चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
8 Dec 2016 - 5:12 pm

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन
व्हिडिओ लेखमाला

चला, शिकू या ओरिगामी भाग १ - कागदपुराण, भाग २ - डोंगर-दरी, मूलभूत आकार
या मूलभूत घड्या आणि मूलभूत आकार वापरून पुढील भागांत काही सोप्या ओरि-कलाकृती बनवू या.

डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.)

या भागात अगदी सोप्या तीन कलाकृती करू या. तीन-चार घड्या घालून तयार होणार्‍या या कलाकृती आहेत.
कप आणि ट्रे तर कमीत कमी एकदा तरी उपयोगातही आणता येतील. ओरिगामीच्या या प्रकाराला ‘युटिलिटी ओरिगामी’ असं म्हणतात.

कप - फक्त दोन-तीन घड्या घालून हा कप तयार होतो. ड्युओ किंवा बायकलर कागद वापरूनही हा तयार करता येईल.

https://youtu.be/INkXQ0wmf20

ट्रे - आयताकार कागद वापरून चौरसाकार ट्रे तयार होतो. मग चौरसाकार कागद वापरून आयताकार ट्रे तयार होईल... करून पाहा.
कबर्ड फोल्डपासून सुरुवात करून हा ट्रे तयार होतो.

https://youtu.be/nlag9emJqWw

पेंग्विन – मी काळ्या रंगाचा कामी वापरला आहे, पण तुम्ही कोणत्याही रंगाचा कागद वापरा. आपला पेंग्विन आपल्याला हव्या त्या कोणत्याही रंगाचा असू शकतो!
काइट बेसपासून सुरुवात करून हा सोपा पेंग्विन तयार होतो.

https://youtu.be/2imcqVMW3RM

अगदी सोपी कला आहे की नाही ही? कोणालाही सहज जोपासता येईल अशी! ना वयाचं बंधन, ना शिक्षणाचं.. ही कला जन्मजात, उपजत असायची पूर्वअट नाही. कोणीही अगदी सहज शिकू शकेल, फक्त थोडी चिकाटी (Perseverance) हवी.

आता तुम्हाला आत्मविश्वास आला असेल, तीन-चार घड्यांपेक्षाही थोड्या जास्त घड्या घालून कलाकृती बनवायला तयार आणि उत्सुक असाल. मग पुढील भागात प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या बेसपासून काही कलाकृती बनवू या.

आणि हो! हा व्हिडिओ बघून तुम्ही बनवलेले कप, ट्रे आणि पेंग्विन याचे फोटो प्रतिसादामध्ये जरूर दाखवा. (म्हणजे मी हे व्हिडिओज बरोबर तयार केले आहेत की नाही, ते मला कळेल.)

(क्रमश:)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Dec 2016 - 12:02 pm | मुक्त विहारि

खूप दिवसांनी मिपावर आल्याचे सार्थक झाले...

आत्ता क्लिनिकला मधेच मोकळा वेळ मिळाला पेशंट कृपेने. ट्रे करुन बघतेय!
पुभाप्र

पद्मावति's picture

9 Dec 2016 - 12:26 pm | पद्मावति

मस्त.

रच्याकने- इतके दिवस औषध कंपन्यांचे कागद वाया जातात म्हणून ठेवुन घेत नव्हते. आता तुमची सिरिज सुरु झाली तसे मागून घेते ;)
दुसरं तुमच्या सिरिजचा चांगला उपयोग होणार आहे लवकरच.आमचा एका आदिवासी वाडीवर कँप आहे.तिथे मुलांना शिकवणार सोप्या वस्तू!

सुधांशुनूलकर's picture

9 Dec 2016 - 6:48 pm | सुधांशुनूलकर

एका आदिवासी वाडीवर कँप आहे.तिथे मुलांना शिकवणार सोप्या वस्तू! - मग मलाही सांगा की. शक्य असेल तर कँपला यायला मलाही आवडेल.

सांगते नक्की.साधारण दर महिन्यातला एक शुक्रवार असतो.

सूड's picture

9 Dec 2016 - 6:55 pm | सूड

वाचतो आहेच.

सानझरी's picture

9 Dec 2016 - 7:37 pm | सानझरी

अरे वाह!! मस्तच हाही भाग.. पुढचे भाग असेच लवकर लवकर येऊ देत..
(ओरीगामी घुबड बनवण्याचं स्वप्न पाहतेय मी. :D)

पिंगू's picture

11 Dec 2016 - 11:16 am | पिंगू

आता स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची वेळ आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2016 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! हा भागही आवडला. कलाकृती बनवणे चालू झाल्याने मालिका अधिक रोचक बनत चालली आहे.

खटपट्या's picture

10 Dec 2016 - 3:34 am | खटपट्या

खूप छान !!
ट्रे लगेच बनवून पाहीला. कामाची कलाक्रुती आहे. :)

कापूसकोन्ड्या's picture

10 Dec 2016 - 8:31 am | कापूसकोन्ड्या

फोटो टाका की ओ!

खटपट्या's picture

11 Dec 2016 - 8:01 am | खटपट्या

माझ्याकडे फोटो अपलोड करण्यासाठी चेपू हे एकच साधन आहे हो. दुसरीकडे आहे का बघावे लागेल

कापूसकोन्ड्या's picture

10 Dec 2016 - 8:36 am | कापूसकोन्ड्या

क्रिएटिव्हिटि ला सलाम
तुम्ही व्हिडिओ पण उत्तम बनवला आहे. रोजच्या सकाळ मध्ये येणार्‍या कागदाच्या जाहीराती आतापर्यन्त टाकून देत होतो. आता जपायला हव्यात.

मदनबाण's picture

11 Dec 2016 - 8:56 am | मदनबाण

केवळ सुरेख... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2016 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त...
तिनही वस्तु बनवून पाहिल्या.
बर्यापैकी जमल्या
पैजारबुवा,

सुधांशुनूलकर's picture

11 Dec 2016 - 8:17 pm | सुधांशुनूलकर

काही वैयक्तिक कारणांमुळे भाग ४ लवकर प्रकाशित करता आला नाही. आता करतो आहे.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2016 - 11:29 pm | पिलीयन रायडर

मिपा युट्युब चॅनलवर इथवरचे सर्व भाग अपलोड केले आहेत!

चला, शिकू या ओरिगामी अशी प्ले लिस्ट तयार केलेली आहे.