वादळचा उत्तरार्ध

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
25 May 2016 - 6:31 pm

अलीकडेच रातराणीच्या कळते रे फॅनक्लबमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या जुन्या कथाही वाचून काढल्यात आणि मग त्यांनी सुचविल्याप्रमाणे वादळ (शतशब्दकथा)चा उत्तरार्ध लिहण्याचे ठरवले. पण शतशब्दाच बंधन नाही घालून घेतलं.
रातराणी .. बघा काही जमलंय का ? जास्त टाकावू वाटल्यास संमना धागा उडवायला सांगा बिनधास्त.
---------------------------------------------------------------------
नेहाशी बोलून त्याने फोन ठेवला. अर्ध्या तासात नेहा त्याच्या घरी पोहोचणार होती म्हणून तो उत्तेजित झाला होता.
मागचे दीड-दोन महिने दोघेही प्रोजेक्टमध्ये अत्यंत व्यस्त असल्याने कामाव्यतिरिक्त त्यांना एकमेकांचा सहवास लाभला नव्हता. पण आता प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. उदया शनिवार होता. दोघांच्या आवडीची वाईन त्याने आणून ठेवली होती.
"नेहा.. सो कुल.. सुंदर, स्मार्ट आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिकल.....आणि बेडरुममध्येही.."

तो नेहाच्या विचारात बुडालेला असतानाच वार्‍याच्या मंद झुळुकी समवेत रातराणीचा मंद सुंगध खोलीत दरवळला. अचानक त्याचे लक्ष त्या फोटोकडे गेले.
"ओह .. नेहा घरी येत असताना हा फोटो नको इथे उगाच.. तसं नेहाला त्याचा काही प्रॉब्लेम नसेल , पण तरी नकोच" असा विचार करीत तो उठला आणि फोटोपाशी गेला. फोटोत त्याला बिलगलेली ती सुंदर आणि गोड दिसत होती, बोलके डोळे, काळेभोर लांबसडक केस, किचित विलगलेले ओठ आणि त्यातुन झळकणारे तिचे लाघवी स्मितहास्य. लग्नानंतरच्या पहिल्या महिन्यात काढलेला तो फोटो होता. किती आनंदात असायची ती, तिचं प्रेम, तिचा विश्वास , तिचं अवघं विश्व तोच होता.
पण आता..तिच्या फोटोकडे बघत तो क्षणभर थबकला. पण क्षणभरच. लगेच त्याने अपराधीपणाची भावना झटकली
"मी काही तिच्यावर अन्याय केलेला नाहीये.. तिच्या सहवासात मला काहीच मजा वाटेनाशी झाली होती. तिचं ते पावसात, फुलापानांत , पाखरांत आणि कवितेत रमणं आणि तिचा तो साहित्यिक भाषेत बुडालेला रोमान्स मला बोअरिंग वाटू लागला होता. तिचे कवितासंग्रह प्रसिद्ध होत आहेत.. चांगले आहे , मला आनंदच आहे तिच्या यशात. पण मी नाही त्यात रस घेवू शकत ना. मग मला माझ्या प्रोजेक्टमधली नेहा आवडली. मजा येते तिच्यासोबत. आम्ही एकमेकांना फक्त पसंत करतो. मनाने फार काही गुंतलेलो नाही. माझी आणी नेहाची जवळीक मी तिच्यापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. मला दुखवायचं नव्हतंच तिला. पण तिला ते कळल्यावर नाकारण्यात अर्थ नव्हता. मग तिची तीच घर सोडून निघून गेली, मी जायला सांगितलं नव्हतच. उलट मी तर स्पष्टच म्हणालो होतो की मला काही हे लग्न मोडायचं नाहीये किंवा नेहासोबत लग्न करायचं नाहीये. त्यावर तीच मला म्हणाली "मला प्रेम हवंय रे तुझं.. फक्त तुझं नाव नाही. आणि तुझं लक्ष माझ्यात नाहीये हे मला समजत होतं पण मीच वेड्यासारखी मनाला समजावत होते की कामाच्या ताणामुळे तू मला वेळ देत नाहीयेस. जाउदे माझी काही तक्रार नाहीये. मी तुला सक्तीने माझ्यावर प्रेम करायला नाही लावू शकत ना. आणि तू मला पुर्वी जे आनंदाचे दिवस दिले होतेस ते मी कधीच विसरणार नाही. निघते मी. काळजी घे स्वतःची"
...मला भिती होती पण ती अजिबात भांडली नाही, काहीच आदळाआपट नाही की रडारड नाही..डोळ्यांत वेदना जाणवत ..."

त्याने एक उसासा टाकत फोटो तिथून उचलला "छे.. .मी पण काय विचार करतोय.. आता ती ही सावरली असेल...मागे काहीतरी अल्बमसाठी गाणि लिहिणार होती. मला वाटतं चालू झालं असेल ते काम आता. बाकी मी तिचं काही वाईट केलं नाही. एक मोठा फर्निश्ड फ्लॅट आहेच तिच्या नावावर , त्याचं भाडही तिच्याच अकाउंटला जमा होतंय....हो ती सावरली असेल नक्कीच.. आणि तिच्या जाण्यानं माझाही फायदा झालाच आता नेहाला कधीही बिनदिक्कत घरी बोलावू शकतो.. "

तितक्यात बेल वाजली..
लवकरच नेहाच्या परफ्युमचा वास आणि वाईनचा दर्प यांनी रातराणीचा गंध झाकोळून गेला.

