मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊसगाणे...

दिनेश५७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...

वाचने 1974 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by महासंग्राम

अभ्या.. Mon, 06/27/2016 - 22:36
तीन वर्षे सलग. आमच्या शाळेत हुशारीवर मॉनिटर करत नव्हते. जो दंगेखोर त्याला ते पद मिळत असे. . ह्यामुळेच सध्या इथे मला संपादक बनवायचा इचार चालुय. जपून राहा बरका. ;)

फारएन्ड गुरुवार, 06/30/2016 - 19:02
नेहमी जून मधे येणार्‍या त्याच त्याच कविता बोअर होतात. पण ही वेगळी वाटली, म्हणून आवडली.