गोरखधंदा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Jan 2017 - 1:47 am

"शूक.. शूक.." गल्लीतून आवाज आला.
आपण तशी डेरींग कधी केली नाय. पण या झ्याट जिंदगीत बाकी ठेवलंय तरी काय. आपण या घोळक्याला उभा कोलतो.
पोरसवदा उभारलेली एकटी दिसली. मग तिच्यासमोर जाऊन खिशात हात घालून उभारलो. सालं आपलं काळीजसुद्धा किती बेभरवसा धडाकतं.

"बैठना है?" असं तिनं विचारलं. सरळसोट. मनानं ती किती नागडी आहे हे एका झटक्यात समजलं.

"कितना?" सौदा हा असाच होत असावा. आता जरा धीर आला होता.

"सौ रुपय.."

तू मागितलं आणि मी दिलं. एवढं सोप्प वाटलं का हे?

"पचास दूंगा.."

"चलेगा.." पापणीही न लवता तिनं धडक उत्तर दिलं.
"फुल ओपन चाहीये.." तिला नक्की मी काय म्हणतोय ते समजलं नसावं. पण नंतर तिच्या लक्षात आलं.

"ठिक है, आओ.." म्हणत रस्त्यावरुन ती एका बोळकांडात शिरली.

बाजूच्या घोळक्यातून "अरे हिजडा है वो.." अशी एक रांड अशी एका सांड माणसाला सांगत होती. बहुतेक त्यांचा सौदा फिस्कटला असावा.

"इधरसे.." त्या पोरीनं मला आत बोळकांडात बोलावून घेतलं. एकदम ठरकी घरं होती ती. अंधारात काही दिसतही नव्हती. दोन चार बोळकांडे ओलांडल्यावर एका घरात शिरली ती. तिथे तर स्वयंपाकपण चालू होता. धूर सगळा घरात.
इथे? इथे करायचं हे सगळं?

पिवळ्या बल्बचा जेमतेम उजेड. आत अजून एक खोली होती. त्याला जोडून अजून तीन चार खोल्या. उंदरांच्या बिळांसारखी इथली घरेही एकमेकांना जोडलेली.
पलंगावर मी बसलो.
"दे दो पैसा.." ती पोरगी म्हणाली.
"होने के बाद दूंगा.." मी म्हणालो.

"ऐसा नही चलता यहा पे , पैले पैसा देना पडता है.."
मग विचार केला.
"ठिक है.." मी पन्नासची नोट काढून दिली. तिनं ती 'ब्रा'च्या आत ठेऊन दिली.

"और?"
"और क्या?"
"सौ रुपय लगता है.."

मनात गोंधळ माजला.

"लेकीन मैने तो पचास बोला था.."

"वो बाहर बतानेका रेट है, अंदरका रेट अलग होता है"

ही तर सरळ सरळ मला फसवायला निघाली होती. आता मात्र मी खवाळलो.

"नै चाहीये, दे दो पैसा वापस. मै जाता हू" मी उठून उभा राहात म्हटलं.

"इधर क्या भाजीपाला है क्या बे, चला आया उठके. एकबार लिया हुआ पैसा वापस नही मिलेगा" फार मोठं भांडण चालल्यासारखं ती जोरजोरात बोलत होती.

तिची बडबड ऐकूण बाजूच्या खोलीतली अजून एक कुठलीतरी रांड तिथे आली.

"इतना हट्टाकट्टा है, कमर तोड देगा हमारी. सौ तेरेलिये ज्यादा है क्या?" ती दुसरी रांड म्हणाली.

ती स्वयंपाक करणारी जाडीभरडी बाईपण आमचा तमाशा बघायला आत आली.

वेश्यावस्तीत खून का होतात. मारामाऱ्या का होतात. नेहमीच लफडी कशी होतात.?
कारण, या साल्या रांडा खूप नीच असतात.

पन्नास रुपायाला चुना लावून शेवटी मी त्या बोळकांडातून बाहेर पडलो.

जर्द गुटखा माणिकचंद. सिगरेट पानपट्टी बीडी. एडस्.
डंपिंग कचऱ्याचा ढिगारा. मटन मार्केट. कोपऱ्यात जाऊन उभारलो. आणि रांडवड्याकडे बघून थुकलो.

