एलियनायटीसेलिया भाग ४

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
20 Sep 2008 - 6:01 pm

मागील भागः
एलियनायटीसेलिया भाग ३
एलियनायटीसेलिया भाग २
एलियनायटीसेलिया भाग १

"काहीतरी लफडं असणार. आपण कॅलिब्रेटर पाहूयाच म्हणजे किती तीव्रतेचे सिग्नल्स आहेत ते समजेल", आम्ही दोघं एकाच वेळी म्हणालो. कॅलिब्रेटर पाहिल्यावर समजलं की ते सिग्नल्स खरंच खूप सशक्त होते. "पुन्हा टेलिस्कोप तिकडे फिरवून पाहूया दोन मिनिटं?", मार्कचंही तेच मत पडलं. आणि त्या दिशेला काहीच नव्हतं, मोकळं आकाश!

मी आणि मार्क दोघांनी ठरवलं की एकीकडे माईकनी ठरवलेले पल्सार्स पहायचे आणि तेवढ्या वेळात कुणा अनुभवी माणसाशी बोलायचं. म्हणून आम्ही इंट्रानेटवरून सगळ्या लोकांचे घरचे फोन नंबर्स काढले. शनिवारी सकाळी कोण भेटणार जॉडीमधे (जॉडी, यॉडी, जॉडर्स अशी सगळी नावं आम्हीच लोकांनी प्रेमानी दिलेली, जॉड्रलला!)? मार्क टेलिस्कोप सांभाळत होता आणि मी आधी इयनला फोन केला. इयनच्या अनुभवावर त्याचा नसेल एवढा माझा विश्वास आहे. बराच वेळ रिंग वाजली कोणीही उचलला नाही, आणि व्हॉईसमेलपर्यंत गेल्यावर मी फोन थांबवला. आणि मग ट्यूब पेटली, सगळे मास्तरलोकं एकतर कॉन्फरन्सला गेले होते नाहीतर मँचेस्टरच्या मास्तरांबरोबर ट्रिपला! मग विचार केला आता माईकलाच विचारुया! पण तो कुठे घरात होता? बरं एकाच घरात रहाणार, एकाच हापिसात काम करणार, त्याच्या मोबाईल नंबरची गरजच कुठे होती? काही विचारायचं असेल तर एकतर स्काईप होतं किंवा ... स्काईपच होतं! हो आम्ही एकाच घरात, किंवा एकाच ऑफिसरूममधे एकमेकांशी स्काईपवरूनच बोलायचो. आळशीपणाची आणखी एक झलक! पण आत्ता काय? मग आठवली जेनी! जेनी तेव्हा तिच्या घरी गेली होती, लिव्हरपूलला; तिची ड्रायव्हींग टेस्ट होती. हं, तिचा मोबाईल नंबर होता पण तो होता माझ्या मोबाईलमधे. बरं जॉड्रलमधे मोबाईल्स आणलेले चालत नाहीत, रेडीओ टेलिस्कोप आहे ना तिथे म्हणून! आणि मला कोण एवढं बोंबलत शोधणार होतं युकेमधे की मी मोबाईल जवळ घेऊन फिरावं? झालं, आता काय असा मोठा प्रश्न होता. आणि मार्कला म्हटलं, "मार्क, आता आपणच काय तो निर्णय घ्यायचा. मला तरी असं काही वाटत नाही की त्या सिग्नल्सना आपण अवाजवी महत्त्वा द्यावं, पण अगदीच सोडूनही देऊ नये. तर ह्या मोठ्या लव्हेल टेलिस्कोपनी आपण ठरवलंय त्याप्रमाणे पल्सार्सच पाहूया आणि तो छोटू आहे ना, ७ मीटरचा, त्यानी आपण त्या नवीन "सोर्स"कडे पाहूया!" त्यालाही माझं म्हणणं पटलं, किंवा त्यानी तसं दाखवलं तरी!

