इंडिपॉप - ९० चे दशक !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
26 Sep 2016 - 7:34 pm

गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........

माईरी याद वो आई !.....

मेड इन इंडिया ........

आँखों में तेरा ही चेहरा ....

तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !

आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.

एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !

मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!

काही तूनळी लिंका :

मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg

गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk

तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g

माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0

आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE

डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag

कलासंगीतविचार

प्रतिक्रिया

नव्वदीच्या दशकातली एकंदर गाणीच मस्त होती.

अभ्या..'s picture

26 Sep 2016 - 7:42 pm | अभ्या..

मै इस धागेपर लै म्हणजे लै लिखनेवाला हूं.
.
बादमे.
अभी दस्ती डालताय.

इरसाल's picture

26 Sep 2016 - 7:44 pm | इरसाल

मस्त वाटलं सगळ आठवुन.
धन्यवाद !

मस्त धागा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आमचं देखील एक आवडतं गाण अ‍ॅडवा.

ढम ढम ढमक ढोला रे

पद्मावति's picture

26 Sep 2016 - 7:55 pm | पद्मावति

आहा...मस्तं धागा.
तनहा दिल....खूप आवडीचं.
जाएँगे हम तो बॉलीवुड...नो नो नो...हॉलीवुड..
परी हूं मै....
याद पिया की आने लगी...

मंदार कात्रे's picture

26 Sep 2016 - 7:56 pm | मंदार कात्रे

खूप छान धागा
९० ची इंडिपॉप सॉंग्स माझीदेखील खूपच आवडती आहेत

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Sep 2016 - 8:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

आरारा कल्लाच धागा न राव!, गाण्यातील ठेके जर ग्राह्य धरले तर कॉलोनिअल कझीन्सचे "ओ हो काय झालं काय पाहुणे अहो काय झालं" सुद्धा मोजायला हवे यादीत, त्याकाळी एक एक गायक/गट एक एक लेजेन्ड होते राव, लकी अली चे सिफर वगैरे तर अक्षरशः घासून गुळगुळीत केलेले, आम्ही आठवीत असताना आलेला शंकर महादेवनचा "ब्रेथलेस" चा प्रयोग, त्या कॅसेट सोबतीनेच त्याच लयीत ते गाणे म्हणायचे केलेले निष्फळ प्रयत्न, सगळे आठवले, पुढे काहीवर्षे अनिश्चिततेची असलेली हवा, कधी भविष्याच्या विचाराने जीव कातर झाला की हेडफोन लावून अंधाऱ्या खोलीत एकटेच शानचे "तनहा दिल" ऐकणे, 'आखों मे सपने लिये घर से हम चल तो दिये, जाने ये राहे अब ले जायेंगी कहां" ऐकून आलेला एक चोरटा अश्रू , सगळे सगळे आठवले, पौगंडावस्था सुरु होऊन जवानीमध्ये पाऊल ठेवुस्तोवर ह्या अनमोल खजिन्याने मोलाची साथ दिली आहे, त्याची आठवण करून दिल्याबद्दल आपले पुन्हा एकवार आभार मानतो ___/\___

तुषार काळभोर's picture

26 Sep 2016 - 9:13 pm | तुषार काळभोर
पद्मावति's picture

26 Sep 2016 - 8:04 pm | पद्मावति

'आखों मे सपने लिये घर से हम चल तो दिये, जाने ये राहे अब ले जायेंगी कहां" ऐकून आलेला एक चोरटा अश्रू +१ मला आजही हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Sep 2016 - 8:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

खरंय

त्याच अल्बम मध्ये अजून एक गाणे होते बहुतेक "भूल जा जो हुआ उसे भूल जा है कसम तुझे" ते सुद्धा लैच क्लास वाटत असे गाणे, खासकरून त्यातल्या ड्रम सेट्सच्या उत्तम वापरामुळे.

