तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी.
तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं.
फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास.
ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग.
मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य.
त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा.
आभाळभर उसळल्या आनंदाच्या लाटा, त्यांच्या दु:खाच्या छटा मी मोजतच गेलो. मग ठोकत गेलो आरोळ्या अज्ञात भविष्याच्या.
तो चेहरा मला भेटला नाही.
मात्र एक बंडखोर भटकतोय काटेरी वनात, दु:खाच्या सावलीच्या शोधात... अजूनही...
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 11:32 pm | उगा काहितरीच
ओॲसीस...
6 Apr 2016 - 7:37 am | विजय पुरोहित
एक अतिशय भयाण अमूर्त विश्व निर्माण करतं तुमचं लेखन.
Awesome!
6 Apr 2016 - 7:47 am | यशोधरा
असा मी असामी मधली एक व्यक्तीरेखा आठवली.
6 Apr 2016 - 8:42 am | अर्धवटराव
मी झोपतो करुन हिमालयाची उशी ?? :प
6 Apr 2016 - 9:01 am | यशोधरा
ऑस्स लग्गेच सांगायचं नै.
6 Apr 2016 - 9:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
णाणु सरणजामे!!
6 Apr 2016 - 8:50 am | विजय पुरोहित
तुमचं लेखन आज थोडं ग्रेससारखं वाटतंय. वाचताना अर्थाचे सूक्ष्म संस्कार मनात उमटत जातात. पण वाचून झाल्यावर परत ते वाळूसारखं हातातून निसटून जातं. फक्त त्या शब्दांनी निर्माण केलेलं एक अद्भुत, अमूर्त, भयचकित करणारं विश्व मनावर ओरखडे मारत जातं. आणि सगळं वाचून थोडं शांत बसलं तर जाणवतं की मी आत्ताच कुठल्या तरी वंडरलँडमधून आलोय.
अद्भुत वाटलं हे नमूद करतो.
6 Apr 2016 - 10:38 am | राजाभाउ
अगदी अगदी ग्रेस + जीए
6 Apr 2016 - 9:20 am | DEADPOOL
पाप धुतले!
;)
6 Apr 2016 - 10:43 am | स्पा
कायीयेक्क कळल नाय
6 Apr 2016 - 11:16 am | चांदणे संदीप
जव्हेर टच!
Sandy
6 Apr 2016 - 11:42 am | रातराणी
छान!
6 Apr 2016 - 3:33 pm | अपरिचित मी
छोटंसं पण मार्मिक
6 Apr 2016 - 8:48 pm | होबासराव
.
6 Apr 2016 - 10:16 pm | जव्हेरगंज
कोणाला समजलं का काय होतं हे?
मग जरा इस्कटा ;)
6 Apr 2016 - 10:39 pm | नीलमोहर
आपल्याच अनेक कथांतील वाक्यांचे कोलाज बनवलंय तुम्ही..
त्यामुळेच हे आधीही वाचल्याची deja vu ची फीलिंग येत होती..
6 Apr 2016 - 10:49 pm | जव्हेरगंज
नै हो, सगळी वाक्ये नवीन आहेत! एखादा शब्द रिपीट होऊ शकतो.( तो तर होणारच ;) )
बाकी हे ज्या अर्थाने लिहिलय त्यातल्या भावना पोहोचल्या का सगळ्यांना? असं विचारायचं होतं मला!!
7 Apr 2016 - 11:31 am | नीलमोहर
मला बरीचशी वाक्यं रिपीट वाटली.. असो,
आता तुमच्या मेंदूचा अनलॉक कोड तेवढा पाठवून द्या, आम्ही शोधतो नक्की काय अभिप्रेत आहे यातून ते ;)
7 Apr 2016 - 6:32 pm | जव्हेरगंज
आमुचे समदे साहित्य मिपावर पडून आहे! सोदाहरण स्पष्ट करा :)
तो शोधतोय आम्ही! भेटल्यास जरुर कळवू ;)
6 Apr 2016 - 11:13 pm | viraj thale
विधवेच दुःख ?
6 Apr 2016 - 11:18 pm | अमृता_जोशी
निःशब्द....
6 Apr 2016 - 11:21 pm | अमृता_जोशी
मनाला काहीतरी टच झाले.. पण नेमका अर्थ मात्र कळला नाही.
7 Apr 2016 - 9:09 am | ब़जरबट्टू
ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग
.आयला, मला तर राहुल गांधीच आठवला..
7 Apr 2016 - 11:12 am | आनन्दा
हो, तिथे पण म्याच होते खरे..
7 Apr 2016 - 11:11 am | आनन्दा
अश्वत्थामा दिस्ताय जनु..
7 Apr 2016 - 12:15 pm | चांदणे संदीप
आयुष्याच्या अखेरीस कुणीतरी घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांच्या क्षणचित्रांना आणी भविष्यातल्या स्वप्नांना जोडून कोलाज कल्पित आहे असे वाटले!
आता तुमच येऊद्या! :)
Sandy