चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
5 Dec 2016 - 10:52 pm

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग १ - कागदपुराण
पुढील भागात ओरिगामीच्या मूलभूत घड्या (basic creases) आणि मूलभूत आकार (base) शिकू या.

चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार
व्हिडिओ लेखमाला

डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवलेल्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाग्ङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.)

भाग १मध्ये आपण ‘कामी’चे - कागदाचे विविध प्रकार पाहिले. आता या भागात ‘ओरू’चे – घड्यांचे प्रकार, त्यांच्या खुणा आणि त्या घड्यांपासून तयार होणारे अतिशय महत्त्वाचे दोन मूलभूत आकार (प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब बेस) शिकू या.

चौरसाकार रफ कागद घेऊन बसला आहात ना? चला तर, सुरुवात करू.

डोंगर-दरी - दोन ‘घड्यां’चा डाव, याला ओरिगामी ऐसे नाव...
दरी घडी (Valley crease) आणि डोंगर घडी (Mountain crease)

https://youtu.be/aUB7VqVDaXY

काही सोपे मूलभूत आकार -
बुक फोल्ड
कबर्ड फोल्ड
हाउस फोल्ड
ब्लिंट्झ बेस
काइट बेस

https://youtu.be/NLCZYkBwVuc

आता याच घड्या घालून ओरिगामीतले अतिशय महत्त्वाचे दोन मूलभूत आकार (Base) तयार करू या.

प्रिलिमिनरी – पांढर्‍या बाजूवर दोन्ही बुक फोल्ड्स आणि दोन्ही कर्णरेषांवर डोंगर घड्या. तयार झाल्यावर मूळ कागदाच्या एक चतुर्थांश चौरस, रंगीत बाजू बाहेर येईल.

वॉटरबाँब बेस - पांढर्‍या बाजूवर दोन्ही कर्णरेषांवर दरी घड्या आणि दोन्ही बुक फोल्ड्स डोंगर घड्या. तयार झाल्यावर मूळ कागदाच्या अर्धा समद्विभुज काटकोन त्रिकोन, रंगीत बाजू बाहेर येईल.

https://youtu.be/iDqRR6udcqo

या मूलभूत घड्या आणि मूलभूत आकार वापरून पुढील भागांत काही सोप्या ओरि-कलाकृती बनवू या.

प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या दोघांवर प्रभुत्व मिळवल्यावर तुम्हाला ओरिगामी अगदी सहज जमेल, याची खातरी असू द्या.
(क्रमश:)

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2016 - 1:47 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे मलिका. लहाणपणी असे आकार बनवून त्यांची बाण, विमाने, झटकल्यावर आवाज येणारे फटाके, इत्यादी बनवत असू. आता त्यापुधे जावून वेगेवेगळे आकार कसे बनवतात याबाबत उत्सुकता आहे ! पुभाप्र.

जयन्त बा शिम्पि's picture

6 Dec 2016 - 3:39 am | जयन्त बा शिम्पि

लहानपणी मकरसंक्रांतीला आम्हाला कागदाचा चौकोनी डबा बनविता येत असे, ज्याच्या चारही कोपर्‍यातुन हलवा बाहेर काढता येत असे. तो डबा कसा बनविता येतो हे मोठे झाल्यावर आत्ता आठवत नाही. ज्याला कोणाला असा डबा बनविणे माहित असेल त्याने/तीने येथे क्रुती लिहावी अशी अपेक्षा आहे.

सुधांशुनूलकर's picture

6 Dec 2016 - 11:00 am | सुधांशुनूलकर

संक्रातीच्या तिळगुळासाठी वेगळ्या प्रकारची वाटी चौथ्या भागात.

मीही लहानपणी एक हलव्याचा डबा करायचे. चौथ्या भागात बघू कसा डबा आहे ते. नाहितर मला जो डबा माहीत आहे तो दाखवेन. (पण त्यात जर्राशी फाडाफाडी आहे. 'ओरीगामी' या संकल्पनेत ते बसतं की नाही माहीत नाही ब्वॉ)

हा असा डबा का? अम्हाला शाळेत हाच शिकवलेला..

.

खटपट्या's picture

6 Dec 2016 - 4:42 am | खटपट्या

छान!
पु.भा.प्र.

लहानपणी अशा प्रकारच्या घड्या घालून काही आकार बनवत असू त्याची आठवण झाली.
पुभाप्र.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Dec 2016 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त चालली आहे मालीका
घरी गेलो की करुन बघतो.
पुभाप्र

वरुण मोहिते's picture

6 Dec 2016 - 12:50 pm | वरुण मोहिते

ज्यांना जमेल त्यांनी यावं..छान उपक्रम

कविता१९७८'s picture

6 Dec 2016 - 1:47 pm | कविता१९७८

मस्त माहीती

अजया's picture

6 Dec 2016 - 2:18 pm | अजया

शहाण्या मुलीसारखे सगळे फोल्ड्स करुन पाहिले मग प्रतिसाद लिहितेय!
-तुमची मालिका आल्यावर लगेच चौरस कागदांचा पॅक आणलेली शिष्या!

सानझरी's picture

9 Dec 2016 - 7:22 pm | सानझरी

अगदी हेच्च म्हणते .. :D
शहाण्या मुलीसारखे सगळे फोल्ड्स करुन पाहिले मग प्रतिसाद लिहितेय!

पैसा's picture

11 Dec 2016 - 11:56 am | पैसा

आपल्याला माहीत नसताना आपण लहान असताना होडी, बाण, तिळगुळाचा डबा असे काय काय करत होतो ते हेच की!

सुधांशुनूलकर's picture

13 Dec 2016 - 4:43 pm | सुधांशुनूलकर

होडी, बाण, तिळगुळाचा डबा, विमान यासुद्धा ओरिगामी कलाकृतीच. यालाच ओरिगामी म्हणतात आणि त्यांचे मूळ अभिकल्पक (डिझायनर) आपल्याला त्या वेळेला माहीत नसतात, एवढंच.
ओरिगामी हा छंद म्हणून पुढे नेला की त्यातले आणखी प्रकार - प्राणी-पक्षी-डयनॉसॉर, टॅसलेशन, किरिगामी, स्नॅपॉलॉजी, मुखवटे-मानवी प्रतिमा, कुसुदामा, मोड्युलर ओरिगामी, अ‍ॅक्शन ओरिगामी असे विविध प्रकार नव्याने कळत जातात.