लदाख सायकल ने : लेह ते ससपोल (भाग १३)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
11 Feb 2016 - 4:01 pm

पहिल्या टप्प्या मध्ये ४७४ किलोमीटर चे अंतर मी पार केले. त्याच बरोबर पाच घाट पण पार केले. चांगला रस्ता थोड्याच ठिकाणी भेटला. जास्त करून खराबच मिळाला. लांब लांब पर्यंत गावच भेटले नाही. तरी पण जास्त काही अडचण न येता, हे अंतर पार केले. हे माझे मोठं यश आहे. म्हणून मी माझा, माझ्यावरच गर्व करतोय.
आज ४९ किमि सायकल चालवली

दिवस पंधरावा

नऊ वाजता उठलो. उठायला कोणतीच घाई केली नाही. रात्री चांगली झोप लागली. जानेवारी महिन्यात लेह फिरून झाले होते,त्यामुळे आता काही फिरण्याची आवश्यकता नाही. खारदूंगला ला जायची खूप इच्छा होती पण हवामान खराब असल्याने परमिट देत नव्हते. सारख्या बातम्या येत होत्या कि, हिमाचल आणि उत्तराखण्ड मध्ये पावसाने थैमान घातले आहे. लद्दाख मध्ये त्याची काही भीती नव्हती. हा पण जोजीला नंतर जम्मू पर्यंत नक्कीच त्रास देऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर दिल्ली ला जाउन हा प्रवास संपवायचा होता.

लेह पासून श्रीनगर पर्यंत तीन घाट पडतात - फोतू-ला, नामिक-ला और जोजी-ला. ह्या मध्ये फोतू-ला सगळ्यात उंच आहे - 4100 मीटर. सगळ्या गोष्टी पकडून म्हणजे येणारे चढ उतार, राहण्यासाठी जागा आणि इतर . श्रीनगरला पोहोचण्यासाठी सात दिवसाचा कार्यक्रम बनवला. तो पुढीलप्रमाणे - लेह ते ससपोल, ससपोल ते लामायुरू, लामायुरू ते मुलबेक, मुलबेक ते कारगिल किंवा खारबू, कारगिल किंवा खारबू ते द्रास, द्रास ते सोनमार्ग आणि सोनमार्ग ते श्रीनगर।

गरम पाणी आले होते. दहा दिवसा आधी ८ जूनला गोंदला मध्ये अंघोळ केली होती. तेव्हा पासून नुसता घाम गाळतोय. शरीराला कुठेहि हाथ लावला तरी मळ निघतोय. नाक खूप जळाले होते. साबण लावला तर आग होत होती. मग ठरवले कि, श्रीनगर पर्यंत अजिबात तोंड उघडे ठेवायचे नाही. श्रीनगर इथून ४३४ किलोमीटर वर आहे.

अंघोळ झाली पण आता प्रश्न पडला कपड्याचा. दहा दिवस झाले, एकच जोडी घालत होतो. मी तसे कपडे आणले होते. पण माझी बुद्धी कुठे चरायला गेली होतो कुणास ठाऊक!! पैकिंग करताना दोन जोडी हाफ पैंट आणि हाफ टी-शर्ट भरलं. लद्दाख मध्ये शरीराचा कोणताही भाग उघडा ठेऊन चालत नाही. खूप खतरनाक असतं. पैण्ट पण घालू शकत नव्हतो. कारण दिवसभर सायकल चालवून पायाचे गुडघे दुखले असते. आता राहिले फक्त लोवर. जे मी मागच्या दहा दिवसापासून घालत आलोय. मग मी लोवर च्या वरती हाफ पैण्ट घातली. मग माझा लूकच चेंज झाला.

लद्दाख मध्ये, थंडी पेक्षा उन खूप खतरनाक असतं. सायकल चालवताना समोरचे हाताचे पंजे,हे सारखे सूर्या समोर असतात. सुरुवातीला न हाथमौजे घातले न क्रीम लावली. दोन्ही जळाले. जेव्हा जळून कातड निघालं तेव्हा तेव्हा कुठे क्रीम लावायला सुरुवात केली. आता ठरवलं कि हाथमौजे घालूनच इथून पुढचा प्रवास करायचा.

