पाऊसगाणे...
माझ्या अंगणात आज
वाजे पावसाचा ताशा
सोहळ्यात पर्जन्याच्या
रुजे उद्याची रे आशा..
माझे घर झाले आज
आनंदाने ओलेचिंब
दिसे प्रवाही पाण्यात
भविष्याचे प्रतिबिंब...
माझ्या घरात नाचते
पावसाचे स्वैरगाणे
आणि त्याच्या तालावर
मन विभोर उधाणे...
माझ्या मनात गुजते
जुन्या पावसाची गाज
गेल्या ओल्या दिवसाची
सल छळते रे आज...
वाचन
1974
प्रतिक्रिया
13