चला, शिकू या ओरिगामी – भाग ४ – तिळगुळाची वाटी, फुलं इ.

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
11 Dec 2016 - 8:34 pm

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग ४ – तिळगुळाची वाटी, फुलं इ.
व्हिडिओ लेखमाला

चला, शिकू या ओरिगामी भाग १ - कागदपुराण, भाग २ - डोंगर-दरी, मूलभूत आकार, भाग ३ - कप, ट्रे, पेंग्विन

आता तुम्हाला आत्मविश्वास आला असेल, तीन-चार घड्यांपेक्षाही थोड्या जास्त घड्या घालून कलाकृती बनवायला तयार आणि उत्सुक असाल. मग पुढील भागात प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या बेसपासून काही कलाकृती बनवू या.

डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.)

प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब हे ओरिगामीचे अत्यंत महत्त्वाचे बेस. यांच्यापासून बर्ड बेस, फ्रॉग बेस असे इतर बेस आणि अनेक कठीण कलाकृती तयार करता येतात. आपण या दोन्ही बेसपासून प्रत्येकी दोन सोप्या कलाकृती तयार करू या. म्हणून आधी दोन प्रिलिमिनरी आणि दोन वॉटरबाँब बेस तयार करून ठेवा.

तिळगुळाची वाटी – मी शाळेत असताना शिकलो होतो. संक्रांतीला न चुकता या वाटीतून तिळगूळ वाटायचो. प्रिलिमिनरी बेसपासून तयार होते. प्रिलिमिनरी बेस तयार आहे ना? चला तर, आता वाटी बनवू या.

https://youtu.be/QGMZk4UPuCI

वॉटरबाँब – या ‘बाँब’मध्ये म्हणे पाणी भरून तो फेकून मारत असत, म्हणून या कलाकृतीवरून या बेसला ‘वॉटरबाँब’ हे नाव पडलं. आधी वॉटरबाँब बेस तयार करून ठेवला आहे ना? चला, तर.

https://youtu.be/NG3oksIJ054

फूल – वॉटरबाँब बेसपासून तयार होणारं सोपं फूल.

https://youtu.be/XYyMNP0Lqmg

लिली - प्रिलिमिनरी फोल्डपासून बनवलेलं लिली - एक पारंपरिक (Traditional) कलाकृती. लिली बनवताना एक नवी घडी – पाकळी घडी (Petal Fold) – घालायची आहे.

https://youtu.be/TjJ9FDsuTU0

प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या ओरिगामीच्या अत्यंत महत्त्वाच्या बेसवर प्रभुत्व मिळवलं, की पक्षी, प्राणी, असे आणि इतर अनेक कठीण कलाकृती तयार करता येतील.

लहानांना आणि मोठ्यांनासुद्धा – मलासुद्धा - अतिशय आवडणारा ओरिगामीचा प्रकार म्हणजे अॅक्शन ओरिगामी. बनवायला अगदी सोप्या आणि अतिशय मनोरंजक अशा, ओरिगामीतल्या हलत्या-बोलत्या काही प्राणी-पक्षी कलाकृती पुढच्या (आणि शेवटच्या) भागात तुम्हाला ओरिगामी प्रदर्शनाचं निमंत्रण देणार आहेत.

(क्रमश:)

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

12 Dec 2016 - 4:46 am | खटपट्या

हा भाग छान झाला.
पुढचा भाग शेवटचा असणार?

आत्ता वाचून बघून ठेवलंय.लगेच शेवट का करता ? :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2016 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार

अजून विमान राहिलय.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

12 Dec 2016 - 10:45 am | प्रचेतस

हा भागही खूप छान.

पद्मावति's picture

12 Dec 2016 - 4:25 pm | पद्मावति

खुप सुरेख!

सानझरी's picture

13 Dec 2016 - 11:59 am | सानझरी

करून बघतेय सगळंच.. हा भागही खूप छान.