दहा वाजून चाळीस मिनिटांनी ह्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. पहिल्या टप्प्या पेक्षा हा टप्पा सोपा आहे. रस्त्याने लोक वस्ती पाहायला मिळेल आणि रस्ता पण चांगला मिळेल आणि जास्त करून खाली उतरायचे आहे त्यामुळे उतार पण मिळेल. मुख्य बाजार मध्ये एक दुकान आहे. तिथे मैदानी भागासारखे जेवण मिळते. जनेवरी महिन्यामध्ये पण हे दुकान उघडे होते. तिथे चहा आणि सामोसे खाल्ले.

मुख्य चौकापासून तीन किलोमीटर लांब उतार आहे. इथून उजव्या हाताला एक रस्ता मनालीला गेला आहे आणि एक पुढे सरळ श्रीनगरला. उतार होता. पहिले थेंब थेब पडत होते. आता जोरात पाउस येऊ लागला. थोडा वेळ थांबलो. रेनकोट घातला आणि पुढे निघालो.

इथून दूर दूर पर्यंत मिलिटरीवाल्यांचे ठिकाणे आहेत. अश्या ठिकाणी, फोटो काढू नाही शकत. पिटुक गोनपा पहिला बघितला होता. त्यामुळे उताराने सरळ पुढे गेलो. रस्त्यामध्ये ईण्डेनची गैस एलपीजी बोटलिंग कंपनी दिसली. तिथ लिहिलं होतं. जगातील एकमेव अधिक उंचावरील बोटलिंग कंपनी, उंची ११८०० फुट.

लेह ३४०० मीटर उंचावर आहे. त्यानंतर उतार सुरु होतो. उताराने खाली आल्यावर तिथे उंची ३२०० मीटर पर्यंत खाली येते. त्यानंतर दहा किलोमीटर पर्यंत परत चढाई आहे. हि चढाई सर्पाकार नाही तर उलट सरळ आहे. पत्थर साहिब च्या दो किलोमीटर अलीकडे तसीच राहते आणि आपण ३५३५ मीटर पर्यंत जाउन पोहोचतो. इथून सिन्धु नदी लांब जाते आणि नंतर दिसत पण नाही. हे चढाईचे, १० किमी अंतर पार करण्यासाठी दोन तास लागले.

गुरुद्वारा पत्थर साहिब लेह पासून पंचीवीस किलोमीटर लांब आणि समुद्रसपाटी पासून ३४७३ मीटर उंच आहे. म्हणतात कि, गुरू नानक देव इथे सन १५१७ मध्ये आले होते. इथले लोक एका राक्षसाच्या त्रासामुळे चिंतीत होते. त्यांना चिंतामुक्त करण्याचे काम नानकदेवजीनि केलं होतं. राक्षस ज्या डोंगरावरती राहत होता. त्या डोंगरा खालीच बसले. राक्षस हैराण झाला. त्याने एक मोठा दगड, वरून गुरुजींच्या अंगावर फेकला. पण गुरूजीना काहीच झाले नाही उलट गुरुजींची शरीराची आकृती त्या दगडावरी उमटली. ती आकृति अजून सुद्धा त्या दगडावरती आहे. तोच दगड तिथे आहे बाकी काही नाही.

गुरू नानक पण खूप हिंडफिरे होते. ज्या वेळेस भारतामध्ये मुसलमानाचे राज्य होते त्या वेळेस त्यांचा जन्म झाला. मक्का मदीना पासून तिब्बत पर्यंत तसेच यारकन्द पासून श्रीलंका पर्यंत फिरले. गुरूद्वारा खूपचं छान आहे. एक छोटा लंगर भेटला.चहा आणि हलव्याचा. त्यावेळेस आकाश्या मध्ये काळे ढग होते. जोराची हवा होती आणि पावसाचे थेंब पडत होते. अश्या वेळेस लद्दाखचं तापमान खूप खाली जातं. गुरूद्वारे मध्ये टाकलेल्या मोठ मोठ्या गाद्यांमुळे चालायला आनंद वाटत होता.

अर्ध्या तासानंतर तिथून निघालो. उतार होता रस्ता पण छान. काही दिवसापासून अश्या रस्त्या साठी मी तरसत होतो. त्यामुळे सायकलच्या ब्रेक वरून हात काढला आणि सायकल जोरात दामटली. एका ट्रक ला मागे टाकून कारच्या मागे लागलो. कार मध्ये बसलेले पर्यटक, मागे वेगात पाठलाग करणारी सायकल बघून हैरान झाले. मैग्नेटिक हिल वरती कार थांबली आणि मी पुढे गेलो. एकतर मौसम खराब होत चाललं होत, त्यात उतार. म्हणून मैग्नेटिक हिल वरती थांबलो नाही.

