लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
4 Feb 2016 - 9:21 am

संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....

दिवस सातवा

सकाळी साडे पांच वाजता उठलो. शेजारच्या तंबू मध्ये मेरठ वरून आलेले शेजारी आज जायच्या तयारीत होते. त्यामुळे खूप गोंधळ चालू होता. त्यांच्या गोंधळाने मला पण जाग आली. तंबू च्या बाहेर येउन बघितले तर समोर सचिन उभा होता. माहिती पडले कि, तो पण खूप थकला होता. काल तो जिस्पा मध्ये थांबला होता. गेमूर पासून ५ ते ६ किमी पुढे. एका दिवसात १००० मीटर वर चढल्यामुळे त्याची हालत पण खराब झाली होती.
इथून सूरजताल १३ किलोमीटर आणि बारालाचा १६ किमी आहे. म्हणजे अजून १६ किमी वर चढायचे आहे. नाश्ता करून साडे सात वाजता बाहेर पडलो. आज ४७ किमी लांब सरचूला पोहोचायचे आहे. इथून निघतो नाही तोच चढाई सुरु झाली. रस्ता चांगला होता. पुढे गेल्यावर एक ओढा पार करावा लागला. ओढ्याला पाणी खूप होते. पण ओढा पसरट असल्याने पाण्याला धार नव्हती. पण पाणी इतके थंड होते कि आईच आठवली. थोडावेळ तर आपले पाय कुठाय ते शोधत होतो. इथे ट्रेकिंग करणारे ओढ्याबरोबर वर चढत होते. मला कळून चुकले कि ते चन्द्रताल ला चाललेत. तिथे पोहोचायला अजून भरपूर दिवस लागतील. रस्त्या मध्ये बर्फ तर इथूनच सुरु झालाय. चन्द्रताल पर्यंत तर बर्फातच चालायला लागणार.

थोडे पुढे गेल्यावर गाड्यांची रांग लागली होती. या प्रवासात एवढे कळून चुकले होते कि, गाड्यांची रांग याचा अर्थ जास्त प्रवाहाचा ओढा. पुढे जाऊन बघितले तर जोरात पाणी वाहत होतं. शेजारीच एका पुलाचे काम चालू होते. तासाभरात काम पूर्ण होईल असे वाटत होते. याच भरवश्यावर बाकीच्या गाड्या थांबल्या होत्या. कोणीही त्या ओढ्या तून जायची हिम्मत करत नव्हतं.

आमच्या सारख्या सायकलवाल्यांच तर नेहमी कौतुक होतं. संधी मिळताच लोक आमच्याशी बोलू लागतात, फोटो काढून घेतात. इथे पण असंच झालं. गुजराती कुटुंबांनी मला घेरलं. माझ्या सोबत फोटो काढून घेतले. माझी सायकल चालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी पण त्यांना सायकल चालवू दिली. ते जो पर्यंत सायकलचे मजे घेत होते. तो पर्यंत पुलाचे काम अर्धे झाले होते. आता इथून आपल्याला जाता येऊ शकते असा अंदाज आला. मग मी सायकल घेऊन पुलावर चढलो. माझ्या आधीच माझी सायकल पडयाल गेली होती. कामगारांनी आपले काम केले होते. सचिन चे पण तसेच झाले. पुढे गेल्यानंतर मी मागे वळून बघितले तर एक गाडी पाण्यामध्ये फसली होती. गाडीवाल्याचा आघाव पणा त्यालाच नडला होता. आम्ही खूप पुढे निघून गेलो तरी ती गाडी अजूनही तिथेच दिसत होती.

सचिन एक चांगला सायकलस्वार आहे. त्याने मुंबई ते गोआ , तसेच मुंबई ते औरंगाबाद सायकल चालवली आहे. डोंगर दऱ्यातून सायकल चालवायचा त्याला खूप अनुभव आहे. मी मात्र नीलकण्ठ ची एकदिनी यात्रा शिवाय कुठेच सायकल चालवली नाही. त्यामुळे तो माझ्या पुढेच राहिला.
बारालाचा च्या आधी ६ किमी पासून बर्फाच जंगल सुरु होतं. मग बर्फ हटवून तिथे रस्ता बनवला जातो. मग चढाई असली तरी सायकल चालवायला मजा येते. इथे थांबून काही फोटो काढून घेतले.

