काळरात्र (भाग ३) आयझँक असिमोव्ह

विचित्रा's picture
विचित्रा in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 2:52 pm

" असं बघा, या वेळी माझ्याच प्रसिद्धीचा तुम्हाला उपयोग होईल. मी तुम्हाला मुर्खशिरोमणी म्हणून सादर केल्यामुळे लोक तुम्हाला हसतील, टिंगल करतील, पण देशद्रोही नाही समजणार. बदल्यात मला पण सनसनाटी बातमी मिळेल." यावेळी बिनी पण मदतीला आला. " आम्हाला त्याचं म्हणणं पटतंय सर. जर आपल्या गणितामध्ये, गृहीतकांमध्ये एखादी चूक राहिली असेल,अगदी हजारात एक अशी, तरी त्या बाजूनेही आपण पर्याय शिल्लक ठेवला पाहिजे. " आजूबाजूच्या आपल्या सहकार्यांना माना डोलवताना पाहून अँटनचा नाईलाज झाला."ठीक आहे. थांब तुला हवं तर. पण आमच्या कामात कोणताही अडथळा येता कामा नये. मी इथल्या व्यवस्थेचा प्रमुख आहे. तुझी मतं काही असली तरी ..." एवढ्यात एका नवीन व्यक्तीच्या आगमनामुळे त्याचं बोलणं खुंटलं.
" हँलो मंडळी . काय चाललंय? " या नवीन व्यक्तीच्या चेहर्यावर चिंतेचा मागमूस नव्हता. " असं सुतकी वातावरण का आहे इथे? एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणारात तुम्ही. एवढ्यात धीर सुटला?" अँटन गोंधळून त्याच्याकडे पहात राहिला. " तू इथे काय करतोयंस शीरीन? तुला सुरक्षाकक्षात थांबायला सांगितलं होतं ना?" गुबगुबीत शरीराचा शीरीन अजून हसत होता. " कंटाळवाणी जागा आहे ती. मला इथे तुमच्याबरोबर जास्त मजा येईल. शिवाय आकाशात चांदण्या बघायची उत्सुकता आहेच." "तुझा झा विक्षिप्तपणा वाढत चाललाय शीरीन." अँटन वैतागला. " तुझा इथे काय उपयोग? " " मग तिथे सुरक्षाकक्षात तरी माझं काय काम? संकटाना तोंड देऊ शकणारे, तरुण , प्रजननक्षम स्त्री पुरुष पाहिजेत तिथे. संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आहे ना त्यांच्या वर. माझ्यासारख्या जाड्या , म्हातार्या मनोविकारतज्ज्ञ ाचा काही उपयोग नाही.
तेवढ्यात थरमॉनने विचारलंच," सुरक्षाकक्ष म्हणजे काय?" शीरीन ने त्याच्या कडे रोखून बघितलं. थरमॉनने आपली ओळख करुन दिली आणि परत तोच प्रश्न विचारला. शीरीन ने त्याला समजावलं . " हे बघ मुला, जुन्या धर्मग्रंथातूनसुद्धा , प्रलयातून वाचून सृष्टीचं नवनिर्माण करणारया पुण्यवान लोकांची वर्णनं आहेत. आपण इथे तेच केलंय. आजच्या संकटातून निदान काही लोकांना तरी वाचवता यावं, म्हणून एक सुरक्षाकक्ष उभारलाय. अामच्या प्रकल्पाशी संबंधित आणि आमच्यावर विश्वास ठेवणारे लोक कुटुंबासहित तिथे आहेत. त्यांच्या अन्न, वस्त्र निवार्याची सगळी सोय आहे. सुरक्षेसाठी शस्त्रसुद्धा आहेत. " " पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण आजपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचं जतन" अँटन मध्येच म्हणाला. " म्हणूनच तुझं तिथे असणं गरजेचं आहे शीरीन. "

कथा

प्रतिक्रिया

भारीच.. लवकर येऊ द्या पुढचा भाग.

राजाभाउ's picture

30 Sep 2016 - 3:54 pm | राजाभाउ

मस्त !!! भाग थोडे मोठे टाकलेत तर जास्त मजा येईल.

विचित्रा's picture

30 Sep 2016 - 6:03 pm | विचित्रा

श्रेय अर्थात मूळ लेखकाचे.

nanaba's picture

30 Sep 2016 - 6:10 pm | nanaba

माझी आवडती कादंबरी. २०१२ सालच्या भाकिताच्या वेळेस बऱ्याचदा आठवण यायची हिचीच.
मराठी ट्रान्सलेशन साठी गुड लक. पुं भा प्र