ती - ८

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 2:45 am

"ती"
"ती" - २
"ती" - ३
"ती" - ४
"ती" - ५
"ती" - ६
"ती" - ७

ती - ८

प्रकाश म्हणाला की, "नेहाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत."

बोरीवलीतील साहेब आमच्या तोंडाकडे बघायला लागले. साहेबांनी मला आणि सुशांतला बाहेर नेले आणि सांगीतले की प्रकाशचे वडील त्या भागातील एक प्रतीष्ठीत व्यक्ती आहेत. त्यांनी तक्रार केलीय तर प्रकरण दाबता येणार नाही. मुलीला इथे आणून प्रकाश बोलतो ते खरे आहे का हे विचारावे लागेल. विजय घरी जाउन नेहाला पोलीस स्टेशनात घेउन आला. बोरीवली पोलीसांनी सर्वांसमक्ष नेहाला विचारले की प्रकाश बोलतो ते खरे आहे का. नेहाचा हा पोलीस स्टेशनमधला पहीलाच प्रसंग. त्यामुळे ती घाबरली होती. प्रश्न ऐकून ती रडायलाच लागली. तीने नीक्षून सांगीतले की ती प्रकाशला ओळखतदेखील नाही. प्रकाशचे वडील प्रचंड खजील झाले होते. त्यांनी तीथेच नेहाची आणि विजयची माफी मागीतली आणि यापुढे प्रकाश आपल्या भागात दीसणार नाही याची ते दक्षता घेतील असे सांगीतले.
तीथून आमची सर्वांची वरात नेहासदन कडे निघाली. विजयला माझे आणि सुशांतचे आभार कसे मानावेत हेच कळत नव्हते. नेहाच्या घरी सर्वांचा चहा झाला. आत्याही माझ्याशी व्यवस्थीत बोलली.

मी नेहाचा निरोप घेउन सुशांतला घेउन निघालो. निघताना आत्या म्हणाली, "संदीप येत जा रे. आमच्याकडे येणं टाकलंस तू"
मी विजयकडे पाहीलं विजयही म्हणाला,"येत जा रे संदीप"
मी नक्की येइन सांगून सुशांतबरोबर निघालो. खाली आलो. सुशांतचे आभार मानले.
सुशांत म्हणाला, "अरे आभार कसले, लग्नाला बोलाव म्हणजे झालं"
"बस क्या यार!" असे म्हणून मी सुशांतला मीठी मारली आणि घराकडे निघालो.

