प्राणान्तिकं दण्डो ब्राह्मणस्य विधीयते । इतरेषां तु वर्णानां दण्डः प्राणान्तिको भवेत् -८-३७९
न जातु ब्राह्मणं हन्यात् सर्वपापेष्वपि स्थितम् । राष्ट्रादेनं बहिः कुर्यात् समग्रधनमक्षतम् ८-३८०
न ब्राह्मणवधाद् भूयानधर्मो विद्यते भुवि । तस्मादस्य वधं राजा मनसाऽपि न चिन्तयेत् ८-३८१

ब्राह्मणाला प्राणदंड देण्याऐवजी (गंभीर गुन्ह्यांसाठी ) केवळ त्याचे मुंडण करावे. ब्राह्मणाचे मुंडण करणे हा त्याच्यासाठी प्राण घेतल्यासारखेच आहे.
मात्र इतर वर्णाची व्यक्ती असेल तर तिला मात्र गुन्ह्यासाठी प्रत्यक्ष प्राणदंड च दिला पाहीजे ( तिथे अशी प्रतिकात्मक सुट नाही )

राजाला कधीही ब्राह्मणाचा जीव घेऊ देउ नये त्याला प्राणदंड देउ नये. जरी त्याने सर्वप्रकारची अगदी कुठलीही गंभीर पापे केली असतील तरी त्याचा प्राण घेऊ नये
त्याऐवजी त्याला जास्तीत जास्त केवळ राष्ट्राबाहेर काढावे. त्यातही त्याला अशा रीतीने देशाबाहेर काढतांनाही त्याचे संपुर्ण धन बरोबर नेउ द्यावे व कुठलीही इजा त्याच्या
शरीराला होता कामा नये.
या भुतलावर ब्रह्महत्येहुन मोठे दुसरे पातक नाही म्हणुन राजाने कधीही त्याच्या मनात चुकुनही ब्राह्मण हत्येचा विचारही मनात येउ देउ नये.

सहस्रं ब्राह्मणो दण्डं दाप्यो गुप्ते तु ते व्रजन् । शूद्रायां क्षत्रियविशोः साहस्रो वै भवेद् दमः ८-३८३

ब्राह्मणाने जर शुद्र वर्णाच्या रक्षित स्त्री बरोबर संग केला तर त्याला १००० पणाचा दंड आकारण्यात यावा तसेच क्षत्रिय व वैश्यांनी सुद्धा असे केल्यास त्यांना १००० पणाचा दंड आकारण्यात यावा.

याचप्रमाणे इतर ठिकाणी मनु म्हणतो की जर ब्राह्मणाला शुद्र स्त्री बरोबर संभोगापासुन जर संतान झाली असेल तर अशा मुलाला त्याच्या पित्याच्या संपत्तीतुन जो वाटा मिळेल तो एकुण संपत्तीच्या एक दशांश पेक्षा अधिक मिळता कामा नये.

Duishen's picture

22 Oct 2017 - 2:03 am | Duishen

राजस्थानच्या उच्च न्यायालयात मनूचा पुतळा आहे... कदाचित असे वाटू शकेल की नुसत्या पुतळ्याने काय होते तर राजस्थान कोर्टाचा बालविवाह रोखणाऱ्या भवरीदेवीच्या बलात्कार केसचा निकाल 'स्तुत्य' आहे...असे 'स्तुत्य' निर्णय कायद्याच्या ऐवजी मनुस्मृतीला स्मरून दिले हे पूर्णत: जाणवते!

एक मराठा लाख मराठा चालतंय काय मग ?

Duishen's picture

21 Oct 2017 - 11:44 pm | Duishen

कुरुंदकर सरांच्या लिखाणाला तोड नाही!

मारावा जी. योग्य शब्दात आणि योग्य ठिकाणी आपण सरांचे मत उधृत केले आहे!

मनु म्हणतो
शुद्र न्यायाधीश नसावा तो असेही म्हणतो की जरी ज्ञानी व जाणता असला तरीही असा शुद्र न्यायाधीश नसावा.
असे म्हणणारया मनुचा पुतळा आजही राजस्थान हायकोर्टाच्या जयपुर येथील आवारात लावलेला आहे.
http://www.thehindu.com/news/national/other-states/Activists-want-Manu%E...