सालं कलोनियल कझिन्सची पहिला अल्बम(1996 मध्ये रिलीज आलेला) मॅग्ना साउंड कंपनी बंद झाल्यामुळे दुर्मिळ झालाय. माझा गहाळ झालाय. कोणी माहिती देऊ शकेल का याविषयी ?7

वरुण मोहिते's picture

26 Sep 2016 - 8:20 pm | वरुण मोहिते

दहावीच्या आतच होतो तेव्हा त्यामुळे विशेष लक्षात आहेत

वाखु साठवली आहे. कलेक्शन MP3 मध्ये हवे असल्यास भेटल्यावर देतो. ;)

हा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद होतात दिला होतात का ?

मोदक's picture

26 Sep 2016 - 9:18 pm | मोदक

नाही.

मी इंडीपॉपची बरीच गाणी व्हिडीओ साँग + ऑडिओ साँग अशी कलाकारांच्या नावानुसार विभागणी करून साठवली आहेत. मापं त्याचे फॅन असतील हे माहिती नव्हते. म्हणून त्यांना म्हणालो की भेटल्यावर देतो.

बादवे - तुम्ही म्हणत आहात ते गाणे माझ्याकडे नाहीये. आता शोधतो.

गाणं नाही , अल्बम होता तो , कलोनियल कॅझिन्स हेच नाव होतं बहुधा. गाणी 6- 7 होती , त्यातली , सानिधपमग रेसा , आणि कृष्णा खूप गाजली. उरलेलीही उत्तमच होती. सापडल्यास कधी कुठे येऊ सांगा , पळत येतो .

मोदक's picture

26 Sep 2016 - 9:26 pm | मोदक

ओके..!!

देश's picture

26 Sep 2016 - 10:23 pm | देश

धन्यवाद, डाऊन लोडून बघतो.

अनुप ढेरे's picture

26 Sep 2016 - 8:42 pm | अनुप ढेरे

धुम पिचक धूम राहिलं की. युफोरिआचं!

अनुप ढेरे's picture

26 Sep 2016 - 8:45 pm | अनुप ढेरे
अनुप ढेरे's picture

26 Sep 2016 - 8:47 pm | अनुप ढेरे

मुझे मिल जो जाये थोडा पैसा हे गाणं अनेक दिवस फेवरीट होतं. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Sep 2016 - 9:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाहाहा हे गाणे खल्लासच आगोश (आनंद गोपाल अन शालीन) चे हे गाणे तुफान आवडे, हम भी होंगे उनके जैसे पर कैसे!! :)

जोर मधलं 'मै कुडी अंजानी हो ' हे हेमा सरदेसाईने गायलेलं गाणं पण मस्त आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Sep 2016 - 9:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

शुभा मुद्गल - अब के सावन द बेस्ट!

आख्खा अल्बम म्हणत आहात की ते एकच गाणे..?

सीखो ना, डेरे डेरे, अब के सावन वगैरे भन्नाट गाणी होती त्या अल्बम मध्ये.

एकदम मस्त अल्बम . शुभा मुद्गलांचा title ट्रॅक चा सॉफ्ट रॉक न रोल ऐकायला तुफान धमाल येते.

युफोरियाच्या एका गाण्यात शुभा मुद्गल यांनी खड्या आवाजात एक सुरावट गायली आहे ती माहिती आहे का..?

मला माहिती आहे.. मुद्दाम सांगत नाहीये. माहिती नसल्यास जरूर शोधा. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Sep 2016 - 9:37 pm | माम्लेदारचा पन्खा

लय भारी !

अनुप ढेरे's picture

26 Sep 2016 - 9:51 pm | अनुप ढेरे

धुम पिचक ना?

मोदक's picture

27 Sep 2016 - 4:14 pm | मोदक

येस्स..!!!!

