आज जिथे आहे सहरा
म्हणजेच वाळवंट,
रेग, सैफ़, बरचन
(म्हणजे काय हे गुगलून घ्या)
वगैरे भूवैशिष्टये असणारे,
तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो
(म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो
सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे
कोट्यावधि वर्षांपूर्वी)
सहस्र योजन विस्तार असलेले
ओलेचिंब, घनदाट, निबिड
रेनफॉरेस्ट!
रोज दुपारी दोनतीन वाजता
गड़गडाट करायचे
अजस्र काळेकभिन्न
क्युमुलोनिम्बस् !
अन् झरझर बरसायचे
जीवनामृतरस!
त्या विशाल निबिड़ जंगलात
होते अथांग एक सरोवर
शतशत योजन विक्राळ..
होत्या विशाल राक्षसी मगरी
आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज
आणिक होते चित्रविचित्र प्राणी
झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........
दिवसरात्र चालायच्या
अद्भुत निसर्गलीला
बाहेरच्याला वाटायचे,
किती हां केऑस!
पण केऑसमध्येही काहीतरी
विलक्षण सौंदर्य असते पोरांनो
जस्ट लाइक योर मेटल ऑर पंक रॉक!
मी शिकवतो माझ्या स्टूडंट्सना
ते डोळे विस्फारुन ऐकतात
त्यांच्या डोक्यात रिमझिमणारा
प्रश्नांचा पाऊस
मलाही ओला करत असतो
पण तासिका संपली असते
( तसेही पोट्टे Quora, WikiAnswers वर
उत्तरे विचारतील,
किंवा गुगलुन काढतील
Video lecture on Rainforest..)
मी घरी परततो
झेपावून माझ्यावर
विचारतो छकुला
"Dad, what should I write
in the column of mothertongue?"
"You should write ENGLISH."
"But you speak some indian language
With grampa granny......"
आता त्याला मी सांगतो
माझ्या माइग्रेशनची काम्प्लेक्स हिस्ट्री
म्हणजे जी लैंग्वेज तो घरी यूज़ करतो
ती वेगळी आहे माझ्या मातृभाषेपेक्षा
अना मोरो मायअजी बोलsसेती
तिसरीच भासा
They all used to speak the same language बेटा
पर सबनं विचार कऱ्या
आपलो भासा ला नाहाय भविस्य
अना वा भासा दुइतीन पीढ़ी मा कसी मरी
उनलाच नहीं मालुम पड्यो
तं तिच्या जागी आली अलगच भाश्या
पर आता लोकाइले वाटू लागली ते बी गावठी
एकाच पीढ़ीत!
फिर हवा चली तीसरी भाषा की.....
तुला सांगतो बाळा,
लिंगविस्टिक सक्सेशन इज पर्फेक्टली नॉर्मल
पण ते एब्नार्मल रेट ने झाले तर
कुछ तो गड़बड़ है दया!
Just like global warming
Driving up rate of desertification
Now a days!
प्रत्येक केऑसमध्ये आपण
शोधू नये सौन्दर्य.
मला माहीत असते
बरेचसे त्याच्या डोक्यावरून गेले आहे
पण तो कानावर पडलेले
गूगल करणार असतो...
निवांत बसून समजून घ्यायला.
दुसऱ्या दिवशी मी परत
लेक्चरला जातो
एक पोरगा प्रश्न करतो,
"सर काय झाले त्या रेनफॉरेस्टचे
वाळवंट होताना?"
"तुमचे पूर्वज जेव्हा इथे आले
दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी
तेव्हा हा देश झाला होता
एक लिंगविस्टिक रेनफॉरेस्ट
त्यांची सगळ्यांची भाषा निराळी
प्रत्येकाची टेरिटरी आखीवरेखीव
पण कुठेतरी सरमिसळ होत होती
त्या सैलेड बाउलमध्ये बदल होत गेले
त्यांच्याही नकळत मेल्टिंग पॉट मध्ये..
आणि आज माझ्यापुढे विस्तारलाय
हां अजस्र भाषिक सहरा.
त्या प्राण्यांना जाणवले नाही रे...
निसर्गाचे घड्याळ असते
ब्रम्हाच्या wristवर.."
दुसरा फेकतो वर्गातला सकलेन
"एमेजॉन पण होणार काय सहरा?"
मी टोलावून लावतो,
"आज जिथे आहे एमेजॉन
ते खंड मुळी तिथे राहीलच
ह्याचीही खात्री नाही....
शेवटी कनवर्जेंट बाउंड्री आहे
नाज़का प्लेटसोबत....."
-- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
9 Aug 2016 - 9:19 am | यशोधरा
सुरेख!