निम्मू च्या तीन किलोमीटर आधी सिन्धु-जांस्कर चा संगम पाहायला मिळतो. जानेवारी मध्ये जांस्कर नदी पूर्ण गोठलेली असते. आता तिथे खूप पर्यटक मस्ती करत होते. इथून निम्मू पर्यंत नदी शान्त होऊन वाहते. त्यामुळे राफ्टिंग पण करता येते. भूक लागली होती. निम्मू मध्ये खायचा होतं. गांव पार करून उजव्या हाताला एक गेस्ट हाउस दिसलं. तिथे जेवायला पण मिळते. दोन परांठे व चहा ची ऑर्डर दिली. लद्दाख मध्ये गेस्ट हाउस ची परम्परा, मला खूप आवडली. माझ्या सारख्या लोकांसाठी ते महाग असतात पण पैसे पूर्णपणे वसूल होऊन जातात. एकदम लद्दाखी घरासारखे राहण्याची सोय असते, शेती असते, बाग बगीचे असतात. मला इथे थांबायचे नव्हते पण जेवण ह्या वातावरणात केलं. खूप मस्त वाटले.

अर्ध्या तासानंतर म्हणजे बरोबर पौने चार वाजता इथून निघालो. निम्मू समुद्र सपाटी पासून ३१३० मीटर उंच आहे. सिन्धु नदीच्या किनाऱ्या वरती. दुसऱ्या गावासारखेच इथे पण सिन्धु नदीचा चांगला उपयोग करून झाडे झुडपे लावली आहेत. जी आपल्या डोळ्याला थंडक देतात. आणि म्हणतात न चांगले दिवस जास्त वेळ राहत नाही. वाईट दिवस खूप लांबले जातात. तसच इथे झालं. निम्मू नंतर चढाई सुरु झाली आणि बासगो नंतर तर अजूनच चांगली चढाई आहे. वाटलं होतं कि, रस्ता सिन्धु नदीच्या बरोबरीने आहे तर उतारच मिळेल. पण प्रत्याक्ष्यात तसे नाही. बासगो नंतर सिन्धु नदी दक्षिने कडे वाहते. नंतर परत वळून उत्तर पश्चिम होते आणि ससपोल पर्यंत उत्तरपश्चिमीच राहते. जर तुम्ही बासगो ते ससपोल चा नकाशा बघितला तर सिन्धु नदी ‘यू’ आकारात दिसते. म्हणून हे अंतर कमी करण्यासाठी बासगो वरून सरळ ससपोल पर्यंत रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे झाले काय कि, रस्ता हा पहिल्यांदा वरती चढतो मग खाली उतरतो. बासगो मध्ये सिन्धु नदी दिसते. नंतर परत ससपोल मध्ये दिसते. बाकी मधी रस्त्यात कुठेच दिसत नाही.

बासगो जवळजवळ ३२०० मीटर उंचीवरती आहे. त्यानंतर चढ सुरु होतो. तीन चार वळण घेतल्या नंतर एक मोठे मैदान पाहायला मिळते. आणि त्यातून मधून सरळ जाणारा रस्ता पाहायला मिळतो. जर तुम्ही गाडी वरून गेलात तर एक सारखे मैदान दिसेल पण जर सायकल वरून गेला तर चढ वाटेल. बासगो वरून १० किलोमीटर पर्यंत चढाई आहे नंतर उतार सुरु होतो. जो ससपोल पर्यंत जाउन संपतो. बरोबर चढाच्या मध्यभागी उंची ३५२० मीटर आहे आणि ससपोल ला ३०९० मीटर.

हे मैदान एकदम ओसाड निर्मनुष्य आहे. कोणतेच गांव नाही, कोणतीच लोकवस्ती नाही. हां, आकाशवाणी चा एक टावर अवश्य आहे. इथून एक दुसरा रस्ता आहे जो ना-ला घातला पार करून हुण्डुर पर्यंत जातो. रस्त्याचे काम चालू आहे. हा रस्ता पूर्ण झाला तर कश्मीर वरून नुब्रा घाटी ला जाण्या साठी लेह ला जायची गरज राहणार नाही. अंतर पण खूप कमी होईल. ना-ला घाट जवळ जवळ ५५०० मीटर उंच आहे.

