मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेनफॉरेस्ट

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज जिथे आहे सहरा म्हणजेच वाळवंट, रेग, सैफ़, बरचन (म्हणजे काय हे गुगलून घ्या) वगैरे भूवैशिष्टये असणारे, तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो (म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे कोट्यावधि वर्षांपूर्वी) सहस्र योजन विस्तार असलेले ओलेचिंब, घनदाट, निबिड रेनफॉरेस्ट! रोज दुपारी दोनतीन वाजता गड़गडाट करायचे अजस्र काळेकभिन्न क्युमुलोनिम्बस् ! अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलीला बाहेरच्याला वाटायचे, किती हां केऑस! पण केऑसमध्येही काहीतरी विलक्षण सौंदर्य असते पोरांनो जस्ट लाइक योर मेटल ऑर पंक रॉक! मी शिकवतो माझ्या स्टूडंट्सना ते डोळे विस्फारुन ऐकतात त्यांच्या डोक्यात रिमझिमणारा प्रश्नांचा पाऊस मलाही ओला करत असतो पण तासिका संपली असते ( तसेही पोट्टे Quora, WikiAnswers वर उत्तरे विचारतील, किंवा गुगलुन काढतील Video lecture on Rainforest..) मी घरी परततो झेपावून माझ्यावर विचारतो छकुला "Dad, what should I write in the column of mothertongue?" "You should write ENGLISH." "But you speak some indian language With grampa granny......" आता त्याला मी सांगतो माझ्या माइग्रेशनची काम्प्लेक्स हिस्ट्री म्हणजे जी लैंग्वेज तो घरी यूज़ करतो ती वेगळी आहे माझ्या मातृभाषेपेक्षा अना मोरो मायअजी बोलsसेती तिसरीच भासा They all used to speak the same language बेटा पर सबनं विचार कऱ्या आपलो भासा ला नाहाय भविस्य अना वा भासा दुइतीन पीढ़ी मा कसी मरी उनलाच नहीं मालुम पड्यो तं तिच्या जागी आली अलगच भाश्या पर आता लोकाइले वाटू लागली ते बी गावठी एकाच पीढ़ीत! फिर हवा चली तीसरी भाषा की..... तुला सांगतो बाळा, लिंगविस्टिक सक्सेशन इज पर्फेक्टली नॉर्मल पण ते एब्नार्मल रेट ने झाले तर कुछ तो गड़बड़ है दया! Just like global warming Driving up rate of desertification Now a days! प्रत्येक केऑसमध्ये आपण शोधू नये सौन्दर्य. मला माहीत असते बरेचसे त्याच्या डोक्यावरून गेले आहे पण तो कानावर पडलेले गूगल करणार असतो... निवांत बसून समजून घ्यायला. दुसऱ्या दिवशी मी परत लेक्चरला जातो एक पोरगा प्रश्न करतो, "सर काय झाले त्या रेनफॉरेस्टचे वाळवंट होताना?" "तुमचे पूर्वज जेव्हा इथे आले दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी तेव्हा हा देश झाला होता एक लिंगविस्टिक रेनफॉरेस्ट त्यांची सगळ्यांची भाषा निराळी प्रत्येकाची टेरिटरी आखीवरेखीव पण कुठेतरी सरमिसळ होत होती त्या सैलेड बाउलमध्ये बदल होत गेले त्यांच्याही नकळत मेल्टिंग पॉट मध्ये.. आणि आज माझ्यापुढे विस्तारलाय हां अजस्र भाषिक सहरा. त्या प्राण्यांना जाणवले नाही रे... निसर्गाचे घड्याळ असते ब्रम्हाच्या wristवर.." दुसरा फेकतो वर्गातला सकलेन "एमेजॉन पण होणार काय सहरा?" मी टोलावून लावतो, "आज जिथे आहे एमेजॉन ते खंड मुळी तिथे राहीलच ह्याचीही खात्री नाही.... शेवटी कनवर्जेंट बाउंड्री आहे नाज़का प्लेटसोबत....." -- स्वामी संकेतानंद

वाचने 4929 वाचनखूण प्रतिक्रिया 34

यशोधरा Tue, 08/09/2016 - 09:19
अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलीला बाहेरच्याला वाटायचे, किती हां केऑस! पण केऑसमध्येही काहीतरी विलक्षण सौंदर्य असते पोरांनो
सुरेख!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

साला चार वर्षांपासून वाचून रायलो बे. आता कवितेत बी थेच येऊन जाते.

खटपट्या Tue, 08/09/2016 - 21:34
मी जास्त कविता वाचत नाही पण असं काही येणार असेल तर मज्जा येते. नुसतं यमकं जुळवण्यासाठी केलेली कवीता नाही आवडत. पण हा प्रयोग जबरदस्त आहे...अजुन येउद्या...

आतिवास Wed, 08/10/2016 - 08:31
रचना किंचित क्रिप्टीक वाटली. अशा कविता वाचायलाही एक निवांतपणा पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं. (नेहमीप्रमाणेच) कविता आवडली.

आवडली ! असंच होता राहिलं आहे या जगात... सहारा असो, अरबास्थानातले रब अल् खाली असो, मध्य ऑस्ट्रेलियातले वाळवंट असो किंवा जगभरची भाषांची खिचडी असो ! :) तसं बघितलं तर बहुतांश युरोप आणि उत्तर अमेरिकाही फार काळ बर्फाळ वाळवंटेच होती ;)