आता मात्र गंमत होती. कारण मार्कला त्या मोठ्या टेलिस्कोपच्या कंट्रोल रुममधून हलता येणार नव्हतं. आणि हा छोटू फक्त शिकवण्यासाठी असल्यामुळे त्या टेलिस्कोपसाठी कोणी कंट्रोलर नव्हता, ना काही मदत! मला काहीच कल्पना नव्हती कसं बघायचं ते! मार्कनी मला तिथल्यातिथे एक छोटं व्याख्यान दिलं आणि मी निघाले त्या छोटूकडे. तसं काही फारसं कठीण नव्हतं तो टेलिस्कोप वापरणं, जमलं. फक्त अर्धा वेळ हा विचार करण्यात गेला की इथे "विण्डोज"वरचे कंम्प्यूटर्स का आहेत! पण ती वेळ "प्रश्न तत्त्वाचा आहे", वगैरे म्हणण्याची नव्हती. त्यामुळे त्या महत्त्वाच्या "तत्त्वा"ला हरताळ फासून मी या महत्त्वाच्या "सोर्स"कडे टेलिस्कोप वळवला. पण आता मी पूर्णच अधू झाले होते. एकदा टेलिस्कोप त्या दिशेला वळवून झाला, आणि डेटा येण्यास सुरुवात झाली की पुढे मला काहीच येत नव्हतं. या डेटाचा फॉरमॅट वेगळा. आणि मुख्य म्हणजे "विण्डोज" वापरताना माझी फारच धांदल उडाली! मग शेवटी मी ठरवलं की डेटा महत्त्वाचा आहे जो येऊन पडत तर आहे, मग बाकीचं काम उद्या-परवाकडेही करता येईल.

दुपारी बाराच्या सुमारास माईकची ऑब्झर्व्हेशन्स संपली. जे काही प्रथम निरीक्षण होतं त्यावरुनतरी त्या पहिल्या धक्क्यानंतर नव्या "सोर्स"नी फारसं काही "केलं" नव्हतं. आता मला फार भूक लागली होती आणि झोपही येत होती. मी सगळं बंद केलं आणि माझं सामान घेतलं आणि "व्हिजिटर सेंटर"च्या दिशेकडे मोर्चा वळवला. थंडी असली तरी हवा स्वच्छ होती, शनिवार असल्यामुळे खूप लोकं त्यांच्या मुला-बाळांना घेऊन सहलीसाठी जॉड्रलला आले होते. टेलिस्कोपमधे काय बघण्यासारखं असं समजू नका! लव्हेल टेलिस्कोप हा संपूर्णपणे फिरणारा जगातला तिसर्‍या नंबरचा टेलिस्कोप आहे. शिवाय विद्यापीठाची तिथे मोठी जागा आहे, त्यात एक छोटं व्हिजिटर सेंटर आहे, तिथे छोटेखानी प्रदर्शन आहे खगोलशास्त्रावर, आणि मुख्य म्हणजे बाहेरच्या भागात खूप मोठ्या भागावर खेळण्याची जागा आहे. त्यामुळे खूपच गर्दी होती. व्हिजीटर्ससाठी असलेली पार्किंगची जागा जवळजवळ भरलेली होती. त्यामुळे गर्दी व्हायच्या आत पोटाची शांत करावी असा विचार करुन मी रेफेक्टरीकडे वळले. गरमगरम सूप पोटात गेल्यावर बरं वाटलं. मग एक सँडविच घेऊन मी पुन्हा जॉड्रलकडे गेले.