बोका-ए-आझम's picture

26 Sep 2016 - 9:15 pm | बोका-ए-आझम

माझी आवडती इंडीपाॅप गाणी -

१. छुईमुई सी तुम लगती हो - मिलिंद इंगळे आणि पडद्यावर अब्बास आणि प्रीती जांगियानी. प्रीती अप्रतिम दिसते आणि हे गाणं तर अजूनही चिरतरुण आहे.

२. परी हूं मै - सुनीता राव. याचा ठेका निव्वळ वेड लावणारा.

३. तू - सोनू निगम - सोनू आणि बिपाशा बासू असलं वीअर्ड काँबिनेशन असलेलं हे गाणं सोनूने मस्त गायलंय.

४. बिजुरिया - सोनू निगम - हे धमाल विनोदी भुताटकी गाणं आहे.

५. चांदनी राते - कोण गायक आहे आठवत नाही. बहुतेक इन्स्टंट कर्मा. सब जग सोये,हम जागे; तारों से करे बाते,चांदनी रातें - हे इतकं सुंदर शब्द असलेलं गाणं!

६. अबके सावन ऐसे बरसे - शुभा मुद्गल - शुभा मुद्गलचा बुलंद आवाज आणि पहिला पाऊस!

७. ढगाला लागली कळ - गायक माहीत नाही - दादा कोंडकेंच्या मूळ गाण्याचं रिमिक्सही भन्नाट होतं.

८. पिया बसंती रे - सुलतान खान आणि चित्रा - खांसाहेबांचा खानदानी खर्ज आणि चित्राजींचा थोडा चढा आणि शार्प आवाज यांचं हे काँबिनेशन सुसाट होतं.

९. अाफरीन - नुसरत फतेह अली खान - जावेद अख्तर आणि नुसरत फतेह अली खान ही जोडी अजोड! या गाण्याचं चित्रीकरणही छान आहे. जैसलमेर, लिसा रे, नुसरतजींचा आवाज आणि जावेदजींचे शब्द!

१०. याद पियाकी आने लगी - फाल्गुनी पाठक - या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी मी स्वतः काम केलेलं असल्यामुळे याचं स्थान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, गाणं एवढं खास नसलं तरीही!

अभ्या..'s picture

26 Sep 2016 - 11:15 pm | अभ्या..

परी हूं मै चा ठेका लेस्ली लुईस चा होता. त्याच बीटस त्याने नंतर "भीगी भीगी रातोंमे, ऐसी बरसातोमें" रिमिक्सला अ‍ॅज ईट ईज वापरल्या.

पद्मावति's picture

26 Sep 2016 - 9:32 pm | पद्मावति

याद पियाकी आने लगी - फाल्गुनी पाठक - या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी मी स्वतः काम केलेलं असल्यामुळे याचं स्थान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, गाणं एवढं खास नसलं तरीही!......वाह, काय मस्तं. क्या बात है बोका- ए आझम....क्लास!!!!!!
माझ्या अत्यंत आवडीचं गाणं. चित्रीकरण अप्रतिम. हे गाणं ऐकण्यापेक्षा पाहाणे जास्ती सुखद आहे.

फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश लुक असला तरी आवाज अत्यंत पातळ अन गोड वाटे. तिच्या व्हिडिओतल्या पोरी मात्र भारी भारी असायच्या.(ईंधना मेरवा ह्यातली ती मंद सोडून) याद पियाकी ला बहुतेक रिया सेन होती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2016 - 6:20 am | कैलासवासी सोन्याबापु

फाल्गुनी पाठकचं "ओ पिया ओ पिया लेके डोली आ" हे त्या पातळ आवाजाचा अजून एक नमुना ठरावं

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 2:18 pm | बोका-ए-आझम

आणि अजून दोघी होत्या. त्या माझ्याशी गप्पा मारायच्या नाहीत त्यामुळे त्यांची नावं लक्षात नाहीत ;)

पद्मावति's picture

27 Sep 2016 - 2:22 pm | पद्मावति

रिया सेन किती गोड दिसायची तेव्हा. पण तरीही तिच्या आईची सर नाहीच.