"In 'Shashtras' this great country has been described as under :
"ASMAD DESHA PRASUTASYA SAKASADAGRA JANMAMAH SWAM SWAM CHARITRAM SCHIKSERAN PRITHIVYAM SARVA MANAVAN."
राष्ट्रगीताला पुरेसा आदर मिळावा या हेतुने नारायण चोकसी - १३ वर्षांपूर्वी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात 'कभी खुशी कभी गम' च्या निर्मात्यांवर दावा लावला होता.अर्जदाराचा दावा मान्य करणारे त्यावेळचे तेथील न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा यांनी नंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतांना जो निकाल दिला होता त्यात ते मनुस्मृतीतील खालील श्लोकाचा संदर्भ देतात.
ज्याची चिकीत्सा श्री अरविंद कोल्हटकरांनी ऐसी अक्षरे वरील एका लेखात केलेली आहे तो भाग असा आहे. कोल्हटकर म्हणतात

लॅटिननंतर न्यायमूर्ति संस्कृतकडे वळतात. तेथे त्यांनी दाखविलेला श्लोक धादान्त अशुद्ध आहे आणि त्याचे तेथे स्थान काय तेहि कळत नाही. ते म्हणतातः
"In 'Shashtras' this great country has been described as under :
"ASMAD DESHA PRASUTASYA SAKASADAGRA JANMAMAH SWAM SWAM CHARITRAM SCHIKSERAN PRITHIVYAM SARVA MANAVAN."
हे 'शास्त्र' कोणते हे न्यायाधीश स्वतः सांगत नाहीत पण ते 'मनुस्मृति' आहे. 'मनुस्मृती'मध्ये २.२० येथे असा श्लोक आहे:
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मन: ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवा: ॥
ह्या श्लोकात कोणत्याच great country चे वर्णन नाही. काय आहे तर असा आदेश की 'ह्या देशात जन्मलेल्या ब्राह्मणापासून (एतद्देशप्रसूतस्य अग्रजन्मनः सकाशात्) सर्व लोकांनी आपण कसे वागावे ते शिकावे (स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्). (क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्यांनी जन्माने सर्वोच्च असलेल्या - अग्रजन्मन् - कडून आपापल्या जातीस योग्य असे वर्तन शिकावे.) ह्या कालबाह्य निर्देशनाला येथे का आणले आहे? आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?

तर सांगायचे तात्पर्य असे की दीपक मिश्रा सारखे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ही जेव्हा अगदी आजच्या काळात ही आपल्या निकाल पत्रात मनुच्या प्रेमाने प्रेरीत होऊन त्याच्या तत्वांचे समर्थन वा प्रचार करत्तात तेव्हा जे कुरुंदकर म्हणतात ते किती सत्य आहे व आजही लागु आहे हे लक्षात येते.

मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.

पगला गजोधर's picture

20 Oct 2017 - 12:55 pm | पगला गजोधर

मारवाजी यांचे

परखड सत्य विवेचन ...
१+

मारवाजी, प्रतिसाद आवडले.

गामा पैलवान's picture

20 Oct 2017 - 8:59 pm | गामा पैलवान

मारवा,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे.

माझ्या मते ५-१५४ चा अर्थ वेगळा आहे. पती शीलभ्रष्ट, कामधर्जिणा, गुणहीन असला तरी त्याची नित्य सेवा करणारी स्त्री साध्वी समजली जाते.

२.

स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते

ही अत्युत्तम सुविधा आहे.

३.

पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये.

ज्या स्त्रियांना पतीलोकाची इच्छा आहे अशांसाठीच हे व्रत सांगितले आहे. ज्यांना इच्छा नाही त्यांच्यासाठी इतर मार्ग खुले आहेत.

४.

पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे.

यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत.

५.

स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे.

निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही.

६.

झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे.

हा तुम्ही लावलेला अर्थ आहे. माझ्या मते स्त्रियांची कुचर्या मणजे काय हे दर्शवण्यासाठी झोपून राहणे इत्यादि दुर्गुण वर्णिले आहेत.

७.

अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात.
या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात.

यांत वावगं काय आहे? या बायका नीच योनीतल्या होत्या तरीही सद्गुणी पतींची सेवा करून पूज्यत्वास पोहोचल्या. मला बायकांमुळे सन्मार्गावर आलेले पुरुषही माहितीयेत.

८.

जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे

अडचणीत असलेल्या नवऱ्याला वाऱ्यावर सोडणारी बायको काय कामाची? शिवाय इथे मनुने मद्यपान हा एक आजार म्हणून धरलेला आहे. हा स्त्रियांवर केलेला अन्याय नसून मद्यपींप्रति दाखवलेला समजूतदारपणा आहे.

९.

परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये.

माझ्या मते ९-७९ चा अर्थ वेगळा आहे. पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी असल्यास त्याचा त्याग केल्यास ते अपवर्तन होत नाही.

१०.

मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो

आजिबात नाही. उलट अशाचा त्याग केल्याने अपवर्तन घडंत नाही असा निर्वाळा देतो.

११.

मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो )

ज्या स्त्रीस पतीलोक हवा आहे, केवळ अशा स्त्रीस हे व्रत लागू पडतं. इतरांना नाही. मनु कोणालाही कसलीही परवानगी व/वा आदेश देत नाही.

१२.

कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.

माझ्या मते मनुस्मृती लिहिली गेली तेव्हा कलियुग चालू नव्हतं. त्यामुळे कलीवर्ज्य हा प्रक्षेप असण्याची दाट शक्यता आहे.

