(अफवा)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
28 Sep 2008 - 7:59 am

प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली! ;)

माझ्या 'तिच्या' कथेच्या उठती अजून अफवा
'मीटिंग लेट' करता येती पिकून अफवा

नाही प्रुफे बुफेची मज सावरून गेली
गेली निघून कांता, आल्या घरून अफवा

माझेच शब्द माला फसवून नेत गेले
कोटामधून 'तिकिटे' निघता बनून अफवा

भार्येस ऐकवू का माझी खरी कहाणी
'माहेरच्या दिशांना' होत्या भरून अफवा

संतापल्यात बाई दूरध्वनी निनादे
गणगोत सर्व माझे आले खलून अफवा

करतो बळेच धावा, 'दुर्गेस' शरण मेला
अंगामधून तेव्हा आल्या सुजून अफवा

अफवांमधेच शोधे आधार बायकोही
'चतुरंग' शरण येई दाती धरून अफवा

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

28 Sep 2008 - 9:27 am | सुनील

झ्याक कविता!

माझेच शब्द माला फसवून नेत गेले
च्या ऐवजी
माझेच शब्द मजला फसवून नेत गेले
कसे वाटते?

करतो बळेच धावा, 'दुर्गेस' शरण मेला
इथे किंचित यतिभंग.

एकूण कविता छानच.

(अफवेखोर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.