रिया सेनने गप्पा मारल्या तरी समजायला पाहिजेत ना आप्ल्याला.
तिचे हिंदी ऐकून फाडफाड मारावे वाटते.
देव हुशार आहे. सगळेच कसे देणार म्हणा.

पद्मावति's picture

27 Sep 2016 - 2:39 pm | पद्मावति

=)) खरंय अभ्या..
रिया सेन सुरेख आहे पण थोडीशी डंब वाटते. तिची बहीण एकदम गोड आणि तरतरीत आहे.

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2016 - 2:40 pm | टवाळ कार्टा

जे दिलेय ते भरपूर आहे की ;)

मदनबाण's picture

27 Sep 2016 - 3:41 pm | मदनबाण

जे दिलेय ते भरपूर आहे की ;)
अस्मित पटेल ने तर "टेस्ट" करुन पाहिले आहे... ;)
असो... हो गयी है मोहब्बत तुमसे... हे गाणं पहा, मस्त आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

रिचा पल्लोडला दुर्दैवाने चांगली दिसत असून आणि अभिनयही ठीकठाक असूनपण चान्स नाही मिळाला.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 2:49 pm | बोका-ए-आझम
एस's picture

26 Sep 2016 - 10:04 pm | एस

बूम बूम!

भारतात चित्रपटसंगीताने बाकीचे सगळे गाणे खाऊन टाकले! 'मेड इन इंडिया' नंतर आलिशा चिनॉयला तशाच हिटसाठी 'कजरारे कजरारे' पर्यंत वाट पहावी लागली.

आलिशाचे करम मधले 'तिनका तिनका' छान होते.

किसन शिंदे's picture

26 Sep 2016 - 10:29 pm | किसन शिंदे

लिफ्ट करा दे वाल्या अदनान सामीला विसरलात काय? तुफान हिट झालेले गाणे होते ते.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Sep 2016 - 10:39 pm | माम्लेदारचा पन्खा

तशी खूप गाणी आहेत....श्वेता शेट्टी,बाली ब्रम्हभट्ट,बाली सागू,मिलिंद इंगळे,पंकज उधास ही मंडळीसुध्दा आहेतच की !

प्रसन्न३००१'s picture

28 Sep 2016 - 10:20 am | प्रसन्न३००१

मिलिंद इंगळेंचा ये हे प्रेम हा अल्बम मस्तच होता.. ती मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि व्हिडीओ मधली प्रीती जांगियानी .... खल्लास एकदम....

त्याच्या अल्बममधले तेरा चेहरा आणि नैनोसे नैना तो मिला भारी होते.
विडिओ पण चांगले शूट होते. अनुक्रमे रानी मुकर्जी आणि रवीना टंडन.

तुषार काळभोर's picture

27 Sep 2016 - 11:38 am | तुषार काळभोर

अमिताभबरोबर हे एक गाणं होतं त्याचं

अनिरुद्ध प्रभू's picture

27 Sep 2016 - 3:45 pm | अनिरुद्ध प्रभू

'भिगी भिगी रातों में फिर तुम आओ ना....!' पण गाजल होतं....

अमर विश्वास's picture

26 Sep 2016 - 10:59 pm | अमर विश्वास

पिया बसंती रे आणि अबके सावन ऐसे बरसे अत्यन्त आवडीचे.. बाकिची गाणीही उत्तम

चांदनी राते हे शम्सा कंवल ने गयले आहे...

भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी फ्यू थिंग्स द्याट मेक मी अ टॅड सेण्टिमेण्टल & थिस इज़ वन ऑफ देम. लैच हळवे झाल्या गेले आहे. ह्योबी इतिहासच म्हणायचा एका प्रकारचा. अता रिपीट मोडवर हे सगळे ऐकल्या जाईल.