आ.न.,
-गा.पै.

१. माझ्या मते ५-१५४ चा अर्थ वेगळा आहे. पती शीलभ्रष्ट, कामधर्जिणा, गुणहीन असला तरी त्याची नित्य सेवा करणारी स्त्री साध्वी समजली जाते.

तत्कालीन स्त्री समोर दुसरा काय पर्याय होता?

२.".....पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते" ही अत्युत्तम सुविधा आहेstrong>

...आणि पुरुषांनी काय करायचे...?...

३.ज्या स्त्रियांना पतीलोकाची इच्छा आहे अशांसाठीच हे व्रत सांगितले आहे. ज्यांना इच्छा नाही त्यांच्यासाठी इतर मार्ग खुले आहेत.
पुरुषांना लग्न होऊनही सर्वच मार्ग त्याकाळी खुले होते..(आजही मोठ्या प्रमाणावर खुले आहेत... तशी सोयच करून ठेवली आहे ना!... उदा: देवदासी)

४. आणि ५
यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत.
निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही.

मनुस्मृती मनामनात रुजली आहे ह्याचे हे द्योतक! म्हणून कुरुंदकर सरांचा मारावा जी ने दिलेला उतारा महत्त्वाचा ठरतो...आपल्या पुढील प्रतीक्रीयेंवर मत देण्यात काही अर्थ नाही.

कुठ्ल्याही लेखाला काही एक उद्दिष्ट असतं. मला तुमच्या 'मनुस्मृती' ची ओळख करून देण्यामागचा हेतू काही समजला नाही. कृपया भारताला अंध:कारमय जीवन देणाऱ्या या मनुस्मृतीवर इथे संक्षेपाने देण्याच्या आपल्या उद्दिष्टावर प्रकाश टाकावा,

एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं..

सबंध लेखात केवळ वरील नमूद वाक्य एव्हडेच काय ते तुमचे 'विवेचन' जाणवले. हा लेखाचा उद्देश आहे का?

काही बाबी ह्या काळ कितीही लोटला आणि कुठल्याही भूभागावर घडल्या तरीही चूकच ठरतात कारण जर विश्लेषणाचे निर्देशक हे वैश्विक मूल्य असतील तर! स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संकल्पनेवर मनुस्मृती तपासली तर ती कुठल्याही काळावर किंवा भूभागावर चुकीचेच आहे. मनुस्मृतीला विरोध करणारे त्या काळातही असणारच पण जो जेता तोच इतिहास लिहितो!! क्रूरता जिंकली आणि सभ्यता हरली म्हणून क्रूरता गोंडस असते असे नाही!

'प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले असते' यासारखे वैचारिक फोलपणा असलेले वाक्य नाही. उदाहरण देतो - जगात सगळ्यात मोठा क्र. २ चा व्यापार कुठला...?...मुलींची आणि बालकांची वेश्याव्यवसायासाठी विक्री...आता आर्थिक निकषावर खूपच यशस्वी व्यवसाय, नाही का! जरा यात नेमके काय चांगले शोधायचे सांगता येईल का! ..यातून मिळणारा पैसा? एखाद्या अशा पिडीत स्त्रीला तीचे दु:ख विचारून बघा! एकुलता एक मानवी जन्म जेंव्हा पूर्णत: शोषणात जातो; काय चांगले शोधणार! कदाचित मनुस्मृती मानणारे शोधू शकतील; कारण अख्खी मनुस्मृती शोषणाची समर्थक आहे.

सुटे सुटे श्लोक देऊन कदाचित त्यातील भव्यपणा जाणवू शकेल पण पूर्ण स्मृतीशी निगडीत त्या श्लोकांचा अर्थ घ्यावा लागेल. तुम्ही दिलेले उदा बघू -

(४) अध्याय ४ (श्लोक २६०)
सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय.
निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये.
धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा.

सत्य म्हणजे काय? प्रिय बोल कसे असतात? जे जे धर्माधारित आहे किंवा धर्मात सांगितलेले आहे तेच सत्य आणि तेच प्रिय! आणि धर्मात काय सांगितले आहे...ते मनुस्मृतीत गठीत करून ठेवले आहे आणि मनुस्मृती काय सांगते तर स्त्री आणि शूद्रांचे शोषण! म्हणजे जे शोषणाविरुद्ध बोलतील ते असत्य आणि अप्रिय! सत्य बोलावे म्हणजे शोषणाचे समर्थन करणारे बोलावे; प्रिय बोलावे म्हणजे शोषणाच्या समर्थनार्थ बोलावे. आणि 'असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये' म्हणजे शोषणाविरुद्ध ब्र देखील काढू नये!

मनुस्मृतीला काळाच्या परीप्रेक्ष्यात जरीही चूक किंवा बरोबर ठरवायचे झाले तरही चूकच ठरते!