सव्वा अकरा वाजता सूरज ताल ला पोहचलो. समुद्र सपाटी पासून 4770 मीटर उंच. म्हणजेच आम्ही १५६४९ फुट उंचीवर होतो. इथून बारालाचा ३ किमी आहे. एका छोट्या तलावाच्या चार हि बाजूने बर्फाचे डोंगर होते. तलावामध्ये पाण्याचं बर्फ झालं होतं. जर बर्फा ऐवजी पाणी असते तर तो तलाव खूपचं छान दिसला असता. आपल्या चार हि बाजूने बर्फच बर्फ असेल आणि त्यात कडक उन असेल तर कुणाची हिम्मत कि बिना चष्म्याचा डोळे उघडे ठेऊ शकेल. फोटो काढण्यासाठी चष्मा काढणे आवश्यक होते. पण काढू नाही शकलो. अंदाजाने फोटो काढले. तरी फोटो चांगले आले. मला मैनुअल फोटोग्राफी येत नाही. आपलं कॅमेरा ऑटो मोड ठेऊन दणादण क्लिक करत राहायचे.
थोड्या अंतरावर एक पत्र्याचे शेड दिसत होतं. मनात म्हटलं हेच बारालाचा-ला आहे. तिथे गेल्यावर खरे खोटे कळाले. बारालाचा-ला तर अजून लांब आहे.

बारालाचा ४९०० मीटर (१६०७६ फुट) उंचीवर आहे. मी आता ४८५० मीटर उंचीवर होतो. ह्या प्रवासात अजून पर्यंत मी एवढ्या उंचीवर आलो नव्हतो. खूप दम लागला होता. उंच पर्वतीय आजार झाला होता. शरीर खूपच कमजोर झालं होतं. भूख पण लागली होती. मी तिथेच बसलो. काजू, बदाम आणि मनुके खाल्ले. अर्धा तासानंतर तिथून पुढे सरकलो. पावणे एक वाजता बारालाचा-ला पोहचलो. बारालाचा रोहतांग पेक्षा १००० मीटर उंच आहे. त्यामुळे बर्फ असणार यात काही वादच नाही. असे असले तरी उंची आणि बर्फ याचा काही संबंध नाही. लदाख मध्ये उंची आहे पण जास्त बर्फ बघायला मिळत नाही.

बारालाचा-ला नंतर रस्ता जाम खराब आहे. बर्फा मुळे रस्त्या वरती पाणीच पाणी होतं. दीड वाजता भरतपुर (४७०० मीटर) ला पोहोचलो. इथे पण रहायची आणि खायची व्यवस्था चांगली आहे. बुलडोजर रस्त्यावरचा बर्फ काढत होता. तिथेच सचिन भेटला. तो खाऊन पिउन निघायच्या तयारीत होता. मी दुकानदाराला डाळ आणि भात सांगितला. पण भात तयार नव्हता. म्हणून ब्रेड आणि आम्लेट खाल्ले. खूप थकलो होतो. म्हणून अर्धा एक तास आराम करावा या हिशोबाने तिथे पडलो. सचिन ला सांगितले कि, तू जा आपण सरचू मध्ये भेटू. सचिन मग सरचू ला गेला. सरचू इथून 25 किमी आहे.

अर्ध्या तासान उठलो. खूप फ्रेश वाटत होतं. आता इथून सरचू पर्यंत पूर्ण पणे उतार होता. पण खराब रस्त्यामुळे त्या उताराचा पण काही फायदा झाला नाही. सारखे ब्रेक दाबून दाबून सायकल ला झटके बसत होते. भीती वाटत होती कि, एखादा नट बोल्ट तुटून बाहेर पडतो कि काय!! सर्व भर हातावरच होता. हाताला पण चांगले झटके बसत होते.

