हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
30 May 2016 - 2:08 am

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

पैसे परत मिळाले की नाही? ते कोणी लाटले?

... आता माझ्यातला कमांडर जागा झाला. कार्डासोबत मिळालेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे धडाधड फोन लावले. कार्ड ब्लॉक केले! त्यात सांगितलेल्या प्रमाणे कार्डाचे २ तुकडे करून फोटो पाठवले. कार्ड माझ्या खिशात असताना पैसे खटाखट गेले कसे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते! तोवर भाच्याला कल्पना दिली. आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळीच ७ दिवसाच्या सहलीला जायचे कॅन्सल न करता त्याला डॉलर्सची व्यवस्था करून पैसे आणायला विनंती केली. तो ऑफिसातून पटकन पैसे घेऊन घरी आला. तो त्याच रात्री कॅनेटिकेटला पत्नीला मिलपिटासला आणायला फ्लाईट पकडून चालला जाणार असे ठरले होते. त्यामुळे त्याने त्याच्या एका मित्राला आम्हाला पिक अप पॉईंटला सोडायची व्यवस्था करून तो गेला.
नेहमी प्रमाणे पत्नीच्या अपशब्दांना सामोरे जावे लागले. 'आपण हे क्रेडिट कार्ड वापरायला नको होते. तुझ्या उत्साही स्वभावामुळे ते वापरून पैसे गहाळ झाले. नोटा असत्या तर मी जपून ठेवल्या असत्या.' वगैरे रीतसर तासंपट्टी झाली. प्रत्येक बायकोला आपला नवरा वेंधळेपणाने वागून असा 'पचका' करतो असे वाटते की काय कोणास ठाऊक! मस्तक शांत झाल्यावर मी म्हणालो की ते पैसे जरी आत्ता हाती नसतील तरी त्याला इन्शुरन्स कंपनी भरून देईल. 'हो बसलेत असे ते द्यायला, काहीतरी खुसपटं काढून गंडवतील तेंव्हा कळेल.'तंग हवामानला शांत कसे करायचे ते अनुभवी लोकांना पटकन जमते म्हणतात. या वेळी ग्रँड मॉल कामी आला. हातखर्चाच्या उरलेल्या पैशातून नवी पर्स घरी आली!...
... आमची पुढील महिनाभराची ट्रिप व्यवस्थित पार पडली. मध्यंतरी मी जो भेटेल त्याला पैसे गमवल्याची सारंगी वाजवत काय करता येईल याची चौकशी करत असे. प्रत्येक जण आपापल्या कार्डासोबत घडलेली रामकहानी सांगे. आणि पैसे इन्शुरन्स कंपनी देते असे अनुभवाचे बोल सुनावत...
या दरम्यान अॅक्सेस बँकेने मागवलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिली होती. आता एकच काम बाकी होते ते म्हणजे एफ आय आर ची कॉपी पाठवायला मागितली होती ती कशी आणायची? अमेरिकेत एफआयआर नसतो असे एकमुखाने इथल्या स्थायिक लोकांनी म्हटल्यावर मी पेचात पडलो. इन्शुरन्स कंपनी या कारणावरून माझा क्लेम कोलून लावेल हे धडधडीत सत्य होते! मी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तंबी दिली की मला अमेरिकेत काय करून एफआयआर दाखला मिळवतात ते सांगा. जे माझ्याशी ईमेल वरून, फोन वरून संपर्कात आले होते त्यांना मी तुमच्या नोकरीत लफडे करू शकतो. म्हणूननां दम भरला. माझा क्लेम नाहीतर पास झाला तर मी तुमच्यावर दावा ठोकीन. वगैरे राणा भीमदेवी डायलॉग कामी आले...