मारवा's picture

22 Oct 2017 - 12:06 am | मारवा

'प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले असते' यासारखे वैचारिक फोलपणा असलेले वाक्य नाही.

एक विधान चांगले आहे उदाहरणार्थ वरील मुळ लेखात शरदजींनी एक विधान दिलेले आहे.

उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.

वरील विधानातील "शुद्राकडुनही" यातील हीनतादर्शक भाव आपण सोडुन देऊ. जाउ द्या.
पुढील वाक्य पहा स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर यातील अर्थ असा वाटतो की कुल जरी नीच असले तरी अशा स्त्री चा वरच्या वर्णाच्या पुरुषा ने
पत्नी म्हणुन स्वीकारण्यास हरकत नाही असे मनु म्हणत आहे. एक प्रकारचा उदारपणा यातुन भासतो. की उच्च कुलीन ब्राह्मण वा क्षत्रिय अशा स्त्रीचा स्वीकार करु शकतो त्याला वर्णाचा अडथळा जणु नाहीच.
पण असे खरेच मनुला अभिप्रेत होते का ? म्हणजे शरदजी एकच श्लोक देतात त्यांच्या वाचकांकडे फारसा वेळ ही नाही फारसा
आता वरील शरदजींचा श्लोक लक्षात ठेउन मनु चे खालील छेद देणारे इतर श्लोक बघा.

तिसर्या अध्यायात मनु विवाह कुठल्या स्त्री शी करावा कुठल्या नाही या संदर्भात मार्गदर्शन करत आहे.

यस्यास्तु न भवेद् भ्राता न विज्ञायेत वा पिता । नौपयच्छेत तां प्राज्ञः पुत्रिकाऽधर्मशङ्कया ॥११॥

जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥

सवर्णाऽग्रे द्विजातीनां प्रशस्ता दारकर्मणि । कामतस्तु प्रवृत्तानामिमाः स्युः क्रमशोऽवराः ॥१२॥
शूद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा च विशः स्मृते । ते च स्वा चैव राज्ञश्च ताश्च स्वा चाग्रजन्मनः ॥१३॥

द्विजांचा प्रथम विवाह कर्तव्य असता सवर्ण स्त्री श्रेष्ठ होय. पण केवल कामलोलुप होऊन विवाहास प्रवृत्त होतात त्यास ह्या पुढील क्रमाने प्रशस्त आहेत. ॥१२॥
शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥

न ब्राह्मणक्षत्रिययोरापद्यपि हि तिष्ठतोः । कस्मिंश्चिदपि वृत्तान्ते शूद्रा भार्यौपदिश्यते ॥१४॥
पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्‍या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥

हीनजातिस्त्रियं मोहादुद्वहन्तो द्विजातयः । कुलान्येव नयन्त्याशु ससन्तानानि शूद्रताम् ॥१५॥

मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥

शूद्रावेदी पतत्यत्रेरुतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगोः ॥१६॥
शूद्रां शयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिम् । जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव हीयते ॥१७॥

शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥

सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥

दैवपित्र्यातिथेयानि तत्प्रधानानि यस्य तु । नाश्नन्ति पितृदेवास्तन्न च स्वर्गं स गच्छति ॥१८॥
वृषलीफेनपीतस्य निःश्वासोपहतस्य च । तस्यां चैव प्रसूतस्य निष्कृतिर्न विधीयते ॥१९॥

ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥

ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥

वरील काहीही वाचण्यास शरदजींच्या तरुण वाचकांस फारसा वेळ नसल्याने शरदजी त्यांना अगदी सार म्हणुन इतका एकच महत्वाचा श्लोक देतात तो म्हणजे

स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.

Duishen's picture

22 Oct 2017 - 12:22 am | Duishen

शरदजीचा हा धागा आणि भारतातील सर्व मनुस्मृती समर्थक हे सोयीचेच श्लोक, सोयीचेच उदाहरण समोर देऊन 'प्रत्येक साहित्यात काहीतरी चांगले असते' असे म्हणून त्यांच्या मनात रुजलेली मनुस्मृती समाजात नव्याने रुजविण्याचा प्रयत्न सतत करीत असतात असे जाणवत आहे.
...मुळात मनुस्मृतीची निर्मिती देखील ठराविक जातींच्या (केवळ पुरुषांच्या) सोयीसाठी झालेली आहे तेंव्हा असे सोयीचा धागा आणि सोयीचे श्लोक दिसत असले तर ते काही अगम्य नाही!

१- शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.

२-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.

पहील्या विधानात शंभर अश्वमेध करणारया व्यक्ती इतकेच शाकाहारी ला मिळत असलेल्या पुण्याचे वर्णन आहे म्हणजे मास न खाउन राहील्यास त्या व्हेजीटेरीयन व्यक्तीस इतके मोठे पुण्य मिळते. इतकी पुण्यवान शाकाहारी व्यक्ती आहे.