आता तसं काही काम नव्हतंच, पण घरी जाउनसुद्धा काय करणार होते? मग शांतपणे माझं मशीन सुरु केलं आणि एकेक इमेल्स बघायला सुरुवात केली. अचानक निरुपमची चार-पाच इमेल्स होती! काल संध्याकाली आमची जाम वादावादी झाली होती आणि मी वैतागून निघून गेले होते. आमच्या घरी, चेशर हंटमधे, इंटरनेट नसल्यामुळे एकदा घरी गेलं की जवळजवळ "बिग ब्रदर खेळणं" एवढंच करता यायचं. त्याची बरीचशी इमेल्स थोडी "घाबरत" लिहिल्यासारखीच होती. माझा राग, वैताग आतापर्यंत गेला होता. त्यामुळे मला जरा मज्जा वाटायला लागली होती. पण त्याला असं छळणं पटत नव्हतं. पण आज होता शनिवार, त्यामुळे त्याच्याकडे इंटरनेट नव्हतं आणि अम्ला आत्ता या क्षणी त्याला सांगावसं वाटतं होतं ..... त्याचा फोन नंबर ... तोपण भारतीय सिमकार्डात, भारतात होता. मला असं वाटलंही नव्हतं की त्यालाही माझ्याबद्दल असं काही वाटेल ... आता काय करावं या विचारातच मी एकीकडे इतर इमेल्स बघायला लागले. त्यात एक इलेम होतं कोणत्यातरी नवीन माणसाकडून; त्याचा इमेल पत्ता दुसर्‍या एका ऑब्जर्व्हेटरीचा होता म्हणून "डी"बटन दाबलं नाही. उघडलं, त्यात एक "अलर्ट" होता. साधारण मी संध्याकाळी सगळं बंद करुन काल निघाले होते त्यानंतर एखाद तासानी पाठवलेला तो अलर्ट होता. त्यात त्यानी लिहिलं होतं की काल दुपारच्या सुमारास अमुकतमुक पोझिशनवर एक नवा एक्स-रे सोर्स पाहिला गेला आहे, तुम्हाला शक्य असेल तर याचा इतर तरंगालांबीमधून, म्हणजे रेडिओ, दृष्य वगैरे प्रकारच्या दूर्बिणींमधून तो सोर्स पहावा अशी विनंती त्यात होती. मी धावतच कंट्रोलर रुममधे गेले, सकाळी जो सोर्स आम्ही पाहिला होता त्याचे कोऑर्डिनेट्स, पोझिशन बघण्यासाठी! आता मार्कची ड्यूटि संपली होती आणि तिथे दुसरा कंट्रोलर आला होता. तो फारच विचित्र होता स्वभावानी! तो होता अर्धा मराठी, अर्धा पंजाबी, आणि लहानपणापासून फ्रान्समधे राहिलेला, आनंद राजवीर सिंग त्याचं नाव! मला पाहुन वसकन म्हटला 'येस्सस... व्हात दु यु वान्त'..

क्रमशः

बालकथाविनोददेशांतरमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Sep 2008 - 6:09 pm | अवलिया

अरे एलियन घाबरुन पळाला की काय‍?
आणि हा कोण वसकन ओरडणारा ? चक्क तुमच्यावर ओरडला? थापा मारु नका

उत्तम भाग (थोडा मोठा झाला असता तरी चालले असते)

पुढील भाग लवकरात लवकर येवु द्या

आनंदयात्री's picture

20 Sep 2008 - 6:25 pm | आनंदयात्री

उत्तम भाग, आता पुढे काय होते याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आणी उत्तमोत्तम हुशार हुशार नवनवीन क्यारेक्टर पण येत आहेत :)

आपलाच,

आनंद राजवीर सिंग
(सिंग इज किंग)
;)

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

मदनबाण's picture

20 Sep 2008 - 6:40 pm | मदनबाण

यम्मी ताई यम्मी ताई लम मस्त तुम्ही..

लवकर लवकर पुढचा भाग टाका बरं

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मेघना भुस्कुटे's picture

20 Sep 2008 - 7:31 pm | मेघना भुस्कुटे

खतरनाक!
आनंद राजवीर सिंग??? =)) =)) =))
मजा येतेय, लय मजा येतेय...
आजूबाजूच्या जगाचं चित्र, तुझ्या आजूबाजूचे लोक, तुझी मनःस्थिती (म्हणजे तुझ्या हिरॉइनची!) सगळं खतरनाक लिहिलं जातंय. लिही लवकर.