सकाळी आठच्या सुमारास त्याचा मोबाईल वाजला "xxx हे ऑनसाईटवाले झोपू पण देत नाहीत.. आता काय आग लागली बुवा.."
नेहाच्या मिठीतून स्वतःला सोडवत त्याने मोबाईल उचलला.
"हॅलो.."
"हेलो..." तिचा आवाज ऐकून त्याने गडबडून स्क्रीनकडे पाहिले.
"हं.. ब.. बोल"
"कसा आहेस रे.. ?"
"आय म फाईन..ठीक , मजेत"
"मला परत यायचंय, आपल्या घरी."
"...." त्याला काहीच सुचत नव्हते.
"डार्लिंग झोप ना.. काय कॉल चालू केलेस रे सकाळी सकाळी..." अर्धवट झोपेत नेहा बडबडली...
"हॅलो..." त्याने गडबडून फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण पलीकडून फोन बंद झाला होता.
काही वेळ फोनच्या स्क्रीनकडे बघत तो पुटपुटला
"कुणी एखाद्याला एवढं कसं आवडू शकतं?"
----------------------------------------------------------------------------------
शेवटचं वाक्य रातराणीकडूनच घेतलय :)

कथाप्रतिसादआस्वादलेख

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

25 May 2016 - 6:56 pm | सुबोध खरे

कथा आणि उत्तरार्ध
दोन्ही आवडले
छान आहेत.

मराठी कथालेखक's picture

28 May 2016 - 9:13 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

रातराणी's picture

25 May 2016 - 7:36 pm | रातराणी

केवढा तो दुष्टपणा! मकले तुम्हाला बंटीला दोन दिवस (संपूर्ण) सांभाळण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

अवांतर: कथा आवडली. :( मी फोन झाल्यानंतरचा हा भाग आहे अशा इंप्रेशनने वाचत होते. मूळ कथेतला संवाद शेवटी आल्याने जबरदस्त धक्का बसला. छान जमली आहे कथा.

अति अवांतर : माझा फॅन क्लब आहे?! हे धत्तड तत्त्ड. एखाद्या वर्षभर उनाडक्या केलेला मुलगा /मुलगी दहावी बारावीला एकदम बोर्डात आल्यावर कसे वाटेल तसंच वाटतंय मला आता. एवढ्या कौतुकाची सवय नाही हो. खूप खूप धन्यवाद. आणि मकले तुमच्या धाग्यावर अवांतर केल्याबद्दल क्षमस्व.

मराठी कथालेखक's picture

25 May 2016 - 11:42 pm | मराठी कथालेखक

दुष्टपणा... हो थोडा झाला खरा. म्हणजे नायकाने नायिकेच्या प्रेमाची कदर न करणे (हा 'कळते रे' चा इफेक्ट म्हणता येईल का ? :)
शेवटचं वाक्य मुळ कथेतलं नाहीये ओ... 'कळते रे' मधलं आहे :)
बाकी होरपळ कथेवर ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यावरुन तरी असंच वाटतं की आता तुमचा मिपावर फॅनक्लब बनला आहे...माझ्यापुरतं म्हणाल तर मी सध्या तरी 'कळते रे' चा 'जबरा फॅन' झालोय.. काल अनेकांना मी त्याचा दुवा पाठवला.
होरपळ पण खूप आवडली पण 'कळते रे' बात काही औरच....
बाकी जे रवी बघू शकत नाही ते बघायला मी पण जात नाही त्यामुळे तुमच्या कवितांपासून अद्याप दूर आहे.

रातराणी's picture

27 May 2016 - 12:36 am | रातराणी

मला परत यायचंय, आपल्या घरी.

ह्या वाक्याबद्द्ल म्हणत होते मी.

चाणक्य's picture

26 May 2016 - 9:39 am | चाणक्य

मूळ कथेतला संवाद शेवटी आल्याने जबरदस्त धक्का बसला. छान जमली आहे कथा

याच्याशी सहमत

नाखु's picture

26 May 2016 - 9:25 am | नाखु

@रातराणी

अति अवांतर : माझा फॅन क्लब आहे?!

"ऐ $$$$$$ इसमे कोई शक? होनाभी नही चाहीए"=== इथुन तिथुन मिथुन

"बर्खुद्दार आपके लेखनके और विड्म्बनकी झंकार अभीतक हमारे कानोमें गुंज रही है,और आप हमींपर शक करते हो,ऐसी तौहीन दुबारा मत करना" == जानी और मानी राज कुमार

"बाई तुम्ही लिवलेल आमच्या मिपा पोरास्नी लई आवडतं बघा,असच लिहित जावा"=== निळुभाऊ (चरित्र भुमीकेत फक्त)

संकलक नाखु

रातराणी's picture

27 May 2016 - 12:37 am | रातराणी

खी खी खी.
आणि मी तुमच्या प्रतिसादांची पंखा आहे :)