शिद's picture

26 Sep 2016 - 11:23 pm | शिद

अता रिपीट मोडवर हे सगळे ऐकल्या जाईल

धागा वाचल्यावाचल्या मी तर युट्यूबवर लगेच सगळी गाणी शोधून ऐकयला-पहायला चालूपण केली.

संदीप डांगे's picture

26 Sep 2016 - 11:30 pm | संदीप डांगे

लै येळा लै येळा सहमत.

ही सगळी गाणी कधी कधी प्लेलिस्टमधे हाती लागतात. विचार येतो, आणी अशीच नव्वदीनंतरची, आधीची गाणी आठवण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या गाण्यांच्या 'दौर'च्या अगोदर आणि नंतर असा 'दौर' कधी झालाचि नाही. इसके पैलेकी और बादकी पिढी ने 'लै कुच्च' मीस किया.

प्रसन्न३००१'s picture

28 Sep 2016 - 10:23 am | प्रसन्न३००१

+१००

टिके's picture

27 Sep 2016 - 10:23 am | टिके

+100

पाटीलभाऊ's picture

28 Sep 2016 - 2:31 pm | पाटीलभाऊ

'परी हू में' आताच ५-६ वेळा ऐकून झाले आहे..!
बाकीची गाणी पण आता रिपीट मोड वर चालू राहतील.

रंगासेठ's picture

26 Sep 2016 - 11:24 pm | रंगासेठ

एकदम जबरा धागा. वर लिहिलेली सगळीच गाणी आवडतात.
मलाइका अरोरावर चित्रित झालेलं, 'गुड नाल इश्क मिटा' हे बाली सागूचं गाणं पण हिट झालं होता.

आणि दलेर मेहंदीला कसं विसरता... अक्शरशः धुमाकूळ घातला होता. 'तुनक तुनक...', 'बोलो तारारा..', 'हो जाएगी बल्ले बल्ले' इ.

आणि राव 'पुरानी जीन्स' तर अजून पण फेवरिट आहे.

Puraanee jeans

पद्मावति's picture

27 Sep 2016 - 12:02 am | पद्मावति

गुड नाल इश्क मिटायेस्स....हेच गाणं तेव्हापासून आठवत होते पण लक्षात येत नव्हतं...

बाली सागूचा "नूरी" रिमिक्सचा व्हिडिओ खतर्नाक होता. बीट्स आणि त्यातील भूत भारीच.

ओओओ.....नूऽऽऽरीऽऽऽ....

