गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
वाचने
44726
प्रतिक्रिया
202
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्वदीच्या दशकातली एकंदर
याची काही मदत होईल काय ?
In reply to नव्वदीच्या दशकातली एकंदर by आदूबाळ
मै इस धागेपर लै म्हणजे लै
आवडले
मस्त धागा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या
आहा...मस्तं धागा.
खूप छान धागा
आरारा कल्लाच धागा न राव!,
आरारा कल्लाच धागा न राव!
In reply to आरारा कल्लाच धागा न राव!, by कैलासवासी सोन्याबापु
'आखों मे सपने लिये घर से हम
'आखों मे सपने लिये घर से हम चल तो दिये, जाने ये राहे अब ले जायेंगी कहां" ऐकून आलेला एक चोरटा अश्रू+१ मला आजही हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येतं.खरंय
In reply to 'आखों मे सपने लिये घर से हम by पद्मावति
सालं कलोनियल कझिन्सची पहिला
मस्त आठवण .
वाखु साठवली आहे. कलेक्शन MP3
हा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद
In reply to वाखु साठवली आहे. कलेक्शन MP3 by मोदक
नाही.
In reply to हा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद by A.N.Bapat
गाणं नाही , अल्बम होता तो ,
In reply to नाही. by मोदक
ओके..!!
In reply to गाणं नाही , अल्बम होता तो , by A.N.Bapat
हे बघा
In reply to गाणं नाही , अल्बम होता तो , by A.N.Bapat
धन्यवाद, डाऊन लोडून बघतो.
In reply to हे बघा by देश
धुम पिचक धूम राहिलं की.
धुम पिचक...
याशिवाय
हाहाहा हे गाणे खल्लासच आगोश
In reply to याशिवाय by अनुप ढेरे
त्यांचं सनी देओल आणि सुश्मिता सेन यांच्या
In reply to हाहाहा हे गाणे खल्लासच आगोश by कैलासवासी सोन्याबापु
शुभा मुद्गल - अब के सावन द
आख्खा अल्बम म्हणत आहात की ते
In reply to शुभा मुद्गल - अब के सावन द by कैलासवासी सोन्याबापु
एकदम मस्त अल्बम . शुभा
In reply to शुभा मुद्गल - अब के सावन द by कैलासवासी सोन्याबापु
युफोरियाच्या एका गाण्यात शुभा
In reply to एकदम मस्त अल्बम . शुभा by A.N.Bapat
हो....मला माहीत आहे
In reply to युफोरियाच्या एका गाण्यात शुभा by मोदक
धुम पिचक ना?
In reply to युफोरियाच्या एका गाण्यात शुभा by मोदक
येस्स..!!!!
In reply to धुम पिचक ना? by अनुप ढेरे
अरे वा! मस्तच!
परी हूं मै चा ठेका लेस्ली
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
याद पियाकी आने लगी - फाल्गुनी
याद पियाकी आने लगी - फाल्गुनी पाठक - या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी मी स्वतः काम केलेलं असल्यामुळे याचं स्थान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, गाणं एवढं खास नसलं तरीही!......वाह, काय मस्तं. क्या बात है बोका- ए आझम....क्लास!!!!!! माझ्या अत्यंत आवडीचं गाणं. चित्रीकरण अप्रतिम. हे गाणं ऐकण्यापेक्षा पाहाणे जास्ती सुखद आहे.फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश
In reply to याद पियाकी आने लगी - फाल्गुनी by पद्मावति
फाल्गुनी पाठकचं "ओ पिया ओ
In reply to फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश by अभ्या..
रिया सेन, रिचा पल्लोड
In reply to फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश by अभ्या..
रिया सेन किती गोड दिसायची
In reply to रिया सेन, रिचा पल्लोड by बोका-ए-आझम
रिया सेनने गप्पा मारल्या तरी
In reply to रिया सेन, रिचा पल्लोड by बोका-ए-आझम
=)) खरंय अभ्या..
In reply to रिया सेनने गप्पा मारल्या तरी by अभ्या..
जे दिलेय ते भरपूर आहे की ;)
In reply to रिया सेनने गप्पा मारल्या तरी by अभ्या..