बासगो नंतर पानी कुठेच भेटले नाही. चढाई वरती पाण्याची खूप गरज असते. बाटली खाली झाली होती. मैदानं मध्ये रस्त्याच्या कडेला एक टैंकर उभा होता. सरदारजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून सुर्यास्थाचा आनंद घेत होता. इथे टैंकर उभा राहिला याचा अर्थ एकच आहे कि, नक्की खराब झाला असणार. मी पाणी मागितलं. सरदारजीने पंजाबी ग्लासा मध्ये ठण्ड पानी भरून आणलं आणि बाटली भरून दिली. त्यांनी सांगितलं कि तीन दिवसापासून गाडी खराब आहे. उद्या ठीक व्हायची आशा आहे. त्यांच्या बरोबर सोळा सतरा वर्ष्याचा मुलगा पण होता. त्यांनी सांगितलं कि, सुट्या पडल्यात. चल म्हटले ट्रक वरती लद्दाख ची चक्कर मारून येऊ. मी म्हटलं खूप चांगला काम केलं तुम्ही. या भारतात लदाख पेक्षा दुसरी कोणती जागाच नाही फिरण्यासाठी. त्यांनी थांब आणि जेऊन जा म्हणून सांगितले. पण मी धन्यवाद देऊन तसाच पुढे निघालो.

पांच वाजून बावन मिनिटाला बासगो आणि ससपोल चा सर्वोच्च उंचीचा बिन्दु पण पार केला. इथून पुढे १३ किलोमीटर लांब ससपोल ला पोहोचण्यासाठी ४८ मिनट लागले आणि ह्याच वेळेत मी खूप सारे फोटो पण काढले. रस्ता चांगला होता. स्पीड पण मिळाला होता. एक फाटा मिळाला. तिसरा रस्ता लिकिर गोम्पाला जात होता. हा गोम्पा लद्दाख मधला मोठ्या गोम्पा मधला एक आहे. वेळ नव्हता म्हणून गेलो नाही.

जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात आणि भाजी.

ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत नव्हता. अल्ची ला जायची माझी इच्छा पण नाही.


लेहचा मुख्य चौक. डाव्या बाजुला मनाली, सरळ श्रीनगर


जगात सर्वात ऊंच बोटलिंग प्लांट


गुरुद्वारा पत्थर साहिब


पत्थर साहिब वरुन निम्मु चा नजारा


हाच तो दगड. दगडावरिल आक्रुति गुरुजिन्चि आहे.


मन्दिराच्या आत मधे


गुरुजी कुथे कुथे फिरले त्याचा नकाश्या


माझी सायकल पण भारी आहे.


सिन्धु नदी


सिन्धु आणि जांस्करचा संगम. डाव्या बाजुला सिन्धु, समोर जांस्कर.


निम्मू


बासगो च्या नन्तर चढाई


आता हा राजमार्ग १ आहे. पहिला १D होता


लद्दाखी भाशेमधे लिहिले आहे. ससपोल 12 किलोमीटर


ससपोल मधे गेस्ट हाउस


माझ्या खोलीच्या खिडकीमधुन

पुढच्या भागात काय.....???
मूनलैण्ड चे जबरदस्त फोटो ....त्यातला एक फोटो.

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

11 Feb 2016 - 4:10 pm | चांदणे संदीप

माझी सायकल पण भारी आहे.

तुमच सगळच लय भारीय राव! ;)

Sandy

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2016 - 4:12 pm | पिलीयन रायडर

तुमचा तो हिंडफिरा शब्द मला फार आवडतो!!!

हा ही भाग मस्तच!!! जायलाच हवं इकडे.. तुमची लेखमाला वाचुन बहुदा लवकरच ट्रिप करण्याचे ठरणार...!

आयुष्यात एकदातरी घ्यावाच असा अनुभव! मस्त सफर. पुभाप्र!

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Feb 2016 - 6:24 pm | स्वच्छंदी_मनोज

जबरी.. ह्या भागातले फोटो विषेश आवडले. इकडे जायला मिळेल तो सुदीन.

आदूबाळ's picture

11 Feb 2016 - 7:55 pm | आदूबाळ

व्वा!