फुटपाथवर पडलेला लुळा पांगळा देह. डुक्कर. रेल्वे. मुतारी.

बसस्टँडवर आलो तेव्हा सामसूम होती. भिकारी सोडले तर तिथं काही न्हवतं. राऊंडात एक चक्कर टाकली. हे बसस्टँडपण एखादा रोग झाल्यासारखं निपचित पडलं होतं. उभ्या उभ्याच आडोश्याला उफाळती धार मारुन बैल मोकळा केला. मग तोटीवर जाऊन तोंड धुतलं. रुमाल काढला. कडक इस्त्रीचा. तोंड पुसत मग पुन्हा बसस्टँडवर आलो. कुर्द बाकडं निवडलं आणि बसलो. आपल्याला कसलं व्यसन नाय. सुपारीचं खांडसुद्धा आपण कधी खात नाय. दारुला काय आपण व्यसन मानत नाय. कधी कधी गांजा ओढतो. तेवढंच.

बाकड्यावर आडवा झालो. थंडगार वाऱ्याची झुळूक डोक्याला चालना देते. एक अनुभूती. एक चिरनिद्रा. मनाच्या गाभाऱ्यात शांतता.

झोप लागणारंच होती की डोक्यात एक झ्याटू प्रश्न आला. की बाबा हे असं कसं?

आणि मला खिशातलं ते मशीन आठवलं.

तडक उठून बसलो. आजूबाजूचा कानोसा घेतला. आणि सरळ रांडवड्याकडे निघालो.

एक्स.डिडब्लू.प्रेझेंट्स...

डंपिंग कचऱ्याचा ढिगारा. ओली चिकचिकीत भिंत. चमेली मोगरा गुलाबो. और ये हसीन काली काली रात.

साला एक साधूपण त्या घोळक्यातून जाताना दिसला. मघाची ती पोरसवदा रांड तिथेच उभी होती. अगदी तशीच. अंधारातून जाऊन तिच्यासमोर उभारलो. अगदी तसाच. खिशात हात घालून.
"क्या है?" तिनं बहुतेक मला ओळखलं.
"ये ले तेरे पचास रुपय.."" मी नोट तिच्यासमोर नाचवली.

तिनं ती नोट हातात घेतली आणि काही कारण नसताना त्या नोटेकडंच बघत बसली.
"या खुदा.." ती बहुतेक अशीच काहितरी पुटपुटली असणार. "चल.." मला खूण करत ती बोळकांडात शिरली.

पुन्हा एकदा तेच ठरकी घर. धपाधप स्वयंपाक. धूर.
पण तिथं अगोदरंच कुणाचातरी प्रोग्रॅम चालू असणार. कारण मग ती मला कोपऱ्यावरच्या एका शांत झोपड्यात घेऊन गेली.

पुढं तुंबळ युद्ध झालं.

क्लिक!

पुन्हा एकदा रणांगण पेटलं

क्लिक!
घनघोर लढाई आणि उखळीच्या तोफा

क्लिक!

त्यादिवशी मला भरपूर क्लिका कराव्या लागल्या. शंभर रुपयात तिला किमान पन्नासवेळा तरी झोपड्याची कडी आतून लावावी लागली.

शेवटी शंभर रुपये उडवून मी त्या बोळकांडातून बाहेर पडलो.

फुटपाथ. वडाप. गाई म्हशी डुकरं. अर्थात गाढवांना विसरुन चालणार नाही.

बसस्टँडवर आलो तेव्हा नेहमीचीच सामसूम. भिकारी सोडले तर तिथं काही न्हवतं. कुर्द बाकडं निवडलं आणि झोपलो. बरीच रात्र झाली होती.
थंडगार वाऱ्याची झुळुक मनात एक विचार घेऊन आली.
मी नॉब ऍडजस्ट केला.

क्लिक!

"शूक.. शूक.." गल्लीतून आवाज आला.
आपण तशी डेरींग कधी केली नाय. पण या झ्याट जिंदगीत बाकी ठेवलंय तरी काय. आपण या घोळक्याला उभा कोलतो.
पोरसवदा उभारलेली एकटी दिसली. मग तिच्यासमोर जाऊन खिशात हात घालून उभारलो. सालं आपलं काळीजसुद्धा किती बेभरवसा धडाकतं.