दुसरे विधान ही त्याचीच उलट बाजुने स्पष्ट समर्थन करत आहे. जर मांस खाल्ले तर इहलोकांतच नाही तर परलोकांत ही सुख मिळणार नाही. इतका मांसाहार वाईट आहे त्याज्य आहे.

आता वरील दोन्ही विधानांना छेदुन खालील विधान येते

३- मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो.

आता एकदम पलटी मारुन मांसाहारीला परलोकात ही सुख मिळणार नाही ची वार्निंग देणारा मनु सौम्य होत म्हणतो. मांस खाण्यात पाप नाही.

इतकेच होते तर एक वेळ म्हटले असते ठिक आहे थकला असेल बिचारा सांगुन पण नाही खालील श्लोक पहा

तं प्रतीतं स्वधर्मेण ब्रह्मदायहरं पितुः । स्रग्विणं तल्प आसीनमर्हयेत् प्रथमं गवा ॥३॥

ब्रह्मचार्‍याच्या धर्माचे अनुष्ठान केल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या, पित्यापासून ब्रह्मरूपी धनाचे हरण करणार्‍या, माळेच्या योगाने अलंकृत झालेल्या व उत्कृष्ट आसनावर बसलेल्या त्या वेदवेत्त्याची विवाहाच्या पूर्वी मधुपर्क विधीने पूजा करावी.

यातील मधुपर्क हा मांसाशिवाय संभवतच नाही
त्याची व्याख्याच मुळात नांमासो मधुपर्क भवति इतकी सुस्पष्ट आहे. मांस असल्याशिवाय मधुपर्क मधुपर्क च होत नाही.

तर इथे विवाह्पुर्व मधुपर्क देऊन मांस देऊन पुजा करावी असा आदेश मनु देतो. ते ही महत्वाच्या शुभ प्रसंगी मांस खाण्यास प्रोत्साहन देत आहे.

या विचीत्र चमत्कारीक विसंगती ला खुद्द ज्ञानेश्वर ही समजु शकत नाही. एकीकडे अहिंसेचे समर्थन एकीकडे मांसाहाराच्या विधी ला प्रोत्साहन

या वैदीकांच्या दांभिकते वर ज्ञानेश्वर म्हणतात

परी ते ऎसी देखा, जैशा खांडुनिया शाखा, मग तयाचियां बुडुखा, कुंप कीजे, । तैसी हिंसाची करुनि अहिंसा निफ़जविजे हा ऎसा, पै पुर्वमीमांसा निर्णो केला। जे अवृष्टीचेनि उपद्रवे, गादलें विश्व आघवें, म्हणोनि पर्जन्येष्टी करावे, नाना याग । तंव तिये इष्टीचा बुडीं, पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी, कैंची दिसे। पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा, परि नवल बापा धिंवसा, या याज्ञिकांचा। (अ-१३ ओ-२१८ ते २२३)

अर्थ- वृक्षाच्या फ़ांद्या तोडून मग त्यांचाच वापर करुन त्या वृक्षासाठी कुंपण करावे ( याला काय अर्थ आहे ?) त्याप्रमाणे प्रत्यक्ष हिंसाच करुन अहिंसा निर्माण करावी असा चमत्कारीक निर्णय पुर्वमीमांसाकारांनी केलेला आहे. पाऊस न पडल्याने सर्व प्राणी गांजले जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणुन विविध प्रकारचे यज्ञ करावेत. पण त्या यज्ञ-यागाच्या बुडाशी तर उघड उघड रोकडी पशुहिंसा च आहे मग अहिंसेची कड कशी लागणार ? जेथे केवळ हिंसाच जर पेरली जाते: तेथे शुद्ध अहिंसा कशी उगवेल ? परंतु या हिंसेला अहिंसा म्हणण्याच्या याज्ञिकांच्या धाडसाच नवल बघ बाबा

संदर्भासाठी बुल्हर चा मूळ इंग्रजी अनुवाद
3. The meaning is, that the student who, after completing his term, has become a Snataka, shall receive first, i.e. before his marriage, the honour of the Madhuparka (Ap. II, 8, 5-9) from the person who instructed him. The phrase ' who has received his heritage, the Veda, from his father,' indicates, according to the commentators, that, as a rule, the father is to teach his son. As, however, the teacher is considered the spiritual father of his pupil, pitu/z might also be translated ' from his (spiritual) father.'

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2017 - 7:08 am | श्रीगुरुजी

१- शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.

+ १

२-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.

+ १

बाकी चालू द्या.