9 Aug 2016 - 9:25 am | स्पा
सोलीड्स
एकदम वेगळा जॉनर
9 Aug 2016 - 9:29 am | पैसा
!!!!!! _/\_
9 Aug 2016 - 9:40 am | कैलासवासी सोन्याबापु
ज्योग्राफी ऑप्शनल उर्फ भूगोल वैकल्पिकचा अभ्यास जोरात झालेला दिसतोय स्वामु!
9 Aug 2016 - 9:41 am | स्वामी संकेतानंद
साला चार वर्षांपासून वाचून रायलो बे. आता कवितेत बी थेच येऊन जाते.
9 Aug 2016 - 9:44 am | कैलासवासी सोन्याबापु
ऑल द बेस्ट बालको!!
9 Aug 2016 - 9:45 am | स्वामी संकेतानंद
_/\_
9 Aug 2016 - 9:53 am | उडन खटोला
स्वामीजी मस्त भौगोलिक प्रागैतिहासिक वैश्विक कविता.
9 Aug 2016 - 10:16 am | अभ्या..
स्वामी तू लै बेफाट इसम हायस.
9 Aug 2016 - 10:49 am | कैलासवासी सोन्याबापु
स्वाम्या घाग आहे!
9 Aug 2016 - 11:22 am | अभ्या..
घाग म्हणजे रे काय बापू? स्पेशल काही?
9 Aug 2016 - 11:34 am | संदीप डांगे
घाग: मुरलेला
बाकी कविता झिंगाट!!!!!
9 Aug 2016 - 11:44 am | अभ्या..
ओके संदीपराव,
तुम्ही सगळे वर्हाडी लैच घाग आहात राव.
10 Aug 2016 - 9:02 am | स्वामी संकेतानंद
हॅहॅहॅ. थँक्यू!
9 Aug 2016 - 11:18 am | अंतरा आनंद
सुंदरच आहे.
9 Aug 2016 - 11:26 am | सतिश गावडे
बेफाट लिहिलंय स्वाम्या !!!
9 Aug 2016 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या चार पाच ओळी नंतर तर वाचायचाही कंटाळा आला, पूर्ण लेखन वाचले नाही. पुभाशु.
-दिलीप बिरुटे
9 Aug 2016 - 1:40 pm | प्रसाद गोडबोले
+१
10 Aug 2016 - 8:59 am | स्वामी संकेतानंद
तुम्हाला आवडेल अशी कविता टाकली आहे आज. :D :D
9 Aug 2016 - 11:40 am | विप्लव
जबरदस्त लिहलय बराच भाग डोक्यावरुनच काय पुर्ण बिल्डिंग वरुन गेला.
10 Aug 2016 - 9:01 am | स्वामी संकेतानंद
हाहाहा! दोनतीनदा वाचून पहा! भाष्य आहे कशावर तरी. येईल लक्षात.
9 Aug 2016 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जी की महान रचनॉंएं..
9 Aug 2016 - 12:55 pm | एस
आवडलं. आधी जंगल असतं. मग 'सिव्हिलायझेशन' येते. आणि मग वाळवंट बनतं...
9 Aug 2016 - 1:30 pm | नीलमोहर
अफाट आहे हे !!
9 Aug 2016 - 1:38 pm | मुक्त विहारि
झक्कास...
9 Aug 2016 - 1:52 pm | अजया
जबरदस्त!
9 Aug 2016 - 3:36 pm | पद्मावति
अफाट लिहिलंय _/\_
9 Aug 2016 - 9:34 pm | खटपट्या
मी जास्त कविता वाचत नाही पण असं काही येणार असेल तर मज्जा येते.
नुसतं यमकं जुळवण्यासाठी केलेली कवीता नाही आवडत.
पण हा प्रयोग जबरदस्त आहे...अजुन येउद्या...
10 Aug 2016 - 9:00 am | स्वामी संकेतानंद
धन्यवाद!
10 Aug 2016 - 8:31 am | आतिवास
रचना किंचित क्रिप्टीक वाटली. अशा कविता वाचायलाही एक निवांतपणा पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
(नेहमीप्रमाणेच) कविता आवडली.
20 Aug 2016 - 2:03 pm | शिव कन्या
संकु, तू आमच्या थोपू भिताडावर येऊन झैरात करण्याआधी वाचली होती ही कविता.
आवडली हे सांगाया आज निवांत वेळ मिळाला. लिहित रा.
20 Aug 2016 - 2:29 pm | जव्हेरगंज
लै भारी!!
20 Aug 2016 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
आवडली !
असंच होता राहिलं आहे या जगात... सहारा असो, अरबास्थानातले रब अल् खाली असो, मध्य ऑस्ट्रेलियातले वाळवंट असो किंवा जगभरची भाषांची खिचडी असो ! :)
तसं बघितलं तर बहुतांश युरोप आणि उत्तर अमेरिकाही फार काळ बर्फाळ वाळवंटेच होती ;)
21 Aug 2016 - 11:26 pm | प्रीत-मोहर
आवडेश