काळरात्र (भाग ४) आयझँक असिमोव्ह

विचित्रा's picture
विचित्रा in जनातलं, मनातलं
1 Oct 2016 - 11:57 am

" तुम्ही हे सगळं एवढ्या ठामपणे सांगताय, कि हळूहळू माझाही विश्वास बसायला लागलाय." थरमॉन पुटपुटला. " मी तुझे लेख वाचलेत आणि काही अंशी सहमतसुद्धा आहे." शीरीन म्हणाला. " तसंच तूही आमची बाजू समजून घे." " मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या." " जरुर"
" इथे नाही." अँटन गुरगुरला."माझ्या निरीक्षकांच्या कामात व्यत्यय नको."
ते शेजारच्या कक्षात गेले. सतत भरपूर आणि शुभ्र प्रकाशाची सवय असल्यामुळे दूरवरच्या बीटा तार्याच्या मंद केशरी प्रकाशात उदासवाणं वाटत होतं. शिवाय गारवा वाढला होता. कुडकुडणार्या शीरीनने उत्तेजक पेयाची मागणी केली, पण अँटनने ती नाकारली. तो अजूनही थरमॉनकडे रोखून बघत होता. " आता मला तुम्ही समजावून सांगा. " थरमॉनने आपलं गाडं पुढे रेटलं
" " म्हणजे पुरेसा अभ्यास न करताच तू आमच्यावर आरोप करतोयंस. " अँटन तिखट स्वरात म्हणाला. " मला पार्श्वभूमी माहितेयं. . तुम्ही शास्त्रीय दृष्टीकोन सांगा. " थरमॉन उत्तरला. " त्याने सांगितलेली शास्त्रीय माहिती तुझ्या डोक्यावरुन जाईल." शीरीन मध्ये पडला. " त्यपेक्षा मी तुला समजावतो, सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दांत." काही निरोप आल्याने अँटन तेथून निघून गेला. शीरीन ने आरामशीर बैठक मारुन बोलायला सुरुवात केली." तुला हे माहितच आहे, कि आपल्या लगाश ग्रहावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या नि कालौघात नष्ट झाल्या. हे एका विशिष्ट कालखंडाच्या अंतराने वारंवार घडत असल्याचं आपल्या लक्षात आलंय. बहुतेक वेळा या संस्कृती आगीत भस्मसात झाल्याचे पुरावे मिळाले. या स्थित्यंत्तराला काही अवकाशीय घटनांचा संदर्भ असल्याचं आता सिद्ध झालंय." " पण याचा धर्मग्रंथातील थोतांडाशी काय संबंध?" थरमॉनने विचारलं. " धर्मग्रंथात सांगितलंय कि लगाशवर पापाचरण वाढलं कि तो अंधारगुहेत जातो. सगळे सूर्य नि त्यांचा प्रकाश लुप्त होतो. आकाशात ' चांदण्या' नावाचे चमकते ठिपके दिसायला लागतात. त्यांच्या प्रभावामुळे सर्व पापी लोक वेडे होतात. दुषित समाज नष्ट होतो." शीरीन हसला. " हे धर्मग्रंथ लिहिले गेले त्या काळात विज्ञानाची फारशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे घडणार्या घटनांचे लोकांनी आपल्या परीने अर्थ लावले." " पण म्हणजे खरंच असं घडणार आहे?" " हो. पुढच्या तासाभरात."

कथा

प्रतिक्रिया

हे लेख पुर्वी मनोगत.कॉम वर वाचल्यासार्खे वाट्तात. पन खरेच छान आहेत...

खूप छान चालूय.. जरा मोठे भाग टाका ना प्लीज..

विचित्रा's picture

27 Oct 2016 - 9:51 pm | विचित्रा

वाचूका जी. पण रुपांतराचा माझा पहिलाच प्रयत्न आहे हा.
सराव नसल्याने भ्रमणध्वनीवर देवनागरी टंकणं, कठिण जातं. म्हणून छोटे भाग.