भरतपूर पासून सहा किलोमीटर वरती किलिंग सराय आहे. नावच खूप भयानक आहे. का ते माहित नाही. किलिंग सराय म्हणजेच हत्यारी सराय. हे एका मोठ्या मैदानापाशी आहे. बीआरओ चे मुख्य ठिकाण आहे. राहण्याची आणि खाण्याची चांगली सुविधा आहे. भरतपुर मध्ये जेवल्यामुळे इथे थांबलो नाही. किलिंग सराय पासून सरचू १९ किलोमीटर आहे. रस्ता चांगला आहे. मधेच १ ते २ किमी खराब आहे. कामगार जिथे रस्ता खराब आहे तिथे नीट करण्यासाठी रखडत होते. ह्याच रस्त्यावरती सचिन भेटला. पंक्चर काढीत बसला होता. त्यांनी सांगितले कि, मागच्या ब्रेक मध्ये प्रोब्लेम आहे. ब्रेक लागत नाही नीट. मी व्यवस्थित बघितले तर, कैरियर बैग ब्रेक वरतीच आधांतरित होती. त्यामुळे ते ब्रेक ला आपले काम करू देत नव्हते. त्याला म्हटले आता आपण काही करू शकत नाही. पुढे सरचू ला गेल्यावर बघू. काय करायचे ते.
पुढे गेल्यावर मग अजिबात वळणे नाही. एकदम सरळ रस्ता. त्यात उतार..अजून काय पाहिजे.
जवळ जवळ १५ किलोमीटर सरचू पर्यंत असंच होतं. बराबरीन एक नदी वाहत होती. किनाऱ्याला साचलेल्या माती मुळे ती अजूनच खोल वाटत होती. तिचे दोन्ही किनारे मातीमुळे उभे राहिले होते. त्याच्या वरची वेग वेगळ्या आकृत्या तयार झाल्या होत्या. खूपच वेगळ्या वाटत होत्या.
रस्ता सरळ का होतं तर ते एक मोठे मैदान होते. डोंगर हे लांब लांब होते. त्यामुळे या मैदानावर्ती लोकांनी तंबू ठोकले होते आणि घरे बनवली होती राहण्यासाठी. ७ वाजता सरचू ला पोहोचण्याचे ठरवले होते पण या मैदाना मुळे ६ लाच पोहोचलो.
इथे पण सचिन माझ्या पुढेच राहिला. सरचू च्या १ किलोमीटर अलीकडे भेटला. म्हटला कि, खूप महाग आहे सरचू. इथे ५०० रुपयाला एक बिस्तर. इथे एकाच दुकान होतं. मी म्हटलं हे सरचू नाहीच आहे. ह्या वळणामुळे आपण फसलो असेल. सरचू पुढे आहे. कारण सरचू तर ह्या रस्त्यावरील महत्वाचा थांबा आहे. जसं आम्ही पुढे गेलो तस आम्हाला खूप हॉटेल आणि दुकाने दिसली.

सरचू मानली पासून २२२ किमी दूर आहे. आणि इथून लेह २५२ किमी दूर. सरचू ला मनाली ते लेह मार्गाचं मध्यबिंदू म्हणतात. ट्रकवाले, बसवाले इथे एक रात्र थांबतात. एका हॉटेल मध्ये गेलो. २०० रुपये एका बिस्तर चे. खूप महाग वाटले. पुढे गेल्यावर एका नेपाल्याच्या इथे १०० रुपयाला बिस्तर भेटले. तिथे जेवण इतके खास होते कि, असे मी कुठे खाल्ले नव्हते. जिरा बटाटा, डाळ आणि लोणी लावलेल्या रोट्या. सरचू समुद्र सपाटी पासून ४३०० मीटर उंची वरती आहे. तरी पण गरम होत होते.
अंगावर चादर घेऊन झोपलो. पण झोप काही लागेना बाहेर तोंड काढले कि नाकाला गार हवा लागायची. उंची वरती नाक कोरडे पडते. आणि चादर च्या आत डोके घेतले तर कमी हवे मुळे श्वास कोंडायाचा.
रात्री ११ वाजता एक बस आली. रस्त्यामध्ये ती खराब झाली होती. म्हणून तिला उशीर झाला. हॉटेल वाल्याने डाळ भात द्यायला मनाई केली. मग म्हस्का पाणी लावल्यावर तो तयार झाला. वीस लोकांचे जेवण बनवलं. नंतर काही दुसरी कडे झोपायला गेले. काही इथेच तंबू च्या बाहेर पडले. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे झोपला. त्यांच्यात एक जपानी पण होता. त्याने तिथेच बाहेरच्या बाहेर जागा बनवली आणि चादर घेऊन झोपला. अश्या तऱ्हेने प्रवास मधला अजून एक दिवस संपला.


जिंगजिंगबार


ह्या ओढ्याची रुंदी खूप मोठी होती. फोटो सचिन न काढला.


खूप वेळ लागला हा ओढा पार करायला.


ओढा पार केल्यानंतर पायाची मालिश. मागे काहीजण जण वरती चालले आहेत. ते आता चन्द्रताल ला जातील.


