(खायचे आहे कुठे?)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
19 Sep 2008 - 9:20 pm

अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल!

काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे?
चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?...

ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...

सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी
मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?...

दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी?
कोण तो? फोटो कडेने काढतो आहे कुठे?...

मान्य 'रंगा'नेहि केले भोग 'त्या' लेखातले
बारके 'संपादकाला' व्हायचे आहे कुठे?

चतुरंग

*संदेश = एक बंगाली मिठाई

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Sep 2008 - 10:42 pm | प्राजु

मान्य 'रंगा'नेहि केले भोग 'त्या' लेखातले
बारके 'संपादकाला' व्हायचे आहे कुठे?

वाया वाया.. सगळे वाया...सगळी कसरत वाया...
उगाच दीड किलो वजन कमी केलेत... अहो, नव्हते व्हायचे बारिक तर कशाला "त्या" लेखाचा खटाटोप??
असो.. सध्याच्या तुमचा उपक्रमही छान आहे हो.. चालूद्या.
विडंबन छान झाले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वगत : आजकाल चतुरंगांची खादाडी या विषयावर बरीच विडंबने येत आहेत... विभाला सांगावे लागेल. :?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 11:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...

हहपुवा!
"वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो" या कटूसत्याची जाणीव तुम्हाला महिन्याच्या आतच झालेली दिसते!

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 9:28 am | विसोबा खेचर

ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...

ह्या ओळी झकास! :)

आपला,
(ढेरपोट्या) तात्या.

एक सल्ला - अरे रंगा, एखादी छानशी गझल किंवा कविता लिही रे प्लीज! च्यामारी, आता काही दिसांपुरती तरी बास झाली ही विडंबने.. :)

तात्या.

ऋषिकेश's picture

20 Sep 2008 - 9:53 am | ऋषिकेश

ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...

हे बेष्ट
बाकी ठिक

आगाऊ दुरुस्ती: संदेश असा पदार्थ नसून सोंदेश आहे

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार's picture

20 Sep 2008 - 10:45 am | केशवसुमार

रंगाशेठ,
विडंबन छान पण यमक चुकली.. ४/१० यायचे.. जायचे..इ...
(निवृत्त) केशवसुमार
स्वगतः केश्या तू बाई ,बाटली, बापात अडकला होतास आता हा रंग्या 'कसरती' मध्ये आपल्याला जे झेपत नाही ते लिहायचे कशाला..;)

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

(खुद के साथ बातां : बघितलंस रंग्या, तरी म्हणत होतो जास्त भूक लागल्यावर विडंबनं करु नयेत म्हणून, चुका होतात :T ! पुढचं विडंबन भरल्या पोटाने येऊदेत आणि विषय बदल जरा! ~X( )

चतुरंग

राघव's picture

20 Sep 2008 - 9:16 pm | राघव

दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी?
कोण तो? फोटो कडेने काढतो आहे कुठे?...

झक्कास.... चालू द्यात!
(व्यायाम करण्यास कंटाळणारा) मुमुक्षु :D