पाऊसगाणे...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 11:13 pm

माझ्या अंगणात आज
वाजे पावसाचा ताशा
सोहळ्यात पर्जन्याच्या
रुजे उद्याची रे आशा..

माझे घर झाले आज
आनंदाने ओलेचिंब
दिसे प्रवाही पाण्यात
भविष्याचे प्रतिबिंब...

माझ्या घरात नाचते
पावसाचे स्वैरगाणे
आणि त्याच्या तालावर
मन विभोर उधाणे...

माझ्या मनात गुजते
जुन्या पावसाची गाज
गेल्या ओल्या दिवसाची
सल छळते रे आज...

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

Bhagyashri satish vasane's picture

26 Jun 2016 - 11:18 pm | Bhagyashri sati...

छान आहे कविता

अभ्या..'s picture

26 Jun 2016 - 11:54 pm | अभ्या..

पाउस कधीही जुना नसतो एवढे बोलून मी माझा प्रतिसाद संपवतो.
जय सगळे

महासंग्राम's picture

27 Jun 2016 - 3:09 pm | महासंग्राम

रच्याकने अभ्या मास्तर तुम्ही शाळेत कदी मॉनिटर होते काय

तीन वर्षे सलग. आमच्या शाळेत हुशारीवर मॉनिटर करत नव्हते. जो दंगेखोर त्याला ते पद मिळत असे.
.
ह्यामुळेच सध्या इथे मला संपादक बनवायचा इचार चालुय. जपून राहा बरका. ;)

वेल्लाभट's picture

27 Jun 2016 - 3:06 pm | वेल्लाभट

क्या बात है ! वाह वाह ! वाह !
आवडली खूप

महासंग्राम's picture

27 Jun 2016 - 3:08 pm | महासंग्राम

बढिया ....

राधी's picture

27 Jun 2016 - 10:10 pm | राधी

कविता आवडली

एकप्रवासी's picture

29 Jun 2016 - 6:05 pm | एकप्रवासी

"सोहळ्यात पर्जन्याच्या
रुजे उद्याची रे आशा.."

आवडली....

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2016 - 8:39 pm | अत्रुप्त आत्मा

वाहुव्वा रे वाहुव्वा! मजा आया.

फारएन्ड's picture

30 Jun 2016 - 7:02 pm | फारएन्ड

नेहमी जून मधे येणार्‍या त्याच त्याच कविता बोअर होतात. पण ही वेगळी वाटली, म्हणून आवडली.

कविता तिहि पावसावर मग क्या बात है..... मस्त

दिनेश५७'s picture

3 Jul 2016 - 10:01 am | दिनेश५७

धन्यवाद!

रणजित पारेकर's picture

3 Jul 2016 - 11:28 am | रणजित पारेकर

छान.......