काळरात्र (भाग २) आयझँक अँसिमोव्ह

विचित्रा's picture
विचित्रा in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 2:16 pm

"आणखी चार तासात आपली संस्कृती नष्ट होणार आहे." अँटन उदासवाणं हसत म्हणाला." तू हे छापू शकतोस. पण वाचणार कोण?" "पण चार तासांत काहीच घडलं नाही तर?" थरमॉन हळूच म्हणाला."सगळंच बदलणार आहे." अँटनचा पारा चढला. तोच बिनीने परत हस्तक्षेप केला."पण सर, ऐकून तर घ्या,तो काय म्हणतोय." अँटनने हताशपणे मान हलवली."ठीक आहे. या तुझ्या मित्रासाठी मी तुला पाच मिनिटं देतो. बोल."
"मी एवढंच सांगतोय,कि आता घडून येणार्या घटनांचा साक्षीदार बनण्याची तुम्ही मला संधी द्या. जर या परिस्थितीत तुमची भाकितं खरी ठरणार असतील, तर माझ्या वृत्तांकनामुळे तुमचं काहीच नुकसान नाही. पण जर तुम्ही खोटे ठरलात,तर खुप चेष्टा आणि टीका होणार आहे तुमच्यावर. त्यावेळी निदान तुमची बाजू समजून घेणारे हितचिंतक मित्र तरी असतील." अँटन कुत्सित हसला. "तू आमचा हितचिंतक मित्र?" "नक्कीच" थरमॉनने पून्हा बैठक मारली होती. " हे बघा, मी नेहमीच माझ्या स्तंभातून तुम्हाला संशयाचा फायदा दिला आहे. हे शतक काही बुवाबाजी नि अंधश्रद्धांचं नाही. लोक आता धर्मग्रंथांवर विश्वास ठेवत नाहीत. आता आमच्या ज्येष्ठ संशोधकांनी पक्ष बदलला, धर्मग्रंथच बरोबर असल्याचं ते सांगायला लागले, तर लोक वैतागणारच. "
" भल्या माणसा, आम्ही धार्मिक क पुस्तकातील माहितीचा वापर केला असला, तरी त्यातून काढलेले निष्कर्ष हे पुर्णपणे शास्त्रीय सत्य आहे. त्यात गुढ, धार्मिक असं काहीच नाही. उलट आम्ही त्यांच्या गुढ गृहितकांमागचं रहस्य उघडकीला आणल्यामुळे हे धार्मिक लोक तुमच्यापेक्षा जास्त तिरस्कार करतात आमचा."
" मी वैयक्तिकरित्या तुमचा तिरस्कार करत नाही. मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, कि तुम्ही लोकांचा अपेक्षाभंग केलाय. लोक रागावलेत तुमच्यावर." " त्याने आता काय फरक पडणार आहे?" अँटनने हताशपणे खांदे उडवले. " उद्या तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे तुम्हाला ." " उद्या उगवणारच नाहीये." " पण उगवला तर? तुमच्या भाकितांमुळे समाजातील काही घटक अस्वस्थ झालेत. बाजारात घसरण झालीय. भांडवलदार पैसा गुंतवत नाहीयेत. लोक खरेदी करत नाहीयेत. चलनमुल्य उतरलय. आता जेव्हा हे नाटक संपेल, तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी नि देशाच्या अधोगतीसाठी लोक तुम्हाला जबाबदार धरतील.". " मग यात तुझा काय उपयोग आम्हाला?"

कथा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

29 Sep 2016 - 2:42 pm | राजाभाउ

वाचतोय.
पण हे काय आहे ? आयझँक अँसिमोव्ह च्या कथेचा अनुवाद आहे का ?

नीळा's picture

29 Sep 2016 - 7:05 pm | नीळा

Nightfall?

नीळा's picture

29 Sep 2016 - 7:10 pm | नीळा

Nightfall?

नीळा's picture

29 Sep 2016 - 7:10 pm | नीळा

Nightfall?

विचित्रा's picture

29 Sep 2016 - 8:38 pm | विचित्रा

हो.
आवडती कथा म्हणून अनुवादाचा प्रयत्न केलाय.

नीळा's picture

29 Sep 2016 - 8:51 pm | नीळा

मस्त आहे
भराभर पुढचे भाग टाका
मीपा वर पहील्यांदाच science fiction वाचली

विचित्रा's picture

29 Sep 2016 - 9:41 pm | विचित्रा

धन्यवाद
आणि हो, मिपावर ही कमी मलापण जाणवली होती.