रेनफॉरेस्ट
आज जिथे आहे सहरा
म्हणजेच वाळवंट,
रेग, सैफ़, बरचन
(म्हणजे काय हे गुगलून घ्या)
वगैरे भूवैशिष्टये असणारे,
तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो
(म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो
सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे
कोट्यावधि वर्षांपूर्वी)
सहस्र योजन विस्तार असलेले
ओलेचिंब, घनदाट, निबिड
रेनफॉरेस्ट!
रोज दुपारी दोनतीन वाजता
गड़गडाट करायचे
अजस्र काळेकभिन्न
क्युमुलोनिम्बस् !
अन् झरझर बरसायचे
जीवनामृतरस!
त्या विशाल निबिड़ जंगलात
होते अथांग एक सरोवर
शतशत योजन विक्राळ..
होत्या विशाल राक्षसी मगरी
आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज
आणिक होते चित्रविचित्र प्राणी
झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........
दिवसरात्र चालायच्या
अद्भुत निसर्गलीला
बाहेरच्याला वाटायचे,
किती हां केऑस!
पण केऑसमध्येही काहीतरी
विलक्षण सौंदर्य असते पोरांनो
जस्ट लाइक योर मेटल ऑर पंक रॉक!
मी शिकवतो माझ्या स्टूडंट्सना
ते डोळे विस्फारुन ऐकतात
त्यांच्या डोक्यात रिमझिमणारा
प्रश्नांचा पाऊस
मलाही ओला करत असतो
पण तासिका संपली असते
( तसेही पोट्टे Quora, WikiAnswers वर
उत्तरे विचारतील,
किंवा गुगलुन काढतील
Video lecture on Rainforest..)
मी घरी परततो
झेपावून माझ्यावर
विचारतो छकुला
"Dad, what should I write
in the column of mothertongue?"
"You should write ENGLISH."
"But you speak some indian language
With grampa granny......"
आता त्याला मी सांगतो
माझ्या माइग्रेशनची काम्प्लेक्स हिस्ट्री
म्हणजे जी लैंग्वेज तो घरी यूज़ करतो
ती वेगळी आहे माझ्या मातृभाषेपेक्षा
अना मोरो मायअजी बोलsसेती
तिसरीच भासा
They all used to speak the same language बेटा
पर सबनं विचार कऱ्या
आपलो भासा ला नाहाय भविस्य
अना वा भासा दुइतीन पीढ़ी मा कसी मरी
उनलाच नहीं मालुम पड्यो
तं तिच्या जागी आली अलगच भाश्या
पर आता लोकाइले वाटू लागली ते बी गावठी
एकाच पीढ़ीत!
फिर हवा चली तीसरी भाषा की.....
तुला सांगतो बाळा,
लिंगविस्टिक सक्सेशन इज पर्फेक्टली नॉर्मल
पण ते एब्नार्मल रेट ने झाले तर
कुछ तो गड़बड़ है दया!
Just like global warming
Driving up rate of desertification
Now a days!
प्रत्येक केऑसमध्ये आपण
शोधू नये सौन्दर्य.
मला माहीत असते
बरेचसे त्याच्या डोक्यावरून गेले आहे
पण तो कानावर पडलेले
गूगल करणार असतो...
निवांत बसून समजून घ्यायला.
दुसऱ्या दिवशी मी परत
लेक्चरला जातो
एक पोरगा प्रश्न करतो,
"सर काय झाले त्या रेनफॉरेस्टचे
वाळवंट होताना?"
"तुमचे पूर्वज जेव्हा इथे आले
दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी
तेव्हा हा देश झाला होता
एक लिंगविस्टिक रेनफॉरेस्ट
त्यांची सगळ्यांची भाषा निराळी
प्रत्येकाची टेरिटरी आखीवरेखीव
पण कुठेतरी सरमिसळ होत होती
त्या सैलेड बाउलमध्ये बदल होत गेले
त्यांच्याही नकळत मेल्टिंग पॉट मध्ये..
आणि आज माझ्यापुढे विस्तारलाय
हां अजस्र भाषिक सहरा.
त्या प्राण्यांना जाणवले नाही रे...
निसर्गाचे घड्याळ असते
ब्रम्हाच्या wristवर.."
दुसरा फेकतो वर्गातला सकलेन
"एमेजॉन पण होणार काय सहरा?"
मी टोलावून लावतो,
"आज जिथे आहे एमेजॉन
ते खंड मुळी तिथे राहीलच
ह्याचीही खात्री नाही....
शेवटी कनवर्जेंट बाउंड्री आहे
नाज़का प्लेटसोबत....."
-- स्वामी संकेतानंद
वाचने
4929
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
अन् झरझर बरसायचे
सोलीड्स एकदम वेगळा जॉनर
!!!
ज्योग्राफी ऑप्शनल उर्फ भूगोल
In reply to ज्योग्राफी ऑप्शनल उर्फ भूगोल by कैलासवासी सोन्याबापु
साला चार वर्षांपासून वाचून
In reply to साला चार वर्षांपासून वाचून by स्वामी संकेतानंद
ऑल द बेस्ट बालको!!
In reply to ऑल द बेस्ट बालको!! by कैलासवासी सोन्याबापु
_/\_
स्वामीजी मस्त भौगोलिक
स्वामी तू लै बेफाट इसम हायस.
In reply to स्वामी तू लै बेफाट इसम हायस. by अभ्या..
स्वाम्या घाग आहे!
In reply to स्वाम्या घाग आहे! by कैलासवासी सोन्याबापु
घाग म्हणजे रे काय बापू?
In reply to घाग म्हणजे रे काय बापू? by अभ्या..
घाग: मुरलेला
In reply to घाग: मुरलेला by संदीप डांगे
ओके संदीपराव,
In reply to स्वामी तू लै बेफाट इसम हायस. by अभ्या..
हॅहॅहॅ. थँक्यू!
सुंदरच आहे.
बेफाट लिहिलंय स्वाम्या !!!
कविता आहे का धड़ा ?
In reply to कविता आहे का धड़ा ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to कविता आहे का धड़ा ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला आवडेल अशी कविता
जबरदस्त लिहलय बराच भाग
In reply to जबरदस्त लिहलय बराच भाग by विप्लव
हाहाहा! दोनतीनदा वाचून पहा!
स्वामिज्जी की महान रचनॉंएं..
आवडलं. आधी जंगल असतं. मग
मस्त..
मस्त हो....
जबरदस्त!
अफाट लिहिलंय _/\_
मी जास्त कविता वाचत नाही पण
In reply to मी जास्त कविता वाचत नाही पण by खटपट्या
धन्यवाद!
आवडली.
संकु, तू आमच्या थोपू भिताडावर
लै भारी!!
आवडली !
आवडेश