जे दिलेय ते भरपूर आहे की ;)
In reply to जे दिलेय ते भरपूर आहे की ;) by टवाळ कार्टा
ती डम्ब दिसते, प्रत्यक्षात अजिबात नाहीये.
In reply to रिया सेनने गप्पा मारल्या तरी by अभ्या..
याद पिया की आने लगी
In reply to ती डम्ब दिसते, प्रत्यक्षात अजिबात नाहीये. by बोका-ए-आझम
बूम बूम!
भारतात चित्रपटसंगीताने बाकीचे
आलिशाचे करम मधले 'तिनका तिनका
In reply to भारतात चित्रपटसंगीताने बाकीचे by एस
हो गयी है मोहब्बत तुमसे...वन ऑफ माय फेवरेट साँग
लिफ्ट करा दे वाल्या अदनान
नाही....पण तितकंसं आवडलं नव्हतं....
In reply to लिफ्ट करा दे वाल्या अदनान by किसन शिंदे
मिलिंद इंगळेंचा ये हे प्रेम
In reply to नाही....पण तितकंसं आवडलं नव्हतं.... by माम्लेदारचा पन्खा
त्याच्या अल्बममधले तेरा चेहरा
In reply to लिफ्ट करा दे वाल्या अदनान by किसन शिंदे
कभी नही!!
In reply to लिफ्ट करा दे वाल्या अदनान by किसन शिंदे
त्याचच...
In reply to लिफ्ट करा दे वाल्या अदनान by किसन शिंदे
पिया बसंती रे आणि अबके सावन
भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी
+१००
In reply to भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी by बॅटमॅन
लै येळा लै येळा सहमत.
In reply to भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी by बॅटमॅन
+१००
In reply to लै येळा लै येळा सहमत. by संदीप डांगे
+100
In reply to भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी by बॅटमॅन
+११११
In reply to भावा रडिवलंस. देअर आर व्हेरी by बॅटमॅन
जबरा धागा
गुड नाल इश्क मिटायेस्स....हेच
In reply to जबरा धागा by रंगासेठ
गुड नाल इश्क मिटायेस्स....हेच गाणं तेव्हापासून आठवत होते पण लक्षात येत नव्हतं...बाली सागूचा "नूरी" रिमिक्सचा
In reply to गुड नाल इश्क मिटायेस्स....हेच by पद्मावति
+२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२
In reply to बाली सागूचा "नूरी" रिमिक्सचा by अभ्या..
बाली सागू
In reply to बाली सागूचा "नूरी" रिमिक्सचा by अभ्या..
ओ हो हो हो
इंडीपॉपची व्हिडीओ बनवून
बाबा
In reply to इंडीपॉपची व्हिडीओ बनवून by अभ्या..
खासच होते ९० चे ते "Indipop"
हाच वारसा आता पंजाबी इंडस्ट्री ने चालवला आहे ...
कल्ला आहे हा धागा खरंच. ९०
सोनु निगम चा दिवाना,आणी हो
मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय
मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय
मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय
मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय
मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय
"छुईमुईसी तुम लगती हो" या
In reply to मिलिंद इंगळे चा गारवा कसाकाय by dr.zatka
दादा... गारवा रिलीज
In reply to "छुईमुईसी तुम लगती हो" या by मोदक
ओक्के... हे माहिती नव्हते.
In reply to दादा... गारवा रिलीज by थॉर माणूस
गारवा अल्बम मनातून उतरला >>>
In reply to "छुईमुईसी तुम लगती हो" या by मोदक
चालेल... नक्की ऐकतो. :)
In reply to गारवा अल्बम मनातून उतरला >>> by रायबा तानाजी मालुसरे
A Band of Boys चं गोरी..
आणि इन्स्टंट कर्मा !
सुफी साँग्स पण आले होते - १४
यारो सब दुवा करो म्हणायच का?
In reply to सुफी साँग्स पण आले होते - १४ by स्रुजा
संयोनी - जुनून आल्बम म्हणायचे
In reply to सुफी साँग्स पण आले होते - १४ by स्रुजा
जुनून खल्लासच!! _/\_
In reply to संयोनी - जुनून आल्बम म्हणायचे by मराठमोळा