माझ्या ठरलेल्या बोरीवली एसी गाडीत बसलो मात्र पण विचारांच चक्र काही केल्या थांबेना. कीती झालंतरी प्रकाशची असं बोलण्याची हींमतच कशी झाली? कशात नाही काय आणि सरळ म्हणतो प्रेम आहे एकमेकांवर? का खरंच आहे? नाही पण माझी (माझी?) नेहा असं करणार नाही. हायला पोरी कधी काय करतील काय सांगता येत नाही. दुसर्या दीवशी सकाळी नेहाला फोन केला.
"हेलो नेहा"
"ह्म्म बोल"
"काय गं, काय झालं नंतर?"
"काही नाही रे, विजय गेला होता खाली तर त्याला कळलं की प्रकाशच्या वडीलांनी त्याला कायमचा गावी पाठवले लगेच."
"ह्म्म, मात्रा बरोबर लागू पडली तर"
"सद्यातरी असंच दीसतंय"
"पण काय गं, त्याची असं बोलायची हींमत कशी झाली"
"अरे मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय"
"मला तर ऐकल्यावर गरगरायलाच झालं होतं. वाटलं खरंही असु शकतं"
"अस्सं?"
"नाही अगं तो खूप आत्मविश्वासाने बोलला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून"
"आणि तुझा लगेच विश्वास बसला? आणि खात्री करण्यासाठी तु मला फोन केलास ना?"
"नाही तसं नाही..."
"मग कसं संदीप? तू माझ्याशी असाच बोलणार असशील तर मी फोन ठेवते..." परत फोन वर मुसमुसण्याचा आवाज....
"हेलो नेहा"
"........."
"हेलो? मी काय बोलतोय ऐकतेस का?"
"अजून काय ऐकवायचं बाकी आहे?"
"अरे, मला विश्वास होताच की तो खोटं बोलतोय..."
"मग कशाला उगाच परत परत तेच तेच उगाळतोयस?"
"ठीक आहे बाबा, तो विषय संपला बस?"
"कीती आनंदात होती मी... आणि तू असं बोलून साफ मूड ऑफ केलास"
"सॉरी बाबा. बरं मला सांग आनंदात का होतीस?"
"अरे, बर्‍याच दीवसांनी आत्या आणि विजय तुझ्याबद्दल बोलले. तू हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळलास ना, त्याने खूप इंप्रेस झालेत ते. विजयने तर सर्व हकीकत फोन करुन गावी बाबांना सांगीतली."
"अच्छा, म्हणून तुला आनंद झाला होय."
"ठेउ मी फोन?"
"अरे काय....लगेच ठेउ."
"तुला बोलावले आहे घरी परत आत्याने. माहीत आहे ना?"
"हो तर? येतो ना येत्या रविवारी"
"येत्या रविवारी मी एकटीच आहे घरी. आत्या आणि विजय गावी चाललेयत."
"असंका? मग नको. नकोच. परत कधीतरी येइन. उगाच परत गैरसमज नको."
"अरे नाही तसं काही नाही. तू ये. आत्या मला स्वत: म्हणाली की ते दोघे घरी नाहीत, तरी तू आलास तर तुला व्यवस्थीत चहा नाश्ता करुन घाल..."
"काय म्हणतेस? अशी बोलली? एवढा बदल?"
"हो ना आणि विजयपण काहीच बोलला नाही"
"पण काय गं? हे अचानक गावी चाललेत दोघे?"
"मला माहीत नाही, काहीतरी काम आहे बोलतायत. पण मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकारामुळे त्यांना आता माझ्या लग्नाची घाइ झालीय. बहूतेक गावी जाउन बाबांशी बोलून काहीतरी ठरवतील. पण मला काही सांगत नाहीत सद्या."
"बापरे, गडबड होणार"
"कसंली गडबड?"
"अगं तुझं लग्न ठरवलं तर?"
"तर काय?"
"अरे नेहा, माझं काय?"
"तुझं काय? हींमत असेल तर बोल विजयशी!"
"........."
"काय रे? घाबरलास?"
"घाबरलो नाही गं....पण..."
"ओके मीस्टर मुळूमुळू तुम्ही येताय ना रविवारी? तेव्हा बोलूयात आपण?" नेहा हसायला लागली.
"ठीकाय...येतो."
"नक्की ये. मी वाट बघीन."
"ओके. निघताना फोन करीन."
"सकाळीच ये."
"सकाळी कशाला? मॅच आहे का परत?"
"अरे ये ना सकाळी बोलू भरपूर आपण..."
"हम्म्म्म"
"ok, बाय मीस्टर मुळूमुळू!!!"

नेहाने फोन ठेवला. तीला तर सर्व मज्जाच वाटत होती. माझी अवस्था बेकार झाली होती. लग्न ठरवलं घरच्यांनी तर मी काय करणार होतो. हातात तुटपूंजा पगार. काय करणार होतो मी...नसता फोन केला तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं... पण करणार काय मन तर सारखं तीकडेच ओढ घेत होतं. हे म्ह्णजे डायबेटीस होणार हे माहीत असूनदेखील साखर खायला जाण्यासारखं होतं. फटाफट नवीन नोकरी शोधायचा निर्णय घेतला. मुंबैत ज्या होत्या त्यात जास्त पगार नव्हता पण नॉयडा, बंगळूर भागात चांगल्या नोकर्‍या होत्या. टीपीकल मराठी माणसाप्रमाणे मुंबै सोडायला मन तयार नव्हते. घरी बोलायला लागणार होते आइ बाबांबरोबर. त्याशिवाय काही शक्य नव्हतेच. रविवार कधी येतो असे झाले होते.

