चला, शिकू या ओरिगामी – भाग १ – कागदपुराण

Primary tabs

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
4 Dec 2016 - 1:13 am

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग १ – कागदपुराण

व्हिडिओ लेखमाला

तर मंडळी, खूप दिवसांपासूनची अनेक मिपाकरांची (आणि माझीही!) इच्छा पूर्ण करतोय. या डिसेंबर महिन्यात १८-२१ तारखेदरम्यान मुंबईत ओरिगामी प्रदर्शन आहे, त्यानिमित्त सोप्या ओरि-कलाकृती बनवायचे व्हिडिओ सादर करण्याचा हा प्रयत्न.... नेटप्याकवाल्यांची क्षमा मागून.

एकूण पाच (किंवा कदाचित सहा) व्हिडिओंच्या मालिकेतून ओरिगामीची तोंडओळख करून देण्याचा हा प्रयत्न सर्वांना नक्की आवडेल आणि ओरिगामी सहज शिकता येईल अशा प्रकारे ही व्हिडिओ लेखमाला बनवायचा प्रयत्न केला आहे. ओरिगामी ही अगदी सोपी कला आहे, हे या व्हिडिओ लेखमालेतून नक्की पटेल.

ओरिगामी म्हणजे कातरी आणि गोंद न वापरता, कागदाला फक्त घड्या घालून विविध वस्तू तयार करण्याची जपानी कला. कागदाचा जन्म चीनमध्ये झाला, त्यामुळे साहजिकच अगदी प्राथमिक स्तरावरची ओरिगामी चीनमध्ये जन्मली. मात्र कागद जपानमध्ये पोहोचल्यानंतर ही कला खर्‍या अर्थाने तिथे रुजली, वाढली, फोफावली आणि तिथून साधारणत: १९५०नंतर जगभर पसरली. जपानमध्येच या कलेला नाव मिळालं – ओरिगामी.. हा जपानी शब्द ‘ओरू’ + ‘कामी’ या शब्दांपासून तयार झालाय. ओरू म्हणजे घडी घालणं आणि कामी म्हणजे कागद. कागद हा या कलेचा कच्चा माल (Raw Material), म्हणून या पहिल्या भागात आपण कागदाच्या विविध प्रकारांची ओळख करून घेऊ.

ओरिगामीसाठी वापरल्या जाणार्‍या कागदाचे प्रकार -
कामी - एका बाजूने रंगीत, मागच्या बाजूला पांढरा.
ड्युओ - दोन्ही बाजूंना एकच रंग
बायकलर - दोन्ही बाजूंना दोन वेगळे रंग
नक्षीदार (डिझायनर) कागद
बनाना स्किन (हे नाव का पडलं? माहीत नाही.) कागद - पातळ आणि चिवट
हँडमेड कागद

https://youtu.be/uDCo1Xm0dbY

सराव करायला पाठकोरा, वापरलेला कागद, जुन्या वहीचा वापरलेला कागदही चालतो. तर, प्रदर्शनात मांडण्यासाठी, दुसर्‍याला भेट देण्यासाठी ओरि-कलाकृती बनवायला चांगला कागद वापरावा. साधारणत: ७० ते ९० जी.एस.एम.चा कागद वापरा. मात्र ‘घोटीव’ कागद अजिबात वापरू नका, कारण त्याला घडी घातल्यावर त्याचे अक्षरशः तुकडे पडतात.

बहुतेक ओरि-कलाकृती मुख्यत: चौरस कागदापासून तयार करतात. आयताकृती, त्रिकोनी कागदापासूनही काही ओरि-कलाकृती बनवता येतात. हल्ली मोठ्या शहरांमध्ये स्टेशनरीच्या मोठ्या दुकानांत, मॉलमध्ये चौरसाकार ओरिगामी कागद (कामी – एका बाजूला रंगीत असलेले) मिळतात. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाजूने मुख्य पोस्ट ऑफिससमोरून बॅलार्ड पियरकडे जाणाऱ्या रस्त्याला काटकोनात बझारगेट स्ट्रीट (पेरिन नरिमन स्ट्रीट) आणि बोरा बझार स्ट्रीट या गल्ल्यांमध्ये, फिरोजशहा मेहता रस्त्याच्या गल्ल्यांमध्ये कागदाची अनेक दुकानं आहेत, तिथे बर्‍याच प्रकारचे कागद मिळतात. परदेशात तर कामीचे असंख्य प्रकार मिळतात.

इति कागदपुराणम संपूर्णम|

पुढच्या भागात ओरिगामीच्या मूलभूत घड्या (basic creases), खुणांची चित्रलिपी आणि मूलभूत आकार (base) शिकू या.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

वा! अतिशय आतुरतेने वाट पहात असलेला धागा आला.
पु.भा.प्र.

पद्मावति's picture

4 Dec 2016 - 1:46 am | पद्मावति

फारच मस्तं. पु.भा.प्र.

एस's picture

4 Dec 2016 - 9:11 am | एस

वावावा! पुभालटा.

प्रचेतस's picture

4 Dec 2016 - 9:33 am | प्रचेतस

पुभाप्र.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Dec 2016 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

नुलकरकाकांच्या या धाग्याची प्रतिक्षा बरेच दिवस होती.
मनापासून धन्यवाद,
पैजारबुवा,

अजया's picture

4 Dec 2016 - 9:54 am | अजया

___/\___
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2016 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सुरुवात. खूप दिवसांपासून अपेक्षित असणारी मालिका सुरु झाली ! लवकर लवकर टाका पुढचे धागे.

पिशी अबोली's picture

4 Dec 2016 - 2:45 pm | पिशी अबोली

खूप उत्सुकता आहे. रफ कागद घेऊन तयार आहे..

प्रियाजी's picture

4 Dec 2016 - 3:57 pm | प्रियाजी

हा भाग खूप आवडला. तुमचा पार्श्वप्रकाशित हा शब्द फारच आवडला. व्यवहारात नक्की वापरीन.

माणिकमोति's picture

4 Dec 2016 - 9:44 pm | माणिकमोति

मुंबईत हे प्रदर्शन कधी आणि कुठे आहे? अनिल अवचट येणार आहेत का? ज़रा सविस्तर सांगाल का?

nanaba's picture

5 Dec 2016 - 10:37 am | nanaba

Vaat pahatey..

सानझरी's picture

5 Dec 2016 - 11:23 am | सानझरी

झकास.. पु.भा.प्र.
लवकर लवकर येऊदेत पूढचे भाग!!

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2016 - 11:02 pm | सुधांशुनूलकर

सर्वांचे आभार.
पुढचे भाग लवकर लवकर टाकणार आहे, कारण १५-१६ तारखेपर्यंत पाच ते सहा भाग टाकून लेखमाला पूर्ण करायची आहे.
म्हणजे एक-दोन दिवसांआड एकेक भाग प्रकाशित करायचा आहे. शेवटच्या भागात प्रदर्शनाचं निमंत्रण आणि प्रदर्शनाबद्दल सगळी माहिती असेल.

दुसरा भाग - चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार प्रकाशित केलाय.

पैसा's picture

11 Dec 2016 - 11:54 am | पैसा

अतिशय उपयुक्त धागा आणि मालिका!