... आणि अगदी परत यायला निघायच्या जरा आधी माझ्या एका नातलगाने माझ्या गरम डोक्याचा धाक वाटून नेटवरून नंबर शोधून पोलिसांना फोन लावला. तो बोलणार असा रागरंग दिसल्यावर त्यांच्या जावयाने, 'आणा मी बोलतो म्हणून पुढाकार घेतला. त्याच्या सिटिझनशिपमुळे काम फत्ते झाले. पोलीस पुढच्या दहाव्या मिनिटात पॅपू पॅपू करत घरात प्रवेशला. ताडमाड उंच, थोराड बांध्याचा गोरा सोजीरा,' हू इज अॅलकॅ, व्हेरीज शाशीकँट' असे आमच्या नामाचे उद्धार करत आमची कागदपत्रे वाचून 'स्ट्रेंज केस' म्हणून आमच्या सह्या घेऊन १० मिनिटात बाहेर पडला. दोन दिवसात, सोमवारी रिपोर्ट मिळेल असे म्हणून आपले कार्ड दिले. मँचेस्टर, लंडन, दुकानांची नावे, जीबीपी, करन्सी ट्रान्स्फर फी अशा किचकट नावांनी डेबिट व पुन्हा क्रेडिट अशा जंबल एन्ट्रीज माझ्या सारख्या तरबेज अकौंट्स वाल्याला अगम्य होत्या. तर त्या मठ्ठ पोलीसाला काय कळणार? १५ अशा ट्रांझॅक्शन स्लिप वरील हिशेब पाहता माझे ७०० डॉलर या बदमाशांनी हॅक करून लाटले होते. मला वाटतं की आदल्या रात्री ज्या हॉटेलमध्ये उतरलो तिथे किंवा त्या आधी टॅक्सीवाल्याला पैसे देताना कार्ड स्वाईप करताना कोणी तरी त्या मशीनमधून माझ्या कार्डावरील बित्तंबातमी चोरली असेल... आणि बहुतेक इंग्लंडमध्ये न जाता अमेरिकेत सुद्धा बसून, कार्ड न वापरता फेक दुकानांच्या नावाने ते वापरून पैसे गोळा केले असावेत. असा तर्क प्रत्येकाला योग्य वाटला. काहीही असो. गेलेले पैसे परत मिळणार की नाही हे माझ्यासाठी महत्वाचे होते...
... भारतात परतल्यावर इन्शुरन्स कंपनीने २ महिन्याच्या कालावधीनंतर आम्हाला डॉक्युमेंटेशन मिळाले नाही तर क्लेम रिजेक्ट करू म्हणून हैद्राबाद मधून फोन यायला लागले. मग मी अॅक्सेस बँकेमार्फत पाठवलेल्या इमेल्स गेल्या कुठे विचारून विचारून थकलो. या काळात मी एफ आर आरया करन्सी एक्शचेंज करणाऱ्या कंपनीच्या अधिकार्‍यांना भेटून सर्व कागदपत्रे पुन्हा सादर केली. शुभजीत नामक त्या व्यक्तीच्या पुढाकाराने माझे गमावलेले पैसे ७०२ डॉलर माझ्या अकौंट मध्ये जमा झालेले पाहिले व त्याला आरएसआयच्या लॉनवर पार्टीला बोलावले. पण काहींना काही कारणे दाखवून त्याने यायचे टाळले. असो...
... असे हे हरवलेले डॉलर चार महिन्यांनंतर गवसले...
... ते पैसे मिळाल्यावर पत्नीने गालगुच्चा घ्यायला पुढाकार घेतला तेंव्हा गालावरील लाली पाहून पैसे गमावल्यापेक्षा असा प्रीती उत्सव साजरा करायला चान्स मिळाल्याचा आनंद मला जीवनभर आठवत राहील!...
तळटीप : इन्शुरन्स कंपनी - बजाज अलायंस.
भाच्याला त्याच्या पैशाची भरपाई भारतात आल्यावर केली. त्याने तत्परतेने पैशाची व्यवस्था केली म्हणून आम्हाला काहीच जड गेले नाही.
विविध नातलगांच्या तर्‍हा व त्यांना आलेले काही कटू अनुभव ऐकून आम्हाला धीर वाटला की आम्ही असे गंडले जाणारे पहिलेच नाही आहोत!
पोलिस रिपोर्टमधील शेवटी दिलेल्या रिमार्काचे वाचन रंजक वाटते...