रवीवारी स्पेशल एसी बसने बोरीवलीला पोहोचलो. मस्त मोगर्‍याचा गजरा घेतला. आणि नेहा सदनमधे धडकलो. नेहाच्या घराची बेल वाजत नव्हती म्हणून मग कडी वाजवली. कडीच्या आवाज होताच बाजुच्या दोन फ्लॅटमधून दोन चेहरे डोकावले. नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे उघडेच होते. नेहाने दरवाजा उघडला. मला आत घेउन दरावाजा बंद करायला लागली तर मी लगेच तीला दरवाजा उघडाच ठेव हे सांगीतले. त्याबरोबर ती काय ते समजून गाल्यातल्या गालात हसली आणि आत गेली.
बाहेर आली ती मस्त डोसा चटणी घेउन आली. परत आत जायला लागताच तीला म्हणालो, "आत कशाला जातेस सारखी सारखी. इथेच बस ना. दोघेही खाउ."
"ह्म्म, माझ्यासाठी घेउन येते"
दोघांनी एकमेकांकडे बघत डोसा संपवला. नेहा सुग्रण होती. अन्नपुर्णा होती. तीला नेहमी सर्वांना चांगलं करुन खायला घालायला आवडायचं. हे माझ्यासाठी चांगलं होतं. मी ताटात पडेल ते खाणारा. अगदी कार्ल्यापासून मटणापर्यंत मला सर्व चालतं. अन्नाचा अपमान केलेला मला आवडत नाही. आमचं खाउन झाल्यावर दोघांचं परत एकमेकांकडे टकमका बघणं चालू झालं. आता आजूबाजूला कोणीच बघायला नाही म्हट्ल्यावर कोणाची पापणी आधी लवते याची स्पर्धा लागल्यासारखे एकमेकांकडे बघायला लागलो. तीने भुवया उंचावल्यासारख्या केल्या की मीही तसेच करायचो. बराच वेळ हा खेळ खेळल्यानंतर मी म्हणालो, "कुठे बाहेर जाउया का फीरायला? इथे काही अद्रुश्य डोळे आपल्याला बघतायत असे वाटते."
"जायला हरकत नाही, पण ते अद्रुश्य डोळे लगेच गावी रीपोर्ट पोचवतील."
"आयला, अस्सं आहे होय? तरीच दोन्ही फ्लॅटचे दरवाजे उघडे आहेत!!!"
"हळू बोल, अद्रुश्य कानही टवकारुन आहेत :)"
"हायला ही काय फालतूगीरी आहे? चल बाहेरच जाउ"
"हम्म, थांब थोडा वेळ जेवण करतेय मी. जेउन जाउ. तोपर्यंत अद्रुश्य कान आणि डोळेही कंटाळतील"
"ओके, पण काय ग? हे आत्या आणि विजय तुझे लग्न ठरवायलाच गेलेते गावी हे कशावरुन?"
"फोनाफोनी चालू होती गुपचूप, तेव्हा काही शब्द कानी पडले. येताना बाबा येतील असं वाटतंय दोघांबरोबर."
"म्हणजे यावर्षी बार उडवूनच देणार तुझ्या लग्नाचा तर"
"माझ्या लग्नाचा? म्हणजे तू काय करणार आहेस? आणि काय रे, लग्नाचा विषय काढल्यावर असा ढ मुलाचे परीक्षेत मिळालेले मार्क वर्गात जाहीर केल्यावर जसा चेहरा होतो तसा का होतो तुझा चेहरा?"
"नेहा, मी "ढ"च आहे गं. :( लग्नाच्या बाजारात. पगार खूप कमी आहे. कसं होणार?"
"अरे पण पगार सदासर्वकाळ तेवढाच राहणार आहे का? कधी वाढणार नाही?"
"वाढेल ना. पण कधी ते सांगता येत नाही. आणि त्यासाठी कदाचीत मुंबैबाहेर जावं लागेल"
"ओके, अरे पण मलाही पगार आहे ना चांगला"
"अरे हो, हा विचारतर मी केलाच नव्हता" :) पण आपण वेगळे रहायचे ठरवले तर सर्व भागले पाहीजे."
"वेगळे कशाला? आइबाबांबरोबर का नाही रहायचे?"
"नाही मला काहीच प्रोब्लेम नाही, पण हे सर्व आधी घरी बोलावे लागेल, अजुन घरात काहीच माहीती नाही."
"मग बोलना, का मी येउ बोलायला?"
"........"
"अssssय मुळूमुळू !!!कसला विचार करतोयस?"
(नेहा माझी लग्नाआधीच शाळा घ्यायला लागली होती. प्रचंड डॉमीनेटींग होती. मला शाळेतला विद्यार्थीच समजत होती. फेसरींडींगची कला तीला अवगत होती. मला नेहमी निरुत्तर करायची. माझ्या मनात काही चावट विचार आले की बरोब्बर ओळ्खून उठून आत जायची. परत आली की लग्नाची शिखरवार्ता सुरु...)
मी म्हणालो, नेहा तू बोलतेस ते सगळं पटतंय मला...पण तूझी नोकरी कीती दीवस चालणार?"
"का? चांगली कॉन्व्हेंट शाळा आहे आमची, पुढे मागे पोस्ट ग्रज्युएशन केलेतर मुख्याध्यापक होउ शकते मी !!!"
"हो पण, एकदा आपल्याला मुले झाली की...."
"ओ मीस्टर पुरूष !! आलात ना लायनीवर? तुम्ही खूप पुढचा विचार करताय. जे काही मनात स्वप्न रंगवतोय्स ना, त्यासाठी लग्न करावं लागतं, त्यासाठी आधी ताठ मानेने घरात विषय काढावा लागतो.
"हो ते तर आहेच.......ते जाउदे ना, तू तयार हो ना, आपण बाहेर जाउ फीरायला. ते अद्रुश्य कान सगळं ऐकताहेत असा भास मला होतोय"
नेहा हसून उठून आत गेली. ती बोलत होती ते सर्व बरोबरंच होतं. पण आइकडे हा विषय काढायचा म्हणजे दुसरी लढाइ होती. हजार प्रश्न. त्याची उत्तरं आधी तयार करायला पाहीजे होती. ती काय विचार करेल? तयार होइल का? हा सगळा विचार करत असाताना नेहा तयार होउन बाहेर आली