देश's picture

27 Sep 2016 - 11:29 am | देश

चुरा लिया चा रिमीक्स बहुतेक पहिला रिमिक्स होता बॉलिवूडचा

चुभुदेघे

देश

अभ्या..'s picture

27 Sep 2016 - 12:01 am | अभ्या..

इंडीपॉपची व्हिडीओ बनवून पब्लिश करायची सुरुवात बहुतेक बाबा सहगल ने केली. आईस आईस बेबी ची नक्कल ठंडा ठंडा पानी ने. त्या काळात पॉप व्हिडिओ दिसायचे ते अपाचे इंडीअन वगैरे. बाकी एमजे, जॉर्ज मायकेल, मॅडोना वगैरे व्हिडिओ फक्त ऐकून माहीत असायचे. व्ही आणि एम चॅनेल दिसायचे नाहीत तेंव्हा. बाबा सहगल कोणता तरी टॉप टेन स्टाईल कार्यक्रम करायचा. गुरदास मान एक त्यावेळी ट्पिकल दूरदर्शन स्टाईल गाणे टाकायचा. मग हळूहळू इंडीपॉप सॉन्ग्स अन त्यांच्या व्हिडिओजवर मेहनत सुरु झाली. त्यासाठी स्टोरीज बनू लागल्या. परी हूं मै मधली शाळकरी मुलगी अन प्रौढ शिक्षकाची ब्लॅकनव्हाईट कथा, लकी अलीची पिरॅमिड शोधाची कथा, पिया बसंती मधील कश्मीरी अतिरेकी नायक, इंस्ट्ंट कर्माच्या बाहोमे चले आओ चा नायक, सिल्क रूटच्या डूबा डूबा मधली थीम (परवा द्र्श्यम चित्रपट पाहताना त्यातली येलो गेटझ दगडाच्या खाणीत हळूहळू बुडताना पाहून मला हे आपण लहानपणी कधीतरी पाह्यलेय असे वाटत होते. अचानक एक महिन्याने डूबा डूबा आठवले) अशा कथामुळे इंडीपॉप्स श्रवणीयपेक्षा बघणीय होऊ लागले. चित्रपटांच्या तोंडात मारतील असे ग्राफिक्स वापरायला इंडीपॉप व्हिडिओने चालू केले. शाहिद कपूर, रिया सेन, रिमी सेन, प्रियंका चोप्रा अशांनी स्क्रीन पर्फोर्मन्सची सुरुवात इंडीपॉपच्या माध्यमातूनच केली.
ह्या व्हिडिओजच्या तंत्राचा (स्पीड, कटस, ग्राफिक्स, ड्रेसेस, फ्रेम्स) वापर बॉलिवुडने चालू केला अन इंडीपॉपला उतरती कळा लागली.
चांगल्या म्युझिक अ‍ॅरेंजर्स आणि मेलडींची वानवा हे कारण होतेच शिवाय व्हिडिओज विकून पैसा मिळवणे भारतात जास्त परवडत नसावे. मुख्य गायकाला प्रसिध्दी मिळाली कि तो बॉलिवुडची प्रतिक्षा करे. ह्या व अजुन बर्‍याच कारणाने इंडीपॉपचे सोनेरी दिवस आठवणे एवढेच हातात आहे.

सुमीत भातखंडे's picture

28 Sep 2016 - 12:12 pm | सुमीत भातखंडे

बाबा सहगल कोणता तरी टॉप टेन स्टाईल कार्यक्रम करायचा.
सुपरहिट मुकाबला. मुकाबला, उरवशी आणि हम्मा हम्मा या तीन गण्यांनी बराच काळ टॉप ३ मधे ठाण मांडून बसल्याचं आठवतंय

सुंड्या's picture

27 Sep 2016 - 12:48 am | सुंड्या

मस्तच होती त्या वेळची गाणी एकदम तत्कालीन सिनेमामधील गाण्यापेक्षा काहीतरी वेगळीच 'kick' देणारी. Audio आणि video मधील वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेत ते याच 'Indipop' मधे आणि गायकाची star म्हणून स्वतंत्र प्रतिमा तयार
झाली (आधीही गायक 'star' असायचे पण सिनेमा मधल्या हिरो-हिरोईनच्या खालचे वलय त्यांना लाभायचे.)
आत्ताही संग्रही आणि नेहमी ऐकण्यात येणारी माझी आवडती गाणी:

श्वेता शेट्टी चा 'जॉनी जोकर',
सुनिता रावचे 'परी हु मै',
अलिशा चीनोय- 'लवर गर्ल, मेड इन इंडिया'
Indus Creed -'Trapped'
जावेद अख्तर आणि नुसरत फतेह आली खां यांचा "संगम" ('आफरीन आफरीन 'लिसा रे') अल्बम एकदम जोरदार आहे, त्यातले 'शहर के दुकानदारो, अब क्या सोचे आणि मै और मेरी आवारगी ही अतिशय श्रवणीय आणि अर्थपूर्ण गाणी.
लकी अलीचा 'Sunoh' नावाचा अल्बम सगळीच गाणी ऐकण्यासारखी.
बाली सागू चे पुन:मिश्रित (remix) गाणीही खासच- चुरा लिया है, दिल चीज है क्या जाना, तुम बिन जिया उदास एकदम बेस्टचं.