मांडणीप्रवासदेशांतरअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

हाहाहा. चांगलाच अनुभव आहे हा.

शशिकांत ओक's picture

30 May 2016 - 12:23 pm | शशिकांत ओक

प्रत्येकाला यावा असा?

नाखु's picture

30 May 2016 - 10:29 am | नाखु

घडल्म असतं तर नक्की काय झाल्म असत्म याचा विचार करण्याची हिंमतच नाही.

पोलिसांच्या (ब)"धीर" देणार्या(?) अनुभुतीचा अनुभवी नाखु

मुक्त विहारि's picture

30 May 2016 - 11:10 am | मुक्त विहारि

भारतात आणि आखाती देशात पिन कोड तरी आहे, पण ज्या देशात पिन कोड शिवाय पैशांचे व्यवहार असतील, त्या देशात खिशांत रोकडा पैसा नसेल तर न जाणेच इष्ट.

शशिकांत ओक's picture

31 May 2016 - 12:21 pm | शशिकांत ओक

मु वि

खिशात रोकडा नसेल तर न जाणे इष्ट!

शशिकांत ओक's picture

31 May 2016 - 12:22 pm | शशिकांत ओक

मु वि

खिशात रोकडा नसेल तर न जाणे इष्ट!

अभिनव's picture

30 May 2016 - 11:39 am | अभिनव

मला काहीच कळले नाही पैसे नक्की कसे चोरी गेले? कार्डाचा नक्की कसा गैरवापर झाल?
ते दिले आहे का लेखात?

शशिकांत ओक's picture

30 May 2016 - 12:21 pm | शशिकांत ओक

नाही? हो!

एक एक्सरे फिल्म वापरून कार्ड क्लोन करण्याचं टेक्निक आहे त्याने काम करतात.
मुद्दा असा आहे की १) तुम्हाला पैसे मिळाले ते त्या कंपनीने व्यवहार खोटे ठरवून पैसे परत दिले का?
२) इकडच्या इंन्श्यगरन्स कंपनीने भरपाई केली?
तुमचे गेलेले पैसे कोणीतरी परत केले हे ठीक आणि आनंदच आहे परंतू मुद्दा १) खरा की खोटा?

शशिकांत ओक's picture

1 Jun 2016 - 12:02 am | शशिकांत ओक

देखील कार्ड क्लोनिंगबद्दल बोलून दाऊदच्या घरच्यांनी वापरलेला फोनवरून गुफ्तगू करता येईल असे सुचवले होते. त्यावरून जाणवले की चर्चा किती फोन कॉल झाले ही रंगली होती. मात्र त्या कॉलमधून गप्पा काय झाल्या ते कोणी सांगेल का?

शशिकांत ओक's picture

30 May 2016 - 2:44 pm | शशिकांत ओक

मी गमावलेल्या पैशाची भरपाई करून द्यायला बांधली होती. त्यांनी आपली गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित करून कोणाला दोषी पकडले हे ते सांगत नाहीत. म्हणून १प्रमाणे काम झाले की नाही ते मला सांगता येणार नाही.

अनिरुद्ध प's picture

30 May 2016 - 5:09 pm | अनिरुद्ध प

खरच आपण मोठ्या धीराने प्रसंग निभावलात, असे खरच कोणाच्या वाट्यास येऊ नये हि सदिच्छा

थोडक्यात तुम्हाला इंन्शु भरपाइ मिळाली आणि चोरलेल्या रकमेपेक्षा तुमचा इंन्शु जास्ती असल्याने सर्व पैसे मि। मिळाले.चोरी कशी झाली ते कशाला शोधेल इंशु कंपनी?

शशिकांत ओक's picture

5 Jun 2016 - 9:13 am | शशिकांत ओक

अॅक्सेस बँकेचे कार्ड होते. त्यांनी बजाज अलायन्स कडे केस दिली होती. इन्शुरन्स कंपनी वाल्यांची असे फ्रॉड शोधून काढायची गरज आहे. ते कसे काम करतात . वगैरे वर इथे कोणाला जास्त माहिती असेल तर सादर करावी. ही विनंती.

नाही शोधत ते.एक क्लेम सेटल एवढंच महत्त्व देतात.

शशिकांत ओक's picture

9 Jun 2016 - 12:26 am | शशिकांत ओक

मल्टी करन्सी कार्डचे तुकडे तुकडे करून फेकून दिले.

शशिकांत ओक's picture

9 Jun 2016 - 12:26 am | शशिकांत ओक

मल्टी करन्सी कार्डचे तुकडे तुकडे करून फेकून दिले.

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 3:54 am | रमेश भिडे

>>>१५ अशा ट्रांझॅक्शन स्लिप वरील हिशेब पाहता माझे ७०० डॉलर या बदमाशांनी हॅक करून लाटले होते.

अगदी 75 रुपये डॉलर पकडला तरी 700 चे होतात किती???? 53500 रुपये????

उगाच लक्षाधीश आणि भिक्षाधीश?

शशिकांत ओक's picture

10 Jun 2016 - 1:21 am | शशिकांत ओक

आपला रोकडा सवाल आवडला.मी एरव्ही पैशाने लक्षाधीश होतो म्हणूनच अमेरिकेची ट्रीप केली. मात्र गेले ते पैसे पाहता मला नातलगांकडे त्या करन्सीसाठी कटोरा हाती घ्यावा लागला या अर्थी भिक्षाधीश असे मला अभिप्रेत आहे...