ओढ्या मध्ये फसलेली गाडी


बारालाचा-ला कडे


मागे वळून बघितल्यावर


बारालाचा च्या खूपच आधी पासून बर्फ सुरु झाला.


मागे वळून बघितल्यावर


एवढ्या अवघड ठिकाणी सायकल? लोक गाडी तून उतरून फोटो काढून घेत होती.


मागे वळून बघितल्यावर


सूरजताल चे पहिले दर्शन


सूरजताल - इथून बारालाचा ३ किमी आहे.


सूरजतालच्या बरोबरीन जाणारा रस्ता


तुटलेले शेड


लोकांचा फालतूपणा


बारालाचा-ला


बारालाचा नंतर भरतपूर पर्यंत असाच रस्ता आहे.


भरतपुर जवळ एक तलाव


सचिन पंक्चर काढताना


सरळ धोपट उताराचा रस्ता


ह्या अश्याच रस्त्यामुळे, एक तास आधी आम्ही सरचू ला पोहोचलो.


‘सरचू’ नदी


नदी च्या कडेने अश्या आकृत्या बनल्या आहेत.


रस्त्याच्या कडेने अश्या तंबूच्या खोल्या बनवल्या आहेत. खूप खर्चाचे आहे हे.


सरचू च्या ६ किमी आधी.


सरचू


सरचू मध्ये सूर्यास्थ

(क्रमशः)
पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Feb 2016 - 9:33 am | प्रचेतस

अफाट सुंदर आहे हे.

राजकुमार१२३४५६'s picture

4 Feb 2016 - 10:44 am | राजकुमार१२३४५६

धन्यवाद!!

मयुरMK's picture

4 Feb 2016 - 10:54 am | मयुरMK

जबरदस्त इच्छाशक्ती

एस's picture

4 Feb 2016 - 10:56 am | एस

जबरदस्त!

अशक्य सुंदर, साला मी काय करतोय रोजच्या आयुष्यात असं वाटतय :(

sagarpdy's picture

4 Feb 2016 - 5:36 pm | sagarpdy

+१

भारी वाटतंय. मस्त लेखमाला.

अजया's picture

4 Feb 2016 - 12:18 pm | अजया

:(मलापण
फार सुंदर.
ग्लेशियरजवळ टाकलेला कचरा बघून वाईट वाटते आहे.

वेल्लाभट's picture

4 Feb 2016 - 12:41 pm | वेल्लाभट

कचकावून!!!!!

कधी जाईन असं झालंय

पिलीयन रायडर's picture

4 Feb 2016 - 1:38 pm | पिलीयन रायडर

एक तर नीरज जाट हा मनुष्य महान असला पाहिजे. त्यात तुम्ही सुद्धा भारीच आहात. अगदी सगळे भाग अनुवाद करुन टाअकत आहात. फोटो.. कॅप्शनसकट.. नकाशावर मुक्काम दाखवलेले.. पुष्कळच मेहनत घेत आहात. तुमचेही फार कौतुक वाटले..

जायलाच हवं इथे.. प्रश्नच नाही..

स्वच्छंदी_मनोज's picture

4 Feb 2016 - 4:22 pm | स्वच्छंदी_मनोज

हेच म्हणतो.

नीरज जाट चे तर प्रचंड कौतुक आहेच पण त्याच तोडीने तुम्हालाही अनेक धन्यवाद कारण हे सर्व तुम्ही आमच्या पर्यंत पोचवत आहात आणी ते सुद्धा बारीक डीटेल्ससकट.

राजकुमार१२३४५६'s picture

4 Feb 2016 - 8:02 pm | राजकुमार१२३४५६

धन्यवाद !!

यशोधरा's picture

4 Feb 2016 - 3:40 pm | यशोधरा

अफ्फाट! सुरेख अहेत फोटो!
इतक्या अद्भूत ठिकाणीही माणसाला कचरा केल्याशिवाय राहावत नाही! :(

सूड's picture

4 Feb 2016 - 8:47 pm | सूड

हॅट्स ऑफ!!

नीलमोहर's picture

5 Feb 2016 - 2:26 pm | नीलमोहर

इथे प्रत्यक्ष कधी जाणे होईल की नाही माहित नाही पण तुमच्यामुळे उत्तम माहिती, फोटो बघायला मिळत आहेत, बसल्याजागी हा सर्व प्रवास केल्याचा फील येत आहे, लेखमालेसाठी धन्यवाद.