neha

हाय !!! यासाठी तर आजन्म दास व्हायला तयार होतो मी...
(क्रमश:)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

भाग आवडला. मी मधूनच वाचायला सुरूवात केली आहे. आता गाडी रुळाला लागत्येय म्हणायची!

फक्त

निघताना आत्या म्हणाली, "सुशांत येत जा रे. आमच्याकडे येणं टाकलंस तू"

इथे संदीप असायला हवं.

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 3:58 am | खटपट्या

अरे हो बरोबर पकडले :)

साहीत्य संपाद्क - वरील बदल करुन मिळेल का?

निशाचर's picture

29 Sep 2016 - 3:58 am | निशाचर

माझा पहिल्यांदाच पहिला प्रतिसाद :)

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2016 - 4:28 am | श्रीरंग_जोशी

हाही भाग नेहमीप्रमाणेच आवडला.

बाकी भागाच्या शेवटी शोभा डेंचा तरुणपणीचा फोटो का टाकलाय?

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 5:18 am | खटपट्या

अरेरे, घोर अज्ञान.
सागरीका घाटगे आहे हो ती. कथेतील नायिका तीच्याइतकी सुंदर होती एवढेच दर्शवायचे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2016 - 9:51 am | श्रीरंग_जोशी

धन्यवाद अज्ञान दूर झाले.
मला वाटले होते तो फोटो मद्रास कॅफेमध्ये युद्ध-पत्रकाराची भूमिका करणार्‍या नटीचा आहे ;-) .

अभ्या..'s picture

29 Sep 2016 - 11:39 am | अभ्या..

अरेरेरेरेरेरेरे
कुठे सागरिका घाटगे, कुठे नर्गिस फखरी
कुठे झेंडूचे पोते, कुठे गुलाबाची टोकरी.
.
.
.
साल्ल्ला मै तो कवि बन गया. ;)

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 8:40 pm | खटपट्या

काहीही बोला, पण त्या शोभा नावाच्या हडळीचे नाव काढून दीवस खराब करु नका...

वाचतिये ही काल्पनिक कथा......पण काल्पनिक आहे यावर विश्वास बसायला तयार नाही.

आला का नवीन भाग. रेवाक्का, यू आर म्हणींग राईट. मलाही हे काल्पनिक वाटत नै.

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 7:52 am | खटपट्या

रेवती आणि यशोधरा .......

बोला, काय म्हंताय? सांगाच! =))
खरं म्हंतोय ना आम्ही?

तुम्हाला खरं वाटतंय यातच माझं यश दडलय...

यशोधरा's picture

29 Sep 2016 - 8:19 am | यशोधरा

असल्यावर वाट्टंच म्हणे..
.
.
.
पळाऽऽ!

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 10:37 am | खटपट्या

तू गप र्‍हव गो...

यशो आणि रेवाक्काला या बाबतीत स्टँडिंग पाठींबा आहे. संदीप च्या ऐवजी सुशांत काय विरुपाजी टाकलं असतं तरी चाललं असतं ;)

आणि एवढं अशुद्ध का लिहीलंय आज? पै ताई च्या धमकीने घाबरलात का? :प

एस's picture

29 Sep 2016 - 9:29 am | एस

वाचतोय.