"इधर सिव्हील हॉस्पिटल किधर है?" मी आपला एक भोळाभाबडा प्रश्न केला.

"ये रंडीबजार है, पता पुछनेको इधर आया?" ती हसतच म्हणाली. "बसस्टँड के उस पार है, जा"

मी लगेच कलटी मारुन तिकडे चालू लागलो.

[ याआधी : ]

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

7 Jan 2017 - 1:53 am | पिलीयन रायडर

नेहमीप्रमाणेच.. काहीच कळलं नाही..

शिवोऽहम्'s picture

7 Jan 2017 - 3:26 am | शिवोऽहम्

जव्हेरगंजभाऊ, नेहेमीच पहिल्या धारेची कशी येते तुमच्या लेखणीतुन?

फेरफटका's picture

7 Jan 2017 - 4:00 am | फेरफटका

झकास जव्हेरभौ! तुमची कथा मांडणीची स्टाईल नेहेमीच हटके असते. दिल को छू जाता है आपका अंदाज-ए-बयाँ!!

तुषार काळभोर's picture

7 Jan 2017 - 6:24 am | तुषार काळभोर

पंन्नासवेळा व सिव्हिल हॉस्पिटल यांचा काही संबंध आहे का?

संदीप डांगे's picture

7 Jan 2017 - 8:52 am | संदीप डांगे

नेहमीप्रमाणे कडक !

वरुण मोहिते's picture

7 Jan 2017 - 12:16 pm | वरुण मोहिते

मस्त

इरसाल कार्टं's picture

7 Jan 2017 - 12:49 pm | इरसाल कार्टं

अप्रतिम

नँक्स's picture

7 Jan 2017 - 1:26 pm | नँक्स

नेहमीप्रमाणे कडक !

गामा पैलवान's picture

7 Jan 2017 - 4:56 pm | गामा पैलवान

जव्हेरगंज,

भडव्याशी पंगा परवडला पण रांडेशी नको वाटतो.

पसंत अपनी अपनी.

आ.न.,
-गा.पै.

उगा काहितरीच's picture

7 Jan 2017 - 5:00 pm | उगा काहितरीच

कळाली नाही.

Ranapratap's picture

7 Jan 2017 - 7:14 pm | Ranapratap

एकदम कडक दादा

चांदणे संदीप's picture

7 Jan 2017 - 11:30 pm | चांदणे संदीप

जव्हेरभौ... टाईम मशीन जरा देता का वापरायला?
पुढचे काही भाग वाचून घेतो!

Sandy

Ujjwal's picture

7 Jan 2017 - 11:38 pm | Ujjwal

एकदम झकास...!

प्रियाभि..'s picture

8 Jan 2017 - 1:45 am | प्रियाभि..

जबराट..
पण आधीचे भाग वाचल्याशिवाय कळत नाही ..

योगेश कोकरे's picture

8 Jan 2017 - 1:19 pm | योगेश कोकरे

ख्रिस्तोपर नोलन च्या चित्रपटाच्या कुठे ची कॉपी वाटते.फक्त देशी मसाला भरलाय असा वाटतंय .....असो कॉपी पेस्ट कारण गुन्हा नाहीय

जव्हेरगंज's picture

8 Jan 2017 - 2:47 pm | जव्हेरगंज

कोणता चित्रपट?
जरा सविस्तर सांगा की मालक!

कॉपी पेस्ट कारण गुन्हा नाहीय >>>>> असहमत. हा गुन्हा आहे. कैच्याकै फेकु नका.

ज्योति अळवणी's picture

9 Jan 2017 - 10:10 pm | ज्योति अळवणी

थोडा गोंधळ उडाला आहे. बहुतेक पुढील भागात लक्षात येईल

सगळे भाग वाचले. फारसे काही समजले नाही. त्या मशीनमुळे मनुष्यास भविष्यातले कळतेय किंवा हवे तसे भूतकाळात जाता येतेय असे काहीसे वाटतेय. गोंधळ उडाला आहे.

रातराणी's picture

10 Jan 2017 - 10:26 am | रातराणी

क आणि ड आणि क !