श्रीगुरुजी
आपला प्रतिसाद कळाला नाही.
म्हणजे आपल्याला नेक्के काय म्हणावयाचे आहे ते थोडे विस्त्तारपुर्वक मांडावे.
+१ म्हणजे वरील विधा नांच्या समर्थनार्थ आहे का ?
तसेही + १ ची सांकेतीक भाषा मला समजत नाही खर म्हणजे आवडत ही नाही फारशी

शब्दबम्बाळ's picture

22 Oct 2017 - 9:30 am | शब्दबम्बाळ

मारवा जी आणि Duishen जी आपण इतका वेळ काढून सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल खरोखर आभार!
खरंच मनुस्मृती इतक्या विकृत दर्जाचा असेल याविषयी माहिती नव्हती! आणि संस्कृत भाषा अवगत असणारे अगोदरच कमी असल्यामुळे आपल्याकडे किती लोकांना याविषयी माहिती असेल काय माहित... त्या काळातदेखील किती सामान्य लोकांना यातले कळत असेल? (म्हणूनच संस्कृत मर्यादित लोकांपर्यंत ठेवली गेलेली का?)
आणि हे सगळे आपली घटना अस्तित्वात येईपर्यंत सुरु होते म्हणजे किती विकृती आपल्या समाजात होत्या(अजूनही आहेतच)... आणि या सगळ्यांना "धर्माच्या" नावाखाली चालवलं जात होत... विचार करूनच कसतरी होत...
जेव्हा तथाकथित शूद्र लोकांना या स्मृतींबद्दल आणि त्यातल्या "अत्यंत" विषमतापूर्ण श्लोकांबद्दल माहिती कळाली असेल तेव्हा काय वाटले असेल!
इतकी हजार वर्ष इतकी खराब वागणूक फक्त एका विशिष्ट घरात जन्म मिळाला म्हणून! (आता काही लोक म्हणतील वर्ण हा जन्मावर अवलंबून नव्हता! किती शूद्र ब्राम्हण झालेली उदाहरणे आहेत इतिहासात?) का विद्रोह करणार नाहीत ते... इथे ६०-७० वर्ष झाली आरक्षण देऊन तर पार जीव गेल्यासारख्या प्रतिक्रिया देतात लोक...

क्षत्रिय असोत ब्राम्हण असोत इतिहासामध्ये अनेक लोकांची नाव आहेत महान राजा म्हणून कधी महान ज्ञानी म्हणून पण या लोकांची कुठे नाव आहेत का? त्यांना इतिहासामध्ये काही स्थान तरी दिल गेलाय का कधी? हे जाणून घ्यायला आवडेल...

आताच्या मनुस्मृतीच्या समर्थकांना निषेध दर्शवण्यासाठी असले ग्रंथ जाळायलाच हवेत... आपल्या समाजात नवीन ग्रंथसंपदा निर्माण करण्याची आणि समतेच्या तत्वावर लिहिण्याची नक्कीच कुवत आहे. असले ग्रंथ फक्त इतिहासात आपण किती पाण्यात होतो आणि आता किती आहोत याचे विश्लेषण करायला राहतील.

शरदजींनी ठराविक श्लोकच का घेतले आणि या लेखांमागे त्यांचा उद्देश काय आहे हे प्रश्न आहेतच...

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2017 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे

मनुस्मृतीत सांगितले आहे म्हणून मी आज त्यातील अमूक अमूक गोष्टींचे पालन करतो असे सांगणारे किती लोक असतील?

गामा पैलवान's picture

22 Oct 2017 - 9:23 pm | गामा पैलवान

मारवा,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥

विवाहेच्छुकाच्या कुळाची चौकशी अगदी आजही सगळेच करतात. जर अपत्याच्या गळ्यात आज्याचं श्राद्ध करायचं लोढणं बांधायचं नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी ते सांगितलं आहे. ज्यांना श्राद्धादि कार्ये करायची नाहीतच त्यांनी खुशाल कोणाशीही विवाह करावेत.

२.

शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥

शूद्राला क्षात्रकन्या काय कामाची? आज कोणी आपल्या वरचढ बायको करतो का? नाकापेक्षा मोती जड कोणाला हवाय? शिवाय कोणती वधू आपल्याहून कमी स्तरावरील वर निवडेल? Women are hypergamous by nature.

३.

पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्‍या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥

इथे मनुचा संबंध येत नाही. तो इतर शास्त्रांत अमुक परिस्थितीचा उल्लेख नाही इतकंच सांगतो आहे.

४.

मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥

अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?

५.

शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥

इथे मनु अत्री व गौतामांची मते पुनरोक्त करतो आहे.

६.

सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥

जो भोगलोलुप आहे तो खरंतर ब्राह्मणच नव्हे. यांत चुकीचं ते काय?

७.

ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥

श्राद्धादि कर्मे पार पाडण्यासाठी शुद्धीची अपेक्षा आहे. भोगलोलुपतेमुळे मन बिघडतं. बिघडलेल्या मनाने केलेलं कोणतं कार्य फलद्रूप होईल? पण जर शूद्र स्त्री उत्तम चालीरीतींची असेल (उदा. : शारंगी व अक्षमाला) तर कोणताच प्रत्यवाय नाही.

८.

ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥

हे असं मनुच्या वेळेस होतं. तुम्ही आजची शुद्धीकरण प्रक्रिया सांगा. आपण राबवू.