नाखु's picture

29 Sep 2016 - 9:34 am | नाखु

कथा नायकासाठी

आणि हो मीही हे काल्पनीक समजतोय (तुम्ही म्हणताय म्हणून)

खुलाश्यातील खलाशी नाखु

रातराणी's picture

29 Sep 2016 - 10:05 am | रातराणी

किती गोंधळ तो सुशांत संदीप सुशांत आधी एक नाव ठरवा बरं. तुळशीचं लग्न झालं की उडवून दया मग बार!

गिरिजा देशपांडे's picture

29 Sep 2016 - 11:58 am | गिरिजा देशपांडे

हा भाग पण मस्त!!! फार उत्सुकता ताणु नका हो, पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या. :)

नीलमोहर's picture

29 Sep 2016 - 1:21 pm | नीलमोहर

बाकी कथानायक फारच बुवा 'हे' की काय म्हणतात तसा वाटतोय,
:)

"हे" म्हणजे कसा. सांगीतलंत तर पुढच्या भागात त्याचा स्वभाव बदलता येइल...

असे केल्यास वाचकांची फसवणूक होईल. आतापर्यंत नायकाचा स्वभाव जसा दाखवलाय तसा खरा वाटतोय. स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. असा मध्येच कसा बदल्ता येईल? ते काही नाही. जो है वो है.
जोपर्यंत कथानायक म्हणजे तुम्हीच आहात हे कबूल करत नाही तोपर्यंत आम्ही पाळत ठेवून आहोत. ;)

यशोधरा's picture

29 Sep 2016 - 9:18 pm | यशोधरा

+१ अगदी, अगदी.

स्रुजा's picture

29 Sep 2016 - 9:51 pm | स्रुजा

होय च मुळी !!!

आतापर्यंत नायकाचा स्वभाव जसा दाखवलाय तसा खरा वाटतोय.

म्हंजे? तुम्ही नायकाला ओळखता का ?

जोपर्यंत कथानायक म्हणजे तुम्हीच आहात हे कबूल करत नाही तोपर्यंत आम्ही पाळत ठेवून आहोत. ;)

व्हॉट रबीश...

आम्ही कथानायकाला ओळखत नसलो म्हणून स्वभाव मध्येच बदलणार?
हे म्हण्जे शिनेमाच्या मध्येच साध्या नायकाने कात टाकून स्लो मोशनात हिरविनीला ओढत देवळात नेऊन मांग मे शेंदूर भरल्यासारखे आहे. एरवी उकाड्याने हैराण झालेल्या गावात त्याचवेळी जोरदार थंडी हवां के झोंके येतात व पत्ते हवा में उडायला लागतात. त्यावर विश्वास बसत नाही. तुमचा नायक कसा रियल वाटतोय अशी तारीफ करतिये.
इतकं एक्सप्लेनायला लावण्यापेक्षा तोच मी असं कबूल करा ना भौ!

खटपट्या's picture

30 Sep 2016 - 4:44 am | खटपट्या

अहो पण तो मी नाहीच तर कबूल कसं करणार? उगाच ?
माझ्या कल्पनाशक्तीला दाद द्यायची सोडून भलतंच हा कायतरी तुमचं रेवाक्का... :)
ते मागे डोब्रा नावाची गोष्ट लीहीली होती मी. आता त्यातील शास्त्रज्ञ देखील मीच होतो हे जाहीर करु का?
आता मी भयंकर वास्तववादी लीहीतो हा माझा दोष हाये का? ;) (लाल डबा संपला) असोच्च..

अजया's picture

30 Sep 2016 - 7:15 am | अजया

=))))
पुभाप्र

यशोधरा's picture

30 Sep 2016 - 7:18 am | यशोधरा

भयंकर वास्तववादी

=))

नीलमोहर's picture

29 Sep 2016 - 10:13 pm | नीलमोहर

'हे' म्हणजे तेच हो :)
वाईट काही नाही चांगलंच आहे,

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 1:22 pm | पद्मावति

मस्तं झालाय हा भाग सुद्धा.

शेवटी शोभा डेंचा तरुणपणीचा फोटो का टाकलाय?

खी खी खी....काहीही हां......
जास्तीत जास्तं हा नर्गिस फाकरीचा दहा वर्षानंतरचा फोटो वाटू शकतो =))

पैसा's picture

29 Sep 2016 - 2:29 pm | पैसा

मस्त चालू आहे नायकाची कथा!

बापू नारू's picture

13 Mar 2017 - 4:55 pm | बापू नारू

पुढचा भाग कधी?