सध्या एवढेच

तिथली गाणी सिंगापूर मेलबॉर्न च्या बार मध्ये धुमाकूळ घालतात. कित्येक डॉलर्स उडवले जातात .नाव आठवत नाही पण उडता पंजाब मध्ये जो पोलिसांच्या भूमिकेत होता त्याचीही गाणी खूप हिट आहेत .

स्रुजा's picture

27 Sep 2016 - 1:19 am | स्रुजा

कल्ला आहे हा धागा खरंच. ९० च्या दशकाने धमाल केली अक्षरशः . गाना वर त्यांचं रेडिओ चॅनल आहे: पहला नशा. त्या चॅनल वर फक्त ९० ची च गाणी लागतात. पहिले काही दिवस मजा येते मग तीच तीच गाणी सुरु होतात (पण तो प्रॉब्लेम कुठे नाहीये म्हणा )

सोनु निगम चा दिवाना,आणी हो नितीन बाली च एकच गाणं निलेनिले अंबर पें.
पण तनहा दिल 1नंबर.

मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय विसरता राव?

मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय विसरता राव?

मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय विसरता राव?

मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय विसरता राव?

मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय विसरता राव?

"छुईमुईसी तुम लगती हो" या अप्रतीम व्हिडीओ आणि गाण्यानंतर "झाडाखालीऽऽऽ बसलेले" ऐकले आणि गारवा अल्बम मनातून उतरला..

त्यात ते बहुदा सौमित्र यांचे "ऊन जरा जास्त वाटतंय" निव्वळ रडक्या आणि कृत्रीम टोनमधले वाटले.

गारवा कधीच आवडला नाही त्यामुळे.

थॉर माणूस's picture

27 Sep 2016 - 11:57 pm | थॉर माणूस

दादा... गारवा रिलीज करण्यासाठी केलेली तडजोड होती ती. राजश्री म्यूजिकला हिंदी अल्बम हवा होता, मिलिंद कडे मराठी गाणी होती. पण राजश्रीवाल्यांना काही चाली आवडल्या. त्यामुळे तडजोड होऊन मिलिंदचे दोन अल्बम रिलीज झाले... ये है प्रेम आणि गारवा.

ओक्के... हे माहिती नव्हते.

रायबा तानाजी मालुसरे's picture

28 Sep 2016 - 6:17 pm | रायबा तानाजी मालुसरे

मोदकशेठ,
हवं तर "झाडाखालीऽऽऽ बसलेले" वगळून बाकीचे सुटे सुटे गाण्यांचे ट्रॅक ऐका, पण पुन्हा एकदा गारवातली गाणी ऐकाच.. नक्की आवडतील तुम्हाला. सगळ्याच चाली सुंदर आहेत!

माफ करा, पण "गारवा अल्बम मनातून उतरला" हे वाचल्यावर रहावले नाही म्हणून अगाऊपणा करून सल्ला देत आहे.

मोदक's picture

28 Sep 2016 - 7:11 pm | मोदक

चालेल... नक्की ऐकतो. :)

प्रवास's picture

27 Sep 2016 - 1:36 am | प्रवास

चाहा तुझे है जहांसे भी ज्यादा
सुंधांशू पांडे भारी वाटायचा :)

स्रुजा's picture

27 Sep 2016 - 1:47 am | स्रुजा

आणि इन्स्टंट कर्मा !

सुफी साँग्स पण आले होते - १४ चा एक अल्बम होता. तो पण भारी होता. जरा शोधाशोद करते.

बाकी धाग्याच्या निमीत्ताने जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

संयोनी - जुनून आल्बम म्हणायचे आहे का?

https://www.youtube.com/watch?v=0GLYKYgSE0Y

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2016 - 6:44 am | कैलासवासी सोन्याबापु

जुनून खल्लासच!! _/\_