असो.

एकंदरीत ज्यांना पितृकर्मे वगैरे धडपणे पार पाडायची आहेत अशांसाठी मनुस्मृती आहे. ज्यांना अशी गरज वाटंत नाही त्यांनी खुशाल दुर्लक्ष करावं.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

23 Oct 2017 - 6:00 pm | मारवा

मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥

अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?

म्हणजे द्विजानी शुद्र स्त्री शी विवाह केल्याने त्याचे अधपतन होइल त्याचा मान संपेल ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2017 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

मारवा,
तुमचे मन:पूर्वक धन्यवाद. तुमच्या मुद्देसूद प्रतिसादांमुळे इथल्या अट्टल टनाटनींचे बुरखे टराटर फाटले. त्यांना असेच उघड केले पाहिजे. ब्रम्हकपटी टनाटन्यांचा निषेध असो!

गामा पैलवान's picture

23 Oct 2017 - 12:53 am | गामा पैलवान

मारवा,

आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?

मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. एक उदाहरण देतो.

भारतात ढिगाने जातीजातींची संमेलनं भारतात. पण पहिलं अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मणसंमेलन नाशिकात भरलं होतं (२००५ साली? ) तेव्हा आख्ख्या भारतभर कोण प्रसिद्धी लाभली होती. लोकं आजूनही ब्राह्मणांचा आदर करतात. तो जातीने ब्राह्मण असलेल्यांचा नसून ते ज्या ब्राह्मण्याचं प्रतिनिधित्व करतात त्या ब्राह्मण्याचा आदर आहे.

सांगायचा मुद्दा काये की जातीने ब्राह्मण असलेला माणूस ब्राह्मण्याने वागला तर आजही हिंदूंच्या आदरास पात्र होतो.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

23 Oct 2017 - 8:51 am | माहितगार

ब्राह्मण्य म्हणजे काय ?

माहितीगार जी चा एक प्रश्न योग्य आहे की 'ब्राह्मण्य' म्हणजे काय.

आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?
या प्रश्नाला तुम्ही खालील उत्तर दिले आहे -
मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल...

म्हणजे ब्राह्मण्याची मनुस्मृतीकृत व्याख्या आणि वर्तन तुम्हाला मान्य आहे. हरकत नाही, कारण ते तुम्ही मान्य केले नसते तरीही आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत...

विसाव्या शतकाच्या सुरवातीला 'हिंदू कोण?' अशी वाद / चर्चा आर्य समाज आणि तत्कालीन इतर हिंदू संघटनामधे मोठ्या प्रमाणावर झाली. जे वेद मानतात ते हिंदू की भगवतगीता मानतात ते हिंदू? ..आणि जे दोन्ही मनात नाहीत त्यांचे काय? मोठा कळीचा प्रश्न होता. शिवाय केवळ चार वर्णांचाच उल्लेख मग दलितांना कुठे बसवणार?...त्यांचा गुलाम म्हणून होणारा वापर सुखासुखी सोडवत नव्हता. पुन्हा प्रश्न राहिला तो आदिवासी समाजाचा, भटक्याचा... त्यांना गुलाम म्हणून कोठे बसवणार याचा! एक महत्त्वाची नोंद अशी की शिवाजी महाराजदेखील 'हिंदवी स्वराज्य' असा शब्दप्रयोग करतात; 'हिंदू स्वराज्य' असा नाही. सावरकरांची भू-राजकीय व्याख्या ही धार्मिक मानून हिंदू संघटनांची वाटचाल सुरु झाली... अजून एक वाद जो १९९५-९६ पर्यंत चालला; तो म्हणजे हिंदू हा धर्म की हिंदू ही संस्कृती... आणि त्यानंतर हिंदू म्हणवून घेणाऱ्या बहुतेक राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या 'विद्वत्ताप्रचुर' वाक्यावरून असे जाणवते की 'वेळ पडली तर संस्कृती म्हणून शब्द वापरावा आणि वेळ पडली तर धर्म म्हणून शब्द वापरावा'.

तुमची हिंदूची व्याख्या काय? धार्मिक, सांस्कृतिक की भू-राजकीय?...१०० कोटी हिंदू असा उल्लेख केला म्हणून जिज्ञासा जागी झाली. पण असो! आपल्यापेक्षा श्री. मोहन भागवत सरांनी 'इंडियन एक्स्प्रेस' समूहाला दिलेली व्याख्या बघू. त्यांच्या मतानुसार 'जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू! इथला मुस्लीम, ख्रिचन, सिख, इसाई हे सर्व हिंदू!' किती व्यापक वाटत ना वाचून! पण ठराविक लोक काय मानतात यावरून देश नक्कीच चालत नाही...

