धाक... दहशत

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
25 Aug 2016 - 10:16 am

दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात

तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो.
बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.

मुक्तकराहणीस्थिरचित्रप्रतिसादअनुभव

प्रतिक्रिया

गंम्बा's picture

25 Aug 2016 - 10:32 am | गंम्बा

बरोबर आहे मन साहेब तुमचे. म्हणुनच मला पितृपंधरवडा हा एकच काळ आवडतो वर्षातला.

सामान्य वाचक's picture

25 Aug 2016 - 11:06 am | सामान्य वाचक

त्याचा हि उत्सव सुरु होईल

कविता१९७८'s picture

25 Aug 2016 - 3:16 pm | कविता१९७८

सहमत

खेडूत's picture

25 Aug 2016 - 11:15 am | खेडूत

पितृपंधरवडा हा एकच काळ..

म्हणजे त्या काळात पुढचे मांडव, नवरात्रीच्या वर्गण्या वगैरे काही नसतं तुमच्याकडे?
लक्की दिसता!
आमच्या परिसरात वर्षातून बारा महिने उत्सव असतो..प्रायोजक बदलतात, बाकी पात्रे तीच.
आज न्यायालयाचा आदेश मोडणार्‍यांवर गुन्हे दाखल होतील, मग पलिका निवडणूका आल्या की ते घाऊकमधे मागे घेतले जातील.
हा का ना का!

ज्योति अळवणी's picture

25 Aug 2016 - 11:54 pm | ज्योति अळवणी

कायदे मोडून हट्टाने उत्सव साजरे करणारी मंडळे दोषी नाहीत.... त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला घाबरणाऱ्या आणि स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या लोकांची चूक तर अजिबात नाही... मात्र राजकारणी कायम दोषीच! राजकारणातील प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट, पैसे खाऊ आणि मतलबी असते.... नाही का?

किंबहुना's picture

26 Aug 2016 - 2:29 am | किंबहुना

अजिबात नाही.. दोषी कोण माहीत आहे का? आर्ची आली आहे म्हणून तिला बघायला गर्दी करणारे लोक. खरे तर हे उत्सव म्हणजे राजकारणाच्या प्राथमिक पायर्‍या झाल्या आहेत, जर आपण यांना भाव दिला नाही तर मग आपोआप हे लोक लायनीवर येतील. जसे टीव्ही वरच्या सिरियल्सना नुसते नाव ठेवू नका, तर त्या बघायच्या बंद करा असे आपण म्हणतो, तसेच या उत्सवांना नुसते नाव ठेवू नका, तर त्याच्यावर बहिष्कार टाका. म्हणजे आपोआप सगळे लायनीवर येतील.
जर बहिष्कार घातला जात नसेल, तर हे उत्सव बहुसंख्यांना मान्य आहेत असा अर्थ निघतो.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2016 - 10:43 am | मुक्त विहारि

+ १

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 10:45 am | प्रभाकर पेठकर

धगधगीत वास्तव.

नितिमुल्यांचा र्‍हास झालेल्या देशात तरूण पिढी भरकटली नाही तरंच नवल. मी आणि माझा आनंद ह्याला अनन्यसाधारण महत्व आले आहे. एकत्र समाज ही संकल्पना मागे पडत चालली आहे.

सानझरी's picture

25 Aug 2016 - 10:47 am | सानझरी

+ १११११

मराठी_माणूस's picture

25 Aug 2016 - 11:27 am | मराठी_माणूस

सामान्य माणसाच्या वेदना चांगल्या मांडल्यात.

थोडी दिलासा देणारी गोष्ट. टाळकुटेश्वरां वर थोडेसे निर्बंध.अर्थात किति दिवस पाळले जाईल माहीत नाही.
http://www.mumbaimirror.com/home/city/Bhajan-mandalis-wont-sing-on-train...?

खरं आहे. गर्दीला चेहरा नसतो, म्हणूनच विवेकही नसतो.

इल्यूमिनाटस's picture

25 Aug 2016 - 9:37 pm | इल्यूमिनाटस

+१

मन१'s picture

29 Aug 2016 - 9:12 am | मन१

सर्व वाचक , प्रतिसादकाच्मे मनःपूर्वक आभार