राघव's picture

20 Sep 2008 - 9:44 pm | राघव

भाग छान लिहिलाय.. आवडला. :)

पण हा अन्याय आहे... आम्ही इतकी वाट बघायची अन् त्यात इतका छोटुसा भाग तुम्ही लिहिणार.. :W
वाचायला सुरुवात केली अन् लगेच संपूनही गेला.. 8| थोडे जास्त लिहा कि ताई.
मुमुक्षु.

स्वगत: हा क्रमश: चा प्रकार कुणी काढला रे.. त्याच्याशी जरा बोलावे म्हणतो मुद्या-गुद्यांनी X(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 11:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वारी हा लोक्स! जाम पाऊस पडत होता, मग मला क्यांपूटरला चिकटायचा कंटाळा आला. उद्या मोठा लिहिते भाग.
आणि हो, प्रोत्साहनवर्धक प्रतिसादांबद्दल थ्यांकू! :-)

अदिती

ऋषिकेश's picture

21 Sep 2008 - 12:26 am | ऋषिकेश

:) शेवटाला नेहेमी सारखं ढँटॅढँ नाहि झालं... मुजिकचा माफक आवाज आला ;)
पण नेहेमीसारख्या ओघवत्या भाषेमुळे भाग मस्त वाटला :)
एलियन्सचे सिंगल समदिकडे मिळलेले वाटून र्‍हायलंय... लिवा फुडं पटापटा
-(वाचक) ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2008 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

मला पाहुन वसकन म्हटला 'येस्सस... व्हात दु यु वान्त'..

म्हंजी सदाशिव पेठेत दुकानदार गिर्‍हाईकावर वरडतो तस म्हनायच.
प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 9:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हंजी सदाशिव पेठेत दुकानदार गिर्‍हाईकावर वरडतो तस म्हनायच.

श्श्श्श ... काका, हळू बोला! नाहीतर इथे एलियन्सच्या ऐवजी पुणेकर आणि इतर असा पुन्हा वाद झडेल! ;-)
कोणाला सांगू नका, पण हो, अगदी तस्साच वरडला!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2008 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाग ओघवता झाला आहे.
लेखनाची शैली पाहता,एलियनायटीसेलियाचे पुढील भाग मोठे झाले तरी, वाचायला जड जाणार नाही असे वाटते.
पुलेशु :)

अभिज्ञ's picture

21 Sep 2008 - 1:28 pm | अभिज्ञ

चारहि भाग एकदमच वाचले.
अतिशय छान लिहिले आहेत. सुंदर व ओघवती भाषा.
अभिनंदन.अजुन येउ द्यात.

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 1:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठेंकू ठेंकू ठेंकू .... आता पाचवा भाग लिहायला सुरूवात झाली आहेच.

सुनील's picture

21 Sep 2008 - 4:50 pm | सुनील

छान लिहिलय. येउद्यात लवकर पुढचा भाग.

फोटो कुठला आहे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 4:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> छान लिहिलय. येउद्यात लवकर पुढचा भाग.
:-) धन्यवाद. पुढचा भाग अजून थोड्या वेळात येईलच. जवळजवळ झालाय पूर्ण लिहून!

>> फोटो कुठला आहे?
फोटो "आर्बोरीटम" मधला आहे. जॉड्रलच्या मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे, तिथे सर बर्नार्ड लव्हेल, ज्यांनी तो लव्हेल ज्यांनी तो मोठा टेलिस्कोप बांधला, त्यांनी बरीच झाडंही लावली आहेत. तिथे पर्यटकांसाठी फिरायला वगैरे थोडी जागा डेव्हलप केली आहे, तिथला. तिथूनच आणखी पुढे चालत गेले की आमची "चेशर हंट" ही झोपडी यायची!

आदिती खुप छान भाग लिहित आहेस.एवढ्या कल्पना कोठुन सुचतात तुला?अनुपमेय लिखाण....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एवढ्या कल्पना कोठुन सुचतात तुला?

यातल्या अर्ध्याहून जास्त गोष्टी खय्रा आहेत!

तुम्हाला लिखाण आवडलं, धन्यवाद!