तुमचे १०० कोटीचे हिंदू मिथक बघू...२०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिम १३.४%; ख्रिश्चन २.३%; शीख १.९%; बौद्ध ०.८%; जैन ०.४%; इतर ०.६%; धर्म न सांगणारे ०.१% = १९.५%.... हे सर्व स्वत:ला हिंदू मानतात काय? ..तर उत्तर निखालसपणे 'नाही' असेच आहे.

ही झाली सरकारी आकडेवारी... जरा आरक्षणावरून; ..पण हिंदूत्व नाकारणाऱ्याकडे बघू - दलित १५% पण यातील ०.८% बौद्ध सर्वच दलित होते असे गृहीत धरू आणि वगळू करण टक्केवारी दोनदा मोजायला नको... म्हणून दलित १४.२%; आदिवासी ७%; भटक्या आणि विमुक्त जाती-जमाती ३%; ओबीसी समाज ५२% असला तरीही त्यातील ५-६%% समाज जागृत होऊन हिंदू धर्म नाकारतोय अगदी महाराष्ट्र घ्या किंवा युपी! एका मिपाच्या धाग्यावर आणि महाजालातील काही संकेतस्थळावर भारतातील नास्तीकांची संख्या ३% असावी असा कयास व्यक्त केला आहे...म्हणजे आरक्षणातील आणि नास्तीकातील (१४,२%+७%+३%+५%+३%) = ३२.२% समाज स्वत:ला हिंदू समजत नाही. म्हणजे एकूण लोकसंख्येतील १९.५%+३२.२% = ५१.७% भारतातील समाज स्वत:ला हिंदू समजत नाही... शिवाय शिवधर्म स्वीकारणाऱ्याची टक्केवारी अजून उपलब्ध नाही. लिंगायत समाज हा स्वत:ला वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करतोय. तो स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ इच्छित नाही..... मग हे १०० कोटी आले कुठून?

जात हे हिंदू समाजाचे व्यव्वछेदक लक्षण आहे तेंव्हा आदिवासी समजात फिरतांना त्यांना मी हिंदु असण्याविषयी विचारले होते.. तुम्हीपण विचारू शकता अगदी कातकरी, गोंड समाजांना! त्यातील अर्ध्याधिक जणांना हा शब्द माहिती माहिती पण नाही...ज्यांना माहिती आहे त्यांना मी त्यांचा वर्ण विचारला तर ते ही सांगता आले नाही कारण आदिवासी समाज हा निसर्गपूजक, वनस्पतीपुजक किंवा प्राणीपुजक आहे त्यांना हिंदू शब्दाशी काही देणे-घेणे नाही. तेंव्हा आदिवासींना कागदोपत्री हिंदू म्हणण्याचा निणर्य कधी झाला हे पाहणे रोचक ठरेल... आणि असा निर्णय भूभागवाचक असणार धर्मवाचक नव्हे!

तेंव्हा १०० कोटीच्या मिथकाबाबत आपणास शुभेच्छा!

"तेव्हा आख्ख्या भारतभर कोण प्रसिद्धी लाभली होती."

मिडिया कुणाच्या हातात आहे याबाबत आपल्या विधानाने नि:शंक झालो.

गामाजी
आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?

अहो प्रतिसाद तरी नीट वाचा ना एकदा. हा प्रश्न श्री अरविंद कोल्हटकरांनी जस्टीस दीपक मिश्रा यांनी त्यांच्या निकालपत्रात जो मनुचा श्लोक दिलेला आहे त्यावर टीप्पणी करतांना विचारलेला प्रश्न आहे.

गामा पैलवान's picture

23 Oct 2017 - 1:16 pm | गामा पैलवान

मारवा,

माझ्या मते स्वं स्वं चरित्रं हा त्या श्लोकाचा गाभा आहे. ब्राह्मणाचं चरित्र हेच ब्राह्मण्य आहे. तेच जर नसेल तर उरलेल्या श्लोकास काही अर्थ उरंत नाही. अगदी अग्रजन्मन् जरी असला तरी त्याला चरित्र हवंच. प्रस्तुत श्लोकात कसलाही आदेश नाही. कसं असावं ही अपेक्षा मात्र व्यक्त केली आहे. हिलाच जर तुम्ही ब्राह्मण्याचा उदोउदो म्हणणार असाल तर शंभर कोटी हिंदूंना तो मान्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

मारवांचे प्रतिसाद खुप आवडले..
बर्‍याच गोष्टी उलगडल्या..

मारवा,

म्हणजे द्विजानी शुद्र स्त्री शी विवाह केल्याने त्याचे अधपतन होइल त्याचा मान संपेल ?

वसिष्ठ व मंदपाल यांचा मान शूद्र स्त्रियांशी विवाह केल्याने संपला नाही.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

24 Oct 2017 - 8:25 am | मारवा

अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?

वसिष्ठ व मंदपाल यांचा मान शूद्र स्त्रियांशी विवाह केल्याने संपला नाही.

वसिष्ठ व मंदपाल या वाघांनी गवत खाऊनही ?